भाग २३.
पहाटे सहाच्या दरम्यान वेदला जाग येते. तो हळूच डोळे उघडून आपल्या बाजूला पाहतो. त्याच्या हातावर शांत झोपलेल्या गुंजनचा चेहरा पाहून तो गालात हसतो.
"माय लव्ह, गुड मॉर्निंग.",वेद तिच्या गालावर ओठ टेकवत म्हणाला. त्याच्या अश्या वागण्याने अंग चोरून घेऊन त्याच्या मिठीत शिरते.
"वेद झोपू द्या ना मला. तुम्ही पण असेच झोपा!!",गुंजन झोपेतच त्याच्या पोटाभोवती हातांचा विळखा घालत म्हणाली.
"गुंजन लव्ह यू. ",वेद हसूनच अस बोलून तिच्या कपाळावर स्वतःचे ओठ टेकवतो. काहीवेळ तो तसाच तिला मिठीत घेऊन तिच्या केसांसोबत खेळत असतो.
"सोना आता उठली नाही ना तू? तर मग मी पुन्हा रूमच्या बाहेर तुला जायला देणारं",वेद तिच्या कानाजवळ जात तिच्या कानावर किस करत म्हणाला. त्याच अस बोलणं ऐकून ती पटकन डोळे उघडते आणि त्याला पाहते.
"काहीही नाटक करायची नाही हा वेद. मी उठत आहे ना",गुंजन अस म्हणून उठत असते की तेवढ्यात वेद पटकन तिच्या अंगावर चढून तिला स्वतःच्या शरीराभोवती लॉक करतो. तशी गुंजन डोळे मोठे करून त्याला पाहायला लागते. पण वेद तिच्या हातांची बोट स्वतःच्या बोटांत अडकवतो आणि तिच्या मानेत मान घालून तिला हळूहळू किस करायला लागतो. तशी गुंजन स्वतःचे हात हलवण्याचा खोटा प्रयत्न करते. पण वेद मात्र काही तिला सोडत नाही. तो तसाच दुसऱ्या बाजूने देखील करतो. गुंजन आता मात्र त्याच्या हातातुन हात सोडवून घेते आणि सरळ त्याच्या कानाकडे जाऊन त्याच्या कानावर स्वतःचे दात लावते.
"मिस्टर वेद तुम्ही मला तसही इथून उठू देणार नाही आहात. तर मग झोपा ना गप्प. ",गुंजन हसून म्हणाली.
"नाहीच जाऊ देणार मी. स्वतः अस काही करायचं आणि मग जा म्हणायचं? नाही चालणार गुंजन. ",वेद अस म्हणून तिला आपलंसं करत असतो. गुंजन हसूनच शांत बसते. पण वेदच्या उगड्या हातांवर तिची नजर जाताच ती त्याला अडवते.
"वेद हे निशाण तर दिल्लीत मला दिसलं नव्हतं तुमच्या अंगावर. मग आता कस आलं? काही झालं का तुम्हाला?",गुंजन काळजीने त्या जागी हात फिरवत म्हणाली. तिचं अस बोलणं ऐकून वेद भानावर येतो. तो ती घाबरणार या भितीने सरळ होऊन बसतो आणि तिला जवळ घेतो.
"गुंजन मी तुला जे काही सांगेल त्याने तू अजिबात पॅनिक होणार नाही अस प्रॉमिस कर. मग मी सांगेन तुला",वेद अगदी शांतपणे म्हणाला. त्याच बोलणं ऐकून गुंजनच्या हृदयाची धडधड वाढते. ती त्याच्याकडे पाहते.
"प्रॉमिस. पण काय झालं होतं तुम्हाला?",गुंजन प्रेमाने स्वतःला शांत करत विचारते.
"गुंजन सेजल प्रकाश ही एक बिजनेस फॅमिलीतिल मुलगी आहे. लहानपणी आमच्या घरातील लोकांनी आपापसात माझे आणि सेजलचे लग्न ठरवले होते. पण मला आजवर ती कधीच आवडली नाही. इव्हन माझ्या मनात अशी फिलिंग देखील नव्हती. जशी तू आसपास असली ना की ओढ असते? असलं काही नव्हतं माझं तिच्याबद्दल. मग मला जेव्हा कळलं की माझं तुझ्यावर प्रेम आहे. यासाठी मी आईकडे हट्ट केला आणि तुला आपलं बनवलं. तू जरिही मला स्वीकारले नसते ना? तरीही मला पूर्ण आयुष्य तुझ्यासोबत काढायचे होते. यासाठी हे लग्न होत. हळूहळू तुझे स्वप्न कळलं तस ते पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करायला लागलो. या सगळ्यात खूप काही घडलं. हे, तुला माहीतच आहे. त्या सेजलला कुठून तरी माझ्याबद्दल कळलं आणि ती तू घरात नाही हे पाहून माझ्यावर जाळ टाकायला आली होती. पण आपलं दोघांचे प्रेम जास्त असल्याने तो तिचा प्लॅन खराब झाला. मी तिला मानत नाही म्हणून तिने माझ्यावर गोळी चालवली.",वेद अस बोलून थांबतो. कारण गुंजनची मिठी त्याच्या भोवती घट्ट झाली होती. हे त्याला जाणवत. तसा वेद हळूच तिची मान वर करतो.
"भीती वाटली का? नको घाबरू. मी कायम तुझ्याजवळ राहणार आहे. फक्त तुझा बनून",वेद तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. तिच्याही नकळत तिच्या डोळ्यांतून पाणी बाहेर येत. ते गालावरून खाली पडायला लागत. तस वेद एका हाताने तिचे डोळे बंद करतो आणि त्या बंद डोळ्यावर स्वतःचे ओठ टेकवतो.
"वेद एवढं घडून देखील तुम्ही मला काही सांगितले नाही ना? तुम्हाला काही झालं असत ना तर मी काय केलं असत वेद?",गुंजन रडतच त्याला विचारते. तिचा आवाज ऐकून वेद शांत राहतो.
"वेद हे मंगळसूत्र, हे डोक्यावरच कुंकु, या हिरव्या बांगड्या हे काय आहे माहीत आहे का तुम्हाला? हे फक्त सौभाग्यच लेण नसतं आमच्या मराठी बायकांसाठी. हे आमचा जीव की प्राण असतो. एकदिवस हे काही घातलं नाही ना की एक अस्वस्थ पणा निर्माण होत असतो मनात. पण तुम्हाला नाही कळणार माझ्या भावना वेद. तुम्ही ही गोष्ट लपवूच कसे शकतात? मी लपवला तर मला ओरडला होतात तुम्ही ना आणि आता तुम्ही असे वागलात? मला नाही बोलायच तुमच्यासोबत वेद!!",गुंजन अस बोलून रागातच तिथून उठत असते. पण वेदची पकड घट्ट असल्याने तिला उठायला काही येत नाही. वेद चपळाईने तिला आपल्या मिठीत घेतो. तशी ती त्याला हाताने मारत दूर होण्याचा प्रयत्न करते. पण ते काही तिला शक्य होत नाही. तशी ती रडायला लागते.
"आय हेट...",अस काही ती बोलयालक जाणार त्या आधीच वेद तिच्या ओठांवर स्वतःचा हात ठेवतो.
"कधीच नाही ते बोलायचं मला. ज्या दिवशी बोलशील त्या दिवसापासून वेद तुझ्यासमोर कधीच येणार नाही.",वेद तिला पाहत शांतपणे म्हणाला. पण त्याच अस बोलणं ऐकून तिचा राग शांत होतो. ती त्याच्या मिठीत राहूनच रडायला लागते.
"तुम्ही पुन्हा असलं बोलून मला रडवत आहात वेद.", गुंजन रडतच त्याला म्हणाली. पण तिचं बोलणं ऐकून यावेळी मात्र तो हसतो.
"सॉरी ना सोना. पण तू अशी आता रडून आपले चांगले दिवस का खराब करत आहेस हा? तुला तर डान्स प्रॅक्टिस करायची आहे आणि अजून काम पण करायचे आहे ना? चल उठ लवकर.",वेद तिला कामाची आठवण करून देत म्हणाला. त्याच्या तोंडून ते सर्व ऐकून गुंजनचा लक्ष घड्याळावर पडतो. तशी ती पटकन स्वतःला सावरतच वेदपासून दूर होते. यावेळी वेद देखील तिला हसूनच सोडतो. तशी गुंजन स्वतःला सावरत वेदच शर्ट घालून बाथरूम मध्ये निघून जाते. वेद मात्र ती गेला त्या दिशेला पाहत राहतो.
"नशीब हिने काल नाही पाहिलं नाहीतर, वेद तुझी रात्र काय चांगली गेली नसती.पण हिच कुंकू, बांगड्या आणि मंगसूत्रावरच प्रेम पाहून मनाला समाधान मिळालं!! किती चांगली गोष्ट असते ना? आपण ज्या व्यक्तिवर प्रेम करतो आणि ती व्यक्ती देखील आपल्यावर जीवापाड प्रेम करायला लागते. हे सगळं काही मनाला सुखावून जातो. आता बाकी काहीच नको गुंजन आयुष्यात मला. ही स्पर्धा जिंकल्यावर एक छोटीशी कार्बन कॉपी पाहिजे तुझी वाली मला. जास्त अपेक्षा नाही माझी. एकच गुडीया बस्स झाली!!",वेद मनातच स्वतःच आवरत म्हणाला. पण मुलीच्या विचारांवर तो स्वतःकडे चमकून पाहतो.
"हे काय विचार करत आहे मी? ते सुद्धा गुंजनचा विचार न करता?मुलगी मुलगा काही असलं तरीही त्याचा नऊ महिने त्रास माझ्या गुंजनला होणार आहे. नाही नाही तो त्रास मला नाही बघवणार. त्यापेक्षा नकोच हे. मी दत्तक घेईन मुलं. मला माझी गुंजन हसणारी हवी आहे. ती नेहमी माझ्यासोबत रहावी. असच वाटत मला.",वेद स्वतःच्या शर्टची बटन लावत मनातच म्हणाला. तो स्वतःशीच काहीतरी निर्णय घेऊन आपलं आवरुन रूमच्या बाहेर पडतो. इकडे गुंजन देखील आपली मस्त तयार होऊन रूमच्या बाहेर पडून वेदच्या आई आणि वेदसाठी हसूनच नाष्टा बनवायला लागते.
काहीवेळाने वेद तयार होऊन खाली येतो आणि आई, गुंजन सोबत बसून नाष्टा करून आपल्या कामाला निघून जातो. गुंजन देखील आपली काम आवरुन रूममध्ये राहून आपली डान्सची प्रॅक्टिस करायला लागते.
क्रमशः
---------------------------