Gunjan - 9 in Marathi Women Focused by Bhavana Sawant books and stories PDF | गुंजन - भाग ९

Featured Books
Categories
Share

गुंजन - भाग ९

भाग ९.


मागील भागात:-

"सॉरी" तो एवढंच बोलतो. पण गुंजन मात्र , चिडूनच गॅलरीत निघून जाते. तिला भयंकर राग आला होता त्याच्या बोलण्याचा. हे त्याला कळून चुकत. मग तो देखील, तिच्या मागे निघून जातो.


आतापासून पुढे:-

गुंजन गॅलरीत उभी राहते आणि रडायला लागते. वेदच बोलणं तिला जिव्हारी लागलं होतं. कारण आजवर वेदसाठी ज्या फिलिंग तिच्या मनात निर्माण झाल्या होत्या. त्या अजूनपर्यंत इतर कोणत्याही मुलाला पाहून झाल्या नव्हत्या!! वेदच्या स्वभावामुळे ती हळूहळू त्याच्या प्रेमात पडत होती. पण अजूनही तिने कबूल मात्र तोंडाने त्याला केले नव्हते. त्यामुळे वेदला तिचं मन कळत नव्हतं. आता देखील मस्करीत तो बोलून गेला. पण त्याच्या या बोलण्याने ती एवढी हर्ट होईल? अस त्याला वाटलं नव्हतं.



"गुंजन, सॉरी बाबा. माफ कर आता मला. तुझे हे डोळ्यातील पाणी पाहून मलाच वाईट वाटतं" वेद तिच्याजवळ येत म्हणाला.



"मग तुम्ही अस म्हटलंच का? तुम्हाला पण माहीत आहे ना माझं मन? पण तरीही तुम्ही अस मला बोलतात."गुंजन मुसमुसत म्हणाली. तिचं म्हणणं ऐकुन वेद तिला जवळ घेतो.



"शु$$$, असंच म्हटलं आणि त्यावर तू एवढी रडली? सॉरी. आय प्रॉमिस मी पुन्हा नाही बोलणार असलं काही."वेद तिच्यासमोर हार मानत म्हणाला. तिचे डोळे भरले की, त्याला कसतरी होत असायचं. त्यामुळे तो आता तिला समजवायला लागतो. खूपवेळा नंतर ती आपल्या मोड मध्ये येते. पुन्हा दोघे आधीसारखे चर्चा करतच गॅलरीतिल सोफ्यावर बसतात. वेद तिला कशाप्रकारे तिथं राहायचे? कसं जायचं? हे समजावत असतो. कारण आता पुढचा प्रवास तो तिला एकटीने करायला लावतो. गुंजन थोडीशी हळवी होती आणि बाहेरच जग तिला कमी माहीत होतं. त्यामुळे पहिल्यांदा दिल्लीला विमानाने जायचं आहे अस कळल्याने तिच्या चेहऱ्यावर भल मोठं टेन्शन येत.


"विमान, खाली पडणार तर नाही ना? जास्त लोक बसली की?"गुंजन काहीसा विचार करत निरागसपणे बोलते. तिचं बोलणं ऐकून वेद कपाळ खाजवतो. आमदारांची मुलगी होती. पण त्यांनी तिला बाहेरच जास्त पाठवलं नसल्याने, तिला बाहेरच ज्ञान नव्हतं!!



"विमान खाली पडत नाही. ते बरोबर हवेत उडत आणि त्यात जेवढ वजन हवं असत ना? तेवढंच ती लोक भरतात बरं. त्यामुळे याचा विचार तू करू नको!!"वेद हसून म्हणाला.


"फर्स्ट टाईम तुमची बायको एवढ्या दूर जात आहे आणि तुम्ही तिला एकटीला प्रवास करायला लावत आहात? काही वाटतं का याबद्दल? आजवर मला फक्त ट्रॅव्हल्सने ,गाडीने प्रवास करायचा माहीत होता. पण विमानच काही माहीत नाही" गुंजन थोडीशी फुगून म्हणाली. राग आला होता तिला थोडासा. वेद तिच्यासोबत येत नाही या कारणाने!!



"गुंजन, मी तुला एकट सोडत आहे. कारण तुला माहिती व्हायला हवी ना सगळ्याची. त्यात तू थोडीशी धीट व्हावी, अशी माझी इच्छा आहे. त्या कारणाने तुला पाठवत आहे" वेद तिला समजावत म्हणाला. त्याचा विचार ही योग्य होता. गुंजन कधी बाहेर गेली नव्हती जास्त. मग तिला थोडफार तरी या सतत धावणाऱ्या जगाशी मिळत व्हावे लागेल . अस त्याला वाटत होतं. ती एकटी बाहेर राहिली आणि फिरायला लागली, तर तिला जास्त ज्ञान मिळेल. पुढे जाऊन जास्त कोणत्याही प्रॉब्लेमला तिला तोंड द्यावे लागणार नाही. ह्याच कारणासाठी तो तिला एकटीला सोडत असतो.




"ओके, मी जाते. पण मला तुम्ही, बाय करायला तरी याल ना? मी इथं नसताना तुम्ही मला मिस करायचं. नाहीतर बघा हा मी काय करेल ते?"गुंजन म्हणाली.



"ओके, बाबा. तुम्ही म्हणाल, तस राणीसरकार."वेद हसून तिला प्रतिउत्तर देतो. ती तयार झाली ना? हेच पाहुन त्याला समाधान मिळत. कधी कधी प्रेमाने समजवल्यावर लोक समजून घेतात ना? तसंच तो तिला समजावत असायचा. एकदम फ्रेंडली तिच्यासोबत वागत असायचा. त्यामुळे, तिला त्यांच्या नात्याच दडपण अस वाटत नव्हतं. प्रेम काय असत? ते कसं असत? हे ती हळूहळू त्याच्याकडे पाहून शिकत होती.



वेद गुंजनला कस प्लेन मध्ये बसायचं आणि कसं लोकांसोबत बोलायचे? हे सगळं शिकवतो आणि चर्चा संपवून तिला झोपायला आतमध्ये पाठवतो. पण यावेळी देखील गुंजन हट्ट करून त्याला बोलावते आणि त्याच्या कुशीत जाऊन एकदम शांतपणे झोपून जाते. पुन्हा साडे नऊ महिने तो तिला मिळणार नव्हता!! याचा विचार करून ती पुरेपूर त्याचा फायदा घेत होती. अति लाड करून घेत होती. वेद देखील दोन दिवस तिला हवं नको ते सगळं काही आणून देतो. तिला शॉपिंगला देखील घेऊन जातो आणि एकापेक्षा एक मस्त असे ड्रेस तिला घेऊन देतो. मात्र, मार्केटला फिरताना तो पूर्णपणे तिचा चेहरा स्कार्पने झाकतो. कारण ती फेमस झाली होती. कोणी, तिला ओळखले तर ती लोक तिच्या अवती भवती गराडा घालून तिला त्रास देतील. या विचाराने तो तस करतो.


श्रीमंत जरिही ते असले तरीही वागण्यातून त्यांच्या खरी श्रीमंती लोकांना दिसत असायची. एकदम नॉर्मलं लोकांसारखं वेद सगळ्या लोकांसोबत बोलत असायचा. त्याला अस उगाच बॉडीगार्ड घेऊन फिरण आणि श्रीमंतीचा मोठेपणा करणं. कुठेतरी, पटत नव्हतं. त्यामुळेच तो मध्यम लोकांसारखा वागायचा आणि त्याच हे वेगळेपण पाहून गुंजन आणखीनच त्याच्यावर फिदा होत होती.



शेवटी, गुंजनचा दिल्लीला जाण्याचा दिवस जवळ येतो. तस तिला वाईट वाटत. पण वेद पुढे काहीच तिचं चालणार नव्हतं. यामुळे ती त्याला चेहऱ्यावर हसू दाखवून तयार होत असते. कालरात्रीच, वेदने स्वतःहून तिच्या बॅग भरल्या होत्या. त्यामुळे तिला काहीच काम नव्हतं.आज ती मस्त आरशासमोर तयार होत होती. तिला तयार होताना पाहून वेद गालात हसतो आणि मागूनच तिला मिठीत घेतो.




"नाराज आहेस का माझ्यावर? पण आज तुला हे कळणार नाही!! पुढे जाऊन कळेल तुला. मी अस का बोलतो ते? लग्न झालं म्हणजे काही संपत नाही मुलींचे. उलट एक नवीन सुरुवात होते. हे, तुला पटवून देण्यासाठी म्हणून मी तुला या स्पर्धेत पाठवत आहे. इथे येणारे सगळेच जण एकापेक्षा एक डान्सर आहेत. पण ते बाहेरच्या लोकांच्या डान्स प्रकारात जास्त गुंतल्याने तस त्यांनी स्वतःच्या परफॉर्मन्स मध्ये बदल केला आहे. तू एक कथक ,भरतनाट्यम म्हणजे भारतीय नृत्यामधील डान्सर आहे. हे , भारतीय नृत्य इतरांपर्यंत पोहचायला हवे. यासाठी तुला जा म्हणालो मी. आपली बॉलीवूडच्या काही गाण्यांना मिक्स करून पण आजकाल लोक कथक करत ह्या कलेला बाहेरच्या देशात पोहचवण्याच काम करत आहेत. अशा लोकांना तुझ्याकडून छोटीशी मदत होईल आणि तुझ्या नावासोबत हा डान्स प्रकार देखील फेमस होईल!!याचा विचार करूनच मी तुला या स्पर्धेत उतरवलं. एक छोटंसं देणं लागतोच ना आपण देशाचे? यातून ते पूर्ण करू"वेद तिला मिठीत घेत आरश्यात तिला पाहत हळुवारपणे म्हणाला. त्याचे विचार ऐकून तिला काय बोलावे ? ते कळत नाही. कारण तो प्रत्येक गोष्टी मागे एवढा विचार करत असायचा की, गुंजनला देखील कळायचं नाही. आज तर त्याचे देशाप्रतीचे विचार ऐकून तिला त्याच्यावर भरपूर सारं प्रेम करावेसे वाटत होते.

आजच्या समाजात मुलगा म्हटलं की, एक वंशाचा दिवा असतो. तो सगळं काही करू शकतो. कारण तो मुलगा आहे ना? त्याला दुःख नसत. तो जास्त विचारी नसतो. तिच्या घरात ती जन्माला आली त्यामुळेच तिला सगळं काही भोग भोगावे लागले. कारण मुलगी आली ना घरात या कारणाने. त्यामुळेच तिला सतत टोमणे असायचे मुलावरून. म्हणून ती मुलांचा राग करत असायची.पण आज वेदला पाहून मुलांच्या बद्दलचे तिचे विचार बदलत चालले होते.



"मुलगा होणं सोपं नसत. वेद तुमच्याकडे पाहून कळत मला. मी तरी काही झालं की रडून दाखवते. पण तुम्ही मात्र मला कधीच रडताना दिसलात नाही. घर सोडले, तेव्हा देखील तुमच्या डोळ्यात पाणी नव्हते. बायकोचे मन जपणे हे सगळयांना शक्य नसतं. मी जरिही तुमच्या जागी असते ना? तर असलं काही केलं नसत. पण तुम्ही मात्र वेद सगळयांचे मन जपत असतात. किती विचार करतात प्रत्येक वेळी? यामुळेच मी रोज नव्याने तुमच्या प्रेमात पडत जात आहे. रोज गुंतत जात आहे वेद" गुंजन मनातच आरश्यातच त्याला पाहत म्हणाली.



"एकदम परफेक्ट!!"वेद मोबाईल समोर धरत फोटो काढत म्हणाला. त्याच्या मोबाईलच्या आवाजाने ती भानावर येते आणि आरशातून त्याला डोळयांनी विचारते.



"फोटो काढला. परफेक्ट कपल दिसतो ना आपण? म्हणून बोललो मी" वेद हसूनच म्हणाला. त्याच ऐकून ती आरश्यात पाहते आणि गालात हसते. कारण खरंच ते दोघे भारी दिसत होते.



"चला मॅडम फ्लाईट लेट होईल. अजिबात घाबरायचं नाही. भीती वाटली तर मला आठव. मग भीती वाटणार नाही" वेद तिच्या गालावर स्वतःचे ओठ टेकवत म्हणाला. तशी ती लाजते.


"तुम्ही येत आहात ना मला सोडायला?"गुंजन त्याच्याकडे पाहत विचारते. तसा तो तिचा हात हातात घेतो आणि तिला तसच हसून घेऊन जाऊन रूम मधून बाहेर नेतो. यावरून कळत तिला तो सोबत येत आहे. त्यामुळे ती खुश होते. निदान एअरपोर्ट पर्यंत तरी सोबत मिळेल या विचाराने.




वेद तिला बंगल्याच्या बाहेर आणून गाडीत बसवतो आणि तिथून एअरपोर्टला घेऊन जाऊन बाहेरच तिला सोडतो. कारण तिला कस जायचं? कशी प्रोसिजर वगैरे असते, ते कळायला हवे ना? यासाठी तो अस करतो. गुंजन त्याला जाताना घट्ट मिठी मारते आणि आपलं सामान घेऊन थोडीशी धीट होऊन तिथुन एअरपोर्टच्या आत निघून जाते. वेदने सांगितल्या प्रमाणे ती सर्व प्रोसिजर करून तिच्या विमानाच्या दिशेने जायला लागते. विमानात जाताना थोडी तिला भीती वाटते. पण एअर हॉस्टेस तिला मदत करून तिची सीट दाखवतात. मग ती तिथं जाऊन बसते आणि स्वतःला शांत करते. विमान जस, हवेत उड्डाण करणार याची घोषणा होते, तशी ती भीतीने डोळे बंद करते आणि मनातच वेदला आठवते. त्याचा एक एक शब्द आठवल्यावर ती काहीशी शांत होते. जस विमान हवेत स्थिर होत, तशी तिच्या मनातील भीती देखील आपोआप दूर होऊन जाते.




क्रमशः
-----------------------