unimaginable part 2 in Marathi Science-Fiction by Dilip Bhide books and stories PDF | अकल्पित - भाग २

Featured Books
  • ભાગવત રહસ્ય - 112

    ભાગવત રહસ્ય-૧૧૨   જીવનો જ્યાં જન્મ થયો-કે-માયા એને સ્પર્શ કર...

  • ખજાનો - 79

    ડર...ભય... ચિંતા...આતુરતા...ને ઉતાવળ... જેવી લાગણીઓથી ઘેરાયે...

  • ભાગવત રહસ્ય - 111

    ભાગવત રહસ્ય-૧૧૧   પશુ-પક્ષીની યોનિમાં અનેક પ્રકારના દુઃખ ભોગ...

  • વિશ્વની ભયંકર જળહોનારતો

    જ્યારે પણ જળહોનારત અંગે વાત નિકળે ત્યારે લોકોનાં મોઢે માત્ર...

  • ખજાનો - 78

    "રાત્રી નો સમય છે, આંદોલન વિશે સુતેલા અંગ્રેજોને જાણ તો થઈ ગ...

Categories
Share

अकल्पित - भाग २

 

अकल्पित   भाग   २

भाग १ वरुन  पुढे वाचा ........

 

सचिन वैतागला त्याला कळेना, की बाबा असे का वागताहेत, म्हणाला. “बाबा अहो तुम्ही काय बोलता आहात ते तुम्हाला तरी कळलय का ?”

“नाही, मलाही कळत नाहीये, पण थांब, माझ्या डोक्यात काहीतरी घडतंय. जरा थांब.” रामभाऊ म्हणाले. 

हॉल मध्ये विचित्र शांतता पसरली, नर्मदा रडायचं थांबली. सगळेच रामभाऊंकडे पाहू लागले.

पांच मिनिटांनी रामभाऊ त्रिलोकच्या मुलीकडे बघून म्हणाले

“वैशाली बेटा मला एक कागद, आणि पेन देशील”

वैशालीने कागद आणि पेन आणून दिला. रामभाऊंनी त्यावर एक मोठा  गोल आणि त्यांच्या आत एक छोटा गोल काढला. छोट्या गोलात त्यांनी लातूर अस लिहिलं. मोठ्या गोलात महाराष्ट्र आणि गोलाच्या बाहेर भारत अस लिहिलं. आणि त्यांच्या भोवती अजून एक गोल काढला सर्वजण त्यांच्याकडे कुतुहलाने बघत होते. रामभाऊंनी वैशालीला म्हंटलं की

“मी डोळे मिटेन तेंव्हा हा कागद तू कसाही फिरवून ठेव.” मग त्यांनी डोळे मिटले डावा हाताचा तळवा फोटोवर ठेवला, आणि पेन उंचावर धरला. नंतर पेन हळू हळू खाली आणत खाली टेकवला, आणि डोळे उघडले. पेन दोन्ही गोलांच्या बाहेर टेकला होता.

“त्रिलोक,” रामभाऊ म्हणाले की, “पेन दोन्ही गोलांच्या बाहेर, म्हणजे भारत अस लिहिलेल्या जागेत टेकला आहे यांचा अर्थ, परेश महाराष्ट्राच्या बाहेर आहे, पण भारतातच आहे. भारताच्या बाहेर नाही. आता मला जर कोणी भारताचा नकाशा आणून दिला तर परेश नेमका कुठे आहे ते समजू शकेल.”

सोमनाथभाई बोलले “अरे रामभाऊ તમે શું કહો છો, બનતું નથી तुम्ही जे म्हणता आहात तसं काही घडत नाही. आपण २१ व्या शतकात आहोत, आम्ही याच्यावर कसा विश्वास ठेवायचा ?”

रितेश मानसशास्त्राचा प्रोफेसर होता तो मध्येच  बोलला. तो म्हणाला की,

“पापा आमच्या शास्त्रात अश्या अनेक घटना माझ्या वाचनात आल्या आहेत. या गोष्टींवर विश्वास ठेवणं कठीण आहे. पण परेश साठी जर आपण थोडावेळ आजोबांवर विश्वास ठेवला तर बघूया किती सत्य आहे ते.”

त्रिलोक म्हणाला “बाबा, रामभाऊ आजोबा जसं म्हणताहेत, ते करण्यात आपलं काहीच नुकसान नाहीये, त्यामुळे करून बघायला काय हरकत आहे? आजोबा, पांच मिनिट थांबा मी गूगल वरुन नकाशा काढून आणतो.”

नकाशा आणल्यावर, रामभाऊंनी तीच प्रोसीजर पुन्हा केली आणि या वेळी पेन वापीहून सूरत ला जाणाऱ्या NH ४८ वर पडली. कोणालाच काही सांगण्याची गरज नव्हती. आता पर्यन्त सर्वांनाच नकाशावरून काय अर्थ काढायचा हे कळून चुकलं होतं. त्रिलोकने त्या पॉइंट च्या आसपासचा नकाशा मोठा करून आणला. या वेळी पेन बागवड टोल नाक्या च्या जवळ टेकली पण या वेळी पेनचा  हात थरथरत होता. रामभाऊ म्हणाले की, “परेश एका गाडीत आहे आणि ती गाडी टोल नाक्याच्या जवळ आहे. हात थरथरतो आहे यांचा अर्थ गाडी प्रवास करते आहे. हा रस्ता सूरतला जातो आहे म्हणजे परेशला सूरतला घेऊन चालले आहेत.”

हे सगळं जाणिवेच्या पालिकडलं होतं. सर्वजण अवाक् होऊन रामभाऊंकडे बघत राहिले. थोड्या वेळाने रीतेश बोलला “आपण यांना घेऊन पोलिसांकडे जाऊ. आणि त्यांना सांगू की काहीही  करा आणि परेशला सोडवा.”

सोमनाथभाईना पण हा मुद्दा पटलेला दिसला, “અમે કોઈ અન્ય રસ્તો નથી અમને આનો પ્રયાસ કરો आपल्या जवळ यांच्या शिवाय दूसरा पर्याय पण नाही. चला बघूया पोलिसांना हे पटतय का.”

मग सोमनाथभाई, त्रिलोक, रीतेश, सचिन आणि रामभाऊ सगळे पोलिस स्टेशन ला जायला निघाले. नर्मदाला पण यायचं होतं पण त्रिलोक म्हणाला की पोलिसांनी ऐकलं नाही तर तुला त्रास होईल. पण थोड्या वाद विवादा नंतर तिला सुद्धा बरोबर घेतलं.

PSI धनशेखरांनी सर्व शांतपणे ऐकून घेतलं. आणि मग म्हणाले की,

“पोलिस डिपार्टमेंट असल्या भाकडकथांवर चालत नाही. तुमचा मुलगा हरवला आहे म्हणून तुम्ही विश्वास ठेवताहात पण आम्हाला अस वागता येणार नाही. आमचा, आमच्या पद्धतीने शोध सुरूच आहे, काही प्रगती झाली की लगेच तुम्हाला कळवू. आणि आम्हाला खात्री आहे की तुमचा मुलगा सुखरूप घरी येईल.”

“साहेब, माझा मुलगा हरवला आहे.” नर्मदा जवळ,जवळ रडतच बोलत होती. “जेमतेम १० वर्षांचा मुलगा त्या टोळीवाल्यांकडे कसा असेल यांचा तरी थोडा विचार करा. ही एक गोष्ट ट्राय करून बघाना. तुमच्या नियमांच्या जाळ्यामधे अडकून माझ्या मुलांचं काही बर वाईट झालं तर आम्ही काय करायचं?”

धनशेखरांनी नकारार्थी मान हलवली. “शक्य नाही. म्हणाले. आणि मग शेजारी उभ्या असलेल्या शिपायांकडे वळून म्हणाले की काय वेळेकर, काय बरोबर आहे न?”

इतका वेळ मुक दर्शक असणाऱ्या वेळेकरांना कंठ फुटला.

“साहेब माझ्या मेहुण्याचा फोटो माझ्या जवळ आहे आणि तो आत्ता या क्षणी कुठे आहे ते पण मला माहीत आहे. त्यांचा फोटो यांना दाखवू, जर यांनी त्याचा ठाव ठिकाणा बरोबर सांगितला तर पुढचा विचार करू नाही तर हे लोक पण आग्रह धरणार नाहीत.”

धनशेखर साहेब कुटुंबवत्सल होते, मनाने वाईट नव्हते त्यांना ही कल्पना पटली. थोडा विचार कार्टून म्हणाले, “ओके मेहता साहेब आपण हे ट्राय करू पण हा प्रयोग फसला तर तुम्ही शांतपणे घरी जायचं कबूल ?”

“कबूल” सगळे एकसुरात म्हणाले.

त्रिलोकने बरोबर कागद पेन आणि नकाशा आणलाच होता. तो रामभाऊंना

म्हणाला की “हे एकदा वापरलेले साहित्य वापरता येईल का ?” रामभाऊंनी मान डोलावली आणि त्यांनी धनशेखर साहेबांच्या टेबलावर मांडामांड करायला सुरवात केली.

पहिलाच कागद आणि पेन टेकली भारत या जागेवर. रामभाऊ म्हणाले की “ज्या माणसाचा हा फोटो आहे तो माणूस आत्ता महाराष्ट्राच्या बाहेर आहे आणि म्हणून मला भारताचा नकाशा घ्यावा लागेल.”

धनशेखर साहेबांनी शिपायांकडे पाहिलं आणि डोळ्यांनीच विचारलं.

“साहेब प्रयोग फेल गेला. माझा मेहुणा महाराष्ट्राच्या बाहेर गेलेला नाहीये” वेळेकर म्हणाले.  

रामभाऊंनी लगेच उत्तर दिलं की “जरा थांबा माझा प्रयोग पूर्ण होऊ द्या आणि मग आपण यावर बोलू.” त्रिलोकने भारताचा नकाशा ठेवला. आणि या वेळेला पेन कोटीलिंगेश्वर मंदिर च्या बिंदु वर टेकली.

“साहेब हा माणूस कोटीलिंगेश्वराच्या दर्शनाला गेला असावा बहुतेक आणि हे मंदिर कर्नाटकात आहे हे आपणा सर्वांना माहीतच आहे. जरा फोन करून विचारता का?” रामभाऊ म्हणाले.

धनशेखर साहेबांनी शिपाया कडे पाहून म्हंटलं “वेळेकर फोन लावा. स्पीकर वर टाका.”

वेळेकरांनी फोन लावला

“अरे सुभाष कुठे आहेस तू?”

“मी इथे कोटीलिंगेश्वराच्या दर्शनाला आलो आहे. का हो भाऊजी,?  काय झालं. सर्व ठीक आहे ना?” – वेळेकरांचा मेहुणा.

“हो हो, सगळं ठीक आहे, असाच फोन केला होता. बर ठेवतो.” – वेळेकर.

सर्वांचे चेहरे एकदम उजळले. नर्मदाला तर अत्यानंद झालेला दिसतच होता. त्यांची आता खात्रीच पटली की त्यांचा परेश लवकरच त्यांच्या कुशीत असणार म्हणून.

“साहेब, मी सकाळी घरून निघालो तेंव्हा मेहुणा आणि बहीण घरीच होती, आणि कुठे जाण्याचा काहीच प्रोग्राम नव्हता. सॉरी साहेब.” – वेळेकर.  

“अरे ठीक आहे वेळेकर इतकं मनाला लावून घेऊ नका.” धनशेखर साहेब म्हणाले पण ते आता विचारात पडले. सूरत च्या पोलिसांना कळवायचं म्हणजे साहेबांना सांगावं लागणार. आत्ता रात्रीचे आठ वाजले होते. साहेब घरी असणार त्यांना फोन करावा लागणार होता.

“हॅलो साहेब मी PSI धनशेखर बोलतो आहे. एक मुलगा परेश मेहता, तीन दिवसांपूर्वी  हरवला आहे तुम्हाला अपडेट दिलं होतं काल, त्याचा ठाव ठिकाणा मिळाला आहे. सूरत च्या आसपास त्याची लोकेशन मिळाली आहे. सूरत च्या पोलिसांना कळवून त्यांची मदत घ्यावी लागणार आहे साहेब.”

“खबर पक्की आहे?” – साहेब.

“हो साहेब.” – धनशेखर.  

“मग तातडीने हालचाल करा. सूरत पोलिसांशी बोला आणि तुम्ही पण लगेच सूरतला निघा.” – साहेब.  

“होय साहेब. आज रात्रीच निघतो.” – धनशेखर.  

“ओके. मला अपडेट  देत रहा.” – साहेब.  

क्रमश.......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com