Gunjan - 31 in Marathi Women Focused by Bhavana Sawant books and stories PDF | गुंजन - भाग ३१

Featured Books
  • अपराध ही अपराध - भाग 24

    अध्याय 24   धना के ‘अपार्टमेंट’ के अंदर ड्र...

  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

Categories
Share

गुंजन - भाग ३१

भाग ३१.

गुंजनचा आता संसार चांगल्या प्रकारे सुरू झाला होता. आईच्या आणि वेदच्या साथीने तिने तिचं यू ट्यूब चॅनल देखील सुरू ठेवलं होत. त्यावर आठवड्यातून एकदा तिचा डान्सचा व्हिडिओ पोस्ट होत असायचा. इतर मुली तिला फॉलो करून आपला डान्स सुधारत होते. वेदने डेझीच्या साहाय्याने त्याच्या घरातील लोकांना त्यांनी केलेल्या गुन्ह्यासाठी जेल मध्ये पाठवलं होत. वेदच्या बाबांचे लग्न झालेले असताना देखील त्यांनी इतर बाईशी संबंध ठेवले या त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला भोगवण्यासाठी जेल मध्ये पाठवण्यात आले. त्यांची पूर्ण संपत्ती वेदने स्वतःच्या आईला दिली. मायराला मात्र ट्रीटमेंटसाठी बाहेरच्या देशात वेदने पाठवून दिले. स्वतः डेझी आणि त्याचा मित्र अनय देखील तिच्यासोबत गेले होते. मायरा कशीही वागली तरीही वेदला तिच्यासोबत वाईट वागणे जमलेच नाही!! तिच्यासोबत कोणी तरी आहे? या विचाराने त्याची काळजी मिटत असायची. लहान बहिणच होती शेवटी ती त्याची!!



मायराला चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट मिळत असल्याने, ती हळू हळू बदलत होती. डेझी जिला ती खूप काही बोलायची ती तिच्यासाठी धडपड करत असायची. हे पाहून तिला दुःख होते. या क्षणी तिच्या परिवारचे सध्या तिच्यासोबत कोणी नसताना देखील अनय आणि डेझी फक्त ओळखीने तिला बाहेर काढण्याचा पूर्ण प्रयत्न करत होते.


"मायरा , बाळाची अवस्था आता चांगली आहे. पण डॉक्टर म्हणाले सातव्या महिन्यात तुझी डिलिव्हरी करावी लागेल. कारण जास्त महिने ठेवून तुला त्रास होईल अस त्यांचे म्हणणे आहे.", डेझी सोफ्यावर बसत मायराला म्हणाली.


"डेझी, मी तुला एवढ बोलली तरीही तू एवढी मदत मला करत आहेस? एवढंच नाही तर तू मला सोडून बाकी सगळ्यांना शिक्षा दिली. मला का नाही पाठवले?", मायरा डोळ्यात पाणी ठेवत म्हणाली.


"काही गुन्ह्याची शिक्षा मी देणारी कोण ना तुला? आधीच देवाने तुला एवढं सगळ दिल आहे. आता अजून शिक्षा मिळावी असे मला नाही वाटत. तू कशीही वागली ना? तरीही तुझ्या भावाला तस तुझ्यासोबत वागायला जमले नाही आणि आज जी काय तू इथ उभी आहे ना? ते फक्त तुझ्या भावामुळे. त्यामुळे त्याला बोल काय ते मला नाही", डेझी मायराकडे पाहत म्हणाली. पण तिच्या तोंडून वेद बद्दल ऐकून ती आणखीन अस्वस्थ होते.


"भाईऽऽऽ ,त्यांनी केलं हे सर्व? मग मला का नाही आले भेटायला? एवढ परक केलं का मला त्यांनी?", मायरा रडत रडत विचारते.


"परक त्याने नाही तू केलं त्याला. नेहमी असल वागणे ठेवून. अग मुलगी आहेस ना तू? मग तुला हे कळत नाही का नशा सगळ आयुष्य खराब करते ते? तू नशेत एवढी गुंग असायची की तो बाहेरचा मुलगा येऊन तुझ्याबरोबर एवढ सगळ करून जायचा तरीही तुला कळत नसायचे. तुझ्या त्या जन्मदात्रीला कसे वाटले असेल ग अस पाहून? हेच सांगण्यासाठी ती तुझ्याजवळ आली होती. तिला मुलीचे आणखीन आयुष्य खराब झालेले पाहायचे नव्हते. पण तू काय केलं ? स्वतः च्या बाबांचे ऐकून त्या आईला मारल? हाऊ? मुलगी आहेस की कोण ग तू? एवढ सगळ करून पण ते तिघे तुझ्यासोबत वाईट वागत नाही. आज हे जे काही कपडे , जेवण वगैरे करत आहेस ना तू? ते त्या तिघांमुळे करत आहेस. तुझी वहिनी गुंजन नेहमी कॉल करून मला तुझी तब्येत विचारत असते. तिने तुला कधी जास्त पाहिले नाही. तरीही वेदमुळे ती अप्रत्यक्ष पणे तुझ्यात गुंतली गेली आहे. वेद तर सगळा खर्च तुझा करत आहे. आज ते नसते ना ? तर तुझी अवस्था काय असती? याचा विचार देखील तुला करवणार नाही!! हा अनय तुझ्यावर स्वतः पेक्षा जास्त प्रेम करतो. या कारणाने तो भारत सोडून इथे ऑस्ट्रेलियाला आला आहे. पण तुला कुठे दिसत ना त्याचं प्रेम? तुला तर धुंदी चढली आहे. आता तरी स्वतःला शोध तू. स्वतः चे अस्तित्व काय आहे? ते बघ तू!!", डेझी शेवटच्या ओळी अनय कडे पाहून म्हणाली. अनयचे नाव ऐकून भरल्या डोळ्यांनी मायरा त्याला पाहते.


"डेझी स्टॉप यार!! तिला त्रास होतो आहे. नको बोलू हे सगळ.", अनय चिडून म्हणाला.


"तिला त्रास होत आहे? तो दिसतो तुला. पण तिच्यामुळे तुला होत आहे? त्याचं काय अनय? हिला संधी मिळत आहे पण ही आसपास पाहायला बघत नाही. हिच्या अश्या वागण्याने ना सगळ्यांना त्रास सहन करावा लागला आहे.", डेझी चिडूनच बोलून तिथून निघून जाते. ती गेल्यावर अनय एक सुस्कारा सोडतो आणि स्वतः ला शांत करून मायरा कडे जातो.



"हे पाणी पी!! जास्त रडणे बरे नाही तुझ्या हेल्थसाठी", अनय टेबलवरचा पाण्याचा ग्लास तिच्या हातात देत म्हणाला. ती मात्र त्याचं ऐकून न ऐकल्यासरख करत रडत रहाते. तसा अनय तिच्या शेजारी बसून तिच्या तोंडाला पाण्याचा ग्लास लावतो.


"नेहमी मनमानी कारभार असतो. आता रडू नको म्हटले? तरीही रडत असते. शांत रहा बघू",तो तिच्या ब्राऊन डोळ्यात पाहत म्हणाला. त्याचं अस बोलण ऐकून ती शांत राहून पाणी पिते.


"तू केलेल्या चुकांना कोणी सहज माफ केलं अस वाटत ना तुला?पण तसे नाही आहे. वेदने तुझी मनस्थिती समजून घेतली आणि तो माझा मित्र आहे. त्यामुळे त्याला अस वाईट वागणे जमलेच नाही. मी जेव्हा वेदला सांगितले ना माझं तुझ्यावर प्रेम आहे? तेव्हा तो शांत झाला होता. कारण त्याला माहीत होत तू कशी आहेस ते? शेवटी मी त्याला वचन दिले तुला काहीच होऊ देणार नाही!! स्वतः पेक्षा जास्त जपेन!! या विचाराने त्याने मला इथ येऊ दिले.", अनय पाण्याचा ग्लास खाली ठेवत म्हणाला. मायरा फक्त भरल्या डोळ्यांनी त्याला पाहत असते. तिला अस शांत झालेलं पाहून अनय तिचा हात हातात घेतो. एक हात तिच्या गालावर ठेवून तिला पाहतो.


"मायरा आता ज्या तू चुका केल्या ना? त्याला आपण काहीच करू शकत नाही. पण माझा विचार तू करशील का? जशी आहेस तशी मला तू आवडते. तुला सगळ्यांनी माफ केलं आहे. त्यामुळे आता थोडस तू पण माफी मागून स्वतः ला शांत कर", अनय अगदी प्रेमाने तिला म्हणाला. त्याचं अस बोलण ऐकून तिला खूप भरून येत.



"अनय, मी तुमच्यासारखी नाही राहिली आहे. हे बाळ आहे माझ्याकडे. त्यामुळे मला माफ करा. माझ्यामुळे खूप जणांचे आयुष्य खराब झाले आहे. आता तुमचे नाही करायचे आहे मला.", मायरा गिल्टी फिल करत म्हणाली.



"हे बाळ आपले आहे सध्या. माझे आयुष्य खराब नाही होणार उलट चांगले होणार तुझ्यामुळे. या बाळाला सोनोग्राफीच्या वेळी पाहून आपले पणाची जाणीव झाली. प्लीज, त्याला नको ना दूर करू माझ्यापासून!! मी त्याचा खरा बाबा नसलो तरीही मला बनायचं आहे!! प्लीज , मायु", अनय रिक्वेस्ट करत म्हणाला. तशी मायरा त्याला काहीच न बोलता शांत राहते. अनय हाताने तिला धरून उभा करतो आणि हळूच तिच्यासमोर गुढग्यावर बसतो. तो आसपास पाहून हळूच तिच्या पोटावर स्वतः चे ओठ टेकवतो.


"तुझी मम्मा कशीही असली तरीही तू मला माझ्या आयुष्यात हवी आहेस!! सांग की तुझ्या मम्माला तूच तुझ्या बाबांचे खूप प्रेम आहे तिच्यावर. कधी बोललो नाही म्हणून कळणार पण नाही तिला. खूप लहान आहे ना ती? पण आता तुझा बाबा बोलणार आहे. मिस. मायरा जाधव मला तुम्ही माझ्या आयुष्यात या बाळासोबत हव्या आहात. देशाल माझी साथ आयुष्यभर? झालं गेलं मागे सोडून आता नवीन आयुष्य सुरु करुया. आपल्या बाळासोबत!!", अनय अस बोलून तिच्या पोटाला विळखा घालतो. त्याचं अस बोलण पाहून मायरा त्याचा हात काढते आणि त्याला उभ करून त्याच्या मिठीत शिरते.


"आय एम सॉरी अँड आय लव्ह यू!!", मायरा रडत म्हणाली. तिच्या तोंडून ते ऐकून तो समाधानी होतो. तो देखील तिला जपून आपल्या हृदयाशी लावतो.


"आय लव्ह यू टू जान. थँक्यू", अनय बोलतो. हळूच तो एका हाताने तिची मान वर करून तिच्या डोळ्यात पाहतो.


"मी कधी कोणाला किस केलं नाही. पण तुला करण्याची इच्छा आहे. प्लिज मला ती फिलिंग अनुभवायची आहे.", अनय हसूनच म्हणाला. त्याचं बोलणे ऐकुन ती लाजून त्याला पाहते. अनय तिच्या चेहऱ्याकडे स्वतः चा चेहरा घेऊन थोडस खाली झुकून हळूच तिच्या ओठांवर ओठ टेकवतो. ती देखील डोळे बंद करून त्याला प्रतिसाद द्यायला लागते. अनय काहीवेळाने तिच्या ओठांतून ओठ बाजूला काढून हसूनच तिला मिठीत घेतो.


"असच तुला सांभाळत राहीन. आयुष्यात कधीच तुला एकटे सोडणार नाही. तू फक्त माझ्यावर भरपूर प्रेम करायचे.",तो म्हणतो. तशी ती मान हलवते.


"भाईला भेटवू शकतात का तुम्ही मला? त्याने एवढ सगळ केलं म्हणून मला एकदा भेटायचं आहे. पुन्हा कधीच काही मागणार नाही मी तुमच्याकडे.", मायरा मान वर करून त्याचं शर्ट गच्च हातात पकडुन म्हणाली.


"नक्कीच!! आता आपण भारतातच राहायला जाऊ. तुझी तब्येत चांगल्या प्रकारे सुधारली आहे.", अनय तिच्या डोळ्यात पाहून म्हणाला. त्याचं बोलणे ऐकुन ती आनंदी होते.


"खूप खूप थँक्यू", ती आनंदी होऊन म्हणाली.



हे दोघे स्वतःशी बोलत असतात आणि डेझी मात्र यांना पाहून गालात हसत असते. मायराला अनय बद्दल मनात फिलिंग निर्माण झाली होती. पण तिच्या परिस्थितीमुळे ती हतबल होती. आज मात्र अनयच बाळासंबंधीचे बोलणे अनय विचार ऐकून ती आज व्यक्त झाली होती. अनय देखील आज स्वतःला सुखी समजत होता. कारण आज त्याला हवे ते मिळाले होते.




क्रमशः
_____________________

मायरा लहान होती. तिच्यासोबत काय घडायचं हे तिला कळत नव्हते. त्यामुळे ती बिघडली होती. पण आता जेव्हा चांगल्या माणसांत ती राहायला लागली. तसे तिचे विचार सुधारले. गुंजन, वेद वेगळे होते. त्यामुळे मायरा बद्दल द्वेष त्यांच्या मनात निर्माण झाला नाही. कधी कधी वाईट वागणाऱ्या माणसांसोबत चांगल वागले की, त्यालाच एकदिवस स्वतः ची चूक कळते. तसच काहीस इथ झाले होते. भेटू पुढील भागात.