भाग ६.
गुंजन आणि वेदने घर सोडले होते त्यांचे. पण गुंजनला आता ते दोघे कुठे राहणार? हे माहीत नव्हते. मात्र, त्याच्या वर विश्वास तिला होता. काहीवेळाने वेदची गाडी थांबते. तसा वेद तिला बाजूला करतो.
"सॉरी, तुझे काही स्वप्न असतील ना लग्नाला घेऊन? पण अफसोस माझ्यासोबत लग्न झाल्याने ते मोडले असेल? त्यामुळे मी सॉरी म्हणतो. आजपासून एक नवीन सुरुवात करूया का गुंजन?" वेद शांतपणे तिला म्हणाला. त्याला ती एक नजर करून पाहते.
"मला नाही माहीत अहो, माझं काय आहे पुढे ते? पण तुम्ही मला कधीच सोडून जाऊ नका. नेहमी माझ्यासोबत रहा." गुंजन भरल्या डोळयांनी त्याला म्हणाली. किती तो शांत पणे सगळ्या परिस्थिती सांभाळत होता? फक्त तिच्यासाठी!! याचा विचार करून तिच्या डोळ्यांत पाणी येत होते.
"आय प्रॉमिस. कधीच तुला सोडून जाणार नाही. तू म्हणाली ना तरीही नाही जाणार" वेद हसून तिचे डोळे पुसत म्हणाला. त्याच ऐकून तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते. तसा तो आनंदी होतो. तो गाडीचा डोर खोलतो आणि बाहेर जातो. तिच्या बाजूला येऊन तिच्या बाजूचा दरवाजा उघडून तो हसून तिच्यासमोर हात पुढे करतो.
"नवीन सुरुवात आयुष्याची करायला तयार आहेस का माझ्यासोबत?अजूनही माझ्यबद्दल मत बदलले नाही आहे? अस असेल तर एक स्वतःचा सखा म्हणून समज आणि चल माझ्यासोबत?" वेद अगदी हळुवार पणे म्हणाला. त्याच ऐकून तिला काय बोलावे ते सुचत नव्हते? एवढं कस कोणी चांगलं कस असू शकतो?याचे विचार तिच्या मनात येत होते. ती काहीसा विचार करते आणि आपला हात त्याच्या हातात देते. तसा तो तिचा हात धरतो आणि अलगदपणे तिला गाडीच्या बाहेर काढतो. एकदम रॉयल अशी ट्रीट तो तिला करत होता. तो एका हाताने तिच्या खांद्यावर हात ठेवतो. पण नंतर जेव्हा त्याला कळत तसा तो गोंधळून तिच्यावरचा हात पटकन बाजूला काढतो.
"सॉरी, ते मला अस नाही करायचं होतं. प्लीज, चुकीच नको समजू" वेद समजवण्याच्या सुरात म्हणाला. पण त्याला अस गोंधळलेल पाहून ती गालात हसते आणि त्याच्या जवळ जाऊन त्याचा हात धरते आणि सरळ मागून तिच्या खांद्यावर ठेवते. स्वतःचा एक हात ती त्याच्या दुसऱ्या हाताच्या बोटात अडकवते आणि खाली मान घालून गालात हसत असते.वेदला तर तिचं वागणं पाहुन शॉक बसतो.
"वेद, नका ना एवढं चांगलं वागू!! मला वाईट वाटत मी याच्या लायकीची नाही आहे. तरीही तुम्ही एवढं करत आहात. आपण नवरा बायको आहोत. त्यामुळे एवढा विचार नका करत जाऊ. मान्य आहे मी तुम्हाला चुकीचे समजले. पण आता तस नाही आहे ना?" गुंजन खाली मान घालूनच बोलत असते. तिचे बोलणे ऐकून तो गालात हसतो. आज ती सकाळपासून त्याच्या वर अधिकार गाजवत होती. हे त्याला कळत होतं. पण तिच्याकडून ऐकून तर दुसर घ्यायचं होत. पण ती सरळ काही बोलत नव्हती.
"नवरा आहे म्हणून तुझ्या मर्जीशिवाय काही नाही करणार ना तुला"तो हसूनच म्हणाला. त्याच म्हणणं ऐकून ती शांत होते.
"चला मॅडम, आपल्या घरी. मला भूक लागली आहे शोना." वेद शोना वर जोर देत म्हणाला. त्याच्या तोंडून शोना ऐकून तिचे गाल आपोआप लाल झाले होते. जे त्याच्या नजरेतून सुटलं नाही.
"सॉरी, पण मला काहीच बनवता येत नाही!!"ती काहीशी नाराजीच्या स्वरात म्हणाली. तिचं म्हणणे ऐकून तो हसतो आणि तसाच हात पकडून तिला जवळ घेतो.
"काही गरज नाही तुला बनवायची. या घरात सर्वेन्ट लोक आहेत बरेच. "वेद तिच्या ब्राऊन डोळ्यात पाहत म्हणाला.त्याच बघणे, तिला टच करणं, त्याचा स्वभाव सगळं काही तिला भावत होत. आजवर कधी कोणी तिच्यासोबत एवढया प्रेमाने बोलले नव्हते आणि तो मात्र प्रत्येकवेळी आपल्या अंदाजाने तिला जिंकत होता. त्याच्या एवढ्या जवळ असण्याने तिला कसतरी होत.
"गुंजन. घर आवडलं का तुला?"वेद तिच्यापासून दूर होत म्हणाला. त्याच्या बोलण्याने ती भानावर येते आणि समोरच्या दिशेला पाहायला लागते. एक मोठा असा पांढऱ्या शुभ्र रंगाचा मॉर्डन टाईप बंगला तिच्या नजरेत पडतो. पण तिची नजर बंगल्यावर असलेल्या अक्षरावर खिळते. बंगल्याच्या वरच्या बाजूला मध्यभागी काही अक्षर लिहली होती. ती अक्षर पाहून गुंजनला काय बोलावे ते कळत नाही!! कारण तिचं नाव होते ते मराठी मधून लिहलेले. "गुंजन" अस. ती एकदा त्याला पाहते आणि एकदा त्या नावाला.
"मी जर नसते आयुष्यात मग?"गुंजन म्हणाली.
"तू, नसती तर हा वेद बिना लग्नाचा राहिला असता. हा माझा बंगला आहे. यात फक्त तुझं आणि माझं प्रेम आहे बहरलेले. प्रत्येक भिंतीवर तुझे फोटो आहेत. मला आठवण आली की, मी इथेच यायचो."वेद बंगल्याला पाहत म्हणाला.
"एवढं प्रेम?"गुंजन हळवी होऊन विचारते.
"हो, स्वतःपेक्षा जास्त"वेद तिला पाहून म्हणाला. ती त्याच्या या बोलण्यावर शांत राहणे पसंत करते. तिला कळत होतं त्याच प्रेम. पण मन मानून घेत नव्हतं कुठेतरी!!वेद तिला समोर चालायला सांगतो, तशी ती चालत त्या बंगल्यापाशी जायला लागते आणि वेद तिच्या मागे मागे तिला पाहत चालत असतो. गुंजन दिसायला खरंच खूप सुंदर होती. पण कुठे तरी हरवलेली असायची नेहमी. नाचताना मात्र ती जगाचा विसर पडून नाचत असायची. तिचे ते चेहऱ्यावरचे हावभाव आणि आताचे हावभाव यात भरपूर फरक असायचा.आताचे हावभाव तिचे थोडेसे गोंधळलेले होते.
"आजवर कोणीच एवढं माझ्यासाठी केलं नाही आणि यांनी त्यांची फॅमिली, घर सगळं काही माझ्या स्वप्नांसाठी सोडलं. प्रेम करतात म्हणून एवढं कोण करत ना? हा बंगला हे सगळं काही माझ्यासाठी बनवलं. खरंच किती प्रेम आहे यांचं माझ्यावर. मला आमच्या नात्याला पुढे न्यायचे आहे. कस सांगू यांना? हे, माझ्यासाठी करतात म्हणून नाही अहो माझं प्रेम तुमच्यावर. तुम्ही आहातच रिअल जेंटलमन की कोणीही मुलगी तुमच्या प्रेमात पडेल असे. मग मी तर तुमची बायको आहे ना? मला अधिकार आहे तुमच्यावर प्रेम करायचा. यात काही चुकीच नाही वाटत. नवरा बायको मध्ये प्रेम असणं हेच आपल्या नात्याची वीण घट्ट करेल ना? तुम्हाला कस सांगू मी?"गुंजन मनातच विचार करत म्हणाली. तिचे मध्ये मध्ये हातांसोबत चुळबूळ चालू असते. वेद डोळ्याच्या कोपऱ्यातून तिला पाहत असतो. पण तो काही तिला बोलत नाही. गुंजन तशीच घरात जात असते की, तेवढ्यात एक बाई तिच्यासमोर येते.
"मालकीण बाई, पहिल्यांदा येत आहात ना घरात? मग दोन मिनिटं थांबा बघू. आम्हाला औक्षण करू दे तुमचं"ती बाई हातात ताट आणत हसून म्हणाली. तिचं बोलणं ऐकून गुंजन जागीच थांबते.
"या आहेत रखुमाई आजी. इथेच असतात देखभाल करायला. खूप प्रेमळ आहेत हा गुंजन आणि आजी तुम्ही मालकीण बाई म्हणू नका. गुंजन म्हणा!!"वेद मागून येऊन म्हणाला. तशी गुंजन त्यांना हसून दाखवते.
"तुम्ही मला गुंजन म्हणा. आपल्या नातीसारखं समजून"गुंजन हळू आवाजात म्हणाली.
"एक नंबर आहे हा साहेब तुमची पसंत!!"आजी गुंजनला टीका लावत म्हणाल्या. यावर गुंजन मस्त अशी गोड हसते.आजी वयस्कर होत्या. पण तेवढ्याच प्रेमळ अश्या होत्या. वेद आला की त्याचा जेवणाच सगळं त्याच बघत असायच्या. कितीतरी वर्षांपासून ते त्या घरात असल्याने वेदने कधी त्यांना सर्वेन्ट सारख न वागवता आपल्या माणसांसारखं वागवलं होत. त्यामुळे त्या वेद आणि गुंजनला आलेलं पाहून आनंदी होतात. आजी वेदच कौतुक करून थकत नव्हत्या!! गुंजन देखील त्यांच्याकडून वेदच ऐकून इम्प्रेस होत होती. वेद मात्र थोडासा वैतागत होता. कारण त्याला जास्त प्रमाणात कौतुक आवडत नव्हतं त्याच.
"आजी, तुम्ही जावा बघू झोपायला. आम्ही फ्रेश होऊन खायला घेऊ हा."वेद त्यांना समजावत म्हणाला.
"ठीक आहे, साहेब!!"आजी अस म्हणून हसून तिथून निघून जातात. त्या गेल्यावर वेद गुंजनला तिला राहण्याची रूम दाखवतो आणि स्वतः तिथून जात असतो की, तेवढ्यात गुंजन त्याचा हात धरते.
"तुम्ही, कुठे जात आहात? आपण दोघ राहू शकतो इथे. मला काही प्रॉब्लेम नाही आहे."गुंजन म्हणाली.
"गुंजन, तुला ओकवर्ड वाटू नये. यासाठी मी दुसऱ्या रुमला जात आहे. इथे कोणी आपल्याला काही बोलणार नाही" वेद म्हणाला.
"अहो, काही गरज नाही सांगितले ना मी!!"गुंजन वैतागत म्हणाली.तिने त्याच मनगट पकडल होत.तरीही तिचं ऐकून वेद तिला नकार कळवतो.
"अहो, तुम्ही ऐकणार नाही का माझं?" ती काहीशी चिडून म्हणाली.
"गुंजन$$, आपल्यात नात नाही आहे. हे नातं तुझ्यावर लादल गेलं आहे. त्यामुळे नको" वेद आता विचार करून बोलतो. तो ऐकत नाही हे पाहून गुंजन पटकन त्याच्या मानेत हात घालते आणि थोडीशी टाचा उंचावून उभी राहून त्याला काही कळायच्या आत त्याच्या ओठांवर ओठ टेकवते.वेदला काही कळत नसतं. तो डोळे मोठे करून फक्त तिला पाहत असतो. गुंजन मात्र लाजून हळुवार त्याच्या ओठांना आपलं करत असते. जसा तिचा वेग वाढतो. तसे वेदचे हात आपोआप तिच्या कंबरेवर विसावतात आणि तो देखील आता तिच्यात गुंतून हळूहळू तिला पॅशेनेटली किस करायला लागतो. नकळतपणे त्याच्या डोळ्यातुन एक थेंब बाहेर पडतो. पण आज गुंजन काही त्याला सोडायच नव्हतं म्हणून ती अजिबात त्याचे ओठ सोडत नाही. शेवटी वेद श्वास जड पडतात म्हणून तिला बाजूला करतो आणि आपल्या घट्ट मिठीत बंदीस्त करतो. गुंजन मोठ्याने श्वास घेते आणि स्वतःला शांत करते.
"हे, नात आहे आपलं. मी तुम्हाला नाही त्रास देऊ शकत. तुमच्या प्रेमाला पण नाही!! तुम्ही माझ्या आयुष्यातील अशी व्यक्ती आहात की ज्याला मला भरभरून प्रेम करावे वाटत. तुम्ही ऐकूनच घेत नव्हता. त्यामुळे अस वागावे लागलं मला" गुंजन शांत होत म्हणाली. तिची हाईट वेदच्या गळ्या एवढी होती. त्यामुळे वेदने तिला स्वतःकडे लॉक केलं होतं.
गुंजनने जे काही केलं होतं आता ते त्याला आतून सुखावून गेलं होतं. ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, ती व्यक्ती आज त्याच्या एवढ्या जवळ होती की, त्याला तिला किती प्रेम करावे ? कळत नव्हतं.तो अगदी एखाद्या नाजूक बाहुली प्रमाणे कुरवाळत असतो. गुंजन देखील त्याच्या स्पर्शात हरवून जाते. ती बाजूला होते आणि त्याचा चेहरा स्वतःच्या ओंजळीत पकडून त्याच्या कपाळावर स्वतःचे ओठ टेकवते. तो फक्त डोळ्यात पाणी ठेवून तिला पाहत असतो. ती हळूहळू पूर्ण त्याच्या चेहऱ्यावर स्वतःचे ओठ फिरवायला लागते. आज तिला हवं ते ती करत होती. कारण त्याला बोलण्याने कळणार नव्हतं. त्यामुळे स्पर्शाने ती त्याला सांगून हक्क गाजवत असते.
"तुम्ही, फक्त माझे आहात आणि मी फक्त तुमची वेद. आजवर कधी कोणाला अस किस नाही केलं. इव्हन कोणाला जवळ पण नाही केलं. पण तुमच्यात वेगळं आहे. जे मला तुमच्याकडे ओढत असत. काहीतरी खास आहे आपल्यात" गुंजन त्याच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाली. तिचं ऐकून तो डोळ्यात पाणी ठेवून हसतो. तो तिचे हात बाजूला करून पुन्हा एकदा तिला आपल्या मिठीत घेतो आणि तिच्या कानाला हळूच किस करतो.
"तू पण फक्त माझीच आहे याबरोबरच तुझे स्वप्न पण माझंच आहे.थँक्यू, मला स्विकारल्याबद्दल!!"वेद तिला मिठीत घेऊन म्हणाला. त्याच म्हणणे ऐकून ती आनंदी होते. आता काहीवेळापूर्वी जे तिने केलं, ते सर्व आठवून ती स्वतःशीच लाजत असते. वेद तिला पाहून हसतो.
"अशीच रहा आनंदी!!"तो तिला बाजूला करत म्हणाला. तिचा आनंद पाहून तो आनंदी होत होता. वेद आणि ती काहीवेळ तसेच बोलत बसतात आणि नंतर आपलं जेवण करायला जातात. जेवण वाढायच कस? हे देखील गुंजनला कळत नसत. वेदच तिला शिकवतो आणि भरवायला लागतो. ह्या घरात त्या दोघांना बोलणारे कोणीही नव्हते. त्यामुळे ते मस्त असे आपले जेवण करायला लागतात. काहीवेळाने जेवण करून आवरुन बेडरूममध्ये येतात.
"तुम्ही, इथं झोपा माझ्याजवळ" गुंजन हट्ट करत म्हणाली. कारण तिला वाटलं वेद सोफ्यावर जाईल झोपायला? याचा विचार करून ती म्हणते. वेद हसूनच तिच्या बाजूला पडतो. गुंजन खुश होऊन त्याच्या बाजूला झोपायला जात असते की, तेवढ्यात तिचा फोन वाजतो. तशी ती फोनवरच नाव पाहते आणि ते पाहून तिच्या कपाळावर आठ्या उमटतात.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः
---------------
या स्टोरीचे भाग शेड्युलला लावलेले असल्याने ते रेग्युलर येत जाईल.