भाग ३२.
अनय आणि मायराने आपले एकमेकांवरचे प्रेम स्वीकारले असल्याने, डेझीने वेदच्या परमिशनने त्यांचे लग्न लावून दिले. मायराची डिलिव्हरी डेट जवळ असल्या कारणाने तिने तसे केलं. सध्या मायराला डॉक्टरांनी प्रवासाला बंदी केली असल्याने, मायरा मनात असताना देखील भारतात जाऊ शकत नव्हती. अनय तिला खूप जपत असायचा. तिला बाहेर फिरायला घेऊन जाणे, तिला आवडत ते बनवून देणे. अस छोट्या छोट्या गोष्टीतून तो तिला आनंदी ठेवत असायचा. जरासा थकवा आला की तिच्या डोक्याची, पायाची मालिश करून देणे. हे पण तो करत असायचा. मायराला त्याचे एवढ प्रेम पाहून कधी कधी स्वतःचा हेवा वाटत असायचा.
"मायरा झोप लागत नाही आहे का? कम हिअर!!", अनय तिला कुस बदलताना पाहून म्हणाला. तो मायरला हात पसरवून स्वतःकडे यायला सांगतो. तशी ती स्वतःला सावरत त्याच्याकडे जाते. अनय तिला व्यवस्थित जवळ घेऊन एक हात तिच्या पोटावर ठेवतो. ती देखील लहान बाळासारखी त्याचं शर्ट घट्ट स्वतः च्या हातात पकडुन झोपून जाते.
"हे मंगळसूत्र, कुंकू पाहून मला खूप मस्त वाटत मायू!! तू माझी बायको आहेस या फिलिंगने माझं मन शांत होते. माझं बाळ आणि माझी मायु एवढंच मला हवे. बाकी काहीच नाही. थँक्यू, वेद. मला हे सुख देण्यासाठी.", अनय अस म्हणून मायराच्या कपाळावर जिथं कुंकू असते लावलेले? तिथे ओठ टेकवतो. तो हळूच मायराला बेडवर झोपवतो आणि उठून तसाच गुढग्यावर बसून मायराच्या पोटावर हात फिरवतो. हळूच मायराच्या साडीचा पदर बाजूला करून तिथं स्वतः चे ओठ टेकवतो.
"थँक्यू, पिल्लू. तू मला स्वीकारले त्यामुळे. लवकर बाहेर ये हा तुझा बाबा तुझी आतुरतेने वाट पाहत आहे. आय प्रॉमिस तुझ्या नंतर मला कोणीच नको आहे. आपण तिघे परफेक्ट फॅमिली राहू!!", अनय तिच्या पोटाकडे पाहत बडबडत असतो. त्याला वाटते मायरा झोपलेली आहे. पण ती तर त्याच्या बोलण्याने जागी झाली असल्याने, गप्प डोळे बंद करून त्याचं बोलण ऐकत असते.
"भाई, थँक्यू असा लाईफ पार्टनर मला देण्यासाठी!! या काळात मला आपल्या माणसाची खूप गरज होती. पण मी जे काही केलं त्यामुळे तर ही अपेक्षा सोडून दिली होती. यांच्यामुळे आणि यांच्या प्रेमामुळे मी भारावून गेली आहे. त्यांना माहीत आहे . हे त्यांचे मुलं नाही आहे. तरीही खूपच जीव लावत आहे. मी थोड काही पुण्य केले होते. त्याचं हे सुख आहे.", मायरा डोळे बंद करून मनातच म्हणाली. तिला स्वतःच्या गळ्या जवळ गरम श्वास जाणवतात तशी ती हळूच डोळे उघडुन पाहते.
"बेबी ला प्रेम करून झालं. आता बेबीच्या मम्माला. आय प्रॉमिस तुला त्रास नाही देणार मी.", अनय तिच्या गळ्यावर ओठ टेकवत म्हणाला. तशी मायरा हसूनच त्याच्या केसांत हात फिरवते.
"आजवर कधी झाला का त्रास? उलट तुम्ही मला प्रेम करायला शिकवले आहे.", मायरा त्याच्या गालाला स्वतःचा गाल घासत म्हणाली. तसा अनय तिच्या ओठांवर ओठ टेकवून तिला आपलस करायला लागतो. बाळाची पुरेपूर काळजी घेऊन तो तिला प्रेम करून व्यवस्थित झोपवून लावतो. स्वतः देखील नंतर तिला जवळ घेऊन झोपून जातो.
मुंबईत वेद अनय गुंजनचे प्रेम देखील वाढत चालले होते. वेदने तिच्या आलेल्या पैशातून डान्स अकादमीचे काम हाती घेतले. तिची इच्छा तशी होती. त्यामुळे तो तिच्या त्या पैशातून अकादमी उभी करण्याचे ठरवतो. ऑफिस सांभाळून ते काम देखील तो पाहायला मध्ये मध्ये जात असायचा. तो ऑफिसच्या मीटिंग मध्ये बसला असताना त्याला घरच्या बॉडीगार्डचा फोन येतो. तसा तो नाव पाहून मीटिंग थांबवून कॉल उचलतो.
"हॅलो, सर मॅडमला चक्कर आली त्यामुळे हॉस्पिटलला आणले आहे.", बॉडीगार्ड आवाजावर कंट्रोल ठेवत म्हणाला. त्याचं गुंजनबद्दलचे बोलणे ऐकून वेद चेअर वरून उठून उभा राहतो आणि तसाच "एकस्क्युझ मी" बोलून बाहेर निघून जातो. त्याचा पीए मग पुढची मीटिंग एका कंपनीच्या एक्सपर्टच्या हातात देतो.
"कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहेत मॅडम?", वेद काळजीने विचारतो.
"सिटी हॉस्पिटल",बॉडीगार्ड अस बोलताच तो ड्राईव्हरला सांगतो. तसे ड्राईव्हर गाडी स्टार्ट करून त्याला त्या दिशेने घेऊन जातात. गुंजनबद्दल ऐकून तो अस्वस्थ होतो. कधी एकदा तिला पाहतो? अस त्याचं झाल होत.
"अभिनंदन, मिसेस वेद. तुम्ही आई होणार आहात. तुम्हाला आता स्वतः ची काळजी घ्यायला हवी",एक लेडी डॉक्टर गुंजनला चेक करत म्हणाली. तिचं अस बोलण ऐकून गुंजनला काही कळत नाही. पण वेदच्या आईला कळताच त्या जवळ येऊन गुंजनच्या डोक्यावर हात फिरवतात.
"अभिनंदन गुंजन तुला. एवढी चांगली बातमी दिल्याबद्दल थँक्यू. मला ना हल्ली तुझ्या वागण्याने कळत होत. पण पुन्हा बोलले मी तर तुला मस्करी वाटणार. त्यामुळे नाही बोलली. पण आता डॉक्टरांनी सांगितले म्हणून आता मी खूप आनंदी आहे.", वेदची आई म्हणाली.
"डॉक्टर, हे घ्या तुम्हाला.", वेदची आई आनंदात स्वतःच्या हातातील एक सोन्याची डिझायनर बांगडी काढून डॉक्टरच्या हातात देत म्हणाली.
"अहो, सून आहे का ती तुमची? की मुलगी?", डॉक्टर काहीशी गोंधळून विचारते.
"दोन्ही आहे ती माझी. त्या आनंदातच हे तुम्हाला दिले. तुम्ही स्वीकार करावा. अशी अपेक्षा आहे आमची", वेदची आई आपला पदर डोक्यावरचा सावरत म्हणाली.
"आम्ही स्वीकार करतो याचा. आज हॉस्पिटल मध्ये पहिल्यांदा कोणत्यातरी सासूला एवढ आनंदी होताना पाहिले आहे. मुलगाच होणार बघा तुम्ही.", डॉक्टर आनंदी होऊन म्हणाली. पण तिचे ते बोलणे ऐकून गुंजनचा चेहरा बदलतो.
"मुलगा का? अहो आम्ही तुम्हाला मुलगा होणार म्हणून आनंदी झालो अस वाटले काय? आम्हाला नात हवी आहे म्हणून आम्ही आनंदी झालो आहोत. उगाच गैरसमज करून घेऊ नका तुम्ही.", वेदची आई त्या डॉक्टर कडे पाहत म्हणाली. आईचे बोलणे ऐकून गुंजन त्यांना पाहायला लागते. डॉक्टरचे देखील वेगळे काही एक्स्प्रेशन नसतात.
"हो हो मुलगी होईल हां", डॉक्टर अस बोलून तिथून निघून जाते. जरीही गुंजनला वाटल असले वेदची आई आनंदात बोलली तरीही डॉक्टरला मात्र त्यांच्या बोलण्याचा रोख कळला होता. मुलगा म्हटले म्हणून त्यांना राग आला होता हे त्यांच्या डोळ्यातून तिला कळले होते. त्यामुळे ती घाबरून निघून जाते.
"आता गुंजन स्वतः ची काळजी घ्यायची. आपल्या घरात नोकर आहे भरपूर. त्यामुळे काम अजिबात करायचं नाही आणि मी आहेच बाकीचं पाहायला. चांगल हेल्दी हेल्दी खायचं.", वेदची आई गुंजनकडे पाहत तिला समजावून सांगत असते.
"काय काय झालं माझ्या गुंजनला?", वेद दारात येऊन म्हणाला. त्याचा आवाज ऐकून दोघी त्या दिशेला पाहतात. गुंजन काही बोलणार त्या आधी त्याची आई त्याच्या कडे जाते आणि त्याचा कान पकडते.
"तुझ्यामुळे माझ्या मुलीला आजार झाला आहे मोठा. खूप त्रास झाला आता तिला.", वेदची आई त्याचा कान हातात धरून म्हणाली.
"आई कान दुखतो माझा. माझ्यामुळे? काय झालं सोना तुला?", वेद कळवळून विचारतो.
"तुझ्यामुळे झालं सगळे. आता तुझी सोना आई बनणार आहे आणि तू बाबा", वेदची आई हसूनच त्याचा कान सोडत म्हणाली. आईचे बोलणे वेदला काही कळत नाही. जेव्हा कळते तेव्हा मात्र चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन बदलतात.
क्रमशः
___________________