THIS IS CALLED JIWAN PART 7 LAST in Marathi Love Stories by Dilip Bhide books and stories PDF | ह्याला जीवन ऐसे नाव - भाग ७ (अंतिम )

Featured Books
Categories
Share

ह्याला जीवन ऐसे नाव - भाग ७ (अंतिम )

भाग ७

भाग ६  वरुन पुढे  वाचा ..............

 

पंडित नी काही न बोलता त्यांच्या ऑफिस मध्ये फोन लावला. पंडितचा फोन आला म्हंटल्यांवर सर्वांनाच बोलायचं होतं. अर्धा तास सगळ्यांचं समाधान करण्यात गेल्यावर  मग पंडितनी मॅडम चा प्रॉब्लेम सांगितला  आणि क्लेम सेट्टल करता येतो का ते पहायला सांगितलं. पंडित जवळ जवळ तासभर अस्खलित इंग्रजी मध्ये अधिकारवाणीने बोलत होता आणि मॅडम त्यांच्याकडे चकित नजरेने पहात होत्या.

“माझ्या मित्राला सांगितलं आहे, बघू तो काय करतो ते.  तुम्ही आता आराम करा मी आता संध्याकाळच्या तयारीला लागतो. आज काय करू ?” – पंडित.  

“अरे, तू जे काही करशील ते मला आवडतंच. काहीही कर.” – मॅडम

संध्याकाळी मॅडम ला मेसेज आला की त्यांचा क्लेम अप्रूव झाला आहे.

गेल्या महिन्यायाभरात आणखी एक development झाली होती. मॅडम आणि पंडित बरोबर एकाच टेबल वर जेवायला बसायला लागले होते. जेवतांना मॅडमनी विचारलं की

“पंडित तू असा कोणाला फोन केला होतास, की दोन तासात approval चा sms आला? तुझी इतकी पोहोच कशी? दर वेळेला टाळाटाळ करतोस आज तरी सांग.”  

पंडितलाही वाटलं की आता सगळं सांगूनच टाकाव. परिणाम काहीही होवोत. मग त्यानी सुरवाती पासून सगळी कथा सांगितली. आणि रूम मध्ये जाऊन आपलं id card आणलं आणि मॅडम च्या समोर ठेवलं. आणि म्हणाला- 

“तुमचं मेडीक्लेम ज्या कंपनीत आहे, त्याच कंपनीत मी काम करत होतो.”

मॅडम त्याच asst. general manager च कार्ड बघतच राहिल्या. त्यांना समजेना, की या पदावर असलेला माणूस अचानक नोकरी सोडून आपल्या कडे चौकीदार, आणि कुक म्हणून काम करत होता? का?

तिच्या चेहऱ्यावरचे भाव आणि मनातले विचार पंडितने ओळखले आणि म्हणाला-

“मला जेंव्हा धोब्याने कामाची ऑफर दिली तेंव्हा मी सर्दच झालो होतो पण माझं माझ्या कपड्यांकडे लक्ष्य गेलं आणि मनात विचार आला की काय हरकत आहे, नाही तरी अनुभव घ्यायलाच निघालो आहोत. म्हणून मी हो म्हंटलं. त्यानंतर मात्र प्रवाह पतिता सारखा, जसं आयुष्य वळण घेत होतं, तस तसा जात राहिलो. आता अजून एका मोठ्या वळणाची वेळ आली आहे. मी उद्याच एका हॉटेल मध्ये शिफ्ट होतो. इथे राहण्यात आता काहीच शहाणपणा नाहीये, आणि प्रयोजन तर मुळीच नाही. Forgive me for everything. जर मी तुम्हाला जाणता, अजाणता दुखावलं असेल तर, I am sorry.

थोडा वेळ कोणीच बोललं नाही मग मॅडम म्हणाल्या –

“तू आता जे काही सांगीतलस ते फक्त तुला आणि मलाच माहीत आहे. तेंव्हा मला आठ दिवस आणखी दे. तो पर्यन्त मी नवी कुक शोधते. मला तुझे पुढचे प्लॅन्स काय आहेत ते पण ऐकायचे आहेत. They must be interesting. पण त्या बद्दल आपण नंतर बोलू. सध्या तरी तुझी आहे ती भूमिका चालू ठेव अशी मी तुला विनंती करते. I request, please.”

मॅडम नी please म्हंटल्या मुले पंडितला होकार द्यावाच लागला.

पण दूसरा दिवस रविवार होता आणि बऱ्याच घटनांचा साक्षीदार बनणार होता. सकाळीच मॅडमच्या प्रकृतीची चौकशी करायला, मॅडम ची खास मैत्रीण विशाखा आणि तिचा नवरा आला. थोडा वेळ बोलणं झाल्यावर मैत्रिणीने विचारलं-

“शीला, अग तुझा पाय मोडला, आणि जवळ जवळ ३ महीने तू बेड वर होतीस, एवढं असूनही तुझा भाऊ साधी चौकशी करायला पण आला नाही ? लखनौ ला असला म्हणून काय झालं, यायचं त्याचं कर्तव्य होतं.”

“कंपनीत खूप काम आहे सुट्टी मिळत नाही अस म्हणाला.” – मॅडम.

“अग मग तुला तरी घेऊन जायचं. ते ही नाही. काय भाऊ आहे.” – विशाखा  

“Actually तो जिथे paying guest म्हणून रहात होता, त्यांच्याच मुलीशी त्यानी लग्न केलं, हे तर तुला माहितीच आहे, आता त्या घरात त्याचे सासू, सासरे, हे दोघं आणि त्यांचा मुलगा इतके सारे जण राहतात. माझ्याकरता तिथे जागाच नाहीये. म्हणून तो मला नेऊ शकत नाही, अस म्हणाला.” – मॅडमनी सफाई देण्याचा क्षीण प्रयत्न केला.

“याच भावाचा आई वडील गेल्यावर, तू सांभाळ केलास आणि त्याच्याच उज्ज्वल भविष्यासाठी तू लग्न करायचं टाळलस, आस करून, काय मिळालं तुला ? काय साधलस ग ?” विशाखा कळवळून बोलली.

“जाऊ दे ग, उगाच या गोष्टी उगाळून काय फायदा ? Forget it.” मॅडमनी गोष्टी भलत्याच वळणावर जात आहे असं बघून पडदा टाकायचा प्रयत्न केला.

पंडितला ही माहिती नवीन होती. पण तो काही बोलला नाही. तो चहा आणि नाश्ता करायला किचन मध्ये गेला. अजून आठ दिवस तरी त्याला याच भूमिकेत राहायचं होतं. तेवढ्यात कॉल बेल वाजली. तो दार उघडायला जाणार होता पण मॅडमनीच दार उघडलं. दारात एक अनोळखी माणूस उभा होता.

“अरे ! सुधीर असा अचानक ? फोन तरी करायचास.” मॅडम म्हणाल्या.

“बस पाणी देते.” अस म्हणून त्या किचन मध्ये आल्या पंडितला म्हणाल्या की त्यांचा भाऊ लखनौहुन आला आहे तेंव्हा नाश्ता वाढव. आणि त्या पाणी घेऊन हॉल मध्ये गेल्या.

“हं बोल कसं काय ? सगळं ठीक आहे ना ?” – मॅडमनी चौकशी केली.

“हो सगळं ठीक आहे. मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं.” अस म्हणून त्यांनी मॅडमच्या मैत्रिणीकडे पाहिलं.

“अरे हे लोक घरचेच आहेत त्यांना माहीत नाही असं काहीच नाहीये. तू बोल.” मॅडमनी विशाखा कडे बघून म्हंटलं.

“असं पहा ताई, माझं घर आम्हाला आता अपूर् पडतय, तेंव्हा हे तुझं घर विकून तुझ्यासाठी one BHK फ्लॅट घेऊ आणि बाकी रक्कम लाऊन मी three BHK फ्लॅट घ्यायचं म्हणतोय. तुला एकटीला एवढ्या मोठ्या घराची गरज नाहीये, असं वाटलं म्हणून म्हणतोय.”

विषाखालाच राग आला. ती म्हणाली-

“शीलाची गरज काय आहे हे तिला ठरवू दे. तू कशाला ठरवतो आहेस ? हे घर तिनेच बांधलं आहे. वडलोपार्जित नाहीये.”

पंडितला आतापर्यन्त भावा बहिणीच्या संबंधांची तशी माहिती झाली होती. त्याला पण ही गोष्ट जरा विचित्रच वाटली. बहीण दवाखान्यात होती तेंव्हा आला नाही आणि आता येऊन पैश्यांसाठी घर विका म्हणतोय. तो पण म्हणाला-

“एकदम बरोबर बोलल्या तुम्ही, विशाखा मॅडम. ही गोष्ट शीला मॅडमनीच ठरवायला पाहिजे.”

हे ऐकल्यावर सुधीर भयंकर संतापला. विशाखा कडे हात दाखवून म्हणाला-

“ये बात हम भाई बहन के बीच की हैं. आप लोगोंको इसमे बोलनेकी जरूरत नहीं हैं, और हक भी नहीं हैं. आपके लिए अच्छा हैं की आप चुप रहिए. और तू कौन हैं रे? एक अदनासा नौकर. औकात क्या हैं तेरी? ताईचा नवरा असता आणि तो बोलला असतां तर गोष्ट वेगळी होती तुला काय हक्क आहे मध्ये बोलण्याचा ? जाओ अपना काम करो. फालतू आदमी !

पंडित च्या डोक्यात काय चक्र फिरली देव जाणे. पूजेच्या वेळी जशी त्याला

खुन्नस आली होती तशीच ती आत्ता आली. तो एकदम समोर आला. फूलदाणीतलं गुलाबाचं फूल काढून म्हणाला-

“सुधीर भय्या it is a good suggestion.” आणि मग एका गुडघ्यावर टेकून फूल हातात घेऊन शीला मॅडम च्या समोर उभा राहिला. “I love you sheelaa. Will you marry me ?”

प्रसंगाला एकदम अनपेक्षित वळण मिळालं होतं. विशाखा, तिचा नवरा दोघंही पंडित कडे पहातच राहिले. सुधीरची अवस्थाही काही वेगळी नव्हती. त्यानी येतांना, काय काय घडू शकतं यांची मनातल्या मनात उजळणी केली होती त्यात हे कुठेच बसत नव्हतं. याला सामोरं जाण्याची त्याची तयारीच नव्हती. आणि नंतर तर कहरच झाला.

मॅडम पण गोंधळून गेल्या होत्या. पण लवकरच सावरल्या. म्हणाल्या –

“Are you serious ?”

“Yes. I am.” – पंडित.

“Then I say yes.” – मॅडमनी एकदम होकार भरला.

पंडित लगेच किचन मध्ये गेला आणि साखरेचा डबा घेऊन आला, आणि मॅडमच्या हातात दिला. चमचा आपल्याच हातात ठेवला. विषाखाच्या हातावर साखर ठेवली. विशाखा अजूनही भानावर आली नव्हती.

“हे काय ?” ती म्हणाली.

“साखरपुडा. We are engaged.” मॅडमनीच उत्तर दिलं.

सुधीरला कळतच नव्हतं की काय करायला आलो होतो आणि काय होऊन बसलं. त्याचं डोकच चालेना. त्यांनी शांतपणे exit घेण्याचा पर्याय निवडला.

सुधीर गेल्यावर सुद्धा विशाखा आणि तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम होतं. मग शीलाने पंडितची सर्व कथा सांगून खुलासा केला. त्यानंतर मात्र त्या दोघांनाही फारच आनंद झाला. तसंही पूजे नंतर पंडितची चौकीदार आणि कुक अशी प्रतिमा त्यांच्या मनातून पुसल्याच गेली होती. आणि आता खुलासा ऐकल्यानंतर तर प्रश्नच उरला नाही.

ही सगळी माहिती मिळाल्यावर पंडितच्या ऑफिस मधून ती पसरली, आणि दुसऱ्या एका कंपनीने त्याला ऑफर दिली आणि कानपूरला पोस्टिंग पण दिलं. लग्न धूमधडाक्यात पार पडलं. लग्न अर्थात पुरोहितनेच लावलं. एका नवीन जीवनाची प्रेममय सुरवात झाली.

आणि भटकंती?

God knows!

 

समाप्त

*******

 

 

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.