भाग २५.
वेद गुंजनला सोडून ऑफिसला निघून येतो. ऑफिसला आल्यावर तो बाहेरच्या त्याचा वेट करत असलेल्या लोकांना आतमध्ये पाठवण्याचे ऑर्डर कॉल करून देतो. त्याने कॉल केल्यावर काही वेळातच एक फॉरेन महिला आपल्या रुबाबातच त्याच्या केबिनच्या आत दार वाजवून येते. तसा वेद देखील त्या दिशेला पाहायला लागतो.
"मिस्टर जाधव, नाईस टू मीट यू!!", ती महिला काहीशी हसूनच म्हणाली. तिचं बोलणं ऐकून वेदच्या चेहऱ्यावर भलीमोठी स्माईल येते.
"डेझी, अजूनही तशीच आहेस तू?", वेद तिला उत्तर देत म्हणाला.
"मग बदलली पाहिजे का? ज्यांच्यासाठी वाईट, त्यांच्यासाठी वाईट आहे मी. तुमच्यासाठी चांगली आहे", डेझी त्याच्यासमोर येत चेअरवर बसत म्हणाली.
"मला हे माहित आहे. सध्या कामाचं बोलू.काय म्हणत आहे मग जाधव फॅमिली?", वेद आता सिरियस होत विचारतो. त्याचं बोलणं ऐकून डेझीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात. डेझी तिने सोबत आणलेल्या ऑफिस बॅग मधून दोन फाईल काढून वेदच्या समोर ठेवते. तसा वेद ती फाईल हातात घेऊन वाचायला लागतो.
"तुझ्या प्रॉपर्टीचे आणि घराचे पेपर आहेत हे. वेद तू त्या घराला २३० कोटीची सगळ्यात मोठी बोली लावली. जी की खर्या किंमती पेक्षा कितीतरी मोठी आहे? एवढा पैसा लावण्याचं काय कारण आहे वेद?", डेझी डोळ्यावरचा गॉगल काढून वेदला पाहत म्हणाली. तिचे बोलणे ऐकून वेद फाईल टेबलवर ठेवतो.
"माझ्या आणि आईच्या आठवणी आहेत त्या घरात. आईचा जीव आहे त्या घरावर!! त्यात ते घर माझ्या आईने त्यांच्या हाताने सजवले आहे. म्हणून तिच्यासाठी मी कितीही पैसा खर्च करू शकतो. आयुष्यात माझी आई आणि गुंजन या दोघींच्या आनंदासाठी मी काहीही करू शकतो!!",वेद विचार करत म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून समोर बसलेली डेझी त्याला पाहत राहते. आईच्या आठवणीसाठी , आनंदासाठी त्याने एवढी मोठी किंमत मोजली होती!! की ज्याचा विचार कोणीच करू शकत नाही!! बिझनेसमन लोक फायदा असलेल्या ठिकाणी आपले पैसे लावत असतात हे ती जाणून होती. पण वेदने मात्र फक्त आणि फक्त आईसाठी ८० कोटीच्या असलेल्या घराची किंमत २३० कोटी लावली होती. ज्याचं तिला नवल वाटत होत. यातून फायदा तर त्याला काहीच होणार नव्हता. ती अजुनही वेदकडेच पाहत असते. हे पाहून वेदच तिच्यासमोर हात हलवतो.तशी ती भानावर येते.
"वेद, या काळात आई वडिलांना वृद्धाश्रम मध्ये टाकणारे मुलांच्या बातम्या मी ऐकत आली आहे. पण या काळात तुझ्यासारखा आईवर प्रेम करणारा मुलगा पाहायला मिळाला हे पाहून मला खूप भारी वाटल. तुझ्यासारख आईचे उपकार जाणारा मुलगा या काळात पाहून माझं जीवन तर धन्यच झालं अस म्हणेन मी!!पण वेद तुला तुझी बायको काही म्हणाली नाही का एवढी मोठी किंमत तू मोजली म्हणून?", डेझी वेदला पाहत म्हणाली. तिच्या शेवटच्या बोलण्यावर वेद थोडासा हसतो.
"तिला माहित आहे हे आणि यावर ती काहीच मला बोलली नाही. फक्त एवढंच म्हणाली,'मी आहे तुमच्यासोबत, तुम्ही जे कराल ते विचार करून आणि प्रॅक्टीकल होऊन कराल!!' आता तू सांग मग काय बोलते यावर तू?", वेद हसूनच गुंजनचा चेहरा आठवत म्हणाला. आता मात्र ते सगळ ऐकून डेझीला तर त्या दोघांचे कौतुक वाटते.
"अरे, आता बाबा मी काहीच बोलणार नाही यावर!!कारण तुझ्यापेक्षा जास्त मला तुझी बायको आवडली बघ. मला अश्या मुलीला भेटायला आवडेल. जी आपल्या नवऱ्याला तिच्या सासूच्या आनंदासाठी काहीही करायला लावते. खरचं वेद तू खूप लकी आहे. अशी जीवनसाथी तुला मिळाली. नाहीतर मी तरी माझं सांगते मला ना हे सासू , सासरे वगैरे काही आवडत नाही. हा आंटी आवडायच्या!! पण रिअल लाईफ मध्ये सासू नको वाटते.", डेझी नाक मुरडत म्हणाली. तिचं बोलणं ऐकून वेद विचारात पडतो. कारण दोन प्रकारचे उदाहरण आता त्याला अनुभवायला मिळत होते. एक गुंजन होती, जी सासूसाठी तिच्या आनंदासाठी , नवऱ्याला काहीही करायला लावत असायची आणि या उलट आता डेझी होती जिला सासू सासरेच आवडत नव्हते. तो मनातच गुंजनच त्याच्या आई संबंधीचे विचार आठवून समाधानी होतो.
"गुंजन, आय लव्ह यू!!मी तुझ्या स्वभावाने तुझ्या रोज प्रेमात पडत जातो. आज तर तू या सगळ्यांपेक्षा वेगळी आहेस!!हे कळून चुकल आहे मला. तुझ्यासारखी बायको माझ्या आयुष्यात आहे ,हेच मी माझे भाग्य मानतो. मला प्रत्येक जन्मी तूच बायको म्हणून हवी आहे!!", वेद मनातच हसतच गुंजनला आठवत म्हणाला. त्याला हसताना पाहून डेझी देखील गालातच हसते.
"वेद, आता हसून झाल असेल? तर पुढचं बोलूया का?", डेझी त्याला हसताना पाहून म्हणाली. तिच्या बोलण्याने तो भानावर येतो.
"वेद, खर सांगायचं झालं तर मला प्रश्न पडतो, तू या लोकांच्या मध्ये कसा काय जन्माला आला याचा? अरे, ही माणस नाहीच आहे. एक जनावर आहेत. तुझी ती बहिण तर सध्या मेंटल हॉस्पिटलच्या लायकीची बनलेली आहे. ती खूप वाया गेली आहे वेद. आता ती प्रेग्नेंट आहे. त्यात मला वाटत ती आता सुधारायला हवी यासाठी डॉक्टरची मदत घ्यावी!!मी काय म्हणते वेद तुला कळत आहे ना?", डेझी सिरियस होत म्हणाली. डेझीचे बोलण ऐकून वेद विचारत पडतो.
"हममम.. तिला ट्रीटमेंट द्यायला लाग. जे पैसे लागतील ते माझ्या बँक अकाऊंट मधून मिळून जातील तुला. काहीही झालं तरीही माझी लहान बहीण आहे ती. तिला अस मला पाहवणार नाही. मनात कधीच माझ्या तिच्या बद्दल द्वेष नाही निर्माण झाला. प्रयत्न केला मी. पण भाई या नावाने सगळ ते संपल!!म्हणून मी तिच्यासाठी हे करत आहे.", वेद एक सुस्कारा सोडत डेझीला म्हणाला. डेझीला देखील कळून चुकत की, वेद कधीच कोणाचे वाईट पाहू शकत नव्हता. जरीही ती लोक त्याचा द्वेष करत असली? तरीही त्याला ते जमल नाही. याच वेगळेणामुळे तो गुंजनच देखील चांगल्याप्रकारे मार्गदर्शन करत होता. कसा होता ना तो? हाच प्रश्न आता सध्या त्याच्यासमोर बसलेल्या डेझीला पडत होता. त्याला डेझीसारखं वागणं जमणार नव्हत!! याच कारणाने त्याने डेझीला त्या घराची मालकीण म्हणून पाठवलं होते. पण खरा मालक तो स्वतः होता. ही गोष्ट काय? त्याच्या घराला कळली नाही. गुंजनला मात्र न चुकता तो सगळ काही शेअर करत असायचा त्यामुळे त्याने तिला ही सांगितली होती. ज्या गोष्टीची दोघांना भीती वाटत होती. ती गोष्ट मायरा सोबत घडली होती म्हणून त्याला वाईट वाटत होते. पण या ही स्थितीत तो तिला चांगली ट्रीटमेंट देण्यासाठी डेझीला सांगत होता. यावरूनच त्याचं मन सगळ काही डेझीला पाहायला मिळत होत. ती वेदकडे फाईल वगैरे ठेवून जाते आणि वेदने जे काही सांगितले ते फॉलो करण्यासाठी म्हणून त्याच्या ऑफिस मधून फुल्ल जोशातच निघून जाते. ती जाताच वेदच लक्ष हातातील वॉच कडे जात. तसा तो एक सुस्कारा सोडून आपला मोबाईल हातात घेतो.
संध्याकाळ झाली होती त्यात गुंजनचे दोन मिस्ड कॉल्स त्याला मोबाईलवर दिसतात. हे पाहूनच तो आपल्या कपाळावर बोट नेवून कपाळ थोडस रब करतो. नंतर विचार करून आपल व्हॉट्सॲप ओपन करतो आणि त्यावरून तिला मेसेज करतो. काही वेळ तो मोबाईलला पाहत बसतो, तर काही रिप्लाय तिचा येत नाही. मग नंतर खूपवेळाने तिचा बिझीचा मेसेज पडतो. तसा मग तो विचार करून ओके पाठवून मोबाईल बाजूला ठेवतो. साडे आठ पर्यंत तो ऑफिसच काम करून घरी जायला निघतो. कारण गुंजन जरी नसली घरात तरीही त्याची वाट पाहणारी त्याची आई मात्र होती!!ती वेद घरी आल्याशिवाय धड औषध वगैरे घेणार नाही आणि धड खाणार पण नाही. नुसती त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसणार!! हे सगळ काही तो जाणून होता. यासाठीच तो सगळ आवरून आपल लवकरच घरी जातो. घरी आल्यावर जो तो मनात विचार करत होता? तसच सत्यात घडत होत. कारण त्याची आई खरोखरच वाट पाहत दारावर थांबली होती. तो हसूनच मग आईजवळ जाऊन बोलतच आतमध्ये निघून जातो. फ्रेश वगैरे होऊन तो आईसोबत जेवण करायला बसतो. दोघेही एकमेकांसोबत बोलून जेवण संपवतात.
क्रमशः
---------------------