Raktkand - 4 in Marathi Thriller by Shobhana N. Karanth books and stories PDF | रक्तकांड - 4

Featured Books
Categories
Share

रक्तकांड - 4

प्रकरण- ४

ब्युटीक्वीन स्पर्धेचा दिवस जवळ जवळ येत होता. परंतु दोन-दिवस झाले तरी वैशाली कॉलेजला आलेली दिसत नव्हती. वैशालीची स्पर्धेसाठी बरीच जोरात तयारी चालू आहे असे दिसते असे समजून रूपाने वैशालीला फोन लावला.

" हा बोल रूपा---मला वाटलेच होते कि तुझा फोन येणारच---आत्ताच स्मिता, साधना,व वंदना यांचा फोन येऊन गेला---बोल काय म्हणतेस---? "

"अगं, काय म्हणतेस काय---? दोन-तीन दिवस कॉलेजला आलीस नाही तर आम्हाला काळजी नाही का वाटणार---? तब्येत वगैरे बरी आहे नं---? " रूपा म्हणाली.

" अगं हो, माझी सध्या तब्येत बरोबर नाही. ताप येतोय---डॉक्टरांकडे जाऊन आले. ब्लड टेस्ट केली तर टायफाईड आहे असे समजले. त्यामुळे खूप विकनेस आहे. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं आहे. हा ताप लवकर जात नाही म्हणजे या स्पर्धेत मला भाग घेता येईल कि नाही सांगता येत नाही. खूप टेन्शन आले आहे. काय करू तेच समजत नाही. डॉक्टरांनी सांगितले आहे कि " हा ताप माझ्या औषधाने नाही उतरला तर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायला लागेल---जास्त हालचाल करायची नाही---" आता तूच सांग रूपा, मी काय करू---? "

" वैशाली, तब्येतीची काळजी घे, स्पर्धा काय पुढच्या वर्षीसुद्धा तू भाग घेऊ शकतेस. माझ्या मते तर तू आत्ता आराम करायला हवा---" रूपा म्हणाली.

आम्ही सगळ्याजणी रोज कॉलेजवरून तिच्या घरी जाऊन तिच्या तब्येतीची विचारपूस करत होतो. परंतु वैशाली तर एक दिवस ब्युटीपार्लर मध्ये जाऊन केसाची सेटिंग करून आली होती आणि चेहऱ्याला लेप लावून बसली होती. आम्ही तिला समजावूनही वैशालीने काही एक आमचे ऐकले नव्हते. शेवटी काय ---? व्हायचे तेच झाले. वैशालीच्या आईचा फोन आला कि वैशालीचा ताप वाढला त्यामुळे तिला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले आहे.

वैशाली हॉस्पटलमध्ये आहे असा तिने स्वतः फोन करताच रुपेशने स्मिताला फोन करून बोलावून घेतले आणि दोघे हॉस्पिटल मध्ये गेले. वैशाली आराम करत होती. आम्हाला बघताच वैशाली जडपणे हसली.

" हाय वैशाली, आता कशी आहेस, ताप उतरला कि नाही---? आता तरी तब्येतीची काळजी घे---" तुला कोणी सांगितले होते ब्युटीपार्लर मध्ये जायला---? शेवटी काय झाले---? शेवटी हॉस्पिटलमध्ये यावं लागलं नं---आता तुला स्पर्धेत भाग घेता येणार नाही. मला चांगली संधी होती त्या रूपाची जिरवायला---" रुपेश म्हणाल.

" आता रूपाचा विषय काढायची गरज आहे कां---उगाच तिच्या नावाने खडे फोडत असतो---" स्मिता हसत हसत रुपेशच्या पाठीत धपाटा मारत म्हणाली.

" आता गरज आहे म्हणून तर मी तुला वैशालीकडे घेऊन आलो---" " वैशाली तू आता स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही नं--तर मी काय म्हणतो कि तुझे नाव कमी करण्यापेक्षा त्या जागी आपण स्मिताचे नाव देऊया---स्मिता माझं ऐकत नाही म्हणून वैशाली तू तरी हिला सांग---" रुपेश म्हणाला.

" हो स्मिता, जर तुझी तयारी असेल तर माझे काहीच म्हणणं नाही---परंतु रुपेश तू कां रूपावर एवढी खार खातोस---? वैशाली म्हणाली.

" परंतु हि गोष्ट रुपाला कळवू द्यायची नाही---नाहीतर रूपा स्मिताला भाग घेऊ द्यायची नाही---तसं बघायला गेलं तर स्मिताच रूपापेक्षा सुंदर आहे, परुंतु स्मिताला हे पटत नाही नं---स्मिता फॅशन करत नाही. एकदम साधेपणाने राहते. त्यामुळे फॅशनेबल रूपाची छाप जास्त पडते---" रुपेश म्हणाला.

परंतु रूपावर तुझा एवढा राग कां आहे हे तू मला अजून सांगितलेस नाही रुपेश---वैशाली हसत हसत म्हणाली.

" तुला मी नंतर सांगेनच---आत्ता हि वेळ सांगण्यासारखी नाही, तू चांगली बरी हो, मग वेळ आल्यावर पुन्हा कधी तरी सांगीन---ती एक मोठी स्टोरी आहे---रुपेश म्हणाला.  तेवढ्यात रूपा साधना व मी आम्ही तिघी वोर्ड मध्ये गेलो. आम्ही वैशाली जवळ जाताच रुपेश व स्मिता दोघेही जायला उठले.

रूपा वैशालीला बघून आल्यानंतर खुश होती तर जरा अस्वथही होती. वैशाली आजारी पडली म्हणजे माझ्या रस्त्यातील एक काटा दूर झाला म्हणायचा. हि माझ्यासाठी चांगलीच गोष्ट आहे. दरवर्षी कॉलेज ब्युटीक्वीन म्हणून 'किताब घेणारी वैशाली आज आजारी आहे म्हणजे आता माझा नंबर लागण्याची हंड्रेड पर्सेंट ग्यारेंटि झाली. आता मला घाबरायचे कारण नाही. परंतु आज स्मिता वैशालीला बघायला आमच्या बरोबर नं येता रुपेश बरोबर कशी काय आली आणि ते सुद्धा आम्हाला नं सांगता---? एवढी त्यांची मैत्री घट्ट झाली आहे. जाताना सुद्धा कसे हातात हात घालून जात होते. हे सगळे मुद्दाम मला जळवायला रुपेशने केले. परंतु "रुपेश, मी ब्युटीक्वीन बनून तुझ्या नाकावर कशी टिच्चून पाय ठेवते ते तू बघशीलच---थोड्यावेळ धीर धर---घोड मैदान जवळच आहे---" या विचाराने रूपा मनातल्या मनात खूप अस्वथ होती. म्हणून मन रिझवण्यासाठी नेहमी प्रमाणे टी.व्ही. लावून क्राईम पेट्रोल बघू लागली. क्राईम पेट्रोल मध्ये गुन्हेगाराचा शोध कसा लावतात हे बघण्याचा रुपाला जणू एक छंदच लागला होता. सीरियलमध्ये एक मॉडेलचा आपल्या जुन्या वादविवादातून तिच्या मित्राने खून केला आणि त्या गुन्हेगार मित्राचा कसा शोध घेतला गेला हे रूपा इंटरेस्ट घेऊन बघत होती. बघता बघता रुपाला झोप लागली. टी,व्ही, चालूच होता.हे बघून रूपाच्या आईने रुपाला आवाज दिला परंतु रूपा गाढ झोपेत होती. " हे क्राईम पेट्रोल बघायचं कधी सोडणार आहे---एक दिवस नाहीतर कोणाचा तरी खून करून बसेल तेव्हा हिचे डोळे उघडतील---तोपर्यंत हिला काही अक्कल यायची नाही---" रूपाची आई टी.व्ही. बंद करत म्हणाली.

संध्याकाळी रूपाने विचित्र ओरडण्याने डोळे उघडले. ठेव्ढ्यात रूपाची आई धावत आली.

" काय ग काय झाले एवढे ओरडायला---? स्वप्नात घाबरलीस कि काय---? साहजिकच आहे. नको त्या सिरियल्स बघायच्या, मग काय झोपेत घाबरायला होणारच---"

" नाही ग आई काही नाही---तू उगाचच ओरडत बसू नकोस---" रूपा म्हणाली. परंतु रूपा खरोखर स्वप्नात घाबरली होती. आईची कटकट सुरु होईल म्हणून रूपाने आईला काही सांगितले नाही.

परंतु रूपाच्या आजकालच्या अधून मधून रात्री झोपेतल्या ओरडण्याने रूपाच्या आईला रूपाची काळजी वाटत होती. आम्ही जेव्हा जेव्हा रूपाच्या घरी जात असू तेव्हा तिची आई आम्हाला रूपा विषयी तिच्या विचित्र वागण्याच्या काळजीने तिच्या तक्रारी सांगत असे. त्यामुळे रूपा आईवर आणखीनच भडकत असे. त्यामुळे तो राग ती आमच्यावरही काढत असे. आम्ही सुद्धा रुपाला समजावत होतो. परंतु रूपा कोणाचे ऐकण्यातली नव्हती.

अखेर स्पर्धेचा दिवस उजाडला होता. परंतु वैशालीची तब्येत काही ठीक नव्हती. त्यामुळे वैशाली घरीच राहिली होती. रूपा आपले मेकअपचे सामान घेऊन कॉलेजला गेली. रूपाने आपल्या फिगरसाठी खूप मेहनत घेतली होती. ब्युटीक्वीनचा 'किताब आपल्यालाच मिळायला हवा या विचाराने रूपा रात्रभर व्यवस्थित नीट झोपली सुद्धा नव्हती. यावेळेला पंधरा एक मुलींना हरवून ब्युटीक्वीनचा मुकुट रुपाला जिंकायचा होता. या विचाराने रूपाच्या मनात धडकी भरली होती. तरीसुद्धा रुपाला आपल्या सौंदर्याचा विश्वास होता कि मीच प्रथम पारितोषिकाची मानकरी होणार---कारण म्हणजे या वेळेला वैशाली नव्हती.विजेत्यांच्या लाईनीत रूपा स्वतःला ब्युटीक्वीनचा मुकुट परिधान करत असताना बघत होती, एक मॉडेल म्हणून स्वतःला बघत होती.एक स्पोर्ट्स चॅम्पियन रुपेशच्या समोर एक ब्युटीक्वीनचा मुकुट परिधान करताना रुपेशला हिणवायचे होते. त्याचाशी कोणी पंगा घेईल त्याची हार निश्चित आहे---असे उद्गार मला ऐकवणाऱ्याची कशी जीत होते ते मी बघतेच---अशा विचाराने रूपाच्या मनाचा संताप संताप होत होता. रुपेशचा एक एक शब्द तिच्या मनाला नागिणीने मारलेल्या दौंश प्रमाणे दाह करत होता."

सकाळी अकरा वाजता गॅदरींग सुरु होणार होते. रूपा सकाळी उठून आपल्या मेकअपची बॅग तयार करून तयारच झाली होती. तितक्यात वैशालीच्या फोन आला. वैशालीने रुपाला स्पर्धेच्या शुभेच्छा दिल्या होत्या. रूपा खूप खुश होती. आईला म्हणाली आई मला आशीर्वाद दे, मला विश्वास आहे कि मी पहिल्या नंबरने जिंकून मस्तकावर ब्युटीक्वीनचा मुकुट परिधान करून तुझ्या समोर आलेली असेंन---" रूपा म्हणाली.

" रूपा, देवाच्या सुद्धा पाया पडून जा---आज सकाळपासून माझा उजवा डोळा फडफड करतो आहे---मन आतून घाबरल्यासारखे होत आहे---काहीतरी अशुभ होईल असे वाटते आहे. रूपा सांभाळून राहा---" रूपाची आई म्हणाली.

परंतु रूपा आईचे बोलणे ऐकायला थांबलेली नव्हती.

रूपाने मेकअप रूममध्ये प्रवेश केला. सर्व मुली आपला मेकअप करून, सुंदर सुंदर ड्रेस घालून तयार झाल्या होत्या. सर्व मुली जणू धर्तीवर अप्सरा उतरल्यासारख्या दिसत होत्या. क्षणभर रूपा सर्वांकडे बघतच राहिली होती. यांच्याहून मला सुंदर दिसायला हवे.

" हाय रूपा, ओळखलं नाही मला---?

" अरे तू स्मिता---? खरंच मी तुला ओळखलंच नाही, या हेयरस्टाईल मध्ये तर तू एकदमच वेगळी दिसते---परंतु तू पार्टीसिपेट होणार याविषयी मला कळवलेस सुद्धा नाही---"

" अगं, रुपेशने आणि वैशालीने खूप आग्रह केला म्हणून मी भाग घेतला. वैशालीने आपले नाव कमी केले नं तेव्हा त्या जागी रुपेशने माझे नाव टाकले बस्स ---माझं काय घेऊन बसलीस---? मी आपली टाईमपास म्हणून स्पर्धेत उतरली---स्मिता म्हणाली.

वैशालीने आपले नाव स्पर्धेतून कमी केले हे ऐकून रुपाला आपल्या मार्गातला मोठा काटा दूर झाला या गोष्टीने समाधान झाले होते. आता आपला नंबर लागणार हे फिक्स आहे असे समजून रूपा निर्धास्त झाली होती. सगळ्या मुली तयार होऊन स्टेजपाठी आल्या होत्या. स्टेज वर नाटकाचा प्रयोग चालू होता. हॉल अगदी मुलामुलींनी भरगच्च भरला होता. तीन कॉलेजची मुले मुली एकत्र आली होती. एवढ्या अफाट गर्दीपुढे आपल्याला पहिल्या नंबरचा मुकुट मस्तकावर सुशोभित होणार, सर्वांच्या नजरा माझ्यावरच रोखलेल्या आहेत असा भाव रूपाच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. त्यामुळे रूपा आणखीनच आत्मविश्वासात येऊन गर्वाने स्वतःच्या परफॉर्मन्सची वाट उत्सुकतेने पाहत होती.

बघता बघता सर्व कार्यक्रम पूर्ण झाले आणि ब्युटीक्वीन स्पर्धा सुरु झाल्या. प्रत्येक मुलगी आपल्या आपल्या स्टाईलने येऊन आपले शरीर सौष्ठव सौंदर्य सादर करून शेवटी नंबर रूपाचा आला. रूपाने आपल्या सौंदर्याच्या अहंकारात विश्वासाने जजेस समोर एक अनोख्या पोज मध्ये आपल्या सौंदर्याची झलक सादर केली. त्यानंतर सर्वांची भाषणं झाल्यावर जजेसनी प्रत्येक कार्यक्रमातून तीन विजेते नंबर जाहीर केले. शेवटी कॉलेज ब्युटीक्वीन विजेतीची उत्सुकता असलेला कार्यक्रम सुरु झाला. विजेत्यांचे नाव ऐकण्यास सर्वांचे कान टवकारले होते. या वेळेला वैशाली नसल्याने प्रथम विजेती कोण असणार हे मोठे प्रश्न चिन्ह सर्वांसमोर होते. जजेसमधील एका जजेसने उठून हातात माईक घेऊन नाव घोषित करण्यास पेपर हातात घेतला. भरलेल्या हॉलवरून जजेसनी एक स्मित हास्य करून एक नजर फिरवली. रूपा मात्र विश्वासाने स्टेज समोर गर्वाने उभी होती. रूपाच्या चेहऱ्यावर एक गर्वाचे हास्य फुलले होते. ती सर्व सुंदर युवतींकडे एक उपहासाने बघत होती.

थोड्याच वेळात जजेस कडून नाव घोषित करण्यास सुरवात झाली. " या वेळेस पंधरा विद्यार्थींनी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यातून आम्ही फक्त तीन विजेते निवडले आहेत. तरी जे विजेते ठरलेले नाहीत त्यांनी निराश नं होता पुढील वर्षी जरूर पुन्हा प्रयत्न करावा. यातील सर्वच मुली सुंदर आहेत. फरक आहे तो फक्त एक-दोन मार्क्सचा---तर आता मी विजेते घोषित करतो. तिसरी विजेती आहे रिटा फर्नांडिस, दुसरी विजेती आहे माधुरी दुबे, आणि प्रथम विजेती आहे स्मिता साळवी---असे तीन विजेते यांची निवड झाली आहे---"

हे ऐकताच रुपाला एकदम धक्काच बसला. स्मिताचे नाव ऐकताच रूपाच्या मनातून क्रोधाचे अंगारे प्रज्वलित होऊ लागले. " हा माझ्या सौंदर्याचा अपमान आहे. हि पार्शलिटी आहे. रुपेश समोर हि माझी मोठी हार आहे. रूपाचा अहंकार क्रोधाग्नीचे रूप घेऊ लागला. रागाने रूपाचा चेहरा व डोळे लाल झाले होते. सर्व सुंदर मुलींचा गळा दाबून त्यांना मारून टाकण्याची मनोवृत्ती रूपाच्या अहंकाराला प्रेरणा देऊ लागली होती. क्राईम पेट्रोलचे सिरीयल तिला आठवू लागले. एक सूड भावना जागृत होऊ लागली. माझ्या पेक्षा कोणीच सुंदर होऊ शकत नाही. हि निश्चित पैसे घेऊन पार्शलिटी केलेली आहे. रूपाचे मस्तक भिरभिरू लागले. मनात नको ते विचार येऊ लागले. रूपाने आपले मस्तक दोन्ही हाताने दाबुन धरले आणि ती खाली बसून गेली. स्वतःला काय होत आहे हे तिचे तिला कळेना. ती तिथून धावतच मेकअप रूम मध्ये गेली. तिच्या पाठोपाठ तिच्या बरोबर पार्टीसिपेट झालेल्या मुली धावत गेल्या. काय गोंधळ आहे हे कोणालाच समजत नव्हते. त्यात रुपाला सावरायला स्मिता सर्वात पुढे होती. रूपा मेकअप रूम मध्ये जाताच बेशुद्ध पडली. सर्व मुली रुपाला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करू लागल्या. कोणी तिचे हातावर हात चोळून तर कोणी तिचे पाय चोळून तर कोणी तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडून तिला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करत होत्या. हळू हळू रूपा हालचाल करू लागली. रूपाने अलगद डोळे उघडले. डोळे उघडताच स्मिताने रुपाला पाणी पिण्यास काचेचा ग्लास पुढे केला. स्मिताला समोर बघताच पुन्हा रूपा विचित्र हावभाव करू लागली. रागाने स्मिताने दिलेला पाण्याचा ग्लास जोरात जमिनीवर फेकून दिला आणि उठून सर्व सामान रागाने इकडे तिकडे फेकून देऊ लागली. मोठा आरसा फोडून टाकला. स्मिता रुपाला पकडायला गेली तर फुटलेल्या काचेतून एक मोठा तुकडा घेऊन स्मिताच्या चेहऱ्यावर त्या काचेच्या तुकड्याने सपासप वार करू लागली. आजूबाजूला ज्या मुली होत्या त्यांच्यावरही रूपाने भयंकर वार केले. रूपा क्रोधाने लाल झाली होती. आपली शुद्ध हरपून बसली होती. त्यातील काही मुली बाहेर पळून गेल्या, तर काही मुली बेशुद्ध पडल्या. वार झालेल्या चेहऱ्यातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. मुलींची धड ओळखही पटत नव्हती. मेकअप रूम रक्ताने रंगून गेली होती. भिंती रक्ताने माखून गेल्या होत्या. रूपा हे सर्व दृश्य बघून हसत होती. " आता सांगा कोण सुंदर आहे---? या रुपाला कोणीही हरवू शकत नाही. जजेसला पैसे देऊन ब्युटीक्वीनचा 'किताब घ्यायचा आहे नं---स्मिता तू मला धोका दिला---माझी हार करण्यासाठी रुपेशने तुला जिंकून दिले आहे---मी माझी हार कदापि स्वीकारणार नाही. आजवर मी अप्सरेच्या भूमिका पटकावणारी , एक अतिसुंदर अभिनय करणारी, अप्सरेच्या बरोबरीने नृत्य करणारी मी एक मेनका--उर्वशी आहे.रुपेशने किती पैसे दिले जजेसला---? त्या जजेसला सुद्धा मी सोडणार नाही---" असे म्हणून रूपा धावत धावत रक्ताळलेल्या पायाने हॉलच्या दिशेने गेली. तेवढ्यात तीन सौरक्षकांनी रुपाला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु रूपा एकदम पिसाळल्यासारखी धावत होती. त्या सौरक्षकांना सुद्धा काचेच्या तुकड्याने वार केले. जो वाटेत दिसेल त्यांना ती सपासप वार करत गेली. तिने काचेच्या तुकड्याने जो मिळेल त्याला वार करून अनेकांना जखमी केले होते.ती चालत आली त्या पायवाटेवरही रूपाचे रक्ताचे पायाचे ठसे उमटले होते. जिकडे पाहावे तिकडे रक्त हि रक्त दिसत होते. शेवटी तिच्यावर पाईपने पाण्याचा फवारा मारला तेव्हा ती वाटेवरच बेशुद्ध झाली. तोपर्यंत पोलिसही आले. तेव्हा तिचे हात बांधून तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले. तोपर्यंत मेकअप रूम मधील रक्ताळलेल्या बेशुद्ध मुलींची स्थिती फारच गंभीर झाली होती. रक्ताळलेल्या चेहऱ्यामुळे कोणाचीही ओळख पटत नव्हती. एवढे अमानुष पणे रूपाने सर्वांची हत्या केली होती. त्यांनाही हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले. मात्र वेळेवर उपचार नं मिळाल्याने स्मिता या रक्तकांड मध्ये वाचू शकली नव्हती. रुपेशने स्मिताच्या मस्तकावरील रक्ताळलेला मुकुट काढून त्याने मनातल्या मनात स्मितासमोर शपथ घेतली कि " स्मिता, जिने या मुकुटावर तुझे रक्त वाहिले त्या रक्ताची शपथ घेऊन सांगतो कि तिचा मी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. तेव्हाच माझ्या मनाला शांती मिळेल---" असे म्हणून रुपेशने तो मुकुट पुन्हा स्मिताच्या मस्तकावर ठेवला आणि निघून गेला. तिला मिळालेल्या ब्युटीक्वीनचा मुकुट मस्तकावर घालून तिचा अंतिमसंस्कार करण्यात आला. त्यावेळी कॉलेजचे प्रिन्सिपॉल, प्रोफेसर, व सर्व मुलं-मुली तसेच तिच्या घरातील सदस्य मिळून हा विधी करण्यात आला.