Gunjan - 22 in Marathi Women Focused by Bhavana Sawant books and stories PDF | गुंजन - भाग २२

Featured Books
Categories
Share

गुंजन - भाग २२

भाग २२.

गुंजनला येऊन एक दिवस देखील झाला नव्हता आणि तिने तर पूर्ण घराचा ताबा हाती घेतला. वेदने तर तिच्या घरात असल्याने वेगळाच आनंदी राहत असायचा. तिची ही काही वेगळी अवस्था नव्हती. वेदच्या आईची काळजी घेत ती वेदला देखील हळूहळू वेळ देत होती. असेच एका रात्री वेद गुंजनला बेडवर जवळ घेऊन बसला होता. तो आपल्या उजव्या हाताची लांबसडक बोटे तिच्या हातात अडकवतो. तशी गुंजन गालात हसते.


"अहो, तुम्ही ना खूप छान आहात!! आईला आणि मला जपून आपलं काम करत असतात. ",गुंजन प्रेमळ आवाजात म्हणाली. तिचा असा आवाज ऐकून वेद मागूनच तिला जवळ घेतो.


"फक्त प्रेमळ? गुंजन एवढे दिवस तू मला अजून ओळखले नाही का?",वेद तिच्या जवळ चेहरा करत म्हणाला. त्याचे असे बोलणे ऐकून गुंजन त्याला काही बोलणार, त्या आधीच वेद अगदी हळूवारपणे तिच्या ओठांना आपल्या ओठांच्या ताब्यात घेऊन किस करायला लागतो. वेदच अस वागणं पाहून ती शॉक होऊन त्याला पाहते.



"मी ओळखते वेद तुम्हाला जास्त. त्यामुळे तुम्ही जवळ येतात अचानक तरीही मी तुम्हाला हल्ली काही बोलत नाही. कारण मला ते सगळं आवडत. मला तुमच्यावर खूप प्रेम करायचं असत.",गुंजन मनातच डोळे बंद करून म्हणाली. ती हळूच स्वतःला वेदच्या ताब्यात समर्पित करून त्याच्यावर प्रेम करायला लागते. वेद हळुवारपणे तिला बेडवर झोपवून हसूनच स्वतःचा शर्ट काढायला लागतो. तशी गुंजन लाजून खाली मान घालते.


"ओह गॉड वेद तुम्ही खुपच हॉट आहात. पण अजूनही मला तुम्हाला अस पाहण्याची सवय नाही आहे. ओह गुंजन तुझा नवरा आहे तो. काहीपण विचार करते तू. यू स्टूपिड गर्ल",गुंजन खाली मान घालून मनातच स्वतःला म्हणाली. तसा वेद हसूनच तिच्या अंगावर पडतो आणि हळूच तिच्या नाकावर स्वतःच नाक घासतो.



"माझ्या गुंजनला कोणी स्टूपिड म्हटलेल मला नाही चालणार. ",वेद हसूनच तिच्या डोळ्यांत पाहत म्हणाला. पण त्याच अस बोलणं ऐकून ती गोंधळते. वेद मिश्किलपणे हसतच तिच्या गळ्याजवळ स्वतःचे ओठ टेकवतो. तशी ती लाजून शांत होते.


"मिसेस वेद लग्नाच्या आधी असला काही माझ्याबद्दल विचार केला नव्हता ना?",वेद एकदम हळू आवाजात तिच्या कानावर ओठ टेकवत तिला विचारतो. तशी गुंजन हसूनच त्याच्या गालावर किस करते.


"असले काही विचार नव्हते. पण तुम्हाला पाहून मला ना अस वेगळं फिल होत असत. तुम्ही असे रोमान्स करतात ना? हे कोणाला वाटणार नाही हा वेद. ",गुंजन काहीशी विचार करतच म्हणाली. तस वेद तिला पाहून गालात हसतो.


"माझी बायको आहेच एवढी क्युट अँड सुंदर!!त्यामुळे मी तसा आहे. पण हे फक्त तुझ्यासमोर. आपला हा एकांताचा टाईम आहे त्यामुळे मला वाटत तुझ्यावर भरभरून प्रेम करावे.",वेद अस बोलून तिच्यापासून दूर होऊन बेडवर पडतो आणि एका हाताने तिला जवळ ओढून घेऊन तिला अनुभवायला लागतो. गुंजन देखील त्याच्या मिठीत स्वतःला सेफ फिल करते.


"ओके बाबा आपल्या या वेळेत मी तुम्हाला भरभरून प्रेम करेन. ",गुंजन अस बोलून वर सरकते . तशीच ती वेदच्या चेहऱ्यावर हळुवारपणे ओठ टेकवून त्याला आपलंसं करते. गुंजन हळूहळू वेदला आपलंसं करते आणि वेद देखील तिच्या प्रेमवर्षाव करायला लागतो. नंतर दोघे शांत होऊन एकमेकांच्या मिठीत शांत बसतात.



"वेद, आज आईकडून ऐकलं गुंजन इंडस्ट्रीचे नाव तुम्ही माझ्या नावाने ठेवलं आहे आणि हे नाव आपल्या लग्नाच्या आधीपासून तुमच्या डोक्यात घुमत होत. एवढं प्रेम पाहून वेद मी निःशब्द झाले आहे. काय बोलावे वेद मी तुम्हाला हे खरंच कळत नाही आहे.",गुंजन विचार करत म्हणाली.



"हो मग गुंजन हे नाव माझ्या आयुष्यातील बेस्ट आहे. याच नावाने मला प्रेम कळलं. मला एक वेगळं यश मिळाले आहे सगळीकडे. त्यामुळे हेच नाव माझ्या मनाप्रमाणे माझ्या आसपास देखील राहणार आहे.लोक म्हणतात ना? एक मुलगा घडतो तेव्हा त्याच्या मागे त्याच्या मागे फॅमिलीचा सपोर्ट असतो आणि शिक्षकांचे आशीर्वाद असतात? तसच काहीसे माझे आहे. पण माझ्या आयुष्यात मला जन्म देणाऱ्या आईचा आणि माझ्या शरीराचा, सुख दुःखाचा भाग झालेली माझ्या बायकोचा सपोर्ट असल्याने, आज मी हे सगळं पाहत आहे. मी तुम्हां दोघींचा ऋणी आहे. माझ्या आयुष्यात माझी आई माझी पहिली अशी महिला आहे. जिने माझ्यावर चांगले संस्कार करून मला घडवल आहे. दुसरी तू आहे जिने माझं आयुष्य प्रेमाने बहरून टाकले आहे आणि तिसरी आपली मुलगी असेल. जी मला बाबा होण्याच सुख देणार आहे ",वेद तिचं बोलणं ऐकून झाल्यावर तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला. पण त्याच शेवटच वाक्य ऐकून गुंजन लाजूनच त्याच्या मिठीत शिरून झोपून जाते.



"ही कधीच सुधारणार नाही. पण आज जे आहे ते खरं आहे. मायरा तुझ्यासाठी आता येणारे दिवस चांगले नसणार. रोज तुला आईची आठवण येणार असेच काहीसे होईल आता तुझ्यासोबत.",वेद अस बोलून स्वतःशी डोळे बंद करून झोपून जातो. हे जरिही शांत झोपले असले? तरीही जाधव कुटुंब मात्र काही व्यवस्थित झोपल नव्हतं.



जाधव कुटुंबाच्या घरी:-



"हे बघा मिस डेझी विलियम तुम्ही आम्हाला वेळ द्यावा थोडासा अशी आमची अपेक्षा आहे. एवढ्या रातोरात आम्ही कुठे जायचे हा?",वेदचे बाबा एका सुंदर अश्या फॉरेन महिलेच्या जवळ जात म्हणाले. त्यांचे असे बोलणे ऐकून ती महिला रागातच तिच्या समोर रक्तबंबाळ पडलेल्या एका माणसाच्या हातावर स्वतःच्या हिल्सचा पाय ठेवून जोरातच दाबते. तसा तो माणूस कळवळून वेदनेने ओरडायला लागतो.


"आह आह सोडा मला.....यांचे मॅटर आहे ते....",तो माणूस वेदनेने ओरडत म्हणाला. पण त्या बाईचे अस वागणं पाहून पूर्ण घरात भीतीचे वातावरण निर्माण होते.


"एकच उपाय तुम्ही सगळे जण आजपासून माझे नोकर बनून रहा!! मंजूर असेल तर सांगा? नाहीतर घर रिकामी करा.",ती बाई रागातच त्या सर्वांना पाहून म्हणाली. पण तिचे ते रागाने लाल झालेले डोळे पाहून सगळे घाबरतात. सध्या त्यांना काही सुचत नसल्याने , वेदचे बाबा समोर येतात.


"ठीक आहे!! मिस मायरा उद्यापासून तुमच्यासारखी मुलगी मला माझ्या ऑफिस मध्ये दिसली नाही पाहिजे. जाधव घराण्याची पूर्ण प्रॉपर्टी आणि सोबत ऑफिस देखील माझ्या नावावर असल्याने? मला तुमच्या कोणाचीही ढवळाढवळ आणि मनमानी कुठेच चालणार नाही. हे ध्यानात ठेवा. मला कोणी नकार दिला ना? तर या मुलापेक्षा वाईट अवस्था करून कोर्ट मध्ये लिगली कारवाई केली जाईल तुमच्या संपत्तीवर. हे देखील थोडं लक्षात असू द्या!!",ती बाई अगदी मराठीत त्यांना पाहून बोलली. पण तिचं अस बोलणं ऐकून मायरा तिला रागत पाहून तिथून धुसपुसत निघून जात असते की, तेवढ्यात डेझीचा आवाज तिच्या कानावर पडतो.




"मिस मायरा ,कुठे झोपायला जात आहात? तुम्ही आता मी काय बोलले ते ऐकलं नाही का? हे सगळं माझं आहे. त्यामुळे तुम्ही या घरातील सर्वेन्ट लोकं जिथं झोपतात ना? तिथं जाऊन पडा. उद्या सकाळी मला पाच ला कॉफी हवी असते, त्यामुळे ते देखील तुम्हीच पहायच आहे.",डेझी अस जेंटली बोलते आणि सगळ्यांवर एक कटाक्ष टाकून आपले पाय वाजवत तिथून सरळ वरच्या वेदच्या रुममध्ये निघून जाते. पण इकडे मात्र तिच्या बोलण्याने आणि वागण्याने जाधव कुटुंबाची झोप मात्र रातोरात गायब झाली होती. डेझी सोबत आलेले काळ्या सुटाबुटातील लोक तिथं जमिनीवर पडलेल्या त्या माणसाला उचलून घेऊन घराच्या बाहेरच्या रस्त्यावर फेकून येतात आणि पूर्ण हॉल जाधव कुटुंबातील सदस्यांकडून साफ करून घेतात. ती लोक देखील त्या लोकांना घाबरून रात्रीचे घर अगदी स्वच्छ करून टाकतात.






क्रमशः
-------------------

कोण आहे ही डेझी? हे पाहू पुढील भागात. तोपर्यंत वाट पहा. धन्यवाद.