rose jam in English Short Stories by Vrushali Gaikwad books and stories PDF | गुलाबजाम

Featured Books
Categories
Share

गुलाबजाम

काल रात्री आमच्या दोघांच भांडण झालं होतं. कारण तसं नेहमीचच होतं आणि भांडण ही रोजचच होतं. भांडणांच एकमेव कारण म्हणजे त्याच्याकडुन मला वेळच मिळत नव्हता. रोज संध्याकाळी कामावरून दोघेही घरी गेल्यानंतर मला त्याला खुप काही सांगायचं असायचं पण त्याचं घरी आल्यानंतर ही काम असायचं. कधी कधी कंटाळा येतो त्याच्या कामाचा मग असं वाटतं नको ते काम तुझं आणि नको ती नोकरी. पण नेहमी सारखच काल रात्री ही झालं मी घरी आल्यानंतर कामं आवरून जेवण वगैरे झाल्यावर त्याच्याकडून थोड्या वेळाची अपेक्षा केली आणि त्यानेही नेहमी सारखं फ्री होण्यासाठी थोडा वेळ मोबाईल वापरायला सुरुवात केली. मला खुप बोलायचं असतं पण मोबाईल दोघांकडेही नको असं मी त्याला सांगत होती. पण मग त्याचं म्हणणं असं होतं. मला पहाटे लवकर उठायचं आहे आणि आता मी झोपणार... खरंतर रोहीतला फर्स्ट शिपला म्हणजेच घरातुन साडे पाचला निघायला लागायचं. म्हणुनच त्याला रात्री दहा ते साडे दहा पर्यंत झोपायचं असायचं .. तरच कुठे त्याची सहा तासाची झोप व्हायची. कारण साडे चार वाजता तो उठायचा. मग मात्र माझं डोकं फिरायचं कारण तुला लवकर जायचं म्हणुन मी का लवकर झोपु. मी त्याला झोपुनच देत नव्हती पण तो काही बोलायला तयार नव्हता. मग मात्र मी बोलणं बंद केल आणि त्याने चिडुन तोंड एका साइडला करून झोपून घेतलं. मला कुठे लवकर झोप येते.. मी बारा वाजे पर्यंत मोबाइलवर टाईमपासच करत बसलेली. पहाटे कामावर जातानी तो रोज मला आवाज देऊन गालावर गोड किस करुनच कामाला जायचा. आज ही त्याने मला आवाज दिला आणि मी ऐकुनही ब्लॅकेट आणखी चेहर्‍यावर ओढुन घेतली. त्याने ब्लॅकेट खाली घेऊन नेहमी सारखीच गालावर किस केली आणि कामावर निघाला. मी मात्र गालातल्या गालात हसून पुन्हा झोपली.
साडे नंतर मी उठली आणि माझं सर्व आवरून मी कामावर गेली. खरंतर आज मी आमचं भांडण विसरून त्याला मेसेज केला. आज मला न्यायला येशिल का ??? त्यावर मी आज दमलो आहे असा त्याने रिप्लाय दिला. मी बर्‍याच दिवसांनी आज त्याला बोलवलं होतं पण त्याने कारण दिला पण ओके समजुन घेतलं. पण काही वेळानी त्यानी शुजचे फोटो मला पाठवले ..कोणते घेऊ असं विचारलं मला राग आला मग माझ्यासाठी तुला वेळ नाही.शुज घेण्यासाठी मित्रासोबत बरोबर गेला.. म्हणुन मग मी घरी गेल्यानंतर बोलायचंच नाही असं ठरवलं. मी घरी पोहचते तर रोहितनी दरवाजा उघडल्यानंतर मला लगेच मिठी मारली. मला बोलायचंच नव्हतं, मला त्याच्याबद्दल मनात थोडा राग नाही पण चिड होतीच.. मी इग्नोर करत होती त्याला पण तो मागे मागेच सॉरी .. बोल ना .. म्हणत त्याने दोघांसाठी आणलेले गुलाबजाम मला दाखवले आणि आत्ताच खा म्हणुन माझ्या मागे फिरत होता. मी दुर्लक्ष करत नको मला म्हणुन माझी कामं आवरत होती. मी जेवण बनवायला घेतलं आणि तो माझ्यासोबत किचनमध्ये येऊन गप्पा मारत होता तरिही मी त्याच्यासोबत बोलायला तयार नव्हती. आता मात्र त्याला आवडलं तो चिडला आणि तुला फोर्सच करणार नाही म्हणुन हॉलमध्ये जाऊन बसला. खरंतर तो मागे मागे फिरतोय म्हणुन मी पण मुद्दाम बोलत नव्हती.पण आत्ता मला बोलावं वाटत होतं पण मी काही माघार घेतली नाही. थोड्यावेळानी मी दोघांसाठी जेवायला घेतलं आणि तरिही न बोलताच जेवायला सुरुवात केली. मला रोज रोज घरंच खाऊन कंटाळा येतो म्हणुन तु जास्त घे म्हणुन त्याला बोलली पण तो माझ्यावर ओरडुन मला खुप बोलला. मला ते आवडलंच नाही. मी माझी प्लेट उचलुन बेसिंग मध्ये नेली आणि हात धुतले. मला जे वाटलं ते त्याने केलं. तो पण न जेवताच माझ्या मागे आला आणि हात धुतले. त्यानी हात धुतलेले पाहुन मला खुप वाईट वाटलं. कारण त्याला लवकरच भुक लागलेली.
तु वेडा आहेस का ?? जेवला का नाहीस मी त्याला विचारलं. त्याने मला उत्तरच दिलं नाही.. मला खुप रडायलं आलं. मी तशिच जाऊन झोपले. मी रात्री साडे आठ वाजताच झोपली तो मात्र हॉलमध्ये मोबाईल घेऊन बसलेला.. तो साडे नऊ वाजता बेडरुम मध्ये आला पण माझ्यासोबत न बोलताच काही वेळात झोपुन गेला. मला जाग आलीच होती आणि आत्ता काही झोप लागणार नव्हती मी मोबाईलवर काहीतरी टाईमपासच म्हणुन सिरीयल्स बघत बसली. बारा वाजले तरी मी जागिच होती. आणि मी जागी असताना मी त्याला गाढ झोपुन देणारच नव्हती. मी त्याला उठवणसाठी पाय मारायला सुरुवात केली त्याला खरंतर या गोष्टीची सवय झाली होती. झोप गं नालायक म्हणत त्याने माझा मोबाईल बाजुला ठेवला पण मला खुप भुक लागलेली.मी रोहितला उठवायला सुरुवात केली.

उठ ना.. नको ना झोपु भुक लागले खुप..
का आत्ता.. का.. झोप गप्प..
नाही ना.. जा उठ मला गुलाबजाम घेऊन ये लवकर...
आ... झोपु दे ना गं.. म्हणत तो ब्लॅकेट बाजुला करत उठला..
किती खाणार...
मला दोनच आण..
हा आणतो... वेडी पोरगी...

असे म्हणत मस्तपैकी दोन बाऊलमध्ये दोघांसाठी रोहित गुलाबजाम घेऊन आला. रात्री एक वाजता हसुन गुलाबजाम खायला जाम मज्जा आली.
दिवसभर झालेलं भांडण पाच मिनीटांत विसरुन गेलो. रात्री एक वाजता गुलाबजाम खाल्ल्यावर दोघेही झोपुन गेलो. असं आभचं भांडण गुलाबजाम मुळे क्षणात मिटलं.
तुझ्या माझ्या प्रेमाला आणखी काय हवे..
दिवसभर भांडण रात्री गुलाबजामच हवे..