Gunjan - 14 in Marathi Women Focused by Bhavana Sawant books and stories PDF | गुंजन - भाग १४

Featured Books
Categories
Share

गुंजन - भाग १४

भाग १४.


"गुंजन, उठा मॅडम. सकाळ झाली आहे.",वेद तिच्या गालावर स्वतःचे ओठ टेकवत प्रेमाने तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाला. मगासपासून तो असच करत होता. पण तरीही गुंजन डोळे उघडून पुन्हा डोळे बंद करत असायची.


"नका ना छळू!! मला झोपू द्या तुम्ही",ती अस बोलून पुन्हा त्याच्या कुशीत शिरते. तो आता नाही मध्ये मान हलवतो.



"गुंजन, अग आज दिल्ली पाहू या ना? मी तुला दिल्ली दाखवणार आहे. पण त्या नंतर मात्र , तू न घाबरता दिल्लीत वावरायचे आहे. हे दिल्ली शहर, कधी तुला आपलं करून घेईल? आणि कधी तुझ्या मनाची भीती कमी करेल? हे, तुझं तुला कळणार नाही. बघ, तू इथून निघताना मला नक्की या शहराबद्दल बोलशील.", वेद हसूनच तिला समजावत म्हणाला.कारण खरच तर होत. दिल्ली शहर, जेवढे त्याने पाहिले होते? त्यावरून ते तो तिला सांगत होता.



शेवटी, गुंजन त्याच बोलणं ऐकून उठते आणि काहीशी लाजूनच हळूच त्याच्या गालावर ओठ टेकवते.



"अहो, हे असलं काही नका घालत जाऊ मला. नाही आवडत हे.",गुंजन स्वतःकडे पाहत म्हणाली. वेदने तिला आपला शर्ट घातला होता. जो की, खूपच मोठा होता. ते पाहुनच ती म्हणाली.



"ओहऽऽऽ , मग मी तुला अस उघड झोपवू का?मला हे कळत नाही तू असे थोडेसे मॉर्डन टाईप ड्रेस का घालत नाही?",वेद तिला पाहत विचारतो.


"माझं लग्न झाल आहे ना? मला आवडत पण नाही ते कपडे घालायला. असे, पाय उघडे दिसतात, हात, पोट, कंबर पण दिसत ना त्यातून? म्हणून कसतरी वाटत.", गुंजन काहीशी तोंड बारीक करून म्हणाली. तिचं बोलणं ऐकून वेद थोडासा हसतो.



"अस काही नाही. मॉर्डन मध्ये पण प्रकार असतात. ते छोटे कपडे सोड. पण तू जीन्स वगैरे देखील वापरत नाही? त्याच काय? मला सांग, लग्न झालं की असे कपडे घालू नये? हे कोणी सांगितले तुला?मुळात तू प्रत्येक बाबतीत एवढा विचारच का करते?तुला हवं ते घाल ना.",वेद तिला समजावत म्हणाला.



"अहो, मला नाही आवडत ना ते. तुम्हाला माझी ओळख करून दाखवायला कमी पणा वाटतो का? माझ्या कपड्या वरून बोलतात ना तुम्ही म्हणून विचारलं. तस असेल तर सांगा मी, तुमच्या आसपास पण येणार नाही",गुंजन वैतागत म्हणाली. मात्र, तिचे ते बोलणे ऐकून कधी न चिडणारा वेद मात्र थोडासा चिडतो.



"गुंजन, काहीही काय बोलत आहेस तू? मी अस कधी म्हणालो? मी फक्त तुला बदलणाऱ्या काळासोबत मॅच करायला सांगत आहे. बाकी काहीच नव्हतं. पण असो, तुला नाही घालायच ना? तर नको घालू!! पण असले काही बोलून मला चिडायला लावू नको.",वेद अस चिडून बोलून तिथून उठतो आणि तसच आपलं बाथरूम मध्ये निघून जातो. बाथरूम मध्ये येऊन तो शॉवर ऑन करतो आणि तसाच त्याच्या खाली उभा राहतो.



"वेद, तुला अस चिडून चालणार नाही. गुंजन असेच बोलली असेल.", वेद स्वतःला शांत करत म्हणाला. गुंजनच बोलणं त्याला लागलं होतं. कारण तो फक्त तिला या बदलणाऱ्या जगासोबत कसं मॅच करायचं? हे शिकवत होता. पण गुंजनने वेगळंच त्याला सुनावले असल्याने त्याला रागच आला.



काही वेळाने तो फ्रेश होऊन बाहेर येतो आणि आपलं आवरायला लागतो. गुंजनशी तो एकही शब्द न बोलता आपलं आवरत असतो. त्याच झाल्यावर ती देखील आपलं बाथरूम मध्ये जाऊन आवरुन येते.


"अहो, सॉरी ना. मला अस नाही म्हणायला हवं होतं. पण तुम्ही अस नाराज नका ना होऊ. मला वाईट वाटत.",गुंजन फ्रेश होऊन त्याच्या शेजारी बसत म्हणाली. वेद आपला लॅपटॉप घेऊन त्यावर आपलं काम करत होता.


"गुंजन, मला काम आहे.",वेद तिचं बोलणं इग्नोर करत म्हणाला. त्याच अस तुटक बोलणं ऐकून तिला वाईट वाटते. कारण आजवर तो कितीही बिझी असला तरीही? तिच्यासाठी वेळ काढत असायचा.


"मला माहीत आहे, तुम्ही रागावला आहात माझ्यावर!! मी अस नाही बोलायला पाहिजे. आजपासून तुम्ही सांगणार तसच वागेन. पण तुम्ही बोला ना माझ्यासोबत. एकट एकट वाटतं मला, तुम्ही नाही बोललात की", गुंजन भरल्या डोळयांनी बारीक आवाजात म्हणाली. तिचा तसा आवाज ऐकून तो तिच्याकडे पाहतो. खरंच तिच्या डोळ्यात पाणी भरले होते. जे पाहून वेदला वाईट वाटत. कारण सध्या तरी त्या दोघांना एकमेकांशिवाय कोणीच नव्हते!! त्यात पण तो असा जर वागला, तर गुंजन एकटी पडेल? या विचाराने, तो तिला लॅपटॉप ठेवून जवळ घेतो.



"सॉरी गुंजन. "तो अस बोलून तिला मिठीत घेतो.


"तुम्ही ना अस चिडला ना? तरीही माझ्यासोबत अबोला नका घेत जाऊ. मला नाही आवडत ते. मी प्रयत्न करेन, स्वतःला थोडस चेंज करण्याचा. पुन्हा असलं काहीच बोलणार नाही.",गुंजन गहिवरून म्हणाली. एवढीशी गोष्ट देखील तिच्या मनाला लागली होती. हे वेदला कळून जाते.



"पुन्हा नाही बोलणार ना? मग ठीक आहे. मला कधीच तुला सोबत घेऊन फिरायला कमीपणा वाटत नाही. हे तू तुझ्या छोट्याशा डोक्यात फिट कर.",वेद तिला बाजूला करत म्हणाला.


"सॉरी नाऽऽऽऽ",गुंजन रडक तोंड करून म्हणाली. तिच्या या बोलण्यावर वेद हसतो.


"ओह माय क्युट प्रिन्सेस. चला आता दिल्लीत फिरायला जाऊ. तसा मी एकटा फिरलो आहे, पण तुझ्यासोबत फिरण्यात एक वेगळीच मज्जा असते. पुन्हा आपण हे कॉम्पिटेशन संपलं की फिरू.", वेद तिचे गाल ओढत म्हणाला.


"म्हणजे?तुम्ही नाही थांबणार का माझ्यासोबत?",गुंजन उलट्या हाताने डोळे पुसत विचारते. तसा तो "नाही" मध्ये मान हलवतो.


"अस कस करू शकतात तुम्ही? मला सोडून जाणार? मी एकटी पडणार ना?",गुंजन त्याला हाताने मारत म्हणते.


"अरे, बाबा लागत ना मला. कॉम्पिटेशनच्या फायनलला येईल की मी. तू आता त्या लोकांसोबत राहायचं. ते तुला शिकवतील सगळं. सगळे स्पर्धक आता एकत्र राहणार ना? त्यामुळे तुला देखील त्यांच्यासोबत ऍडजस्ट करावे लागेल. सगळे, लोक इथे वेगवेगळ्या प्रांतातून आलेले आहेत. त्यांची भाषा, राहणीमान सगळं वेगळं असणार आहे. त्यामुळे, तुला खंबीरपणे राहावे लागेल. अशी रडत राहिली तर ती लोक तुझ्या स्वभावाचा फायदा घेतील. म्हणून आता नाही रडायचं.",वेद प्रेमाने तिला समजावत म्हणाला. त्याच बोलणं ऐकून तिला कुठेतरी वाईट वाटत. कारण आता वेद तिच्यासोबत नसणार होता. त्यात वेगवेगळ्या प्रांतातील लोक ज्यांना ती ओळखत पण नव्हती? अश्या लोकांसोबत तिला राहायचे होते. या सर्वाचा विचार करून ती थोडीशी घाबरते. पण नंतर स्वतःची समजूत काढून शांत होऊन तयार व्हायला निघून जाते.



काहीवेळात गुंजन मस्त अशी जीन्स आणि शॉर्ट असा पिंक रंगाचा टॉप घालून बाहेर येते. थोडीशी घाबरूनच ती बाहेर पडते. पण तिला अस पाहून वेद मात्र गालात हसून तिच्याजवळ जातो.


"परफेक्ट आहे. खूप सुंदर दिसते आहेस तू यात. हे तर कमीच आहे गुंजन. ",वेद तिच्याजवळ जात तिचं कौतुक करत म्हणाला. त्याच बोलणं ऐकून ती स्वतःला पाहते आणि थोडीशी विचित्र तोंड करते.


"कम ऑन कोणी काही बोलणार नाही. नवरा सांगत आहे ना तुला घालायला? मग का घाबरते?",वेद तिला मोकळं करण्यासाठी म्हणाला.



"अहो, पण हे कसं वाटतं ना? ओढणी घेऊ का मी?",गुंजन स्वतःकडे पाहत म्हणाली. तसा तो हसून नाही मध्ये मान हलवतो. तो तिला व्यवस्थित करतो आणि हसूनच तिचा हात हातात धरून रूमच्या बाहेर घेऊन जातो.



आज पहिल्यांदा अस जीन्स वगैरे घालून बाहेर आल्याने गुंजन थोडीशी कावरीबावरी होते. खरतर तिला कोणी जास्त पाहत नव्हते. पण तरीही तिला बाहेर फिरताना थोडस ओकवर्ड वाटत होते. वेद तिला आपल्या गाडीत बसवतो आणि मस्त दिल्लीच्या फेमस ठिकाणी फिरायला घेऊन जातो. गुंजनला वेद बोलण्यात गुंतवून तिचं लक्ष स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न करत असतो. कारण ती अशीच फिरत राहिली तर, ती इथं जास्त वेळ टिकणार नाही. याचा विचार करून तो तस करतो. हळूहळू गुंजन देखील दिल्लीच्या वातावरणात मिसळायला लागते. ती आसपासच्या महिलांना पाहून थोडीशी फ्री होते.



"ही लोक पण घालतात कपडे. यांचे तर छोटे छोटे आहेत. तरी पण फ्री राहतात आणि मी एक आहे अशी वागते. नो गुंजन तुला पण थोडस चांगलं राहायला हवे. वेदना नाही टेन्शन द्यायचं मला. आता मी पण फ्री राहणार.", गुंजन मनात आसपासच्या महिलांना पाहून स्वतःशीच म्हणाली. मनात निर्धार पक्का झाल्याने आता ती न घाबरता , वेद सोबत बोलतच फिरायला लागते.


दिल्लीतील लाल किल्ला, लोटस टेम्पल, कुतुबमिनार, इंडिया गेट, मीना बाजार अश्या काही फेमस ठिकाणी ते मस्त फिरतात आणि बऱ्याच आठवणी, क्षण कॅमेरात कैद करतात. गुंजनला आणि वेदला फिरून भुकेची जाणीव होते. तसा वेद तिला मस्त अश्या दिल्लीतील फेमस मार्केट चांदनी चौकला घेऊन येतो. ते माणसांनी गजबजलेल मार्केट पाहून गुंजनच्या चेहऱ्यावर विचित्र एक्सप्रेशन उमटतात.


"इथं खाणार आपण?कसे खाणार ना? त्या पेक्षा हॉटेलला जाऊ ना",गुंजन बारीक आवाजात म्हणाली.



"गुंजन, हे मार्केट बघ तरी आधी खाली उतरून. एक दिवस इकडचा अनुभव घेऊन बघ. नक्की आवडेल तुला. माहीत आहे आपण असे श्रीमंत वगैरे आहोत. पण कधी कधी ना, असे छान मध्यम वर्गीय लोकांचे अनुभव घ्यायचे असतात. तुला माहीत नाही, पण मी देखील ना? इथे आलो की या मार्केट मधून मस्त स्ट्रीट फूड खाऊन जात असायचो.",वेद हसूनच तिला समजावत म्हणाला. तो आपली गाडी पार्क करून तिला बाहेर काढतो आणि मस्तपैकी एका एका छोट्या अश्या दुकानांवर घेऊन तिला एक एक डिश खायला देतो. आधी तर गुंजन हळूहळू खाते इकडे तिकडे पाहत. पण नंतर ती तिथे असलेल्या लोकांना पाहून हसूनच एन्जॉय करत खायला लागते. वेदला देखील ती भरवते.



"अहो, हा ना बेस्ट अनुभव आहे माझ्या आयुष्यातील. आपण दिल्लीत आलो ना कधी? की असच खाऊ. त्या फाईव्ह स्टार हॉटेलच्या जेवणाला देखील चव नसते, त्याहून जास्त चव या पदार्थांना आहे.",गुंजन आनंदी होत खात खात म्हणाली.

"यह दिल्ली है मेरे यार
बस इश्क़ मोहब्बत प्यार
बस्ती है मस्तानो की दिल्ली दिल्ली
गली है दीवानों की दिल्ली" ,वेद स्वतःच्या रुमालाने तिचे ओठ पुसत म्हणाला. त्याच ऐकून ती हसते.


"तुमचा आवाज मस्त आहे. पण काहीही झालं तरीही मुंबई हैं मेरी जान.",गुंजन हसूनच त्याला बोलते.



"हा ते आहेच ग. पण त्यापेक्षा आपण अस म्हणून , हा पूर्ण भारत आपला जीव आहे. एखादे शहर, राज्याला आपलं म्हणण्यापेक्षा , हा भारत देशचं माझा आहे, अस आपल्या वापरण्यात आणू. इतरांना देखील तेच सांगू. कारण हे सगळे आपलेच आहे. ", वेद आपला हात पुसत म्हणाला.



"हा. हे बरोबर आहे. आपण भारतीय म्हणून ओळख लावू. ना की महाराष्ट्रीयन,दिल्लीकर !!",गुंजन देखील त्याला साथ देत म्हणाली. दोघे नंतर तिकडच्या एक एक डिश टेस्ट करतात आणि थोडीफार शॉपिंग वगैरे करून आपल्या हॉटेलला निघून जातात.


आजच्या दिवसाने गुंजनने खूप काही वेदकडून शिकून घेतले. वेदच राहणीमान, त्याचे विचार हे खूप वेगळे होते. त्यामुळेच ती रोज रोज त्याच्या प्रेमात पडत असायची. आजही तेच झालं होतं. हळूहळू वेद तिला उलगडत होता. रोज नवीन रूप त्याचे तिला पाहायला मिळत होते. पण आता तो काही दिवसांनी आपल्या सोबत नसणार? याचा विचार करताच तिला कसतरी होत. मनाला घट्ट आवर घालून ती शांत होऊन ,मध्यरात्री त्याच्या जवळ जाऊन झोपी जाते.




क्रमशः

---------------------------