Snehi - 1 in Marathi Love Stories by KRUTIKA FALAK books and stories PDF | स्नेही - 1

Featured Books
Categories
Share

स्नेही - 1

पुण्यातील सुंदर आषाढातील सकाळ





सकाळचा प्रहर निळ्या आकाशात पुर्वेकडून डोकं वर काढत असलेला सूर्य, सुरेल गीत गात असलेले पक्षी, तो वर्षा ऋतू ची चाहूल देणारा प्राभती गारवा, सर्व धरती भर पसरलेले तांबूस सूर्यकिरणांची चादर सर्व जीवांना कवेत घेऊन मायेची ऊब देत होती. हे आल्हाददायक वातावरण मन अगदी मोहून टाकत होतं





खिडकीतून येणारी सकल किरण एका मोहक चेहऱ्यावर पडून त्या सावळ्या रंगाच्या मुलीचं सौंदर्य वाढवत होते. प्रकाश पडताच त्या मऊ काळ्या पापण्या उघडू पाहत होत्या. ते नाजूक नाक, गुलाबी ओठ आणि चेहऱ्यावर येणाऱ्या केश लटा प्रियाला 👩 जागवत होत्या. अखेर प्रिया चे डोळे उघडताच समोर मायेन तिच्याकडे निहाळत असलेला आकृती कडे गेलं प्रियाच्या ओठावर गोड हसू पसरलं. आई प्रिया जवळ येत ती डोक्यापाशी बसते तिचा केसातून हात फिरवत गालावर पापा देत बोलते





आई:-
उठ बाळा कस वाटतय आता तुला?





(एका महिन्याच्या सुट्टी नंतर आज प्रियाचा बारावी चा रिझल्ट असतो. गेल्या १५ दिवसांपासून प्रिया फार आजारी असते तर वसंत आणि मालती म्हणजेच प्रिया चे आई बाबां आणि प्रियाचा लहान भाऊ ध्रुव अस सर्व कुटुंब त्यांच्या कुलदेवी जाणार असतात)





प्रिया:-
हो ग आई. मी फर्स्ट क्लास आहे आता. 😁





आई:-
बर चल आवर लवकर महितीय ना आज कुठे जायचंय.





प्रिया:- हो आलेच लगेच.





आई किचन कडे वळते. प्रिया उठून अंगोळ करून ओल्या केसावर फुसत ती आरश्यासमोर येऊन उभी राहिली.





प्रिया:-
(स्वतः शीच बोलत) काही दिवसापासून खूप टेन्शमध्ये होते आई बाबा माझा अचानक अश्या इतक्या आजरी पडण्याने फार घाबरले होते ते. पण आता सर्व छान आहे बाप्पा परत त्यांना कधी टेन्शन नको देऊ





प्रिया डायनिंग टेबलजवळ येत ध्रुव च्या डोक्यावर एक टपली मारत पेपर वाचत असलेल्या बाबा ना मिठी मारून त्यांचा शेजारी बसते .




ध्रुव:- ( तिच्या कडे रागाने बघत) ऐऐऐ प्रिया ! 😡





प्रिया:- ‌‌हे प्रिया काय ?? मी मोठीं आहे तुझ्या पेक्षा.😡





ध्रुव:- का विनाकारण मारलस मला.





प्रिया:- (हसत) अरे तुझी अक्कल कधीची चालत नसेल ना म्हणून तू चालवी म्हणून मारल.😁





ध्रुव :- 😒😒तू नको काळजी करू ती. तू आताच बरी झालीय म्हणून बदला नाही घेत जा तुझे माफ किया जा सिमरन जा!!!!😁




बाबा:- 😂😂





प्रिया:- बस flimy कुठला. अभ्यासा कडे लक्ष दे. १५ दिवस
तुझ्याकडे लक्ष नाही देता आल पण आता तुझी चांगली नाटक बघते मी.😠





ध्रुव:- अअअ आई अग ताईला नाष्टा दे लवकर भूक लागलीय जोरात वाट.





बाबा दोन्हीच बोलण ऐकून पेपर वाचतच हसत असतात. आई ही किचन मध्ये हसते.




आई :- (नाष्याच्या प्लेट घेऊन येत) हो रे आणतेय की.





आज प्रियाच्याआवडीचा नाष्टा वडा सांबर असतो. सर्वांना वाढत आई ही बसते प्रिया किती दिवसातून छान चमचमीत खात असते. आजारी असल्यामुळे प्रिया सर्व बिना मसाल्याच खव लागत असत.





प्रिया:- आई आता कुठे वाटत आहे मी जेवते आहे म्हणून. वाह 👌 काय वडा सांबर केलाय तू ( आई च्या हातावर तिचे ओठ टेकवत) तेरे हात चुम लू 😁





बाबा:- बाळा बर वाटत आहे ना तुला ?





प्रिया:- हो बाबा.





तेवढ्यात डोअर बेल वाजते. ध्रुव प्रिया कडे बघत डोळ्याने इशारा करतो की उठ दार उघड म्हणून प्रिया ही त्याला मी का माझा वडा सांबर सोडून दार उघडू तू उठू आणि उघड. यांचे अस करण्यात तिकडे बेल वाजतच असते. शेवटी आई उठेते दार उघडायला जाते.




दारावर रेवा(प्रियाची जीवलग मैत्रीण) उभी असते.




प्रिया:- कोण आहे ग आई ?




आई:- ये रेवा , रेवा आलीय ग!




रेवा:- काय मॅडम, कस वाटतय आता ?




प्रिया:- ठणठणीत वाटतय 😁




रेवा :- छान! आज आपला रिझल्ट आहे ना म्हणूनच आलेय.




प्रिया :- हो. आधी आम्ही देवी वर जातोय. दुपार पर्यंत येऊ आणि असा ही दुपारी च लागेल ना रिझल्ट!




बाबा:- रेवा तू ही येत असली तर चल आमचा सोबत घरी कळवून दे.




प्रिया:- चल ना रेवू.




रेवा :- हो घरी विचारते.




काही वेळाने सर्व गाडीत बसतात. बाबा गाडी ड्राईव्ह करतात ध्रुव बाबाच्या शेजारी आणि आई प्रिया रेवा मागच्या सीट वर गप्पा मारत असतात. अर्ध्या तासात गाडी एका देऊळासमोर पोचते. सर्वे गाडीतून उतरतात.




देवी दर्शन करून सर्वे परत येतात. रस्त्यात एका ठिकाणी थांबून हॉटेल मधे जेवण करून परत घरी येतात. आता दुपार झाली असते. प्रिया चा फोन रिंग करतो. प्रियाच्या कॉलेज मित्राचा फोन असतो.




विकी:- 📞 हॅलो प्रिया.





प्रिया:- 📞बोल विकी काय फेल झाला का 😂 सांग काय लागला रिझल्ट.





विकी :- 📞ऐ बाई चांगल बोल ना जरा. अजून समजला नाहीय. बघतोच आहे आता.




प्रिया:- 📞बघ मग लवकर.





प्रिया आणि रेवा तिच्या रूम मधे लॅपटॉप ऑन करून रिझल्ट बघतात आणि दोघींचे डोळे मोठे होतात😳. प्रिया तर जोरात ओरडतेच. आवाज ऐकून सर्वे रूम मधे येतात.







( क्रमशः :- बघुया तर की रिझल्ट लागतो प्रियाचा.😁😁)