दुसरा भाग - माझा विश्वास
आदित्यचे घरचे गेले तसे मेघना हि आपल्या खोलीत गेली ती मनापासून खूप खुश होती कारण तिच्या मनासारखा जोडीदार तिला मिळाला होता मी
मेघनाचे आई बाबा आदित्यच्या घरातल्याचा निरोप घेऊन आता आले "चला एकदाचे पार पडले आपली मेघु खूप नशीबवान आहे तिला चांगले घर मिळाले "
"होय हो माणसे खूप चांगली आहे आणि आदित्य हि "
'आपली मुलगी तिथे सुखात राहील ह्या पेक्षा आणखी सुख आईबाबाला काय असू शकत "
"हो ना बरोबर बोललात पण कुठे गेली ती पाहते जरा तिला "
मेघनाची आई खोलीत आली तर मेघना विचारात मग्न असलेली दिसली
"मेघु "
"आ आई तू कधी आलीस "?
"काय कुठल्या विचारात "
"काही नाही असच "
"बरं स्थळ आवडलं ना तशी ती माणसे चांगली आहेतत"
"हो आई आवडले आणि खरं म्हणजे मला आदित्यचा स्वभाव आवडला जो टिपिकल नवरा असतो तसा नाही आहे तो खूप वेगळा आहे" "
"एकाच भेटीत एव्हडं कौतुक पण चांगलं आहे तू सुखी तर आम्ही सुखी "
"नाही आई मी उगाच कौतुक नाही करत खरंच तो वेगळा विचार करणारा आहे आणि तुला माहित आहे माझी सर्वात मोठी अपॆक्षा तो पूर्ण करण्यास तयार झाला "
"अपेक्षा कसली अपेक्षा "?
"लग्नानंतर नाव न बदलण्याची "
"काय "
"हो "?
"अगं पण एकत्र कुटुंब त्याची रीत असेल काहीतरी आणि लग्ननंतर नाव हे बदलतच त्यात काय एव्हडं "
"पुरे आई पुरे पण मी नाही बदलणार आणि आदित्य तयार हि झाला ""
"पण मेघु तू उगाच नावामागे लागलीस अगं नावात काय आहे "
"खूप काही आहे मला पहिले आडनाव पण बदलायचे नव्हते पण आडनाव बदलायला माझी आता काही हरकत नाही पण नाव मात्र मी नाही बदलणार "
"तू ना मेघु लहान मुलासारखा हट्ट बरा नव्हे"
"अगं तू कशाला टेन्शन घेते तुझ्या होणाऱ्या जावयाने ह्या वर शिक्कामोर्तब केला आहे आणि माझा विश्वास आहे आदित्यवर "
"हो बाई असणारच आता तू होणाऱ्या नवऱ्याचेच गुणगान करणार "
"आई तू पण ना "
"मग काय म्हणू एका थोड्या वेळेच्या भेटीत त्यांनी खूप जादू केली दिसते पण तू खुश आहेस ना तुझ्या मनासारखं सगळं होत तर मग आम्हला आणि काय हवंय "
असे म्हणून आई निघून गेली
आणि मेघना मनातल्या मनात लाजली खरी पण काय आदित्य तिच्यावरचा विश्वास राखू शकेल ?
***************