Tandav - 4 - last part in Marathi Fiction Stories by बाळकृष्ण सखाराम राणे books and stories PDF | तांडव - भाग 4 (अंतिम भाग )

Featured Books
Categories
Share

तांडव - भाग 4 (अंतिम भाग )

तांडव 4
मी पंढरीला फोन केला .तो रिकामा होता.मी त्याला घेवून धरणावर गेलो. एकमेकांना टेकलेल्या दोन त्रिकोणी टेकड्यांना समोरून बांध घालून धरण बनवले होते. आजूबाजूला ऊसाची लागवड केलेली दिसत होती.
परीसर छान दिसत होता.
" पंढरी ..इथे शांत वाटतय...पर्यटक येत असतील नाही?"
" येतात साहेब...पण ..कधीकधी.."
" इथे फार्महाऊसही आहेत. मेजर दळवींचही फार्महाऊस इथे आहे ना?"
" तूम्हाला कस माहित? " त्याने दचकून विचारले.
" मेजर म्हणत होते की ते नसतात तेव्हा तूम्हाला तिथ ठेवतात...सहा महिन्यांपूर्वी तूम्ही तिथे होता...त्यावेळी सात तरूण आलेले...बरोबर ना?"
पंढरी घाबरला.
" साहेब...हे मेजरना सांगू नका..मी त्यांना नाही म्हणत होतो पण त्यांनी मला दोन तासांचे एक हजार रूपये देऊ केले...म्हणून मी त्यांना आत घेतल. पण हे कुणाला सांगू नका."
" नेमके कोण होते ते? कुठून आले होते?"
" मला त्यांच्या बोलण्यातून एवढंच कळल की त्यांचीं फेसबुकवर मैत्री झाली होती. नेटवरून त्यांनी तळगावच्या धरण परिसराची माहिती घेतली होती.ते पहिल्यांदाच इथ
एकत्र आले होते."
" तूम्हाला त्यांनी काय विचारल व तुम्ही काय सांगितलं. "
"जास्त काही नाही. म्हणजे फार्महाऊस कुणाच्या मालकीची आहे?ते कुठं गेलेत? घर कुठे आहे ...तिथ कोण राहत? असे प्रश्न विचारले. मी त्यांना सांगितले की फार्महाऊस मेजरांच आहे..त्यांच घर घाटीच्या खाली असलेल पहिलं घर आहे."
"घरी कोण असत म्हणून सांगितलात.?"
" घरात गिता एकटीच असते .. ती अपंग आहे अस सांगितल"
पंढरीने बोलता-बोलता एक चूक केली होती. त्या तरूणांनी ठरवून गीताच्या घरात प्रवेश मिळवला होता.नराधम...वासनांध तरूणांना गीता देत असलेली शिक्षा बरोबरच होती.अश्या लांडग्यांना ठेचलच पाहिजे होते.पण यात पंढरीही दोषी होता.
" त्यातल्या कुणाची नाव कळली काय."
" एक ब्रजेश शर्मा ....तर दोधेजण एकाच गावातले होते...त्यातल्या एकाच नाव मुस्ताक व दुसर्याच्या नाव रूपेश होत ते दोधे सांगलीचे होते. इतरांची नाव कळली नाही. "
मी पंढरीला त्याच्या घरी सोडले.मी लाॅजवर आलो.नंतरचे दोन दिवस काहीच घडल नाही. पण मला राहून राहून वाटत होत की कुणी तरी माझ्यावर पाळत ठेवतोय.कदाचित ती सी.आय.डी.ची माणसं असावित.मी त्या दरम्यान तळगांव लगतच्या दोन ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या.
तिसर्या दिवशी रात्री मी निवांत झोपलो होतो. कुणीतरी गुदगुल्या करतंय ही जाणीव झाल्याने मला जाग आली.
मी डोळे चोळत उठलो. माझ्या पायांजवळ गीताची धुक्याची पडछाया बसली होती. मी अस्वस्थ झालो.
" हेमराजला मोकळा कर."त्या आकृतीने मला आज्ञा केली.
" झालं..तेवडं पुरे झाल....अजून -----"
" तूझा सल्ला नकोय....सगळे पापी होते.शिक्षा सगळ्यांना झाली पाहिजे. मी अर्धवट काम सोडलं...तर मला मुक्ती मिळणार नाही. मला मुक्त व्हायचय." ती आकृती आपले घूरकट पाय आपटत म्हणाली.
" आणि तू ऐकलं नाहीस तरी मी ...तुझ्याकडून हेमराजला बाहेर काढू शकते...समजल!" तो आवाज आता अधिक कठोर झाला होता.
" पण आज....."
" आज एक नाही दोन शिकार एकत्र आल्यात. मी नाही आणलं त्यांना इथे ते आपणच इथे आलेत.मनातल्या भितीने त्यांना ओढत आणलंय."
" म्हणजे...नेमकं काय झालय?"
" दोघेही एकाच गावातले आहेत.पण दोघांच्याही मनात भिती होती की ...आपण केलेल्या कृत्याला सुगावा कुणास लागला तर नाही? की सगळं शांत आहे ते बघण्यासाठी ते इथे आलेत."
" म्हणजे मुस्ताक व रूपेश ?"
" तूला कस कळल."
मी गप्प राहिलो.
"ते महत्वाचे नाही...दोधे आलेत पण इथे पोलीसांनी त्यांना पकडलं...त्यांच्या गाडीत गर्दची पावडर सापडली. उद्या त्यांना तालुक्यातील कोर्टात हजर करणार आहेत.माझ्याकडे फक्त आजची रात्र आहे. त्यांना तळगांवातच शिक्षा द्यायचीय."
" पण पोलीस कोठडीत ते असताना?"
" हेमराजसाठी काही अशक्य नाही. तो यक्ष आहे."
मी गुपचूप हेमराजला बाहेर काढल.
" तुला काय घडतय ते दिसेल...जस त्यादिवशी गाडी जळताना दिसली होती."
गीताच्या छायेने हेमराजच्या मूर्तीला स्पर्श केला तशी मूर्ती सजीव झाली. दोघंही काही क्षणात नाहीशी झाली.
एकाएकी माझे डोळे जड झाले. मी कसबस स्वतःला बेडवर झोकल.
तंळगांवच्या पोलीसस्टेशन मध्ये इन्स्पेक्टर वारंग आपल्या रूममध्ये बसून दिवसभराची डायरी लिहित बसले होते.रात्रीचे साडेबारा वाजलेले होते.बाजूच्या रूममध्ये तीन हवालदार व एक कॉन्स्टेबल पत्ते खेळत बसले होते. त्यात एक महिला पोलिस होती.सध्या घडत असलेल्या घटनांमुळे काही पोलीस गस्तीसाठी बाहेर गेले होते.सी.आय.डी चे दोन अधिकारीही तिथे असलेल्या छोट्या बंगल्यातून उतरले होते.वारंग उठले व कैद्यांच्या रूमकडे गेले.खेळत बसलेल्या हवालदारांना जागवत त्यांनी कैद्यांची रूम चेक
केली.मुस्ताक शेख व रूपेश पालकर गाढ झोपले होते. वारंगानी पुन्हा आपल्या खुर्चीत येवून बसले.त्यांना झोप येत होती.सध्या तणावाचे दिवस असल्याने सावध राहणे गरजेचे होत.हत्या प्रकरणांमुळे पोलीसांवर प्रचंड दबाव होता. पत्रकार व इतर मिडियावाल्यांनी आधिच रान उठवलं होत.ते कधी स्टींग ऑपरेशन करतील याचा नेम नव्हता. वारंग खुर्चीवर बसून सार्या घटनांचा विचार होते. आधिच या हत्या त्यात पुन्हा ड्रग्स सापडलेले हे दोन तरूण...त्यामुळे ताण वाढला होता. वारंगानी खुर्चीवर बसून डोळे मिटले.दोन चार मिनिट गेली न गेली तो बाहेर जोरजोराने कुणीतरी भांडत असल्यासारखा आवाज ऐकू आला.
" जादा हुषारी केलीस तर इथे जीत्ती गाढीन." एक पुरुषी आवाज आला.
" जसी काय तूझ्या बापाची पेंड हाय !" हा बाईचे आवाज होता.
वारंग बाहेर आले. पोलीस स्टेशनच्या व्हरांड्यात एक पुरुष व एक स्त्री जोरजोरात एकमेकांशी ढकला - ढकली करत भांडत होते. बहुतेक ते कामगार जोडप असाव.स्त्री च्या हातात धारदार कोयता होता तर पुरूषाच्या हातात लोखंडी शिग होती.
" चूप....आवाज बंद ..." वारंगांचा कडक आवाज ऐकून दोघंही गप्प झाले.
"काय ..झाल?"
" साहेब...हा माझा दादाला.. दारू ढोसून....रोज मला मारतो.मला ह्याच्या संगट नाय राहायच ...माझी तक्रार लिहून घ्या."
"ये .....भवाने.. .इथंच मुडदा पाडीन तूझा." पुरूष शिग नाचवत ओरडला.
. तो नशेत होता. हा गोंधळ ऐकून पत्ते खेळणारे पोलीस बाहेर आले.
" हवालदार माने....याला आत टाका आणि तृप्ती काळे हिला तूमच्या सोबत ...ठेवा.....याच्यांकडे सकाळी बघूया" चिडलेल्या वारंगानी ऑर्डर दिली.
मानेनी त्या पुरुषाला मुस्ताक व रूपेश असलेल्या रूममध्ये ढकलून दरवाजा बाहेरून बंद केला.
ते दोघे या दारूड्याला बघून वैतागले.मुळात दोघांची झोपमोड झाली होती.त्यात या माणसाबरोबर रात्र काढावी लागणार म्हणून ते आपल्या दैवाला दोष देत होते.
हा सगळा आरडाओरडा एकूण सी.आय.डी.चे अधिकारी तिथे आले.असे प्रसंग पोलीसस्टेशन मध्ये अधून मधून घडत असतात. वारंगाशी बोलून ते पुन्हां झोपायला गेले.
लेडीज पोलीस तृप्ती त्या स्त्रीला आपल्यासोबत घेऊन आतल्या रूममध्ये गेली. ती स्त्री तृप्तीच्या खांदयावर मान ठेवून ढसाढसा रडू लागली. तृप्तीने तिला काॅटवर बसवलं.बाकी सगळे बाहेर बसले होते.अचानक ती स्त्री हसायला लागली. तृप्ती अजब नजरेने तिच्याकडे पाहू लागली.आता ती स्त्री खदाखदा हसत होती.तिने आपला हात गोलाकार फिरवला. काळ क्षणभर स्थिरावल्यासारखा झाला. मंद घुक सगळीकडे पसरलं. ती स्त्री उठून उभी राहिली. तिचे डोळे लालसर झाले. एक मधुर गंध पोलीसचौकीत पसरला.ती स्त्री ऊठून उभी राहिली. तृप्ती कडे आली.तृप्ती घाबरली.त्या स्त्रीने तृप्तीला स्पर्श केला.तिने तृप्तीला बाकड्यावर बसवलं.भारवल्यासारखी तृप्ती समोर बघत बसून राहिली.ती स्त्री बाहेर आली.बाकड्यावर बसलेले तिन्ही हवालदार सपाट चेहर्याने बघत होते. इन्स्पेक्टर वारंग खुर्चीवर पुतळ्यासारखे बसले होते.त्यांच्या चेहर्यावर कोणताच भाव नव्हते. ती स्त्री हलकेच कोठडीच्या दरवाज्याकडे गेली.
कोठडीत अडकलेला तो पुरूष डोक्यात मान घालून गप्प बसला होता. मुस्ताक व रूपेश त्याच्याकडे रागाने बघत होते. एवड्यात कोठडीच्या लोखंडी बारमधून धुक्याचं एक लाट आत घुसली... बसल्या जागेवरंच् मुस्ताक व रूपेश फेकले गेले व भिंतीवर आदळले.दोघांचे डोळे भितीने विस्फारले. एक तरूणी तिथे उभी होती.ती आत कशी आली? हा विचार डोक्यात येताच ते भयाने थरारले.
" ओळखल ?" ती हसली. हाड गोठवणारा तो आवाज मेंदू थिजवून टाकत होता.
" सहा महिन्यांपूर्वी एका अपंग तरूणीच्या देहाची विटंबना केलेलात तीच मी."
समोर ती ...तीच उभी आहे .पण कस शक्य आहे हे? त्यांनी स्वतः तिचा देह जळताना बघितला होता.
" वाचवा....वाचवा..." दोघांनी एकाचवेळी ओरड ठोकली.
" कितीही...ओरडलात... तरी कोणीच इथे येणार नाही. आणि हो... तुमचे सगळे साथीदार यापूर्वीच हे जग सोडून गेलेयत. फक्त तुम्ही दोघं राहिलात."
दोघेही वाचा गेल्यासारखं हात जोडून जमिनीवर पडून रडत राहिले.
" हेमराज ...आपली अखेरची शिकार....तडफडून...तडफडून...मेले पाहिजेत दोध...उठा...उठा...अशीच दयेची भिक मागत रहा..."
त्या तरूणींने दोघांना केसांना धरून लिलया वर उचलल ....व पुन्हा खाली सोडून दिल.
मघापासून मान खाली घालून बसलेला तो कामगार उभा राहिला. दोघांनी पडल्या- पडल्या समोर बघितल आणि ते पुन्हां किंचाळू लागले.पण संपूर्ण परीसरात स्मशानवत शांतता होती.गोठलेल्या काळात सारेच अडकले होते. समोर एक भव्य दिव्य पुरूष होता. त्याच्या खांद्यावर एक भला मोठा ससाणा होता.आपल्या सावजावर झेप घेण्यासाठी तो पंख फडकवत सज्ज झाला होता. त्याच्या डोळ्यातून अग्नी बाहेर पडत होता.त्या स्त्रीने हात हलवला तसे वातावरणात हार्मोनियम सूर घुमू लागले.अत्यंत जलद...व उच्च वारंवारतेचे ते सूर..जणू काही शंकराच तांडव नृत्य चाललंय की काय असा भास निर्माण करत होते.बाहिर्या ससाण्याने झेप घेतली....अन मग किंकाळ्या ची मालिकाच सुरू झाली.हेमराजचा पंचशूल व ससाण्याची भाल्यासारखी चोच व करवतीसारख्या नखांनी दोघांचे चेहरे विदीर्ण करून टाकले. स्त्रीचे भेसूर हसू....हार्मोनियमचा बेधुंद आवाज...ससाण्याचा चित्कार...व हेमराजची गर्जना ...यात बघता- बघता दोघ कधीच गतप्राण झाले होते.

मला जाग आली तेव्हा ती यक्षमूर्ती माझ्या उश्याजवळ होती. मी जे रात्री संमोहित अवस्थेत बघितले होते.त्यावरून माझी खात्री झाली होती की गीताचा आत्मा मुक्त झाला होता.हेमराजही त्या मूर्तीतून बाहेर पडून हिमालयातील आपल्या मूळ जागी गेला होता.आता ती मूर्ती साधी मूर्ती होती.कुणा तांत्रिकाने कधी काळी त्या मूर्तीत हेमराजची प्राणप्रतिष्ठा केली होती.सूडाच तांडवनृत्य संपलं होत.
मी ती मूर्ती घेतली व सरळ पोलीस स्टेशन गाठल.तिथे प्रचंड गोंधळ माजला होता.दोन्ही कैद्यांची हत्या झाली होती व बाजूला सातविणाची बिन पानांची काडी होती..कोठडी बाहेरून बंद होती. सगळ्यांना फक्त एवढंच आठवत होत की एक जोडपं भांडण करत आल होत.त्यातल्या पुरुषाला कोठडीत बंद केल होत.पण ती दो घ कुठं गेली तेच कळत नव्हते. तृप्ती मानेंनी त्या दोघांचं भांडतानाच शूटिंग केल होत पण आता तिथ फक्त धुक
दिसत होत.सारेच कपाळाला हात लावून बसले होते. जे घडल होत त्यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. मी इन्स्पेक्टर वारंग व सी.आय.डी. च्या अधिकार्यांना
बाजूला घेतलं.त्यांच्या समोर यक्षमूर्ती व वसुदेव पेला ठेवला व सारा घटनाक्रम सांगितला.
" साहेब यावर कुणाचा विश्वास बसूच शकत नाही..पण गीताने स्वतःच त्यांना शिक्षा दिली. हत्यांच सत्र निश्चितपणे संपलय. पण ही केस कशी बंद करायची ते तुम्ही ठरवा."
मी जे सांगितले ते त्यांना पचवणे अवघड होते पण घटनाक्रम लक्षात घेता व रात्रीचा प्रकार त्यांनी स्वतः अनुभवला होता त्यामुळे त्यांना ते पटलं.
मी तिथून पुन्हा लॉजवर जात असताना कुणी तरी मला सांगितले की नव्या बांधकामाच्या ठिकाणी सातविणाच झाड तोडताना ते पंढरी रंगसूरच्या पायावर पडल व त्याचा एक पाय कायमचा जायबंदी झाला होता.मी चमकलो.निश्चित हे काम गीता किंवा हेमराजच नसावं...कारण त्याना पंढरीची चूक कळलीच नव्हती. मग..पंढरीला शिक्षा कुणी दिली होती ?
आज माझ्या संग्रहालयात या दोन्ही वस्तू आहेत.
-------*----------*---------------*-------------*----------
समाप्त