Adidhana - 6 - last part in Marathi Love Stories by Akshata alias shubhadaTirodkar books and stories PDF | अदिघना - 6 - अंतिम भाग

Featured Books
Categories
Share

अदिघना - 6 - अंतिम भाग

सहावा भाग - आदीघनाचा सुखकर गृहप्रवेश

आदित्यचे बोलणे आजी आजोबानी सगळयांच्या कानावर घातले सगळे हे ऐकून जरा आश्यर्य चकित झाले आदित्यच्या आई बाबानी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण काही फायदा झाला नाही सगळयांनी तो विषय संपवला पण नाराजीचा सूर मात्र होता त्यातच लग्नाची तयारी सुरु झाली लग्नाच्या चार दिवस पहिली साखरपुडा होता मेघना च्या घरी साखरपुड्याची जय्यत तयारी केली होती मोरपंखी पुडा मेघना तर्फ तर देवमासा च्या रूपातला पुडा आदित्य तर्फ आणला केला संगीताच्या मस्त धुंदीत एकमेकांच्या बोटात अंगठी घालून मस्त मजेत हा कार्यक्रम पार पडला

हळदीचा दिवस उजाडला आदित्य आणि मेघना प्रेमाच्या हळदीत न्हाहून केले होते‌ नातेवाईक संगे सोयरे नि दोघाचे हि घर गजबजून गेले होते त्याच संध्यकाळी आदित्यच्या मोबाईल वर एक मेसेज झळकला त्यांनी पहिले तर तो मेघना चा होता तो मेसेज वाचून जरा त्याला विचित्र वाटले पण मेघना च्या परत आलेल्या मेसेज ने त्याचा चहेरां खुलला

लग्नाचा दिवस उजाडला शेरवानीत आदित्य खुलून दिसत होता तर साडी मध्ये मेघनाचे रूप अधिक उजळले होते आमंत्रिकांनी लग्नाचा हॉल भरून गेला होता मंगलाष्टके सुरु झाली आणि क्षणात आदित्यच्या नावाचे मंगळसूत्र मेघनाच्या गळ्यात पडले देव कार्य पार पडून मेघनाची पाठवणी सासरी झाली आई बाबा भावुक झाले मेघना त्याची एकुलती एक होती आदित्यच्या घरच्या दरवाजावर पोहचताच सगळ्यांनी उखाणा घेण्यासाठी मेघना ला सांगितले तशी मेघना ने सुरुवात केली

"एका नजरेत आम्ही एकमेकाचे कधी झालो ते आम्हला कळलेच नाही

आदित्य चे नाव घेताना वाटतो मला अभिमान भारी

हे ऐकून सगळ्यांनी टाळया वाजवल्या आदित्य ने मेघना कडे पहिले मेघना ने त्याला खुणेने काही सूचित केले

सगळे आता आदित्यच्या मागे लागले" उखाणा तयार आहे ना आदित्य उखाणा नाहीतर प्रवेश नाही आदित्य ने हसत हसत म्हण्टले हो आहे आदित्यने एक नजर मेघना कडे टाकली आणि सुरवात केली

"आदित्य ची भेट झाली मेघना शी

जुळले एक अतूट नाते मनाशी "

"आदित्यचा आदी "

"आणि मेघनातला घना जोडून "

"स्वागत करतो आदीघना ला माझ्या घरी "

हे ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले कारण नाव वेगळे होते आदित्य ने सगळयांना पाहत हसला मेघना ने गृहप्रवेश केला देव कार्य आटपून सगळे बसले सगळयांच्या चेहऱ्यावर नाव जाणून घेण्याची उत्सुकता होती आदित्य ला कोणी विचारण्यात आताच आदित्यने सुरवात केली

"कसे नाव वाटले अदिघना "?

"अरे पण तू नाव बदलणार नव्हतास ना मग "

हे ऐकून मेघना म्हणाली "नाही मलाच नांव बदलायचं नव्हतं पण त्या साठी त्यांनी एक वेगळं पाऊल उचल तुम्ही घरातले सगळेच त्याचावर नाराज झालात हे जेव्हा मला कळले तेव्हा मला खूप वाईट वाटले माझ्यामुळे तुमच्यात दुरावा आलेला मला चालणार नव्हता आणि आदित्य सारखा जोडीदार मिळाला हेच माझ्या साठी मोठे आहे म्हणून मी आदित्यला हळदी दिवशी माझ्या नावाचा मेसेज केला मला माझ्या नव्या नात्याची सुरवात कडवट रित्या सुरु नाही करायची आजी आजोबा जो काही तो बोला तो फक्त माझ्यासाठी बोला आता सगळं विसरून जा आणि ह्या अदिघनाला आशीर्वाद द्या

हे ऐकून सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या मेघनाचं तोंडभरून कौतुक हि केलं

आदित्य ने मेघना कडे पहिले आणि "थँक्स माझ्यासाठी तुझी अपेक्षा बाजूला ठेवलीस "

"आदित्य हि माझीच अपॆक्षा नाही तर हर एक लग्न होणाऱ्या मुलीची असते पण जो पर्यत आपली नाव बदलण्याची मानसीकता बदल नाही तो पर्यंत मुली जन्म एका नावाने घेतील आणि आयुष्याची बाकीची वर्ष दुसऱ्या नावाने जगतील आणि नेहमी दोन नावाची कसरत करत राहतील "

आदित्य ने मेघना च्या डोक्यावर हात ठेवलाआणि म्हणाला "तू बाकीच्या साठी आदिघना अशील पण माझ्यासाठी मेघनाच राहशील "

आदित्यला भावुक होताना पाहत मेघना म्हणाली वेड्या तसं हि हे नाव मला आवडलं आहे "सो लेट्स स्टार्ट आदित्य न्यू जर्नी ऑफ आदिघना "

 

********समाप्त*****