Adidhana - 4 in Marathi Love Stories by Akshata alias shubhadaTirodkar books and stories PDF | अदिघना - 4

Featured Books
  • ખજાનો - 41

    ( આપણે જોયું કે તે મૂર્છિત માણસ બીજું કોઈ નહીં પરંતુ સોમાલિય...

  • ભીતરમન - 40

    તુલસી મારો પ્રેમ પામીને તરત બોલી, મારી સાચી વાતને પણ તમે તરત...

  • ફરે તે ફરફરે - 22

    ફરે તે ફરફરે - ૨૨   જે ધુન ઉપર મારા પગમા જોમ આવી ગયુ હત...

  • નાયિકાદેવી - ભાગ 29

    ૨૯ વિધિની રમત ગંગ ડાભી અને સારંગદેવ સોઢાની ઓળખાણ સોમનાથની જા...

  • નિતુ - પ્રકરણ 34

    નિતુ : ૩૪ (લગ્ન)નિતુ કેબિનમાં પહોંચી તો વિદ્યા પોતાના કમ્પ્ય...

Categories
Share

अदिघना - 4

चौथा भाग - नावात काय आहे ?

आदित्य आणि मेघना च्या घरी लग्नाची तयारी जोरात चालू होती अश्याच एका रात्री आदित्य चे कुटुंबीय सगळे जण जेवण्यासाठी बसले होते आदित्य काही काम होते म्हणून जरा उशिरा पोहचला गप्पा रंगात आल्या होत्या तेव्हड्यात आदित्य च्या आजोबानी आदित्यला पाहतच सगळयांना शांत केले

"अरे शांत राहा तुम्हीच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहात त्या नवर देवाला पण काही विचारा "?

"काय आजोबा "?

आदित्य च्या काकांनी सुरवात केली "काही नाही रे अरे आम्ही मेघनाचे नाव काय ठेव्याचे ह्याची चर्चा करत होतो सगळ्यांनी एक एक नाव सुचवलं आहे ते सोड तू काय ठरवलं "

"मी काही नाही "

"अरे असं कसं काही तरी ठरवलं अशील ना "?

तेव्हड्यात आदित्यच्या चुलत बहिणीने म्हणजे अनघा ते म्हटले "आदी दादा कोणाचं ऐकूच नको अदिती ठेव मस्त आहे आदित्य ची अदिती "

"ये चला गप्पा गोष्टी मग पहिली जेवण करा "आजोबानी आवाज चढवला तसे सगळे जेवण करू लागले पण आदित्य चे जेवणात लक्ष नव्हते हे त्याच्या नंदन भाऊ ने ओळखले

जेवण झाल्यानंतर आदित्य आपल्याल्या ऑफिस चे काम आहे म्हणून आपल्या रूम मध्ये गेला त्याच्या मागोमाग नंदन हि गेला

"काय रे काय झालं "?

"कुठे काय "?

"आदी खरं सांग जेवताना तुझे लक्ष नव्हते मेघना शी काही "

"नाही भाऊ "

"मग गप्प का"?

"भाऊ काय सांगू" आदित्य ने सगळी गोष्ट नंदनच्या कानावर घातली तसा नंदनचा चेहरा बदला

"अशक्य आहे आदि अशक्य आहे"

"भाऊ मला काही तरी मदत कर ना"

"काय करू तुझ सांग आपल्या घरातले रीती रीवाज तुला माहित आहे अजुनही आजी आजोबांच्या निर्णयाला कोणीच विरोध केला नाही माझ्या आई पासुन तुझ्या आई पर्यंत ते सोड अरे माझ्या नेहाची सुध्दा नंदीनी झाली हे विसरू नकोस आमचे अक्षर एक असताना सुद्धा नावात बदल झाला तर तुमची अक्षरे तर मिळतीजुळती ही नाही अवघड आहे ह्यावर एकच उपाय तु मेघनाला खरं सांगू टाक"

"काय भाऊ पण असे केल्याने तिचा मी विश्वास घात केल्यासारखे होईल"

"मग काय घरातले रिती रिवाज बदलणार आहेस"

"मी मेघना चा विश्वास घात नाही करू शकत जो विश्वास तिच्या डोळ्यात माझ्याबद्दल दिसतो तो मी नाही जे होईल ते होईल मी लग्नात उखाणा घेताना मेघनाच नाव घेईन "

"वेडा झालायस कशाला उगीच आनंदीत वातावरणाला गालबोट लावायचा प्रयत्न करतो तुझ्या ह्या निर्णयाने हजार प्रश्न उभे राहतील उगीच चार लोकांसमोर शोभा नको आणी नावात काय आहे एवढं काही घेऊन बसण्याची गोष्ट नाही आहे मेघनाला समजावं नाही तर मी समजवतो"

"नाही मी आजी आजोबा शी उद्याच बोलणार जो होगा देखा जायेगा आणि हो नावात काय आहे हे आम्हला म्हणायला सोपे आहे"

नंदन मात्र हे ऐकून विचारात पडला कि "आता काय होणार "?

*********************