Gunjan - 17 in Marathi Women Focused by Bhavana Sawant books and stories PDF | गुंजन - भाग १७

Featured Books
Categories
Share

गुंजन - भाग १७

भाग १७.

मागील भागात:-

दिल्लीत गुंजन आपल्या रूममध्ये रात्रीची अचानक घाबरून उठून बसते. तिच पूर्ण अंग घामाने भिजून गेलं होतं. अस अचानक घाबरून उठल्याने तिच्या हृदयाचे ठोके जलद गतीने वाढले होते. नकळतपणे तिचा हात तिच्या गळ्यातील मंगळसूत्रावर जातो. तस तिला तिच्या मंगळसूत्राचा एक धागा तुटलेला दिसतो. त्या धाग्यातून काही काळे मणी बेडवर पसरलेले असतात. ते पाहून ती घाबरते.



"वेदऽऽऽऽ", तिच्या तोंडून भितीने निघते.



आतापासून पुढे:-

गुंजन पॅनिक होऊन पटकन आपला मोबाईल हातात घेते आणि वेदचा नंबर डायल करून त्याला कॉल करायला लागते. दोन ते तीन वेळा रिंग होते आणि कॉल बंद होतो. असच पुन्हा पुन्हा तिच्या बाबतीत घडत राहत. तशी ती आणखीन घाबरते.


"हे वेद पण ना!! कॉल का उचलत नाही. मला इथे टेन्शन आलं आहे आणि हे अस वागतात माझ्यासोबत.",गुंजन मोबाईलकडे पाहत म्हणाली. ती स्वतःला शांत करते आणि बेडवर पडलेले काळे मणी एक एक करून हातात उचलून घेते.


"गुंजन, रिलॅक्स!! काहीच झालं नसेल त्यांना. मी पण कधी कधी उगाच जास्त विचार करते.",गुंजन स्वतःला समजावत म्हणाली. ती गळ्यातील मंगळसूत्र हळुवारपणे काढून हातात घेते आणि तिच्या बॅगमधून दोरा आणून ते मंगळसूत्र ओवत बसते. तिला ते मंगळसूत्र एवढे प्रिय होते की, ती उद्याची वाट न पाहता स्वतःच ते रात्रभर ओवत बसते. मनात मध्येच नको ते विचार येत असायचे. पण ती मात्र सारखी सारखी स्वतःला समजावत असायची.



मुंबई:-


पहाटे चार वाजता वेद आपल्या रूममध्ये हाताला बेडवर धरून बसून बॉडीगार्डला काहीतरी सूचना देत असतो.


"बॉडीगार्ड सेजलला पोलिसांनी पकडले आहे. तर कमिशनरला तिला लवकरात लवकर न सुटण्यासाठी प्रयत्न करायला सांगा!! ती, एक मानसिक रोगी आहे. मला गुंजनच्या स्पर्धेला घेऊन काही रिस्क घ्यायची नाही आहे. त्यामुळे त्या मुलीला लवकर सोडू नका. असे , तिकडच्या पोलिसांना देखील सांगा.",वेद बॉडीगार्डकडे पाहून म्हणाला.


"ओके, सर. तुम्हाला मॅडमला कॉल लावावे लागतील. कारण तुमचे उपचार चालू होते तेव्हा मॅडमचे कॉल येत होते.",एक बॉडीगार्ड त्यातील त्याला म्हणाला.


"ओह. ही गुंजनला देखील हल्ली लगेच कळत बहुतेक. पण आता कॉल लावू नाही शकत मी. मॅडम झोपल्या असतील. सकाळीच करतो.",वेद मनातच विचार करत म्हणाला. तो बॉडीगार्डला तिथून बाहेर घालवतो आणि तसाच बेडवर आराम करत काही वेळापूर्वीचा त्याच्यासोबत घडलेला प्रसंग आठवत असतो.

काहीवेळा पूर्वी:-


"वेद साहेबऽऽऽऽ",रखुमाई आजी ओरडते. तसे सर्वजण वेदकडे पाहतात. बॉडीगार्ड लोक पटकन वेदकडे जाऊन त्याला कव्हर करतात. कारण सेजलने त्याच्यावर फायरिंग केली होती. पण ती गोळी वेदच्या हाताला छाटून गेली असल्याने, त्याच्या हातातुन रक्त येत होतं.



"रखुमाई आजी, मला काही झाले नाही आहे.",वेद आपला हात दुसऱ्या हातात धरत म्हणाला.


"वेद साहेब, अहो रक्त येत आहे तुमच्या हातातुन. आपण डॉक्टरकडे जाऊ.",रखुमाई आजी डोळ्यात पाणी ठेवत म्हणाल्या.


"आजी तेवढं काही नाही झालं. तुम्ही पोलिसांना कॉल करा. या सेजलला इथून लवकरात लवकर घेऊन जायला सांगा. ",वेद काहीसा चिडुनच म्हणाला. तसे, काही बॉडीगार्ड आधीच परिस्थितीचे भान ठेवून सेजलला पकडणारे तिथून तिला घेऊन जायचा प्रयत्न करतात. पण सेजल काही त्यांना जुमानत नव्हती. तरीही , ते बॉडीगार्ड तिला तिथून घेऊन जातात.


काहीवेळात पोलीस तिथे येऊन सेजलला वेद वर हल्ला करण्याच्या गुन्ह्यात कारवाई करत तिथून आपल्यासोबत घेऊन जातात. रखुमाई आजी डॉक्टरला कॉल करून त्यांना वेदवर उपचार करण्यासाठी बोलावतात. तसे, डॉक्टर बंगल्यावर येऊन वेदवर योग्य ते उपचार करून निघून जातात.


वर्तमानकाळ:-


"वेद साहेब, गुंजनला तुम्ही सांगा. हे सगळं. असे मला वाटते.",रखुमाई आजी तिथं येत म्हणाल्या. रखुमाई आजीच्या आवाजाने वेद भानावर येतो.


"आजी, तिला नका सांगू. ती आणखीन टेन्शन मध्ये येईल. छोटसं तर आहे हे. गुंजन एका मोठ्या स्पर्धेत उतरली आहे. तर तिचं फोकस तिथेच असावे, यासाठी ही गोष्ट तिला सांगू नका!!",वेद अगदी शांतपणे म्हणाला.



"पण साहेब, या यावेळी त्या इथं हव्या...",रखुमाई आजी बोलतच असतात की, तेवढ्यात वेद त्यांच वाक्य मोडतो.



"आजी, जरी माझी अशी अवस्था असली ना? तरीही मला सध्या तरी या सगळ्यांपेक्षा तिच स्वप्न महत्त्वाचे आहे. तुम्हाला माहिती असेलच, बायकांना काही झालं तरीही ती किती टेन्शन घेतात ना? हे आईकडून पाहिलं आहे मी. घरच्या कर्ता पुरुषाला काही झालं की एकदम हळव्या होतात आणि सगळं काही मग इमोशनल होऊन सोडुन द्यायला पाहतात. मला ना हेच नको आहे. गुंजन कशी सगळं काही व्यवस्थित पणे हँडल करणारी अशी हवी आहे!! म्हणजे एकदम प्रॅक्टिकली असा विचार करणारी. ही स्पर्धा एक निमित्त आहे. तिला मी तर बाहेरच ज्ञान कळावे आणि ते तिने आत्मसात करावे, यासाठी पाठवलं आहे. आता जर तुम्ही तिला सांगितला ना सगळं? तर ती सगळं काही सोडून येईल माझ्यासाठी. हेच नको आहे मला!!",वेद शांतपणे रखुमाई आजीला समजावत म्हणाला. त्याच ते बोलणं ऐकून रखुमाई आजी शांत होतात.



"साहेब तुमच्यासारखे विचार करणारे लोक जर या जगात असतील ना? तर प्रत्येक मुलगी खंबीरपणे आपलं शिक्षण पूर्ण करून घराण्याला व्यवस्थित सांभाळेल. लग्न झालं की, कितीतरी मुली आपलं स्वप्न मारून संसारात रममाण होतात. पण तुम्ही, मात्र गुंजनला तसे करू दिले नाही. आजवर बायकांनी पुरुष जातीला बदनाम केलं आहे. मात्र, तुमच्यासारख्या पुरुषांमुळे अजूनही काही बायका स्वतःला सुरक्षित समजतात. गुंजन तुमच कौतुक करते, तेव्हा मला चांगलं वाटत असायचं. पण आज मी माझ्या डोळयांनी तुम्हाला अनुभवल यामुळे मला पटलं. तुम्ही दोघे असेच कायम एकत्र रहा!!",रखुमाई आजी वेदकडे पाहत म्हणाल्या.



"नाही हो आजी, पुरुष आणि स्त्रिया सारख्याच आहेत. काही स्त्रियांमुळे स्त्री जातीला काही पुरुष नाव ठेवतात. तर काही पुरुषांमुळे स्त्रिया पुरुष जातीला नाव ठेवतात. असच काहीसे आहे. पण आता तुम्ही पहा!!गुंजनला आधी माणसं आवडत नव्हती तरीही तिने माझ्यावर विश्वास ठेवला आणि आता तर ती वेडी झाली आहे माझ्यासाठी. नात्यात स्वातंत्र्य दिले, की सगळं चांगलं घडत. अरेंज मॅरेजच नातं हळूहळू उलगडणारे असे असते. आयुष्यभर एकमेकांना जपत ,जाणून घेणार अस नातं असलं की, मग प्रेमाचा अंकुर फुलतो नात्यात. त्यानंतर माझं अस म्हणणारी मुलगी कधी आपलं म्हणते?हे तिचं तिला कळत नाही.",वेद हसूनच आजीला समजावत म्हणाला.




"हे बरोबर आहे. आता साहेब तुम्ही झोपा. थोड्यावेळाने गुंजनला कॉल करा. उद्या त्यांचा डान्स आहे. मी तर माझ्या गावी सगळयांना कॉल करून त्यांचा कार्यक्रम पाहायला सांगितले. ती लोक पण आपल्या गुंजनचे चाहते बनले आहे!!"आजी हसूनच म्हणाल्या.त्यांच बोलणं ऐकून वेद हसतो आणि तसाच बेडवर व्यवस्थित पडून झोपी जातो. आजी त्याला पाहून तिथून निघून जातात.



आज वेदचे विचार ऐकून त्यांना वेद आणखीन भावला. खरंच असा व्यक्ती आयुष्यात मिळणे? किती भाग्याचे असते ना?याचा विचार त्यांच्या मनात येत होता. गुंजन तर त्यांच्या आवडती आधीपासूनच झाली होती. पण आता वेद देखील त्यांना जास्त भावत होता. आपल्या नातवाप्रमाणे त्या त्याचा सांभाळ करत असतात. एका आजीची जशी स्वतःच्या नातवावर माया असते ना?तशीच त्यांची वेद वाफ होती. गुंजन स्पर्धेला गेल्यापासून, त्या सगळं काही वेदच स्वतः करत असायच्या. आजही त्याला गोळी लागली म्हणून त्यांच्या काळजात धस्स झालं. त्यामुळे लगेच त्यांनी डॉक्टरला कॉल करून घरी बोलावून घेतले. जिथे रक्ताची नाती त्याच्यासोबत नव्हती!! तिथे अश्या अनोळखी रखुमाई आजी त्याची व्यवस्थित काळजी घेत होत्या!! हे पाहून त्याला समाधान मिळत.




क्रमशः
-------------------------