Adidhana - 5 in Marathi Love Stories by Akshata alias shubhadaTirodkar books and stories PDF | अदिघना - 5

Featured Books
Categories
Share

अदिघना - 5

पाचवा भाग - आदित्यचा निर्णय

संध्यकाळी कामावरून आल्यावर ठरवल्याप्रमाणे आदित्य आजी आजोबाच्या रूम मध्ये केला आजी खुर्चीवर बसून नामजप करत होती तर आजोबा पुस्तक वाचत होते आदित्यला पाहातच

"अरे आदित्य ये बस "

"आजोबा थोडं बोलायचं होत "

"बोला आदित्य "

आवाज ऐकून आजी ने हि डोळे उघडले

"आजोबा आणि आजी मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे "

"बोल ना "

"आजी आजोबा मी स्पष्ट बोलतो मला लग्नानंतर मेघनाचे नाव नाही बदलायचे "

"काय अरे पण लग्नानंतर सगळ्याची नावे बदलात त्यात काय नवीन नाही तुझ्या आजी पासून तुझ्या वाहिनी पर्यंत सगळ्याची नावे बदली त्यात काय मोठेसे "

"माहित आहे मला कि नावे बदली पण मला नाही बदलायचं "

"अरे हे कुठलं नवीन खूळ डोक्यात घेऊन बसला आहे मेघना काही म्हणाली का "?

"नाही ती काही म्हणाली नाही पण मलाच नाही बदलायचं "

"अरे ती काही म्हणत नाही तर तू कशाला त्रास करतोस "

"आजोबा लग्न होऊन मुली नवीन घरी जाते नवीन घर नवीन माणसे त्यात एका नावाने लहानपाणापासून जगते ते नाव तिला जवळचे असते आणि एका क्षणी नवीन नाव लादणे मनाला पटत नाही "

"अरे पण आपण जगावेगळं काहीही नाही करत आहोत अरे लग्नानंतर नाव बदलणे हे स्वाभाविक आहे आणि आपल्या घराण्यात तर सगळ्यांचीच नावे बदली "

"बदली असतील पण एक नवरा म्हणून मला नाही बदलायचे "

"हे अति होते असे नाही वाटत अजून ती मुलगी घरात आली नाही तर एवढे मग ती म्हणेल मला एकत्र कुटुंब आवडत नाही मग काय वेगळा होणार ?

"आजोबा वाईट वाटून घेऊ नका पण ती तशी नाही आहे तिला एकत्र कुटुंब आवडत फक्त मला तिचे नाव नाही बदलायचे "

"म्हणजे तू हट्टास पेटलास तर ""

"हे बघ आदी अरे मुलीचे लग्न झाले कि नाव बदलत पहिली थोडं अवघड जाते पण मग मात्र सवय होते रे "

"पण आजी मला माझ्या नात्याची सुरुवात अवघड रित्या नाही करायची "

"सुशीला जाऊ दे आता मोठा झाला तो तुला वाटत तेच कर ये तू आता"

आजी आजोबा चे मन राखून कि दुखवून आदित्य कोणता निर्णय घेईल ?

***************