Wakadewad - A thriller - 2 in Marathi Short Stories by Bhushan Patil books and stories PDF | वाकडेवड - एक रोमांच - 2

Featured Books
Categories
Share

वाकडेवड - एक रोमांच - 2

वाकडेवड-एक रोमांच
भाग २


ती बाई बोलायला लागली. सुरुवातीला तीला शब्द फुटत न्हवते. ती बोलण्याचा प्रयत्न करत होती. मामा विचारू लागले "सांग कोण हायीस तू? हिला का धरलीस?" मग ती म्हणाली, "मी शेवंता हाय". ममांना आधीच कळलं होतं ती कोण आहे ते. त्यांच्या बोलण्यावरून समजलं. परत मामा म्हणाले, "उतारा सांग आणि पोरीला सोड. चालती हो." ती बाई सांगू लागली तीला काय काय हवय ते. एक भाकरी, सुखं मटण, भात, रस्सा आणि बुंदीचा लाडू. एवढं मागितलं तिने. मामांनी तिच्या नवऱ्याला सांगितलं. "काय काय सांगितलय तो उतारा पारिजातकाच्या झाडाबुडी ठेवा". उतारा ठेऊन येताना मागे बघायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही. आणि घरात जाताना पाय धुवून जायचं. तो हा हा म्हणला. मामांनी आणि जोरात व्यताची काठी आपटली आणि तिच्या अंगावर अंगारा फुकला. "जा आता परत येऊ नको. तुला पाहीजे ते मिळतंय". अंगारा फुंकताच ती बाई खाली कोसळली. तीला तिच्या सासूने उभा केलं. आता ती नॉर्मल वाटत होती. आजारी अशक्त बाई वाटली. ते सगळे जाट्टूबाईला पाया पडून परत घरी निघून गेले.

मी नंतर विचार करायला लागलो. पारिजातकाच्या झाडाजवळ का बरं उतारा ठेवायला लावला असावा? मी सॅम्पल्स घ्यायला तिथूनच शेतात गेलो होतो. आज रात्री पण तिथूनच शेतात जाणार आहे. मला घाबरायला झालं. सगळी गर्दी निवळल्यावर देवळाच्या बाजूलाच एक कट्टा होता तिथं मी झालेल्या प्रकाराची प्रकरणे उकरत विचार करत बसलो. माझ्यातच मी गुंग असताना माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. मी एकदम दचकलो. अरविंद माझ्या जवळ येऊन बसलेला. "मित्रा एवढा कसला विचार करत आहेस? मी आलेलं भानपण नाही तुला."

मी वाकडेवड ला आलेल्या दिवसापासून अरविंद आणि मी चांगले मित्र झालो होतो. त्याला वेळ मिळाल्यावर तो माझ्या खोलीवर येऊन बसायचा. मला एकटाच बसलेला बघून तो माझ्याजवळ येऊन बसला. तो झालेला प्रकार काय होता सांगू लागला. मग मला वाकडेवड गावची एक दुसरी बाजू समजायला लागली. प्रत्येक गोष्टीला एक बरा वाईट इतिहास असतो. त्या इतिहासाच्या घटनांमधून रूढी, परंपरा, चालीरीती पडत गेलेल्या असतात. काही खऱ्या खोट्या गोष्टीपण रूढ झालेल्या असतात.

अरविंदकडून मला असं समजलं कि, त्याचे आजोबा लहान असल्यापासून एकाच व्यक्तीचं लागीर होत आहे. ते म्हणजे शेवंतीचं. त्याचे आजोबा आत्ता ८० वर्षाचे आहेत. म्हणजे याचा अर्थ असा झाला कि ७० वर्षाच्या आधीपासून शेवंतीचा त्रास लोकांना होत आला आहे. महिन्यातून एकदा दोनदा का असेना जट्टुबाईच्या मंदिरात कोणी ना कोणी लागीर काढण्यासाठी आलेलं असायचंच. मी गावात येऊन ३ महिने झालेले असून मला हा प्रकार काहीच कसा माहित न्हवता? माझ्या खोलीपासून मंदिर थोडं लांब अंतरावर असल्यामुळे असेल कदाचित. या गावाचं नाव कसं आगळंवेगळं आहे तसंच नवीन काही गोष्टी मला आता समजू लागल्या होत्या. खरंतर मी आगळं वेगळं नाव बघूनच हे गाव निवडलं होतं. सरांनी आम्हाला १० गावांची लिस्ट दिली होती. मला याच गावात जाण्याची इच्छा झाली. गावच्या वस्तीच्या बाहेर म्हणजेच जट्टुबाईचे मंदिर म्हणजेच विशाल ५ गुंठ्यात पसरसलेला वडाचा वृक्ष. मूळ झाडाचा खोड फार मोठा होता. ४ माणसे लागतील घेरा द्यायला. मूळ वृक्षाच्या पारंब्यापासून आणि वृक्ष वाढला होता. लांबून बघितलं तर एक जाळीच दिसत होती. करवंदाची जाळी असते तशी. झाडाच्या बुडक्यात गोल दगडासारख्या गाठी तयार झालेल्या. तिथंच जट्टुबाईची पूजा केली जायची पण तिथे देवीची मूर्ती न्हवती. तिथेच बुडक्यातल्या गाठींवर शेंदूर, हळद, कुंकू आणि गुलाल फासलेला होता. मध्य सेंटरची झाडाला असलेली गाठ म्हणजे जट्टुबाई. आणि बाजूच्या गाठी म्हणजे जट्टुबाईचे शिपाई. अशी ग्रामस्थ्यांची मान्यता होती. ते वड खूप वाढलेले आणि वाकडे तिकडे होते. म्हणून त्याला वाकडेवड म्हणत असत. त्या बाजूला असणारे गाव म्हणजे वाकडेवड गाव. अशाप्रकारे त्या गावाचे नामकरण झाले होते.


हजारो लोक देवीला नवस बोलायचे. नवसाच्या परत फेडीसाठी "बकरं कापतो" असं मागीतलं जायचं. आता खरंच ते नवस पूर्ण होतात म्हणून लोक खुषीने बकऱ्यांचा बळी देत होते का? याचं उत्तर देवालाच माहिती असेल. नवस मागताना एक नारळ, गुलाल आणि लिंबू नेला जायचा. देवीला नारळ लिंबू दाखवून नारळला गुलाल फांसून झाडाखाली एका ओळीने नवस बोललेल्यांचे नारळ ठेवले जायचे. खाली नारळ आणि त्यावर लिंबू, त्यावर फासलेला गुलाल. ३००,४०० नारळ दिसायचे. त्याला कोणी हात लावत नसे. त्या ५ गुंठे भागात पसरलेल्या झाडाच्या सावलीमद्धे स्त्रियांना प्रवेश न्हवता. त्या वडाच्या छायेत गेल्यावर आम्हाला काहीतरी होईल म्हणून सर्व स्त्रिया देवीला घाबरून लांबच रहायच्या. अजून एक नियम होता. नवस पूर्ण झालेले लोक बकऱ्याचा बळी झाडाच्या सावलीतच देत होते. जेवण पुरुषच बनवायचे. नंतर बनलेले जेवण झाडाच्या झावळीतून बाहेर आणून मग सगळे पाहुणे मंडळी मिळून जेवणाचा आस्वाद घेत. जेवण जरी शिल्लक राहिले तरी ते तिथेच टाकले जात असे. त्या जेवणाला किंवा इतर शिल्लक सामुग्रीला घरी घेऊन जाण्यास सक्त मनाई होती. असं त्या यात्रेचं स्वरूप होतं.

अरविंदला घरातून बोलावणं आलं तो घरी निघून गेला. मीपण खोलीवर जायला निघालो. वाटेत मला देसाई मामा भेटले. झालेल्या विषयी आमची चर्चा बरीच झाली. देसाई मामा म्हणाले, " मी लहान असल्यापासनं असं हुतंय. तवापासून शेवंतीनं पाट न्हाई सोडली. बिचारीला अजून मुक्तिबी न्हाई मिळाली. तिच्या काही इच्छा असत्यात, त्या मागत्या आणि निघून जात्या. अजून कितीदिवस उतारं मागत फिरणार हाय कुणाला म्हाईत?" मी मामांना विचारलं, "तुम्ही हे सगळं कोणाकडून शिकलात ?" "मी माझ्या आज्जाकडून शिकलो."
मी थोडं गंभीर होऊन विचार करायला लागलो. मामा पाठीवर हात मारत मला म्हणाले, "पोरा घाबरलास काय?" मी, न्हाई! म्हणून स्मित हास्य दिलं. तोवर माझी खोली आली, नंतर येतो सांगून देसाई मामांपासून मी रवाना झालो. लगेच मी अरविंदला फोन केला की, तू माझ्या खोलीवर झोपायला येत जा आजपासून. तो हो म्हणला मग मला मनातल्या मनात दिलासा मिळाला. रात्रीचे ८ वाजले. सखू मावशीच्यात जाऊन जेवण करून आलो. तेवढ्यात अरविंद तेथे आला. अरविंदला मी म्हणलं. आज रात्री 1 वाजता मला देसाई मामांच्या शेतात सॅम्पल्स आणायला जायचं आहे. पहिलं सॅम्पल तिथलं घेतलेलं, त्याचं रिडींग असायनमेंट मध्ये केंव्हाच उतरवलं आहे. आता परत दुसरे सॅम्पल्स घेऊन परत असायनमेंट करावं लागेल. नाहीतर तिकडे गेलोच नसतो मी. तिकडे जाणारा रस्ता पारिजातकाच्या झाडाजवळूनच जातो. देसाई मामांनी त्या लागीर झालेल्या बाईचा तिथंच उतारा टाकायला सांगितलाय. मला एकट्याला जायला होणार नाही. रात्री आधीच घाबरलो होतो. सो, तू माझ्या सोबत येणार आहेस. तो म्हणाला, काय झालं होतं रे रात्री? काही नाही रे सांगतो परत कधी, म्हणून मी गोष्ट तिथंच थांबवली.

"ती शेवंता कधी लगीरते रे? तिच्याबद्दल काही माहिती आहे का रे तुला?" मी अरविंद ला विचारलं.
"लय विचारपूस करत आहेस रे तू. एवढं काय जाणून घ्यायचय तुला. तिच्यापासून घाबरायचं कारण नाहीये. अमावस्या -पौर्णिमेला कोणालातरी लागीरते ती. जास्तीत जास्त बायकानाच लागीरते. उतारा कबूल करून लगेच जाते. याच्या व्यतिरिक्त काही त्रास दिलेला मला तरी माहिती नाहीये. सर्व लोक म्हणतात की, जिथं आता पारिजातकाचं झाड आहे तिथं ती बाळंतीण बाई वारली होती. घरच्यांच्या त्रासामुळे तिने तिथे आत्महत्या केली होती. गावचे केरबा सुतार आहेत बघ, त्यांच्या पूर्वजांपैकी कोणीतरी आहे असं म्हणतात. नतंर ती ज्या जागी वारली तिथं झाड आलं आहे. त्यामुळे उतारा तिथंच टाकला जातो. अमावस्या-पौर्णिमेला खूप झाड बहरलेलं असतं असा गावाकऱ्यांचा अनुभव आहे. असं हे अरविंदचं बोलणं ऐकताच आज सकाळी पडलेला भरगच्च सडा आठवला. आज संध्याकाळी हे असं व्हायचं होतं म्हणूनच सडा जास्त पडला होता.

रात्री एक वाजता उठून आम्ही शेताकडे निघालो. माझा रिसर्च तर चांगला झाला पाहीजे म्हणून मी चाललो होतो. जाऊ वाटत न्हवतं तरी मनाची तयारी केली. झाडाजवळ गेल्यावर मात्र सकाळी वाटत होतं तस काही वाटलं नाही. एखाद्या १००० चौरस फुटाच्या हॉल मध्ये एकच अगरबत्ती लावलीय की काय एवढाच फुलांचा सुगंध दरवळत होता. तिथून आम्ही झटदिशी पुढं सरकलो. अरविंद ला बाजूलाच उभ रहायला सांगितलं आणि मी ऑक्सिजन रिडींग्स घेतले. परत येताना तार तार पाय टाकीत येऊ लागलो. मागे कुत्री भुंकण्याचा आवाज येत होता लांबून. लगबगीने आम्ही मागे आलो.

परत आठवड्याने माझ्या कानी गोष्ट पडली की अजून एक बाधित बाई लागीर काढायला आली होती. तिलापण शेवंतीच लागीरली होती. मलापण ते आता कॅज्युअल वाटायला लागलं होतं. असेच थोडे दिवस निघून गेले आणि अचानक शेवंता लागरायची बंद झाली. माझ्या डोक्यात विचार पडला कि, 70 80 वर्ष लागरत आलेली शेवंता अचानक गेली कुठं? याचा संबंध मी जे त्या रात्री पाहिलं त्याच्याशी तर नसेल ना? त्या गोष्टीला दोन महीने व्हायला आले. त्यांच यामागे काहीतरी कनेक्शन असेल असं मलातरी वाटत नाही. या दोन महिन्यात करणी, वाशीकरण, लागीर, कोप, शाप, नजर, इत्यादि गोष्टींबद्धल गावाच्या लोकांकडून माहिती करून घेतली. म्हणजे मी ते सर्व शिकून घेतलं असं नाही म्हणायचं मला पण, आपल्याशी कोणी वाईट वगतंय आणि कोणती गोष्ट चांगली, कोणती गोष्ट वाईट हे समजण्यासाठी मी माहिती करून घेतली. त्यानंतर भूत-प्रेत, लागीर-बिगीर याची माझी भीती कमी झाली. त्या रात्री ज्या गोष्टीला मी घाबरून आलो होतो सुरुवातीला. मुळात माझा संशोधी स्वभाव असल्यामुळे पुन्हा तिथं जाऊन काय चाललंय याचा शोध घेणार, हे मी ठरवलं.

तेंव्हा त्या संध्याकाळी गावाच्या दुसऱ्या बाजूला सहज फिरायला गेलो होतो. कुठे मला नवीन वनस्पती दिसेल, वेगळी माती दिसेल. वेगळं तण दिसेल त्या उद्देशाने सहज फेरफटका मारायला गेलो होतो. तिथंच एक गोल विहीर होती. बरोबर गोल आकाराची दगडाने बांधलेली. पाणी निळं होतं विहिरीतलं. विहिरीच्या एका कठड्याचे दहा बारा दगड पडले होते. दगडातूनच जागी जागी तण आणि झुडूपी उगवली होती. फक्त शेताच्या पाण्यासाठी विहिरीचा उपयोग केला जात असे. सूर्य मावळत होता. मी तिथंच विहिरीच्या कट्ट्यावर बसलो हवा खात. तिन्ही सांजा झाल्या. मागे मला सूळ सूळ आवाज आला. मागे एक ऊसाचं शेत होतं. मागे वळून पाहिलं तर ऊसाची पाने हलत होती. कोणीतरी शेतातून बाहेर येतंय असं वाटलं. 10 मिनिट तसंच चालू होतं. एव्हाना अंधार पडला. अचानक काहीतरी उडी मारून बाहेर पडलं शेतातून. मी मोबाईल ची टॉर्च पाडली आणि एकदम दचकलो. माझे डोळे विस्फारून मी पाहत होतो. अचानक दचकल्यामुळे माझ्या हातातील फोन पडला. गडबडीत फोन उचलला आणि टॉर्च पुन्हा शेताकडे पाडली. आणि पाहतो तर काय! समोर एक.......