भाग २
दुसऱ्या दिवशी रात्रीच्या जेवणा च्या वेळी सगळे एकत्र बसून जेवण करत होते.
" काय रे काही गोड बातमी आहे का ? म्हणजे मी तुमच्या रूम मध्ये लहान मुलांचा बॉल पाहिला " आई ने जेवता जेवता सुजल कडे पाहत खुश होत विचारल.
" आई बॉल दिसला म्हणून काय लगेच सुता वरून स्वर्ग गाठू नकोस..तस्स काही नाही..एक गरीब मुलगा विकत होता रस्त्यात बॉल म्हणून घेऊन आलो " सुजल ही वैतागत बोलला.
" मग थोड नीट सांग ना एवढं वैतागायला काय झालं ? " आई ही थोड घुश्यात बोलली.
सुजल मात्र त्यावर काहीच न बोलता चूप चाप समोरच्या ताटा तील पदार्थ खाऊ लागला.
" हम्म आमच्या नशिबी कुठे नातवाच तोंड पाहणं? सगळ स्वत: च्या मर्जीने केलं की अशी फळ भोगायला येतात..त्या साठी आई बापाचं थोड ऐकायचं असत..आमचं ऐकल असत तर आता पर्यंत दोन मुलांचा बाप झाला असतास.." सुजल ची आई जेवता जेवता च तोंड वाकडं करून पुन्हा बडबडू लागली.
त्याचं बोलणं ऐकून श्रेया चे डोळे पाणावले ती तशीच जेवण मध्येच सोडून पळत रूम मध्ये निघून गेली.
" श्रेया...श्रेया.....सुजल ने मागून तिला आवाज दिला पणं श्रेया ने त्याचं काहीच ऐकून घेतल नाही.
" आई काही गरज होती का जेवताना तो विषय काढायची ? " सुजल वैतागत बोलला.
" हो..तू आता बायको ची च बाजू घेणार ? बरोबरच बोलतात लोक लग्न झालं की मुलगा आपला राहत नाही..सगळ बायकोच्या इशाऱ्यावर चालत " सुजल ची आई तोंड वाकडं करत बोलल्या.
" आई काही ही काय बोलते? जाऊ दे..काही बोलून फायदा च नाही " सुजय ही तसचं हात धुवून पटकन श्रेया मागे त्यांच्या रूम मध्ये आला.
श्रेया तो सुजल ने आणलेला बॉल ला कवटाळून बेड वर बसून रडत होती.
" श्रेया प्लीज,तुला माहित आहे ना आई चा स्वभाव ? मग तू कशाला त्रास करून घेते ? अग आपण काय म्हातारे झालो आहोत का ? आणि डॉक्टर बोलले आहेत ना सर्व नॉर्मल आहे...? होईल ना बाळ.. थोडा वेट करू.." सुजल तिला जवळ घेत समजावत बोलला तस्स ती ही सुजलच्या कुशीत शिरून रडत रडतच बोलली," सुजल माझी काय चूक आहे ? आता मी काय करू ? मला ही वाटतं ना आपल बाळ असावं पणं ते आता आपल्या हातात आहे का ?"
" हमम आय नो तू टेन्शन नको घेऊ..सर्व ठीक होईल " सुजल तिच्या केसातुन हात फिरवत तिचे गालावर ओघळलेले अश्रू आपल्या हातानी पुसत तिला धीर देत बोलला.
आता तर हे श्रेया साठी कायमच च होत.रडून ती आपल मन मोकळं करून घ्यायची.सुजल ची सोबत आहे यामुळे तिला थोडा तरी धीर येत होता.
त्यानंतर दोन तीन दिवसांनी श्रेया ला पहाटे पहाटे च उल
ट्याचा त्रास होऊ लागला.
" श्रेया काय झालं ? किती वेळा सांगितलं वेळेवर जेवत जा...पित्ताचा त्रास आहे तुला..स्वतः ची काळजी घेत जा..मी काय काय म्हणून बघत बसू? एक तर ऑफिस च्या कामच टेन्शन वरून रोज तुझं आणि आईच भांडण..चल इथे बस..." सुजल श्रेया ला हाताला धरून आणत बेड वर बसवत बोलला.
" सुजल हे पित्ता मुळे नाही होत " श्रेया नजर चोरत बोलली.
" मग कशाने होत आहे ? " सुजल ने न समजून विचारलं.
" ते माझ्या डेट्स ही अजून आल्या नाहीत.." श्रेया काहीशी लाजत बोलली.
" म्हणजे तुला अस म्हणायचं आहे की..या उलट्या..प्रे..
सुजल ने डोळे मोठे करत अर्धवट च श्रेया ला विचारल.
तस्स श्रेया ने खाली मान घालून हा मध्ये मान डोलावली.
" ओ माय गॉड श्रेया अस असेल तर...खूप खूप आनंदाची बातमी असेल...पणं आताच काही निष्कर्ष काढायला नको आपण एकदा डॉक्टर ला दाखवून कन्फर्म करू मग घरी सांगू " सुजल पुन्हा गंभीर होत बोलला.
श्रेया ला ही त्याचं बोलणं पटल तिने ही हा मध्ये मान डोलावली.त्या दिवशी सुजल ने ऑफिस ला सुट्टी घेतली व दुपारी श्रेया ला घेऊन त्यांच्या फॅमिली डॉक्टर कडे हॉस्पिटल ला गेला.
डॉक्टर ने जेव्हा श्रेया ला चेक अप साठी आत नेल तेव्हा मात्र श्रेया पेक्षा जास्त टेन्शन बाहेर बसलेल्या सुजल ला आलं होत.देव करो आणि आमची शंका खरी ठरो हीच प्रार्थना तो मनो मन करत होता.
थोड्या वेळात च श्रेया च चेक अप झालं तस्स सुजल ही डॉक्टरच्या केबिन मध्ये गेला. दोघे ही खुप आशेने डॉक्टर कडे पाहत होते.ते काय सांगतील याची आतुरतेने वाट पाहत होते.
" अरे असे इतके गंभीर चेहरे का केले आहेत तुम्ही दोघांनी ते ही इतकी आनंदाची बातमी असताना ?" डॉक्टर मोठ्याने हसत बोलले.
तस्से श्रेया व सुजल थोड गोंधळून त्यांच्या कडे पाहू लागले.
" म्ह...ण...जे डॉक्टर अंकल खरचं श्रेया प्रेग्नेंट आहे ? " सुजल ने अडखळत विचारलं.
" हो..तुम्ही आई बाबा होणार आहात..अभिनंदन सुजल.." डॉक्टर हसत सुजल चा हात आपल्या हातात घेऊन त्याच्या हातावर थोपटत बोलले.
" थँक्यू सो मच डॉक्टर अंकल...थँक्यु.." सुजल भारावून बोलला.
श्रेया चे तर डोळे च वाहू लागले होते. सुजल ने डॉक्टर सोबत बोलून झाल्या नंतर केबिन बाहेर पडताच श्रेया ला घट्ट मिठी मारली.दोघांनी हॉस्पिटल मधून बाहेर पडताच जवळच्या मंदिरात जाऊन देव दर्शन केलं. सुजल ने चांगले किलो भर पेढे खरेदी केले...आणि मग दोघे ही घरी आले.
आई आणि बाबा दोघे ही घरात दिसत नव्हते.संध्याकाळ ची वेळ होती म्हणजे फेर फटका मारायला बाहेर गेले असतील हे श्रेया व सुजल समजून गेले.
रूम मध्ये येताच श्रेया च लक्ष सुजल ने आणलेल्या त्या बॉल वर गेलं.तिने तो उचलून आपल्या छाती शी कवटाळला.दोन दिवसा पूर्वी ही तिने तो बॉल रडत च स्वतः शी कवटाळला होता आणि आज ही पुन्हा तिच्या डोळ्यात अश्रू होते पणं आजचे अश्रू हे आनंदाचे अश्रू होते..त्या बॉल सोबत खेळणार लवकरच त्यांच्या घरी कोणी तरी येणार होत.
क्रमशः