Gunjan - 21 in Marathi Women Focused by Bhavana Sawant books and stories PDF | गुंजन - भाग २१

Featured Books
  • आखेट महल - 19

    उन्नीस   यह सूचना मिलते ही सारे शहर में हर्ष की लहर दौड़...

  • अपराध ही अपराध - भाग 22

    अध्याय 22   “क्या बोल रहे हैं?” “जिसक...

  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

Categories
Share

गुंजन - भाग २१

भाग २१.

"आई? त्या इथे कसे काय?त्या घरात असताना तुम्ही अस करत होतात? त्यांनी पाहिलं ना तर माझ्याबद्दल गैरसमज करतील. लाज वगैरे सोडून मी अस किस केलं तुम्हाला. ओ गॉड वेद तुम्हाला आधी सांगता येत नव्हतं का? त्यात माझी साडी पण अशी आहे? तुम्ही एकटे असशाल म्हणून सिव्हलेस आणि बॅकलेस घातला ब्लाऊज मी. पण आता मलाच कसतरी वाटत आहे. सासूबाई समोर अस काही घालून जायला.काय विचार करतील त्या माझा...",गुंजन गोंधळून त्याच बोलणं ऐकून भीतीने एकटीच त्याला पाहत बडबडत असते. तसा वेद तिची बडबड ऐकून हसूनच तिच्या तोंडावर स्वतःचा हात ठेवतो. तशी ती वैतागून त्याला पाहते.



"किती बडबडत आहेस? अरे बाबा शांत तर होतच नव्हती तू. म्हणून मग मी अस केलं. आता रिलॅक्स हो जरा बघू.",वेद तिच्या तोंडावरचा हात बाजूला काढत हसून म्हणाला. गुंजनला पाहून त्याचा चेहरा थोडासा खुलतो.


"मी बडबडत आहे हे दिसत तुम्हाला ना? पण वेद अहो माझे कपडे आपल्या रूममध्ये आहेत आणि आता मी अशी नाही ना जाऊ शकत सासूबाई समोर. प्लीज, तुम्ही जाऊन आणा ना.",गुंजन रिक्वेस्ट करत म्हणाली. पण तिचं अस बोलणं ऐकून तो नाही मध्ये मान हलवतो.


"अरे, सोना यातून तू भारीच दिसते की? काही वाईट नाही आहे. अंग तर झाकलेलच आहे ना? मग कशाला घाबरते तू हां?",वेद तिला मागूनच मिठीत घेत म्हणाला.


"अहो, फाजीलपणा करू नका हा. उगाच सासूबाई येतील हा. तुम्ही जास्तच रोमँटिक होत आहात.",गुंजन वैतागत त्याचा पोटावरचा हात काढत बडबडते. पण ते काही तिला शक्य होत नव्हतं.


"गुंजन , रिअली सॉरी. बट मी ना आतापासूनच तुझे सगळे शो पाहण्याचा प्रयत्न करेन. काल प्रॉब्लेम झाला होता. त्यामुळे तुझ्याकडे दुर्लक्ष झाले. पण आता नाही करणार. ",वेद तिच्या खांद्यावर मान ठेवत म्हणाला. त्याच अस बोलणं ऐकून गुंजन आपला हात उचलते आणि हसूनच त्याच्या गालावर ठेवते.


"नका ना जास्त एक्स्प्लेन करत जाऊ. इट्स ओके आहे. समजू शकते मी तुम्हाला. प्रॉब्लेम नाही झाला असता तर तुम्ही माझे कॉल उचलले असते. हे मला माहित आहे वेद. पण प्रॉब्लेम काय झाला होता वेद?",गुंजन प्रेमाने त्याच्या मिठीत हरवून त्याच्या गालावर हात फिरवत विचारते. तिचे असे प्रेमाने त्याला समजून घेणं आणि नंतर त्याच्यावर भरभरून प्रेम करणं. हे सगळं काही त्याला आवडत असत. एक बायकोची जशी अपेक्षा असते ना? आपल्याला नवऱ्याने प्रेम करावे, काळजी घ्यावी, आपले मन जपावे अश्या अपेक्षा मुलांकडून केल्या जातात. पण या सगळ्यात कधी कधी आपण त्यांचे मन समजून घेत नाही.


आज वेदच्या मनात वेगळं भावनांचे वादळ उठले होते. त्यात तो मुलगा आहे!! अस त्याच्या घरात आधीपासूनच बजावून सांगितल्याने तो कोणापुढे जास्त व्यक्त होत नसायचा. कारण त्याचे घरचे म्हणायचे, मुलाने रडायचं नसत. आपला हक्क असा भांडून , रागात घ्यायचा असतो. मुलगा काहीही करू शकतो. असे अनेक विचार त्याच्या मनात भरवले जात असायचे. पण तो मात्र त्या घरात राहून देखील अगदी शांत आणि जबाबदारीने वागत असायचा. स्वतःच्या आईपासून ते बायको पर्यंत सर्वच स्त्री जातीचा सन्मान तो करत असायचा!! त्याचे विचार त्याच्या घरातील लोकांसारखे अजिबात नव्हते. पण आज मात्र गुंजनला जवळ पाहून नकळतपणे त्याला आपले पणाची जाणीव होते. तो गुंजनच्या विचारण्याने तिला सरळ करून स्वतःच्या मिठीत घेतो आणि तिच्या कंबरेला हातांचा घट्ट विळखा घालून रडायला लागतो. त्याच अस अचानक वागणं पाहून गुंजन गोंधळते.



"वेद वेद, काय झालं तुम्हाला? अस का रडत आहात? माझं काही चुकलं का?सॉरी ना पण तुम्ही अस नका ना रडू. मला भीती वाटते.",गुंजन त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवतच म्हणत असते.



"गुंजन, आईची अवस्था नाही ग पाहवत आहे मला. मी कोणाकडे नाही व्यक्त होऊ शकत. कालपासून स्वतःला कसतरी सावरले आहे. पण आता नाही होत मला हे सगळं पाहून. आजवर मी माझ्या आईला माझ्या आयुष्यातील देवी समजत असायचो. कारण तिच्यामुळे मी हे जग पाहिले. भलेही तिला बाबांचे वागणे कधी कधी योग्य वाटले. तरीही मी तिच्यासाठी शांत राहत असायचो. आपलं लग्न देखील मी हट्ट करत केलं होतं. माझ्या आईने माझा हा पहिला हट्ट पूर्ण केला आणि तू माझ्या आयुष्यात आली. पण जशी तू मला हवी होती आयुष्यात ना? तशी आई देखील हवी होती. काही निर्णयामुळे नाही जमल मला ते. आताची तिची अवस्था पाहून उगाच आपण तिला तिथं सोडले? असे वाटायला लागलं. मायरा एवढीशी होती नाजूक बाहुली कशी. आईने तिला खूप जपले होते. तिच्यावर खूप प्रेम केले. सगळे हट्ट तिचे पुरवले आणि आज तिनेच आईवर हात उचलला आणि मी मुलगा असून काहीच करू शकलो नाही. मायराला घेऊन आईने खूप स्वप्न पाहिली होती. पण आता तिला त्या मुलीची भीती वाटत आहे. ",वेद स्वतःला सावरत बोलत असतो आणि त्याचे असे बोलणे ऐकून गुंजनला जबरदस्त धक्का बसतो.



"वेद, तुम्हाला भक्त प्रल्हाद यांची गोष्ट माहिती असेलच ना? तसेच तुम्ही आहात. त्या लोकांमध्ये राहून देखील तुम्ही चांगले राहिलात. कारण तुम्ही स्वतःच्या मनाचे विचार वेगळे ठेवले आणि मन चांगलं ठेवलं. पण आता हे सगळं ऐकून मलाच दुःख होत आहे. तर सासूबाईची अवस्था काय असेल? याचा विचार देखील करवत नाही मला. वेद मला नाही माहीत मायरा बद्दल, जास्त असे. पण मला वाटत तुम्ही यावर कठोर कारवाई करावी. कारण आईपेक्षा या जगात कोणीच मोठं नसत. मी पण नाही आहे वेद. माझ्या आधी आजपासून तुम्ही तुमच्या आईच्या मनाचा विचार करावा. मी तुमच्या आयुष्यात येऊन काही महिनेच झाले असतील. पण आई मात्र, गेली कित्येक वर्षे तुम्हाला सांभाळत होत्या. त्यामुळे तुम्ही आईचे मन जपावे. मला नाही वाईट वाटणार कधी आणि मी नाही नाराज होणार हा तुम्ही असे केले तरी. पण माझ्या मनाचा विचार करून आईला हर्ट केलात ना? तर मग मी नाराज होईन तुमच्यावर. ",गुंजन त्याला सावरत बाजूला करत समजावत म्हणाली. तिचे अस बोलणं ऐकून वेद तिला पाहत राहतो. आणखीन एक व्यक्ती गुंजनच बोलणं ऐकून तिला पाहत राहते.



"गुंजन, तुम्ही देखील वेद सारख्याच आहात. सगळ्यात आधी आमचा विचार करता आहात!! अहो आमची लुडबुड नको तुमच्या संसारात. पुन्हा वाद वगैरे.",गुंजनचे बोलणे ऐकून ती व्यक्ती हळूहळू तिच्याजवळ येत म्हणाली. पण तिचे बोलणे ऐकून गुंजनची नजर त्या दिशेला जाते.



"सासूबाई, काहीही काय बोलत आहात?तुमची लुडबुड वगैरे काही होत नाही आम्हाला आणि सासू काही उगाच बोलत नसते हा सुनेला? तिला वळण लागावे यासाठी असत ते. तुम्ही पण माझं चुकलं की मला बोललात ना? तरीही मी ऐकून घेईन. पण तुम्ही आम्हाला सोडून कुठेच जायचं नाही. आजपासून तुम्ही मला आपली लेक समजून या घरात राहायचे. जशी आई मुलीला ओरडते ना चुकलं की? तस ओरडू शकता मला तुम्ही. ",गुंजन वेदच्या आईकडे पाहून म्हणाली. गुंजनचे विचार ऐकून तर त्यांना काय बोलावे तिला? हे कळत नव्हते.



"गुंजन, हा तुमचा मोठेपणा आहे. नाहीतर आम्ही काही दिवसांपूर्वी तुमची बाजू सावरत नसताना देखील, तुम्ही आज आमच्यासोबत असे वागत आहात. वेद प्रत्येकाच्या घरात अशी सून असली ना? तर सगळ्या सासवा स्वतःला भाग्यवान समजतील बर. सासू याचा अर्थ तुम्ही आज सांगितला. पण आम्ही असे नाही वागणार बर. तुम्ही आधीही आमची मुलगी होतात आणि आताही आहातच. भाग्यवान समजतो आम्ही स्वतःला, आमच्या आयुष्यात असे , दोन हिरे लाभले म्हणून. ",वेदची आई वेद आणि गुंजनकडे पाहत म्हणाली. त्यांच बोलणं ऐकून वेद एका बाजूने जाऊन आईला मिठी मारतो. पण गुंजन त्यांच्याजवळ जाणारच असते, की तेवढ्यात ती भानावर येते साडीचा पदर हातात पकडून खांद्यावर ओढून घेऊन वेद आणि त्याच्या आईला पाहून कसनुसपणे हसुनच तिथून धूम ठोकून पळून जाते. वेदला आठवत तस तो ती गेली त्या दिशेला पाहून गालातच हसतो.


"का पळाली ती? आवडलं नाही का तिला आम्ही इथं राहिलेलं?",वेदची आई टेन्शन मध्ये विचारते.



"काही नाही आई. तिचा ब्लाऊज फॅशनचा होता आणि तुमच्या समोर अस यायला तिला भीती वाटत होती. त्यामुळे भानावर येऊन ती पळून गेली.",वेद हसूनच म्हणाला. त्याच अस बोलणं ऐकून वेदच्या आईच्या चेहऱ्यावर देखील गुंजनचा चेहरा आठवून हसू उमटते.




क्रमशः
--------------------------