मानवता वचन क्रः 1 - लक्षात ठेवा, मानवांच्या महत्त्वकांक्षा त्यांना वाईट गोष्टी करण्यास परावृत्त करीत असतात.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 2 - लक्षात ठेवा, मानवातील मानवता गेल्यास तो देखील एक प्राणीच बनतो.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 3 - लक्षात ठेवा, मानवतेच्या चावी शिवाय लोककल्याणाच्या मार्गातील निस्वार्थीपणाचे कुलूप उघडणार नाही.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 4 - लक्षात ठेवा, जगातील सर्व अडचणींना एकमात्र उपाय मानवता आहे.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 5 - लक्षात ठेवा, एका समाजाने दुसÚया समाजाला तुच्छ लेखणे ही मानवतेसाठी अत्यंत खेदाची बाब आहे.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 6 - लक्षात ठेवा, जर जनावरांना बोलता येत असते तर त्यांना तुम्ही मारते वेळेस त्याने तुम्हाला मायेची हाक मारली असती.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 7 - लक्षात ठेवा, जनावरे माणसे होत चालली तर माणसे जनावरे होत चाललीत.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 8 - लक्षात ठेवा, आज या जगाला कोणत्या प्राण्यापासून धोका नाही तर मानवा पासून आहे.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 9 - लक्षात ठेवा, जगाचा अंत मानवाच्या कृतीनेच होईल व त्यास मानवच जबाबदार असतील हे निश्चित आहे.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 10 - लक्षात ठेवा, काम, क्रोध, लोभ यावर मानवाने नियत्रंण आणणे मानवकल्याणासाठी अत्यंत आवश्यक आहे.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 11 - लक्षात ठेवा, मानवाने आपल्या अस्तित्वासाठी तर्क वितर्क करायला शिकले पाहिजे.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 12 - लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही इतरांशी खोटे बोलत असता; त्यावेळेस तुम्ही स्वतःचे आचरण बिघडवत असता.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 13 - लक्षात ठेवा, मानवासाठी प्रामाणिकपणा सारखे वस्त्र दुसरे कोणतेच नाही.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 14 - लक्षात ठेवा, एक समाज दुसÚया समाजाचा फायदा घेण्यासाठी त्याला अंधकारात ठेवतो.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 15 - लक्षात ठेवा, आज प्रगतीच्या दगडी पायÚया नसून, मानवी देहाच्या आहेत ही अत्यंत लज्जास्पद बाब मानवतेसाठी आहे.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 16 - लक्षात ठेवा, आयुष्य फार छोटे आहे; ते फक्त संस्कार, शिक्षण आणि चांगल्या विचारानेच जगता येते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 17 - लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये एक पदवी असणे गरजेची असते; जर ती मानवतेची असेल तर उत्तमच.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 18 - लक्षात ठेवा, व्यक्तीत नम्रता असणे अति गरजेचे असते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 19 - लक्षात ठेवा, मानवाला आयुष्यामध्ये सक्षम फक्त चांगले विचारच बनवू शकतात.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 20 - लक्षात ठेवा, घेताना हसणे व देताना रडणे हा मानवाचा एक गुणच आहे.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 21 - लक्षात ठेवा, माणसासाठी पैसा नव्हे तर पैसे साठी माणसे तयार होत आहेत.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 22 - लक्षात ठेवा, विद्याथ्र्यांना शालेय जीवनामध्ये मानवता हा विषय असायलाच हवा.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 23 - लक्षात ठेवा, कट्टरता ही नेहमीच मानवता विरोधी असते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 24 - लक्षात ठेवा, विनम्रता हा मानवजातीचा विषेश श्रगांर आहे.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 25 - लक्षात ठेवा, आई वडिलांचा कल त्यांच्या मुलांकडे विनम्रतावान होण्याकडे पाहिजे कारण; मानवतेचे कल्याण हे विनम्र होण्यामध्ये आहे.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 26 - लक्षात ठेवा, निसर्ग तुमच्या अस्तित्वाचे कारण आहे ही कल्पना मानवतेला द्या.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 27 - लक्षात ठेवा, जागतिक मंचावर मानवता हाच विषय असला पाहिजे.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 28 - लक्षात ठेवा, मानव हा देखील एक सामाजिक प्राणी आहे; फरक तो एवढाच की त्याला बौध्दिक संपदा लाभलेली आहे.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 29 - लक्षात ठेवा, युध्दामध्ये मानवतेची पराजय निश्चितच असते; कारण तिला श्स्त्र उचलण्याची परवानगी नसते परंतू याला काही अपवाद आहेत.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 30 - लक्षात ठेवा, मानवतेची एकमेव शस्त्रे प्रेम, करूणा व दयाभाव आहेत.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 31 - लक्षात ठेवा, वर्चस्ववादीपणा मानवतेला नेहमीच हानीकारक ठरतो.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 32 - लक्षात ठेवा, एका लहान प्राण्याच्याही मृत्यूने ज्याला दुःख होईल त्याला मानव म्हणता येईल.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 33 - लक्षात ठेवा, शक्तीमुळे कोणताही अधिकार निर्माण होत नाही; म्हणून मानवी समाजातील अधिकाराला जर कोणता अधिकार असेल तर तो सामाजिक संमतीचा आहे.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 34 - लक्षात ठेवा, गुलामगिरी व हक्क हे परस्परविरोधी आहेत आणि ते एका ठिकाणी नांदू शकत नाहीत.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 35 - लक्षात ठेवा, सर्वसाधारण ईच्छा नेहमीच बरोबर असते आणि मानवकल्याण साधण्याकडेच त्याचा कल असतो.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 36 - लक्षात ठेवा, आधूनिकतेच्या प्रहरातून ज्ञान, विज्ञान आणि संस्काराच्या प्रगतीतून मानवी समाजाची नवी निर्मिती करणे.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 37 - लक्षात ठेवा, मानवता क्रांतीपेक्षा उक्रांतीमध्ये विश्वास करत असते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 38 - लक्षात ठेवा, मानवांची उन्नती जेवढी समाजवादातून होते; त्यापेक्षाही अधिक मानवतावादातून होत असते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 39 - लक्षात ठेवा, मला जर मानवतावाद आणि समाजवाद यामधून कोणतेही एक निवडायचे असेल तर मी निश्चितच मानवतावाद निवडेल.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 40 - लक्षात ठेवा, कोणत्याही ग्रंथामध्ये वेळेनुसार बदल न केल्यास मानवतेच्या उध्दारासाठी ते फक्त अडथळा निर्माण करेल.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 41 - लक्षात ठेवा, मानवता फक्त स्त्री आणि पुरूश यांनाच मान्यता देऊ शकते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 42 - लक्षात ठेवा, दुसÚयांच्या आनंदात सहभागी होण्यापेक्षा त्याच्या दुःखात सहभागी व्हा; ते मानवतेसाठी बरे आहे.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 43 - लक्षात ठेवा, मानवतेच्या कल्याणासाठी येणारे शिक्षणच फक्त महत्वाचे आहे.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 44 - लक्षात ठेवा, जगातील प्रत्येक व्यक्तीशी नाते जोडणे शिका म्हणजे संघर्षाची वेळ येणार नाही.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 45 - लक्षात ठेवा, माणसांचे जीवन निसर्ग एका प्रक्रियेतून वहन करीत असते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्र. 46 - लक्षात ठेवा, स्वातंत्र्य व समतेची आवड, अन्यायाची चीड, दीन-दुबळयांचा उध्दार ही मानवतेकडे जाण्याची लक्षणे आहेत.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 47 - लक्षात ठेवा, मानवतेला घातक अमानवता आहे.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 48 - लक्षात ठेवा, करूणता मानवतेला जन्म देते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 49 - लक्षात ठेवा, मानवतेची रेलगाडी सार्वजनिक सहमतीच्या रूळावरून धावत असते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 50 - लक्षात ठेवा, विषमता मानवानेच अस्तित्वात आणली व तेच त्याला संपुष्टात आणू शकतात.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 51 - लक्षात ठेवा, मानवतेचे तारकच मानवतेचे मारक बनत चालले आहेत.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 52 - लक्षात ठेवा, मानवता ही नेहमी उदार असते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 53 - लक्षात ठेवा, मानवात भेद करणारी विचारप्रणाली ही अमानवीय विचारधारेची असते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 54 - लक्षात ठेवा, मानवता विश्वातील सृजनतेमधील सर्वात संुदर सृजन आहे.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे
मानवता वचन क्रः 55 - लक्षात ठेवा, मानवता या जगाला मानसिक आणि भावनिक सौदर्य प्रदान करते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे