Gunjan - 34 in Marathi Women Focused by Bhavana Sawant books and stories PDF | गुंजन - भाग ३४

Featured Books
Categories
Share

गुंजन - भाग ३४

भाग ३४.

"अनय, अनय. मला खूप त्रास होत आहे. प्लिज, तुम्ही मला सोडून जाऊ नका", मायरा वेदनेने विव्हळत म्हणाली. मध्यरात्री एकच्या दरम्यान तिला प्रस्तुती कळा यायला सुरुवात झाली होती. अनयने डेझीच्या मदतीने तिला तात्काळ हॉस्पिटलमध्ये आणले.


"माऊ, थोडस पेन सहन कर. फक्त थोड.", अनय तिला धीर देत म्हणाला. खरतर तिचे रडणे पाहून त्याला देखील वाईट वाटत होते. पण तिच्यासमोर तो स्वतः ला मजबूत दाखवत होता.



"खूप पेन करत आहे अनय. आपल्या बाळाला काही होणार नाही ना? मॉम मला माझी मॉम हवी आहे!! भाई आणि वहिनीला बोलावं ना माझ्यासाठी प्लीज.", मायरा डोळ्यात पाणी ठेवून म्हणाली. या क्षणी तिला तिच्या घरच्या लोकांची खूप आठवण येत होती. या आधी थोड जरी लागले की तिची आई तिच्याजवळ असायची. पण आज मात्र तिला एवढा त्रास होत असताना आईसोबत नसल्याने आणखीन रडू येत होत.



"माऊ, मॉम आणि वेद येऊ शकत नाही ग लवकर. त्यांना वेळ लागेल यायला आणि तुला काहीच होणार नाही. आपल्या बाळाला पण काही होणार नाही.", अनय तिला समजावत म्हणाला.



"अनय, सोड तिला डॉक्टरांना त्यांचे काम करू दे!!", डेझी म्हणाली. तसा अनय भानावर येऊन तिचा हात सोडतो. डॉक्टर पटकन तिला ओटी मध्ये घेऊन जातात. आतून तिच्या ओरडण्याचा आवाज येत असतो. तो आवाज ऐकून एवढा वेळचे त्याचे थांबवलेले अश्रू बाहेर पडतात. यावेळी त्याला काहीतरी आठवत तसा तो स्वतःचा मोबाईल बाहेर काढतो आणि वेदला कॉल करतो. दोन तीन रिंग जाताच वेद कॉल उचलतो.



"हॅलो वेद, प्लीज तू इथे ये!! मायराला गरज आहे तुमची", अनय आवाजावर कंट्रोल ठेवत म्हणाला.



"काय झालं अनय? ती बरी आहे ना?गुंजन प्रेग्नेंट आहे. तिला एकटीला सोडून मी सध्या नाही येऊ शकत", वेद गुंजनकडे पाहून म्हणाला. त्याचं बोलणे ऐकुन अनयकडे शांतता पसरते. कारण गुंजन प्रेग्नेंट आहे तर वेद काही एकटा येऊ शकत नाही.



"अरे, आईला पाठवतो मी आता. हा ती येऊ शकेल तिथे. फक्त आईची काळजी घे!", वेद आईकडे पाहून म्हणाला. आता मात्र अनय आनंदी होतो.



"थँक्यू, वेद. आई निघाल्या की सांग. डेझी जाईल आणायला त्यांना. उद्या पर्यंत आमचं पिल्लू आमच्या हातात असेल.", अनय म्हणाला.


"हो नक्की. एक एक मिनिट. काय पिल्लू? म्हणजे मायराला ऍडमिट केलं आहे तर? काळजी करू नको अनय ठीक होईल ती. पिल्लू झाल्यावर भारतात या लवकर. आम्ही वाट पाहत आहोत तुमची.", वेद अस बोलून फोन ठेवतो. तो फोन ठेवताच आई आणि गुंजन त्याच्या जवळ येतात.


"मायरा कशी आहे वेद? खूप त्रास होत आहे का तिला?", वेदची आई अस्वस्थ होत विचारते. शेवटी, मुलगीच होती ती त्यांची. त्यामुळे तिला झालेल्या त्रासाची बातमी ऐकून त्या अस्वस्थ होतात.



"आई, तुम्ही जावा! या वेळी गुंजनला तर मी एकटे सोडून जाऊ शकत नाही आणि तिला घेऊन पण जाऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला आपल्या प्रायव्हेट जेटने पाठवायची तयारी करतो.", वेद आईला अस्वस्थ झालेले पाहून म्हणाला. वेदच बोलण ऐकून त्या शांत होतात.



"मला जायला हवे होते आधी. माझ्या मुलीला खूप त्रास होत असेल ना? वेद लवकर कर काय ते. मला लवकर जायचे आहे. मी तयार होऊन येते.", वेदची आई काळजीने बोलून तिथून निघून जाते. तसा वेद त्यांना पाहत राहतो.



"आईचे मन आहे ते वेद. मुलांच्या त्रासाने अस्वस्थ होते. तुम्ही लवकर काय ते बघा. मी आईला मदत करायला जाते",गुंजन अस म्हणून जात असते. तसा वेद तिला अडवतो.


"अरे, आईची रूम वर आहे. पायऱ्या चढायला मनाई आहे तुला. त्यामुळे तू थांब इथे. मी घरातील इतरांना पाठवतो.", वेद अस बोलून जवळच्याच सर्वेंट लोकांना आवाज देऊन आईजवळ पाठवतो. तो आपला मोबाईल हातात घेऊन कोणाला तरी कॉल करतो आणि एक टेक्नॉलॉजीने परिपूर्ण असे बनलेले जेट हायर करतो. नॉर्मली विमानाने जायला ऑस्ट्रेलियाला अठरा , वीस तास लागले असते. पण या टेक्नॉलॉजीने बनलेल्या स्पीड जेटमुळे तो प्रवास दहा तासांचा होतो. यात मोबाईलला
रेंज नसते. मात्र, पूर्ण सुखसोईने बनलेले हे जेट असत. त्या जेट मध्ये एखाद्या घराप्रमाणे सुविधा मिळते. यावेळी वेदला तेच उत्तम दिसत असल्याने तो तेच जेट हायर करतो. आईला ह्या प्रवासाने जास्त काही त्रास होणार नव्हता. उलट आराम करून ती जाणार होती.



"वेद, झालं का तुमचं? आता मी निघू ना?", वेदची आई आपली बॅग खाली घेऊन येत विचारते.

"हो, झालं आई. आता तुम्ही जाऊ शकतात. लवकर या.", वेद आईजवळ जाऊन आईच्या पाया पडत म्हणाला. आई त्याच्या डोक्यावर हात ठेवते आणि गुंजनकडे जाते.


"स्वतः ची आणि बाळाची काळजी घे गुंजन. जास्त काम नाही करायचं हा.",आई गुंजनच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली.


"हो आई. तुम्ही बाळाला आणि मायराला घेऊन या. मला पण पाहायचं आहे बाळ.",गुंजन आनंदात म्हणाली. आई तिच्या या बोलण्यावर हसतात आणि तिथून बाहेर निघून जातात. वेद आणि गुंजन त्यांना जाईपर्यंत पाहत राहतात. वेद आपल्या ड्राईव्हरला आईला जेटकडे सोडायला लावतो. काही वेळात आई जेटकडे पोहचतात. जेट मध्ये असलेली माणस बाहेर येऊन आईला आतमध्ये घेऊन जातात आणि त्यांना एका आराम सीटवर बसवतात. त्या बसताच जेटचे दरवाजे बंद होतात. काही सेकंदातच जेट आपली उड्डाण भरत आणि उंच आभाळात उडायला लागत. स्पीडच असल्याने ते आवाज करत उडत असते. आतल्या लोकांना तो आवाज येत नाही. पण खालच्या लोकांना मात्र तो येतो.


आई मायराकडे गेल्यामुळे वेद गुंजनची चांगल्याप्रकारे काळजी घ्यायला लागतो. तिचं पण आता पोट दिसत होते. त्यात ती प्रचंड प्रमाणात क्युट वाटत असायची त्याला. पोटावर हात ठेवून त्या बाळासोबत आपली बोलत बसायची. वेद आपल ऑफिसच काम आवरून तिला हवे नकोते पाहत असायचा.



आई दहा तासांचा प्रवास करून ऑस्ट्रेलियाला पोहचतात. त्या डायरेक्ट डेझीला गाडी हॉस्पिटलजवळ घ्यायला सांगतात. आपल्या मुलीला सुखरूप पाहिल्यावरच त्यांचे मन शांत होणार होते. यामुळे त्या तसे करतात. हॉस्पिटलमध्ये डेझी त्यांना एका रुमकडे घेऊन येते. तश्या त्या आतमध्ये वाकून पाहतात.


अनय मायराजवळ बसलेला असतो आणि त्याच्या हातात एक छोटस बाळ कापडात असते. मायरा त्या बाळाला आणि अनयला आनंदाने पाहत असते. अनय त्या बाळासोबत हसुनच बोलत असतो आणि ते बाळ त्याच्या छोट्या डोळ्यांनी त्याला पाहत असते. ते दृश्य पाहून आईला बरे वाटते. आपल्या मुलीचे असेच काहीसे स्वप्न त्यांनी पाहिली होती. पण तिच्या कृत्याने ते आता पूर्ण होणार नाही, याचे दुःख त्यांना जास्त वाटत असायचे. मात्र , अनयच त्या बाळाप्रतीचे प्रेम पाहून त्यांना समाधान वाटते. एक परफेक्ट फॅमिली वाटत होती ती त्यांना.

"आई", मायराची नजर त्या दिशेला जाताच ती भरल्या डोळ्यांनी म्हणाली. तिचा आवाज ऐकून त्या देखील भानावर येऊन तिला पाहतात. कितीही मन कठोर केलं तरीही आईचे मन होते ते. त्यामुळे शेवटी विरघळतेच ते. तिचा आवाज ऐकून आई तिच्या दिशेला जाते आणि तिला पटकन आपल्या मिठीत घेते. आईने अस मिठीत घेतलेलं पाहून मायराला रडूच येत. ती ढसाढसा आईच्या मिठीत राहून रडायला लागते. तिचं रडणे पाहून आईला देखील रडू येत.


"आई, मला माफ कर. मी चुकले आई. आज आई होताना समजल मला सगळे.", मायरा रडत रडत म्हणाली. तिचे बोलणे ऐकून तिची आई तिचे डोळे पुसते.


"मायरा तुला चूक कळली ना? यातच सगळे आले. बस बस आता जास्त नको रडू नाहीतर बाळ म्हणेल ही आजी माझ्या आईला खूप रडवते म्हणून.",आई बाळाकडे पाहून काहीशी हसून म्हणाली. आईच्या बोलण्यावर मायरा देखील रडता रडता हसते.


"आई, मुलगा आहे तो. यांना मुलगी हवी होती. पण मुलगा झाला.", मायरा बाळाकडे पाहत म्हणाली.


"काहीही असले तरीही आज त्या बाळामुळे सगळी नाती पुन्हा जोडली गेली. म्हणून बाळाला आभार!!",आई म्हणाल्या.


"आई, घ्या तुम्ही बाळाला. ", अनय अस म्हणून बाळाला आईच्या हातात देतो. तश्या आई बाळाला व्यवस्थित हातात सांभाळून घेऊन त्याच्या डोक्यावर ओठ टेकवतात.



"माझ्या मुलीला चूक कळली तुझ्यामुळे. त्याबद्दल तुझे आभार पिल्लू. आई बनल्याशिवाय चुका कळत नाही कधी कधी. आता माझी मुलगी माणसांत आली आहे.",आई मनातच बाळाला पाहून म्हणाल्या.



"आता मला पण द्या की बाळ. बघू बघू कस दिसते ते?", डेझी त्यांच्याजवळ येत म्हणाली.


"आता तू पण लग्न कर डेझी. मग असे बाळ मिळतील.",आई डेझीकडे पाहून म्हणाल्या.


"आई, तिचे आधीच सात मुलं आहेत. डेझीने काही मुलांना दत्तक घेतले आहे आणि त्यांचे शिक्षण वगैरे तिचं करते.", मायरा डेझीकडे पाहून तिचे कौतुक करत म्हणाली. कारण डेझीने काही गरीब सात मुलांना दत्तक घेतले होते आणि तिच्या स्वतः च्या खर्चातून ती त्यांचे शिक्षण करत असायची. याच मायरा आणि अनयला कौतुक वाटत असायचे.


"हे तर खूप चांगले काम करते डेझी. अभिमान आहे मला तुझा. बर आता मी माझ्या या तिन्ही मुलांना घेऊन जायला आली आहे. तू पण येणारं आहे की नाही?",आई.


"आई, मी नाही येऊ शकत सॉरी. माझी मुलं इथे आहेत त्यामुळे.", डेझी अस बोलून बाळाला हातात घेते. बाळ तिच्याकडे जाताच तिच्या हाताचे एक बोटं घट्ट आपल्या हातात धरते. तशी डेझी हसूनच त्याला पाहते.

सगळे जण नंतर त्या बाळाभोवती गराडा घालून राहतात. आता सगळा आनंद त्या बाळामुळे परत आला होता. काही नवीन नाती तयार झाली होती. तर काही जुनी नाती पुन्हा नव्याने तयार झाली होती. सगळे दुःखाचे दिवस जाऊन आता सुखाचे दिवस आले होते!!






क्रमशः
______________________

पुढचा पार्ट हा अंतिम असेल. याची वाचकांनी नोंद घ्यावी!!