भाग ११.
आजचा गुंजनचा दिल्लीमधील दुसरा दिवस होता. काल उशिरा रात्री झोपल्याने, सकाळी तिला जागच आली नाही लवकर. वेदने बरेच कॉल केले तरीही मॅडम मस्त झोपल्याने, त्यांना त्याचे कॉल ऐकू आले नाही. शेवटी, गुंजन झोपेतच मोबाईल कंटाळून उचलते.
"हॅलो, कोण?मला झोपू द्या ना!"गुंजन झोपेतच बोलते.
"गुंजन,सकाळचे नऊ वाजले आहे"वेद काहीसा हसून हळू आवाजात बोलतो. त्याच ते बोलणं तिला आधीतर कळत नाही. पण, नंतर कळताच ती भयंकर शॉक होते.
"क...काय ? नऊ वाजले? मी एवढा वेळ झोपून कशी राहिली?अहो..तुम्ही पण मला कस झोपू दिलात?"गुंजन घाईत उठतच आपलं बडबडतच त्याच्याशी बोलायला लागते.
"गुंजन, तू नेहमी एवढा वेळ झोपते. यावेळी मी नव्हतो तुला उठवायला. त्यामुळे तुला वेळ कळली नाही" वेद तिचे एक्सप्रेशन आठवत हसून म्हणाला. कारण गुंजन लेट झाल्यावर काय काय करत असेल? याचे विचार आधीच त्याच्या मनात चालू होते. तेच आठवत तो हसत असतो. इकडे गुंजन त्याच्यासोबत बोलतच पटापट आपलं आवरायला लागते. एरवी घरात असताना वेदच सगळं आवरुन घ्यायचा आणि नंतर मग ऑफिसला जाताना गुंजनला उठवत असायचा. त्यामुळे कधी तिला लवकर उठायचं? हे माहीतच नव्हतं. तिला अजून तेवढा व्यवहार माहीत नव्हता. त्यात वेदने कधीच तिच्यावर जबाबदारी टाकली नव्हती. पण, आता बाहेर आल्यावर सगळं काही एकटीला करावे लागत होते. त्यामुळे तिची धांदल उडत होती. ती वेदसोबतच बोलत फ्रेश वगैरे होते आणि तयार होऊन हॉटलेच्या बाहेर जाते. वेद सांगतो, तस तस ती ऐकते आणि चालतच हॉटेलच्या जवळच्याच एका कार स्टँडकडे जाऊन एक कार बुक करून त्यात बसते. तिला व्यवहार ज्ञान कळायला हवे होते. त्यामुळे वेदने यावेळी कॅबला कॉल केला नाही. गुंजन व्यवस्थित पणे त्या ड्रायव्हर सोबत बोलते आणि वेद सांगतो, तसाच अड्रेस ती त्या ड्रायव्हरला सांगते.
"परफेक्ट! आता तू मला संध्याकाळ पर्यंत कॉल करायचा नाही. मी खूप बिझी आहे. त्यामुळे हा शोना"वेद विचार करून म्हणाला. त्याच ऐकून तिला टेन्शन येत. मनातच थोडी भीती देखील वाटते. पण आता एवढ्या मोठ्या शहरात आलो, तर भीतीला दूर ठेवावे लागेल. याचा विचार करून ती त्याला फक्त "ओके" म्हणते आणि नाराज होऊन फोन कट करते.
वेद ऑफिस मध्ये बसलेला असतो आणि त्याच ते बोलणं त्याच्या समोर असलेला, अनय ऐकत असतो. जसा वेद कॉल कट करतो, तसा तो विचित्र नजरेने वेदला पाहायला लागतो.
"गुंजन, आमदारांची मुलगी आहे ना? मग तिला हे सगळं जमत नाही का?लहानमुलीसारख समजावत होता ना तू? म्हणून विचारलं"अनय म्हणाला.
"अनय, आमदारांची मुलगी असली तरीही तिला बाहेरच माहीत नाही. जेव्हा जेव्हा ती बाहेर जायची तेव्हा तिच्या आसपास वावरणारे पुरूष लोकच काम करत असायची. त्यामुळे तिला यातील काहीच माहीत नाही आहे. प्रत्येक वेळी मुलींना अजूनही काही ठिकाणी एकट सोडलं जात नाही. सोबत एक तरी पुरुष असतो आणि तोच सगळं काही पाहत असतो, मुलींना जमणार नाही. मुली घाबरतात. हीच विचारसरणी लोकांची झाली असल्याने गुंजन सारख्या बऱ्याच शिकलेल्या मुलींना देखील अश्या मोठया शहरात वावरता येत नाही. त्यामुळे त्या एकट्या बाहेर पडल्या की, असे प्रॉब्लेमला फेस करायला नाही जमल की रडायला लागतात. छोटे छोटे प्रॉब्लेम देखील त्यांना सॉल्व्ह होत नाही.
आज मला त्यांनी गुंजन सोबत राहायची परमिशन दिली असती. पण मीच विचार केला , सर्व गोष्टीचा आणि तिच्यासोबत जाण टाळल. कारण मी आज गेलो असतो तर पुन्हा सगळं मलाच पाहावे लागले असते. यामुळे मग गुंजनला काही ज्ञान मिळाले नसते. अनय, अशिक्षित लोक देखील सुशिक्षित लोकांपेक्षा कितीतरी चांगल्या प्रकारे वागत असतात, वावरत असतात. त्यामुळे मला गुंजन अस धीट बनवायच आहे. यासाठी मी हे सगळं करत आहे"वेद अगदी शांतपणे विचार करत म्हणाला.
"हे जरा विचित्र आहे ना अस नाही वाटत का तुला?म्हणजे तुझे विचार आवडले. पण आजच्या जगात पण अश्या मुली असतात. हे पहिल्यांदा कळलं. बाय द वे, अभिनंदन वेद. जिला स्वप्नात पाहत होतास.ती आज तुझी बायको झाली!!"अनय हात समोर करत हसून म्हणाला.
त्याचा हात समोर पाहून वेद देखील त्याला हात मिळवणी करतो.
"हम्म थँक्यू. पण पुन्हा मला गुंजन संबंधी काहीही वाईट तुझ्याकडून ऐकायला आले नाही पाहिजे. हे लक्षात ठेव तू"वेद त्याला वॉर्न करत म्हणाला.
"नाही. ते तेव्हा असच बोललो होतो मी. पण आता भाभी संबंधी काहीच वाईट बोलणार नाही मी."अनय म्हणाला.
"ओके. ठीक आहे. तू जाऊ शकतोस आता कामाला" वेद त्याच्याकडे पाहत म्हणाला. त्याच्या या बोलण्यावर अनय मान डोलावतो आणि तिथून निघून जातो. तो गेल्यावर वेद चेअरवर बसून आपल्या फाईल चाळत बसतो. खरंतर त्याला राहून राहून गुंजनची आठवण येत होती. पण सध्या त्याने तिच्यासाठी मनाला भरपूर प्रमाणात आवर घातला होता. कारण आता त्याला गुंजन कशाप्रकारे हळूहळू दिल्लीच्या वातावरणात रुळते? हे पाहायचे होते. त्यामुळे तो आपलं काम करत शांतपणे बसतो.
दिल्लीत गुंजन आपल्या स्पर्धेच्या ठिकाणी बॅग घेऊन पोहचते. त्या ठिकाणी बरेच भारताच्या कानाकोपऱ्यातुन लोक आलेले असतात.त्या सर्वांना पाहून गुंजन मनातच घाबरते. ती आपल गळ्यातील मंगळसूत्र पकडून आपल्या मनातील भीतीला गायब करण्याचा प्रयत्न करत असते. हे मंगळसूत्र वेदने तिला सध्या तरी घालण्यासाठी नको म्हटले होते, त्यामुळे तिने काहीशा नाराजीने ते काढून बॅगेत ठेवले होते. पण आज येताना मात्र तिला ते घालावे वाटलं. एक वेगळीच फिलिंग तिच्या मनात निर्माण झाली होती. त्यामुळे वेदने नको म्हटले असताना देखील ते घालून ती डान्सच्या स्पर्धेत पोहचली होती. आता मात्र तिचे गळ्यातील मंगळसूत्र पाहून काही लोक विचित्र नजरेने तिला पाहायला लागतात.
"गुंजन मॅडम, आप आ गयी। अंदर सब लोग आपको ही ढुंढ रहे हैं, चलो चलते हैं फिर"एक मुलगी तिथं येत गुंजनला म्हणाली.
"चलो, चलते हैं।"गुंजन काहीशी हसून म्हणाली. कारण मंगळसूत्राला हात लावताच तिला वेदचा चेहरा आठवला आणि नकळतपणे तिच्या मनातील भीती गायब झाली होती. थोडीशी धीट बनून ती त्यांच्यासोबत बोलते.
"मॅडम आप ये गले का लॉकेट नहीं पहेन सकते हो।"ती मुलगी तिच्या गळ्यातील मंगळसूत्र पाहून म्हणाली. गुंजनला तिचं बोलणे कळते. तस का कोणास ठाऊक, पण मनात मात्र त्या मुलीच्या बोलण्याचा राग येतो.
"ये लॉकेट नहीं हैं। ये मंगलसूत्र हैं। मैं इसको नहीं निकाल सकती। क्योंकी ये मेरे संस्कृती में नहीं बैठता हैं"गुंजन काहीशी चिडूनच त्या मुलीला बोलते. कारण सध्या तरी तिला ते मंगळसूत्र खूप प्रिय झालं होतं. गळ्यातून काढावेसे, बिलकुल वाटत नव्हते. त्यामुळेच ती त्या मुलीला बोलते.
"ओके, ठीक हैं। फिर आप इसको अंदर रखो। क्योंकी यहाँ के लोग नाराज होकर आपको वोट कम देंगे" ती मुलगी आता चिडून गुंजनला म्हणाली. आता मात्र तिच्या बोलण्याने गुंजनला देखील भयंकर राग येतो.
"मैने आपसे कहां ना? मैं ये नहीं निकालुंगी, तो नहीं निकालुंगी। और वोट डान्स देखकर मिलेंगे मुझे ना की मेरा बॅक ग्राउंड देखकर। आपके रुल्स में ऐसा कुछ नहीं था की आप शादिशुदा लोगो को इसमे पार्टसिपेट करने नहीं देंगे वगैरा। इसलीए मैं आपकी बात नहीं सून सकती। अगर मुझे ये पहेने नहीं दे रहे हो आप लोग? तो मुझे इसमे हिस्सा ही नहीं लेना हैं!! मैं जा रही हुं यहाँ से" गुंजन चिडूनच त्या मुलीला बोलते आणि तिथून सरळ निघून जाते. ती काहीशी चिडून नाराज होऊन कॅब मध्ये बसते आणि त्यांना अड्रेस सांगून गपचूप बसून राहते.
"जिथे माझं मंगळसूत्र काढायला लावले जाते?त्या स्पर्धेत मला भागच घ्यायचा नाही"गुंजन मनातच म्हणाली. पण यावेळी ती अशी का वागली? हे देखील तिला कळत नव्हतं. एका मंगळसूत्रासाठी ती भांडू शकते? याची कल्पना देखील कोणाला नसते. पण ती तिथून निघून गेल्यावर वेदला ती लोक कॉल लावून सगळं आजच सांगून टाकतात. ते सर्व वेद शांतपणे ऐकून घेतो आणि कॉल ठेवून देतो.
"ही मंगळसूत्रावरून बोलली?अस कस शक्य आहे? हिला तर मी नको आहे,मग मंगळसूत्र का जपते ती? वेद काही खर नाही तुझं. तुला तिथं जाऊन तिच्या मनांत काय चालले आहे? ते कळून घ्यायला हवे! नाहीतर ही अशीच क्षुल्लक कारणावरून भांडत बसेल"वेद मनातच कपाळ खाजवत बोलत असतो. कारण गुंजनने जे भांडण केलं? ते त्याला पटलं नव्हतं. सध्या तिच्या मनात काय चालू होतं? हे देखील त्याला कळत नव्हतं? त्यामुळे तो मनाशीच विचार करतो आणि अनयला दिल्लीच्या रात्रीच्या फ्लाईटची बुकिंग करायला सांगतो. कारण ही स्पर्धा सध्या त्याला महत्त्वाची वाटत होती. त्यामुळे गुंजनच अस माघार घेणं? त्याला पटत नव्हतं. अजून स्पर्धेला आठ दिवस बाकी होते. याचा विचार करूनच तो दिल्लीत जाण्याच ठरवतो.
वेद आपलं ऑफिसच काम आवरुन घरी येतो आणि आपल्या बॅग भरून गुंजनला कॉल न करता दिल्लीला जायला निघतो. एअरपोर्ट वर येऊन तो सर्व प्रोसिजर करून दिल्लीच्या प्लेन मध्ये बसतो. काही वेळातच त्याच प्लेन दिल्लीच्या प्रवासासाठी उंच उड्डाण भरते.
क्रमशः
------------------