aas maj balachi kadambari bhag 4 in Marathi Fiction Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | कंस मज बाळाची - भाग ४

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

कंस मज बाळाची - भाग ४

आंस मज बाळाची भाग ४

मागील भागावरून पुढे…




आईचं ऐकून आपण कंटाळा न करता सगळ्या तपासण्या करायच्या कितीही वेळ लागू दे. वैभव आपल्या बरोबर आहे ही किती महत्वाची गोष्ट आहे. पोहे होताच तिनी पोळ्या केल्या आणि मग कुकर लावला. आता अनघाचं मन जरा शांत झालं.


तिचं मन शांत झालं तसा तिचा चेहराही शांत दिसू लागला.


अनघा विचारात इतकी गढली होती कि नाश्ता आणि वैभवचा डबा दोन्ही कधी तयार झालं हे तिच्याच लक्षात आलं नाही. तिला कळलं तेव्हा पुन्हा ती स्वत:शीच खुदकन हसली.


माणसाचं मन विचारात गुंतलं की किती यांत्रिकपणे आपल्यासमोरची कामं करतो कळतही नाही. वैभवाचा डबा भरून ठेवला.अनाघानी समोर डायनिंग टेबलावर पोह्याची कढई आणून ठेवली. दोघांसाठी दोन प्लेट, चमचे, पाणी सगळं आणून ठेवलं. वैभवचा डबा पिशवीत ठेवून टप्परवेयरच्या कंटेनरमध्ये थोडं ताकपण दिलं. सध्या उन्हाळ्याचा कहर सुरु झाला होता. तोपर्यंत वैभव तयार होऊन आला.


तो खोलीच्या बाहेर आला तर त्याला दिसलं की अनघानी टेबलावर पोह्याची कढई, दोन प्लेट्स,चमचे, पाणी सगळं ठेवलं होतं. वैभव मनातून आनंदाला तरी तिला म्हणाला,


"अग कशाला केलस. मी बाहेर खाल्ल असतं." वैभव


अनघा टेबलासमोर येऊन बसली त्याच्याकडे बघून हसत तिने प्लेटमध्ये पोहे वाढले आणि म्हणाली,



"तुझा डबासुद्धा तयार आहे. वैभव या सगळ्या ताणातून मी एकटीच जातेय असं नाही नं तुला सुद्धा खूप ताण आहे. मग मी फक्त माझ्याच ताणाचा विचार करून रडक्या चेह-यांनी सतत बसून राहू का?"


"अग तसं नाही पण ..." वैभवचं बोलणं मध्येच तोडत अनघा म्हणाली,



"काही होत नाही मला. माझा स्वयंपाक पण तयार आहे. तुझाबरोबर नाश्ता केला की तु पण किती निवांत ऑफीसला जा. आता या सगळ्या तपासण्या करायच्या आपण ठरवलं आहे नं मग असं रडत-रडत का करायचं? मी खूप छान आहे. बाळासाठी मी सगळं करायला तयार आहे." एवढं बोलून अनघा मनापासून हसली.



वैभवलापण बरं वाटलं नाहीतर त्याच्या मनावर खरच ताण होता. आता तोही निर्धास्तपणे या तपासण्यांना सामोरं जाउ शकणार होता.तरी वैभवनी तिला विचारलच


"हा धीटपणा फक्त माझ्यापुढे दाखवत नाहीस नं? नाहीतर मी ऑफीसाला गेल्यावर पुन्हा रडूबाई सुरु?"



" ए काहीतरी काय! असं अजिबात होणार नाही. मी माझा वेळ माझ्या आनंदात घालवीन. तू संध्याकाळी आलास की बघशील मी आता जशी आहे तशीच तुला दिसेन."


एवढं बोलून अनघा वैभवकडे बघून गोड हसली. आता वैभवाची खात्री पटली. तो मनापासून पोह्याचा आस्वाद घेऊ लागला.


"आज पोह्यात काय जास्तीचं घातलं अनघा?"


"का? आज पोहे जमले नाहीत?"अनघाच्या चेह-यावर हलकीशी नाराजी आली.ते बघताच वैभव लगेच म्हणाला,


" अगं तसं नाही. पोहे नेहमीपेक्षा छान झालेत म्हणून विचारलं काय आणखी घातलस ह्यात?"


"बापरे, मी एवढी घाबरले. वैभव मला घाबरवत नको जाऊस." वैभव हसला आणि म्हणाला,


"तुला चीडवायचा घाबरवायाचा मला अधिकार आहे. मी नवरा आहे तुझा."


आणि हसू लागला. अनघा जागेवरू उठली त्याला थपडा मारण्यासाठी तर वैभव तिला म्हणाला


"प्लीज हे संध्याकाळी.आत्ता तू धक्का-बुक्की केलीस तर ऑफीसचे कपडे खराब होतील...प्लीज."


"ठीक आहे तुला संध्याकाळी बघते. आत्ता ऑफीसला चाललास म्हणून तुला सोडलं तू भी क्या याद करेगा?"हे वाक्य म्हणतांना अनाघानी जो आविर्भाव केला त्यांनी वैभवला हसू आलं. हसत हसत वैभव ऑफीसासाठी निघाला. आज अनघानी चेष्टामस्करी केल्यामुळे तो खुश होता.


वैभवच्या मनावरचा ताण काल पेक्षा आज आणखी कमी झाला.


नाश्ता आटोपून वैभवी ऑफीसला जाताना हळूच अनघाच्या गालाची पापी घेतली आणि गालावर थोपटून ऑफीसला निघाला.



---------------------------------------------

क्रमशः पुढे काय झालं? वाचा पुढील भागात.

'आसं मज बाळाची'

लेखिका... मीनाक्षी वैद्य.