Bavra Mann - 15 in Marathi Love Stories by Vaishu Mahajan books and stories PDF | बावरा मन - 15 - श्वास माझा....

Featured Books
Categories
Share

बावरा मन - 15 - श्वास माझा....

सकाळी वंशच्या डोक्यावर हात फिरवल्याने त्याला जाग आली...

" वंश तुम्ही आता घरी जा... रात्रभर इथे होतात... थोड्या वेळ आराम करा... आम्ही आहे इथे... " मंजिरी

" रिधुची काही हालचाल झाली का..." विराज

" नाही अजून काहिच रिस्पॉन्स नाही... डॉक्टर येतील आता चेक करायला..." वंश

" good morning everyone... " डॉक्टर आत येउन रिद्धीला चेक करतात...

" आशिष रिद्धीला शुद्ध यायला हवी होती आतापर्यंत..." विराज

" हो विराज... पण मी कालही बोललो होतो कि अजून नक्की काही सांगता येत नाही... आजचा दिवस आहे अजून... hope for best... have a good day... " डॉक्टर निघून जातात....

" वंश बाहेर मीडिया आहे... भरपूर काही बोलून झाल आहे..." विराज

" ते होणारच होत... आणि तिलक नंतर आम्ही रिव्हील करणारच होतो... बघू नंतर... " वंश

........................

.................................

काही वेळाने वंश घरी जातो.... लगेच फ्रेश होऊन खाली हॉल मध्ये येतो...

" वंश थोड्या वेळ आराम करायचा होता..." अर्पिता

" नाही मी हॉस्पिटलला जातो आहे... " वंश

" जा तुम्ही... पण आधी नाश्ता करून घ्या..." अर्पिता

" मॉम मला भूक नाही आहे... मी नंतर खाईल..." वंश

" वंश असं करुन कसं चालेल... आम्हांला माहीत आहे तुम्ही काल पासून काही खाल्लं नसणार आहे... त्यामुळे थोडं खाऊन घ्या... मग आपण सोबतच जाऊ हॉस्पिटलला..." राजमातांचा मान म्हणून वंशने दोन बाईट खाल्ले.... त्यानंतर सर्वजण हॉस्पिटल मध्ये निघाले...

........................

...............................

मॅक्सने गाडी हॉस्पिटलच्या बॅक पार्किंगला थांबवायला सांगितली... कारण पुढे सर्व मीडिया जमा झाली होती...

सर्व जण बॅक साईडने आता गेले... रूमबाहेर यशवंत आणि विराज थांबले होते...

" रिद्धींना शुद्ध आली का..." मनिष

" नाही अजून... काहीच रिस्पॉन्स नाही आहे तिचा.." यशवंत

" असं खचून जाऊ नका यशवंतजी... त्यांना लवकरच शुद्ध येईल..." राजमाता

" आम्ही भेटू शकतो का त्यांना.." अर्पिता

" हो... जा ना आत मंजिरी आहे..." यशवंत

अर्पिता , राजमाता आणि संजना आता गेल्या... रिद्धीला बघून मात्र त्यांनाही भरून आलं होत... नेहमी हसरा असणारा तिचा चेहरा आज मलूम पडला होता...

संजना तिला पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटत होत्या... पण त्या दिवशी पाहिलेली रिद्धी आणि आजच्या रिद्धीला बघून त्यांनाही वाईट वाटत होत...

" excuse me sir... डॉक्टरना थोडं बोलायच होत... कोणाला दोघांना आत बोलावल आहे..." नर्स सांगून निघून गेली...

" विराज - वंश तुम्ही दोघे जा..." यशवंतच्या सांगण्यावर दोघे डॉक्टर केबिनमध्ये जातात...

................

.........................

" काय झालं आशिष... काही सिरीयस आहे का.. रिधु बरी आहे ना.." विराज

" हो विराज... रिद्धी out of danger आहे... पण तिचा काहीच रिस्पॉन्स नाही आहे... त्यामुळे तुम्ही तिच्यासोबत बोला... तिला सध्या तिच्या आयुष्यात काय चालू होत याच्या बद्दल सांगा... कदचित त्यामुळे ती रिस्पॉन्स देईल..." आशिष

" आणि त्यामुळे जर तिला काही त्रास झाला तर..." वंशने शांत आवाजात विचारल तरी त्याच्या आवाजात जरब होती...

" मिस्टर पुरोहित... कधीतरी रिस्क घेऊन जर हाती काही चांगल होणार असेल तर रिस्क घेणं गरजेच असत..." आशिष

" ठीक आहे आशिष... आम्ही बोलतो तिच्यसोबत..." विराज

" फक्त कोणीतरी एकच भेटा..." आशिष सोबत बोलून दोघे बाहेर आले...

...................

..........................

" काय बोलले डॉक्टर..." मनिष

" त्यांनी सांगितल आहे कि तिला आता काय घडतय त्याबद्दल बोला... कदाचित ती रिस्पॉन्स देईल..." विराज

" वंश तुम्ही भेटा तिला..." यशवंत

" नको बाबा... तुम्ही जाऊन बोला... तुमच्यासोबत खूप क्लोज आहे ती..." वंश

" मान्य आहे... पण तिला आता तुमची जास्त गरज आहे..." यशवंत

" बाबा बरोबर बोलत आहे... तुम्ही भेटा तिला..." विराज

" ठीक आहे... बाबा तुम्ही सगळे आता घरी जा हवं तर संध्याकाळी परत या... डॅड तुम्ही पण बाकीच्यांना घेऊन जा..." वंश

सगळे घरी निघून गेले... मॅक्स तेव्हाच आत आला...

" कशा आहेत रिद्धी आता..." मॅक्स

" अजून शुद्ध नाही आली..." वंश

" वंश त्याच नाव रॉकी आहे... त्याला त्याला कोणत्या मुलीने सांगितल होत... पण तो तिच्या विषयी काहीच बोलत नाही आहे...." मॅक्स

" त्याच्या जवळच्यांवर लक्ष ठेवा... कुठे जाता कामा नये..." वंश बोलून रूममध्ये गेला...

नर्स रिद्धीची ड्रीप बदलवत होती... ड्रीप बदलवून ती निघून गेली.... वंश जाऊन तिच्या शेजारी बसला.... कितीतरी वेळ तो तिला न्याहाळत होता...

वेळ जात होती.... पण रिद्धीमध्ये काहीच इम्प्रोव्हमेन्ट होत नव्हती....


राझण ढूड़न मैं चलेया
राझण मिलया ना ये
जिगरा विच अगन लगा के रब्बा
लक़ीरां विच लिख दी जुदाई

खो गया, गुम हो गया
वक़्त से चुराया था जो
अपना बनाया था
हो तेरा, वो मेरा
साथ निभाया था जो
अपना बनाया था

चदरिया झीनी रे झीनी
चदरिया झीनी रे झीनी
आँखें भीनी ये भीनी ये भीनी
यादें झीनी रे झीनी रे झीनी
चदरिया झीनी रे झीनी
चदरिया झीनी रे झीनी
हे आँखें भीनी ये भीनी ये भीनी
यादें झीनी रे झीनी रे झीनी

ऐसा भी क्या मिलना, साथ होके तन्हा
ऐसी क्यों सजा हमने है पाई रांझणा वे
फिर से मुझे जीना, तुझ पे है मरना
फिर से दिल ने दी है ये दुहाई
साजना वे
लकीरों पे लिख दी क्यों जुदाई

हो ओ ग़ैर सा हुआ खुद से भी
ना कोई मेरा
दर्द से कर ले चल यारी
दिल ये कह रहा

खोलूं जो बाहें, बस ग़म ये सिमट रहे हैं
आँखों के आगे, लम्हें ये क्यों घट रहे हैं
जाने कैसे कोई, सहता जुदाइयाँ

चदरिया झीनी रे झीनी
चदरिया झीनी रे झीनी
आँखें भीनी ये भीनी ये भीनी
यादें झीनी रे झीनी रे झीनी
चदरिया झीनी रे झीनी
चदरिया झीनी रे झीनी
हे आँखें भीनी ये भीनी ये भीनी
आँखें भीनी ये भीनी ये भीनी
यादें झीनी रे झीनी रे झीनी
यादें झीनी रे झीनी रे झीनी

राझण ढूड़न मैं चलेया
राझण मिलया ना ये
जिगरा विच अगन लगा के रब्बा
लक़ीरां विच लिख दी जुदाई.....



" प्रिन्सेस खूप झाली तुझी झोप... तु आरामात झोपली आहेस... पण आमची झोप उडवली आहे त्याच काय... तुला चांगल माहित आहे मी तुला असं नाही पाहू शकत तरी मला मुद्दाम त्रास देते आहेस ना... नको ना अशी वागू यार... खूप त्रास होतोय मला... नाही कोणासोबत शेअर करू शकत आहे...मला काय वाटत आहे... खूप control करून ठेवलं आहे स्वतःला... तु जर अजून थोड्या वेळ अशीच राहिली तर मी नाही अजून स्वतःला strong दाखवू शकणार..." वंश

"तु श्वास आहेस माझा... आणि माझा जर श्वासच नाही आहे तर मी तरी कसा जगेल... तुला काही झालं तर माझं काय होईल हा तरी विचार कर ना... तुला शुद्धीवर यावच लागेल... तुझ्यासाठी ना सही माझ्यासाठी.... आता तर आपल लग्न सुद्धा फिक्स झालं... मी आता आजी साहेबांना सांगणार आहे मला अजून तुझ्यापासून दूर राहायला जमणार नाही लवकरच मुहूर्त बघून लग्न करून टाकू.... काय तुला चालेल ना... " वंश तिच्या सोबत होता...

तिचा responce नाही म्हणून वंशचा धीर संपत चालला होता... रिद्धिचे हात हातात घेऊन त्याने त्यावर ओठ टेकवले होते.... त्यातच त्याच्या डोळ्यांतला थेंब तिच्या हातावर पडला.... तेव्ह वंशच्या हातावर तिच्या बोटांची हालचाल जाणवली... म्हणून त्याने तिच्याकडे पाहिलं...

रिद्धीच्या श्वसनाची गती वाढली होती....

" रिद्ध... काय होतय तुला... थांब मी डॉक्टरांना बोलावतो..." वंश तिचा हात खाली ठेवत असतो...

" वंश..sss " रिद्धिचा अस्पष्ट आवाज त्याच्या कानावर पडतो... म्हणून तो तिथेच थांबतो...

" हो प्रिन्सेस मी आहे... मी इथेच आहे..." वंश त्याचे डोळे पुसत बोलतो...

" मॅक्स... नर्स... डॉक्टर... डॉक्टर...." वंश जोरात ओरडतो.... त्याचा आवाज ऐकून सर्व पळत रूममध्ये येतात...

" काय झालं mr. पुरोहित..." आशिष

" रिद्धने आता बोटांची हालचाल केली आणि माझं नाव पण घेतल..." वंश स्वतःला सावरत अडखळत सांगतो...

आशिष लगेच रिद्धीला चेक करतो....

" mr. आशिष... तिला शुद्ध आली आहे... मग तिने अजून डोळे का नाही उघडले...." वंश

" तीला शुद्ध आली आहे... पण अजून ग्लानी आहे काही वेळात तिला पूर्ण शुद्ध येईल... don't worry... she is fine now..." आशिष बोलून निघून जातो... मॅक्स बाहेर जात असतो...

" मॅक्स सर्वांना कॉल करून कळव... " वंशच ऐकून मॅक्स निघून जातो....

" बर वाटतंय..." वंश तिच्या डोक्यावर हात फिरवुन हातावर ओठ टेकवतो....

तिने डोळ्यांची उघडझाप करुन ठीक आहे सांगते...

" वंश... " रिद्धी त्याला आवाज देते... तेव्हा त्याच्या डोळ्यांत पाणी येत

" मी ठीक आहे... तुम्ही असं रडू नका..." रिद्धी त्याचे डोळे पुसते...

" तुझ्या तोंडून तब्ब्ल दोन दिवसांनंतर माझं नाव ऐकतो आहे... तु विचार नाही करू शकत या दोन दिवसांत माझी काय अवस्था झाली आहे.... तु समोर होतीस पण मला बघत नव्हतीस... तुझे निळेशार डोळे मला बघत नव्हते... तुझ्या एका हाकेसाठी कान तरसले होते माझे....पण तु मस्त झोपली होती... पुन्हा जर अशी वागलीस तर बघ... नाही राहू शकणार मी तुझ्याशिवाय... promise me तु कायम माझ्यासोबत आहेस.... " वंश तिच्यासमोर हात करतो.... रिद्धी त्याच्या हातात हात देते...

" रिधु...." मंजिरी सोबत सगळे आत येतात.... वंश आपले डोळे पुसुन उभा राहतो... मंजिरी रिद्धी जवळ जाऊन बसतात.... सगळे तिच्या भोवती जमा झाले होते... वंश मागे हाताची घडी घालुन तिला बघत होता...

" कशी आहेस बाळा... काही त्रास नाही ना होत आहे..." यशवंत

" मी ठीक आहे बाबा..." रिद्धी

" रिधु तुला बर वाटत असेल तर तु सांगु शकतेस त्या दिवशी नक्की काय झालं होत...तुझी जबाब लागेल आम्हांला...." रक्ष

" मी आणि संतोष दादा अकॅडेमीला निघालो होतो पण त्यांच्या मुलीची तब्येत ठीक नव्हती म्हणून मी त्यांना घरी पाठवल... मी अकॅडेमीला जाऊन घरी जायला निघाले तेव्हा मला तनुचा कॉल आला... तीच्य सोबत बोलत असतना टर्न आला... टर्न घेतल्यावर मला वाटलं कार समोर काही आलं म्हणून मी ब्रेक मारला... पण ब्रेक लागत नव्हता तेव्हा मला समजलं कि कारचे ब्रेक फेल झाले आहे... तोपर्यंत समोरून ट्रक आला आणि कार उडाली.... त्यानंतर मला काही आठवत नाही..." रिद्धी त्याला सर्व सांगते...

" कारचे ब्रेक फेल झाले नाही तर ब्रेक फेल केले गेले होते..." रक्ष

" पण कोणी असं का करेल... रिद्धीच कोणासोबत काहीच वाकडं नाही..." विराज

" ते तर आता तो ट्रक ड्रायव्हर सांगू शकेल..." रक्ष

" अंकित मला थोडं बाहेर जायच आहे... तु इथे रहा मी येतो थोड्यावेळाने... " वंश अंकितला बाजूला बोलावून घेतो...

" हो तुम्ही जा.. आम्ही सगळे आहोत इथे.." अंकित

.............

.........................

वंश बाहेर येतो... मॅक्स बाहेर थांबला होता... वंश बाहेर आल्यावर कारकडे निघतो... त्याच्या मागे मॅक्सदेखील निघतो....

वंशच्या मागे पुढे त्याच्या गार्डसच्या कार होत्या... वंशची कार मुंबई बाहेर असलेल्या वंश त्याच्या बंगलोवर आली... कार थांबल्यावर वंश बंगलोच्या बॅक साईडला गेला...

वंश खोलीत आल्यानंतर गार्डने तिथला वॉर्डरोब साइडला केला.... तिथला दरवाजा उघडल्यावर खाली जिना जात होता... वंशने भरभर जिना उतरला... समोर मोकळी रूम होती... ज्याला पासवर्ड होता... वंशने पासवर्ड करून डोअर ओपन केलं आणि आत आला... मॅक्सने डोअर नॉक केल्यानंतर आतून डोअर उघडलं गेलं...

समोर वंशचा लेफ्ट हॅन्ड म्हणजे रॉनी उभा होता... खोलीत संपूर्ण अंधार पसरला होता... एका डिम बल्बचा उजेडामुळे थोडासा उजेड समोर बांधलेल्या दोन माणसांवर पडत होता....

दोघांना खुर्चीला बांधून ठेवल होत... बेदम मार बसल्याने दोघे बेशुद्ध पडले होते.... चेहऱ्यातून रक्त निघाल होत...

वंश आल्याचे पाहून रॉनीने त्याच्या चेहऱ्यावर पाणी मारल... तसे दोघे खडबडून जागे झाले...

" मी काही नाही केलं सोडा मला.... सोडा..." पहिला माणूस ( ड्रायव्हर )

" ए कोण आहेस रे तु... आणि मला असं बांधून का ठेवलं आहे... तुला माहित नाही मी कोण आहे..." दुसरा माणुस ( रॉकी )

रॉकीच बोलण संपल्या बरोबर त्याच्या गालावर लाथ पडली तसा तो खुर्चीसोबत खाली पडला.... तिथेच असलेली खुर्ची घेऊन वंश त्याच्या समोर बसला.... डोळयात अंगार फुलले होते... खाली वाकून त्याने रॉकीचा चेहरा धरला....

" कोणत्या मुलीने सांगितल होत....😠😠 " वंश

" कोणत्या मुली बद्दल बोलताय तुम्ही... मला काही माहीत नाही..." रॉकी

" शेवटच विचारतो आहे... सांगून टाक... नाही तर पस्तावशील...." वंश राग कंट्रोल करत बोलला...

" नाही सांगत चल... काय करणार तु... 😈" रॉकी

वंश चेअरवरुन उठला... मागे वळून एक हात कमरेवर ठेवत दुसरा हात केसामधून फिरवला.... रॉकी मात्र हसत होता पण क्षणात त्याच हसू गायब झालं...

" ए सोड तिला... तिला जर काही झालं ना तर याद राख..." रॉकी हातपाय झाडत बोलतो... मॅक्सने त्याच्या समोर व्हिडीओ धरला होता... ज्यात त्याच्या गर्लफ्रेंडला बांधून ठेवलं होत...

" तुला शिस्तीत विचारल होत पण नाही बोललास आता तुझ्या कर्माची फळ तिला भेटणार... तु बोलत नाही तोपर्यंत तिच्यावर करंट सोडलं जाणार आहे..." मॅक्सने रिमोट प्रेस केलं तस करंट स्टार्ट झालं... जोरात करंट बसल्याने तिकडे ती जोरत ओरडत होती...

" stop... stop... सांगतो मी..." रॉकी जोरात ओरडतो... मॅक्स करंट बंद करतो... वंश येऊन पुन्हा चेअरवर बसतो....

" एक शब्द जरी खोटा ठरला तर माझ्या इतका वाईट कोणी नसेल समजलं 😠😠.... नीट बसवा ह्याला..." वंश

गार्डस रॉकीला उभ करतात....

" मला त्या मुलीचा फोन आला होता.... तिच्या सांगण्यावरुन मी त्यांच्या पाळतीवर माझी माणस ठेवली... मला आधीच त्यांच शेड्युल सांगितल गेलं होत म्हणून जास्त अवघड नव्हतं.... नंतर त्या मुलीचा कॉल आला तेव्हा सांगितल कि सगळे जयपुर जाणार आहेत त्या दिवशी तिला उडवायच... म्हणून सकाळपासून माझी माणस तिच्यामाग होते... ती अकॅडेमीला गेली तेव्हा माझ्या माणसाने तिच्या कारचे ब्रेक फेल केले.... आणि घरी येताना तिला ट्रकने उडवल..." रॉकी सगळं बरळून मोकळा झाला...

" कोण मुलगी होती..." वंश

" तिच नाव नाही माहीत..." रॉकी

" गप सांगतो आहे कि सोडू करंट..." मॅक्स रिमोट पुढे करत बोलला...

" मी खरं सांगतो आहे मला नाही माहित तीच नाव आमच जेव्हा पण बोलणं झालं तेव्हा ती वेगळ्या नंबर वरून फोन करायची...." रॉकी

" पैसे कस काय घेतले... कॅश कि ट्रांसफर..." वंश

" कॅश घेतले होते..." रॉकी

" तिचा चेहरा आठवतो...स्केच बनव..." वंश

" तिने चेहरा लपवला होता... त्यामुळे चेहरा नाही दिसला..." रॉकी

" ए जास्त शहाणपणा केला ना तर आता गोळी डोक्यात घालेल.." रॉनीने त्याच्या डोक्यावर गन लावली...

" मी खर सांगतो आहे... मी नाही पाहिला तिचा चेहरा.. पण हा.." रॉकी

" पण काय..." मॅक्स

" तिच्या हातावर morpis ( मोरपीस) टॅटू काढला होता... माझ्या माणसाने तिचा फोटो काढला होता... त्यात तो टॅटू दिसतो आहे..." रॉकी

" मोबाईल..." वंशने त्याच्यासमोर हात केला... रॉकीचा मोबाईल रॉनीजवळ होता... त्याने लगेच वंश जवळ मोबाईल दिला...

" पासवर्ड... " वंशने मोबाईल त्याच्या समोर पकडला...

" 100000..." रॉकी

वंशने मोबाईल ओपन केला... फोटो गॅलरी ओपन करून फोटो चेक करू लागला... शेवटी त्याला फोटो सापडला... त्याने बराच झूम करुन पाहिला... त्याला टॅटू बघितल्या सारखा वाटत होता... अखेर त्याला आठवलं...

" खूप मोठी चुक केली तु.... पहिल्यांदा तुला सहज सोडलं होत पण या वेळेस नाही... माझ्या जीवावर घाव घातला आहे तु.... आता तुला कळेल रिद्धीच्या वाटेला जाऊन तु किती मोठी चुक केली आहे...😠😠" वंशचे डोळे रागाने आग ओकत होते....

" हिला शोधून काढायच आहे... अर्धा तास आहे तुमच्याजवळ... your time start now... " वंश त्याच्या मोबाईल मध्ये असलेला तिचा फोटो रॉनीला पाठवतो... फोटो पाहून रॉनी गार्डना घेऊन लगेच बाहेर पडतो....

वंश आणि मॅक्स देखील बेसमेंट मधून निघून जातात... वंश रूममध्ये जाऊन शॉवर घेवुन येतो... तोपर्यंत रॉनीचा ती सापडल्याचा कॉल येतो...

" निंबाळकरांच्या घराबाहेर घेऊन ये..." वंश बोलून कॉल कट करतो... रेडी होऊन धराला कॉल लावतो...

" धरा पटकन रेडी हो... तुला हॉस्पिटल जायच आहे..." वंश

" ठीक आहे... निघाले लगेच..." धरा लगेच हॉस्पिटल निघते... तिच्या मागे वंश घराबाहेर पडतो... त्याच्या मागे गार्डच्या मर्सिडीज निघतात...

" अंकित थोड्या वेळात धरा हॉस्पिटल येईल... तु सगळ्यांना घेऊन तुमच्या घरी ये..." वंश

" काही सिरीयस आहे का... सगळं ठीक आहे ना.." अंकित

" तु घेऊन ये... आल्यानंतर समजेल..." वंश

" ठीक आहे... निघतो आम्ही..." अंकित बोलून कॉल कट करतो...

" काका - काकू आपल्याला घरी जावं लागेल लगेंच..." अंकित

" का..? काय झालं..? " यशवंत

" मला पण नक्की माहित नाही... वंशचा कॉल आला होता... त्यांनी लगेच बोलावल आहे..." अंकित

" तुम्ही सगळे जा... मी थांबते इथे..." सिया

" नाही सिया सगळ्यांना बोलावल आहे... धरा येते आहे ती थांबेल इथे..." अंकित

" काय झाल असेल सगळ्यांना बोलावल आहे तर..." मंजिरी

" आता ते घरी जाऊन समजेल... चला आपण निघू..." यशवंत

सगळे घरी जायला निघतात... तोपर्यंत धरा देखील पोहचते...



क्रमशः