मला वेळ नाही मला लवकर येता येणार नाही तुला कळत कसे नाही मला किती कामे असतात तुमचं आपलं बर आहे इकडच्या तिकडच्या गोष्टी करायच्या आणि मग बिंदास गाणं ऐकत बसायचं "
"हो का आम्हला एवढच काम असत इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगितल्या तरी आम्हला मन जिंकावी लागतात ते हि आवाजातून तुमच्या सारख्या प्रेसेंटेशन सारखे नाही सूट बूट घालून लॅपटॉप वर पाहून हातवारे करून आपले म्हणणे पटवायला इथे आम्हला लोक आमच्या आवाजाने ओळखतात
"हो हो सोपे वाटते तुला प्रेस्टेशन म्हणजे अख्या कंपनीचे भवितव्य असते त्यावर चांगल्या ऑफर्स ऑर्डर मिळाल्या तर कंपनी मोठी होते आणि मूवी ला जाऊन वेळ फुकट घालवावे हे मला पटत नाही निघतो मी मला मीटिंग आहे "
सौरभ रागारागात घराबाहेर गेला तशी आरोही हि नाराज होत म्हणाली "काय म्हणावं उग्गीच सकाळ सकाळी वाद करतो मान्य तू ला ऑफिस मध्ये कामे असतात पण कधी तरी त्यातून वेळ काढावा तर माझे काम असेच म्हणतो त्याला कुठे माहित आहे रेडिओ जॉकी होणे काही खायचे काम नाही आवाजाने लोक आम्हला ओळखतात समोर आमचा आवाज च आमचा अभिनय असतो त्यासाठी किती काळजी घ्यावी लागते पण त्याला आपले कामच मोठे दिसते मिटींग्स सेमिनार मोठे मोठे शब्द म्हणजे मोठी कामे का मी फक्त एवढेच म्हणाली आज जरा लवकर ये खूप दिवस बाहेर गेलो नाही माझ्याकडे नवीन मूवी ची तिकीट आहे जाऊ तर नेहमी प्रमाणे नकाराची पावती देऊन गेला "
आरोही हि ने डोळे पुसले आणि घडाळ्याकडे पहिले तर ९ वाजले होते तिनी पटापट आपली तयारी गेली तिचा कार्यक्रम १० वाजता सुरु होणार होता लगेच तयारी करून ती रेडिओ स्टेशन वर पोहोचली आणि स्टुडिओ मध्ये गेली अजून तिचा कार्यक्रम सुरु होण्यासाठी १० मिनिटे होती त्यामुळे ती जरा शांत बसली कारण सकाळी झालेल्या प्रकाराने ती खूप उदास होती तिने आपल्या बॅग मधून पाण्याची बाटली काढली व थोडे पाणी पिले आणि ती डोळे बंद करून राहिली तेव्हड्यात तिच्या कानावर आवाज पडला
"मी तुमचा होस्ट आणि मित्र आर जे सुमित तुमची रजा घेतो परत भेटू उद्या सकाळी आता तुम्हाला हसत खेळत ठेवण्यासाठी येत आहे आपली आवडती माझी मैत्रीण आर जे आरोही .....
आणि आरोही ने डोळे उघडले आणि तीने खुर्ची पकडली "नमस्कार माझ्या प्रिय मित्र मैत्रिणीनो तुमचे स्वागत करत आहे तुमची आवडती आर जे आरोही माझ्या ह्या कार्यक्रमात ज्याचे नाव आहे "डिअर जिंदगी "आणि आरोही ने आपले बोलणे सुरु केले अर्धा तासाचा कार्यक्रम असल्याने बऱ्याच गोष्टी लोकांच्या गाण्याच्या फर्माईश त्या कार्यक्रम असत
अर्धा तास संपला लोकांचा निरोप घेऊन आरोही स्टुडिओ मधून बाहेर आली आणि सरळ कॅन्टीन मध्ये गेली तिनी कॉफी ऑर्डर गेली आणि खुर्चीवर गप्प बसली तेव्हड्यात तिथे सुमित आला
आरोही आरोही दोन तीन हाका मारून हि तिनी उत्तर न दिल्याने तो समोर खुर्चीवर येऊन बसला आणि परत एकदा हाक दिली तशी आरोही आपल्या विचारातून बाहेर आली
"काय आरोही कुठे हरवलीस "?
"काही नाही असच "
"आरोही काही झालं का मग आज उदास का जाणवते "
"नाही रे असे का विचारतो "
"मग तू आज एव्हडी गप्प का स्टुडिओं मध्ये आल्यावर मी बिझी असलो तरी मला तू हाक द्याची तुझा कार्यक्रम सुरु व्ह्याला उशीर असला तरी तू स्टुडिओ भर फिरायची मग आज काय झालं एव्हडी शांत "
"का सुमित माणूस कधी गप्प राहू शकत नाही "
"नाही राहू शकतो पण तू नाही काय झाल "?
"काही नाही सुमित "
"आरोही मी तुला आज ओळख नाही बालपणीचे मित्र आहोत आपण मला तरी फसवू नकोस "
"काही नाही रे माझं आणि सौरभ च जरा जे नेहमीचे आहे "
"अच्छा म्हणजे लडाई अगं त्यात काय घेऊन बसायचं नवरा बायको म्हणजे भांडणे होतात अगं मी आणि रिया केवढे भांडतो पण चार पाच दिवसात परत एकत्र होते सोडून त्याच ते "
"बरोबर बोलतोस तू भांडण्याने म्हणे प्रेम वाढत पण जर सेल्फ रेस्पेक्टवर आलं तर "
"म्हणजे "?
सुमित ला आरोहीने सगळे सांगितले कारण तो तिचा खूप चांगला मित्र होता
"अच्छा तर हि गोष्ट आहे मान्य आहे सौरभ मोठ्या कंपनीत काम करतो पण त्याने तुझ्यासाठी पण वेळ काढायला हवा तू फक्त काम न करता घर हि सांभाळते ते हि न थकता आणि आपल्या कामाला असे हलक्यात त्याने घ्यायला नको होते पण जाऊ दे तू मनाला लावून घेऊ नको "
"नाही सुमित पण त्याचे असे वागणे मनाला लागते"
"पण खरंच हॅट्स ऑफ आरोही एव्हडी दुखी असताना सुद्धा तू कार्यक्रमात कुठेच तू दुखी असल्याचे जाणवू दिले नाही "
"सुमित स्त्रिया आहोत आम्ही आम्हला म्हणे सहनशक्ती खूप असते मनात दुःख असेल तरी डोळ्यातल्या पाण्याला कसे रोखायचे हे स्त्रियांना चांगले माहित असते तिला तिच्या प्रत्येक रूपातली जबाबदारी चोख सांभाळावी लागते मग एक नोकरदारी असू एक मुलगी एक पत्नी म्हणून एक आई किंवा सून आणि आपले काम तर आनंद देणार आहे आपण किती हि दुखी असलो तरी आपल्या बोलण्याने कोणाच्या चेहऱ्यावर हसू येईल ह्या सारखे पुण्य नाही
"खरं आहे आरोही तुम्ही स्त्रिया खरंच महान आहात तुझ्या ह्या बोलण्याने माझ्या मनांत रिया बद्दल अजून आदर वाढला ती हि बिचारी ऑफिस मधून आल्यावर किती थकली असली तरी माझ्या आवडीचे पदार्थ बनवते आणि तू आरोही तुझ्या सारखी मैत्रीण मिळणे म्हणजे नशीबच खरंच आज तू दाखवलं आरोही "यू आर सुपर वूमन अँड यू आर सुपर आर जे "