पहिला भाग - नात्याची नवीन सुरवात
"पहिले न मी तुला तू मला न पहिले पण आज आपली भेट होणार आहे "आदित्य आपल्या मनाशी मनातल्या मनात बोलत होता
तेव्हड्यात आदित्य चे बाबा त्याच्या रूम मध्ये आले "अरे आदित्य चल लवकर उशीर होईल "
"हो आलो चला आदित्य देसाई "
सगळे घरातले गाडीत बसून निघाले आज आदित्य साठी मुलगी पाह्यण्याचा कार्य्रक्रम होता तसे आदित्यचे एकत्र कुटुंब त्यामुळे आजी आजोबा काका काकू आणि आई बाबा आणि भांवंडे सगळीच निघाली होती
गाडी येऊन थांबली तशी सगळे उतरले आदित्य हि उतरला पण थोडा बावरलेला मुलीकडचे म्हणजे मेघना चे आई वडील सगळयांच्या स्वागत साठी सज्ज होते सगळ्यांना त्यांनी आत बोलवले तसे सगळे आत येऊन बसले आणि ओळख पाळख सुरु झाली
आदित्य ला हे पाहण्याचे कार्यक्रम आवडत नसत पण घरातल्या पुढे त्याचे कसे चालणार होते गप्पा चालू झाल्या पण आदित्य गप्प बसून सर्व ऐकत होता एवढ्यात मेघनाची आई मेघना घेऊन आली आदित्य ने पहिले तर टिपिकल मराठी चित्रपटात दाखवतात तसे मेघना हातात कांदे पोहे चा ट्रे घेऊन आली पण पाहताच क्षणी मेघना आदित्य ला आवडली सगळ्यांना पोहे देऊन ती आदित्य कडे पोहोचली आदित्य ने ट्रे मधली डिश घेतली आणि मेघनाला पाहून मिश्किल हसला मेघना हि औपचारिकते प्रमाणे हसली हे पाहून आदित्य ला कळले कि तिचे हे हसणे मनापासून नव्हते आणि मेघना आई शेजारी जाऊन उभी राहिली
गप्पा रंगात आल्या होत्या तेव्हड्यात कोणीतरी म्हण्टले "त्यांना दोघाना एकांतात बोलू द्या" तसे आदित्य आणि मेघना त्याच्या टेरेस वर गेले दोघे हि पाच मिनिटे गप्प राहिले आदित्य ने मेघना कडे पहिले तर ती एक गोधळलेली वाटली म्हणून शेवटी आदित्य ने पुढकार घेतला
"मेघना खूप सुंदर आहे तुमचे घर "?
"थँक्स "
"कांदे पोहे खूप छान झाले होते तू बनवलेस "
ह्या प्रश्नावर मेघनाने आदित्यला पाहत म्हण्टले "नाही सॉरी पण मी खोटे नाही बोलणार मला हे कांदे पोहे एवढे चांगले बनवता नाही येत माझ्या आईनेच बनवले आहे "
"नाही इट्स ओके आजकाल च्या मुलींना नाही येत स्वयंपाक करायला "
"सॉरी पण मी तुला स्पष्ट विचारते मग तुला कशी मुलगी हवी आहे स्वयंपाक येणारी असेल ना कारण तुमचे एकत्र कुटुंब ना "
"माझ्या काही मोठया अपॆक्षा नाही आहेत प्रेमळ मनमिळावू असली म्हणजे झालं "
"म्हणजे तिला स्वयंपाक आला नाही तरी चालेल "
"तसे नव्हे पण शिकेल ना ती तसेच आमच्या घरी खूप लोक आहेत शिकवायला त्यामुळे होऊन जाईल माझ्या चुलत भावाची बायको आमची नंदिनी वाहिनी ती ला कुठे येत होता पण ती हळू हळू शिकली आणि आता तर ती आमच्याघरची मास्टर शेफ झाली आहे तुला कसा तुझा जोडीदार हवा "
"प्रेमळ मनमिळावू आपली कुठली हि गोष्ट माझ्यावर न लादणारा माझ्या मनाचा विचार करणारा आणि हो माझे मुख्य म्हणजे नाव लग्नानंतर न बदलणारा "
"वाह छान पण तुला एकत्र कुटुंब आवडत ना "
"हो त्यात मला काय प्रॉब्लेम नाही "
हे ऐकताच आदित्यने मनातल्या मनात सुस्कारा सोडला कारण आजकाल एकत्र कटुंबात राहंण्यास काहींची पसंदी नसते पण मेघना जरा उदास जाणवली हे पाहून
"एक विचारू मेघना आमचे इथे येणे तुला आवडलेले दिसत नाही"
"नाही नाही तसे नाही पण खरे सांगू मला हे कांदे पोहे वैगरे आवडत नाही साडी नेसून उगीच खोटे हसणे "
हे ऐकून आदित्य हसू लागला
"काय झालं का हसलास "?
"मला पण नाही आवडत हे असले पाह्यण्याचे कार्यक्रम पण घरचे थोडेच ऐकणारे "
"मग तुला कोणी आवडत का"?
"नाही नाही प्रेम वैगेरे नाही झाले मला म्हणून तर असले कार्यक्रम पाहावे लागतात "
"म्हणजे आपली मते जुळतात तर "
हे ऐकल्यावर आदित्यचा चहेरा अजून खुलला न राहून त्याने विचारले मग काय ठरवलस "मी पसंद आहे तुला "?
मेघना गप्पच राहिली
"सॉरी म्हणजे मी असं नको होते विचारायला "
"हे बघ आदित्य तुझ्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं पण माझ्या जर मघाशी सांगितलेल्या अपेक्षा तुला मान्य असतील तरच मी विचार करिन"
आदित्य ने परत एकदा आठवले आणि मनातल्या मनात तो बोलू लागला प्रेमळ तर मी आहे मनमिळावू पण आहे आणि मी कुठली गोष्ट दुसऱ्या वर लादणारा हि नाही प्रत्येकाला स्वतंत्र्य असावे हे माझे मत मनाचा विचार तर मी करणारच पण नाव हे मात्र अवघड वाटते कारण आमच्या घरात आजी पासून वाहिनी पर्यंत सगळ्याची नावे बदली आणि लग्नाच्या पूर्वी ह्यावर चर्चा असते कि कुठले नाव साजेशे असेल त्यांनी एक नजर मेघना कडे पहिले तर ती समोर असलेल्या गुलमोहराच्या फुलांना पाहण्यात गुंग होती
काय करावे हे आदित्य ला कळेना कारण नाव बदलणे हि त्याच्या घरची परंपरा तो तोडू शकत नव्हता आणि मेघनाला हि नाही म्हणणे त्याला जड जात होते तरी त्याने हिंम्मतीने मेघना ला विचारले
"मेघना शेक्सपिअर माहित आहे ना "?
"त्याच काय"
"ते म्हणतात ना कि नावात काय आहे त्यामुळे लग्नानंतर नाव बदल्याने फरक पडतो का "?
हे ऐकल्यावर मेघनाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले "का नाही पडत पडतो आम्ही मुली जन्म एका नावाने घेतो ओळख एक नावाने निर्माण करतो आणि एका लग्नाने अख्खी ओळखच पुसून टाकावी हे मला पटत नाही आणि नवीन नाते जोडताना पूर्वीची ओळख पुसायची गरज आहे का संसार मन जुळ्याने होणार आहे कि नाव बदलण्याने "
आदित्य हि तसा पुरोगामी विचाराचा नव्हता त्यामुळे त्याला तिचे म्हणे पटायला वेळ नाही लागला पण घरातले काय म्हणतील यावर त्यांना समजवणे जरा कठीण होते त्यामुळे तो जरा शांत राहिला पण त्याच मन कुठे तरी सांगत होत "जिस मंझिल कि तुम तलाश कर रहे हो वो तुम्हारे सामने ही है "
त्याने मेघना कडे पहिले तर तिच्या बोलण्यातला आत्मविश्वास तिच्या डोळ्यात दिसत होता त्याने मेघना कडे पहात म्हटले "मेघना मला तुझ्या सर्व अपेक्षा मान्य आहे "
तशी मेघनाला हि आदित्य चा स्वभाव आवडला ती ने हि लगेच होकार दिला दोघे हि खाली आले सर्वाना होकाराची बातमी सांगितली तशी मिठाई वाटण्यात आली सगळीकडे आनंद पसरला हसत खेळत आदित्यच्या कुटुंबांनी मेघनाच्या घरातल्याचा निरोप घेतला सगळे आनंदात होते मेघना हि खुश दिसतं होती जाता जाता तिने मोठीशी स्माईल आदित्यला दिली पण आदित्य ला मेघनाच्या अपेक्षा चे टेन्शन आले होते त्याने होकार दिला होता पण जर मना सारखे झाले नाही तर ?
**********************