Raktkand - 2 in Marathi Thriller by Shobhana N. Karanth books and stories PDF | रक्तकांड - 2

Featured Books
Categories
Share

रक्तकांड - 2

प्रकरण-२

दहावीचा रिझल्ट लागला आणि रूपाने आपल्या शाळेच्या मैत्रिणीबरोबर एकत्र येऊन एकाच कॉलेजला ऍडमिशन घेतले. दोन महिन्यातच कॉलेज सुरु झाले. शाळेच्या वातावरणापेक्षा कॉलेजचे वेगळे वातावरण बघून रूपा खुश झाली होती. मुलींचे वेगवेगळे रंगीबेरंगी ड्रेस, त्यांच्या हेअर स्टाईल्स, त्यांचे उंच उंच सँडल्स हे बघून रुपाला वेगळेपणा वाटू लागला होता. मुलांमुलींनमधील वागण्यातला खेळकरपणा, मोकळेपणा, बघून रुपाला आश्चर्य वाटत होते. हळू हळू कॉलेजच्या वातावरणात रूपा आपल्या मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये रुळून गेली होती. क्लास बुडवून पिक्चरला जाणे, हॉटेलला जाणे, या गोष्टींकडे रूपाच्या मनाचा कल जाऊ लागला. नवं नवीन मित्र मैत्रिणी मिळू लागल्या. नवे अनुभव येऊ लागले, एकीकडे अभ्यास आणि दुसरीकडे मौज मजा यामध्ये रूपा आपले कॉलेजचे नवे जीवन जगू लागली होती.

असेच एक दिवस रूपा लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करत असताना एका मुलीची ओळख झाली.

" हाय रूपा----"

" हाय---मी ओळखले नाही----"

" मी वैशाली---कोणी मला वैशू म्हणतात तर कोणी मला ब्युटीक्वीन म्हणून हाक मारतात. मी सेकंड इयरला आहे. अकरावी पासून मी याच कॉलेजची ब्युटीक्वीन म्हणून ओळखली जात आहे. मला तुझी ओळख रुपेशने करून दिली. तू मला आवडली म्हणून मी तुला माझी ओळख दिली. रुपेश आधी माझ्याच कॉलनीत रहात होता. त्या नंतर तो आता बाजूच्या कॉलनीत रहातो. तरी आम्ही दोघे एकमेकाला रोज भेटत असतो. आमची लहानपणापासूनची मैत्री आहे. तो मुलींची चेष्टा करत असतो परंतु तो तेवढा वाईट नाही. मात्र राग आला तर फार वाईट आहे----मी सुद्धा त्याला घाबरते.तुला मी बघितले तेव्हा मला तू फार आवडलीस म्हणून मी रुपेशला विचारले कि हि नवीन आलेली सुंदर मुलगी कोण आहे----? " वैशाली हसत हसत रूपाचा हात हातात घेत म्हणाली.

" वैशाली, तुझी ओळख झाल्याने मला खूप आनंद होत आहे. ये नं इथे बस---"

" रूपा तू सुद्धा माझ्याप्रमाणेच नाटकात अभिनय करतेस, नृत्यातही तू एकदम प्रवीण आहेस---"

" हो, वैशाली, मी लहानपणापासून नृत्य शिकत आले आहे. त्यामुळे मला नृत्याची फार आवड आहे---"

" रूपा, मला सुद्धा नाटकात अभिनय करायला फार आवडतो. म्हणूनच मी कॉलेजच्या वार्षिक संमेलनात भाग घेत असते. आता अकरावी पासून मी कॉलेज ब्युटीक्वीन म्हणून भाग घेत आले आहे आणि मी नेहमी पहिले पारितोषिक जिंकले आहे. परंतु आता तुला बघितल्यावर असे वाटते कि मला पारितोषिक मिळणार नाही---तुला बघितल्यावर मला असे वाटले कि तुझे आणि माझे जमण्या सारखे आहे. म्हणूनच मी रुपेशला तुझ्याविषयी विचारून तुझी ओळख करून घेतली---"

" एक कॉलेजची ब्युटीक्वीन आपल्याला मैत्रीचा हात पुढे करते तर कोण हि मैत्री स्वीकारणार नाही---? " असे म्हणून रूपाने वैशालीच्या हातात हात मिळवला.

" चल तर मग, आजच्या शुभ मुहूर्तावर एक कॉफी माझ्याकडून देते---" असे म्हणून वैशालीने रूपाचा हात हातात घेऊन दोघीही कॅन्टीनच्या दिशेने निघून गेल्या. तेवढ्यात स्मिता व साधना तिथे आल्या.

" हाय रूपा, हल्ली काय आमच्यामध्ये नसतेस----आता काय नवीन नवीन मैत्रिणी मिळायला लागल्या आहेत---ती सुद्धा कॉलेजची ब्युटीक्वीन---मग आमच्यासारख्यांना कोण विचारणार---? " स्मिता म्हणाली.

" असं काही नाही---तुमची सुद्धा ओळख करून देते नं---हि आहे वैशाली--माझी सुद्धा आताच ओळख झाली आहे--- आणि या आहेत माझ्या शालेय बाल मैत्रिणी स्मिता व साधना---"

" आता म्हणजे या वर्षीचे ब्युटीक्वीन चे पारितोषिक रूपाचे गेले म्हणायचे---आम्हाला रुपाकडून पार्टी मिळणार नाही असे समजून राहिला पाहिजे---" स्मिता खोचक पणे म्हणाली.

" व्वा---असं कसं---? रूपा सुद्धा दिसायला सुंदर आहेच नं---ती सुद्धा कॉलेज सुंदरीचे पहिले पारितोषिक जिंकू शकते---नेहमी मीच ते प्राईज जिंकायला हवे असे थोडं आहे---? सगळ्यांना चान्स मिळायला हवा नं---?वैशाली म्हणाली.

" आता बघूया कोणाची हार होते आणि कोणाची जीत---" स्मिता म्हणाली.

हार आणि जीत हे स्मिताचे शब्द रुपाला कानात गरम तेल ओतल्यासारखे वाटले. आजपर्यंत कधीही हार नं घेतलेल्या रूपाचा अहंकार कोणीतरी डिवचत असल्यासारखे वाटत होते. थोड्यावेळ रूपा निस्तब्ध झाली.

"ए रूपा---कुठल्या विचारात गुंग झालीस---? वैशालीला बघून आपली हार होणार या विचाराने टेन्शनमध्ये तर आली नाहीस नं---स्मिता म्हणाली.

" नाही गं---मी कशाला येईन टेन्शनमध्ये---टेन्शन घेण्यासारखी गोष्ट असेल तर टेन्शन घेईन नं---मला विश्वास आहे माझ्या देखण्या रूपावर---" रूपा म्हणाली.

" हे बघ रूपा, स्पर्धा म्हटली म्हणजे एकाची हार आहे तर दुसऱ्याची जीत आहे. त्यात असे तर नाही कि हरणारी मुलगी सुंदर नाही म्हणून---फक्त काय तर एक दोन मार्क्स इकडे तिकडे होतात. एवढाच फरक आहे. त्यात एवढे मनावर घेण्यासारखे नाही. दर वर्षी मीच जिंकेन असे नाही---हे खरं आहे कि दोन-तीन वर्ष मी जिंकत आले आहे. म्हणून असे बोलू शकत नाही कि या वर्षीही मीच जिंकेन---" वैशाली म्हणाली.

तेवढ्यात रुपेश समोरून आला. " हाय रुपेश, कसं वाटतं हे कॉलेजचे वातावरण---? तू तर स्पोर्ट्स चॅम्पियन आहेस. आता कॉलेजचे नाव झळकावणार नं---" वैशाली हसत हसत म्हणाली.

" हो--हो,कां नाही---? आपण अभ्यासात नाही तर स्पोर्ट्स मध्ये तर नाव काढायला हवे नं---नाहीतर मुलींची छाप माझ्या सारख्या मुलावर कशी पडेल---? तू सुद्धा कॉलेजची ब्युटीक्वीन माझ्याशी दोस्ती केली असती कां---? एक टपोरी रुपेश म्हणून मला सगळे ओळखतात---" असे म्हणून रुपेशने रूपा कडे कटाक्ष टाकला.

" रुपेश, तू आता जरा मुलींची छेड-छाड़ काढणं सोडून दे---हाच तुझा मला अवगुण आवडत नाही. तू एवढा स्पोर्ट्स चॅम्पियन आहेस तर तू कसं राहायला हवे---? वैशाली म्हणाली.

" अगं मी कसे राहायला हवे---असे मी काय करतो---?"

" हो--हो अगदी सभ्य मुलगा आहेस नं---चला आता लेक्चरचा टाइम झाला आहे---लेक्चर अटेंड करून मग आपण चौघे कॉफी प्यायला जाऊ या---चालेल नं रूपा---? " वैशाली रूपाचा हात पकडत म्हणाली.

" नाही , मी येणार नाही---तुम्ही तिघे जा---" रूपाने आपले अंग काढून घेतले. रुपेश असल्या कारणाने रूपाने रुपेशपासून दूर राहण्याचे ठरविले होते.

" रुपेश तू तर येशील नं---? कि तू सुद्धा रूपा सारखा नखरा करणार आहेस---" वैशाली हसत हसत म्हणाली आणि चौघेजण लेक्चर साठी आपापल्या क्लासमध्ये निघून गेले.

कॉलेजचे दिवस पुढे पुढे सरत होते. परीक्षा पार पडल्या आणि जानेवारी महिना उजाडला. जानेवारी महिना म्हणजे स्पोर्ट्स आणि वार्षिक संमेलनाचा महिना---स्पोर्ट्स चालू झाले होते.सर्व मुलं-मुली आपले आपले प्रभुत्व दाखविण्यात गर्क होती. त्यात रुपेशही आपल्या खेळाचे कौशल्य दाखवूनं प्रत्येक खेळात प्रभुत्व दाखवत होता. त्या प्रभुत्वाने त्याने अनेक खेळात आपल्या कॉलेजचे नाव झळकावले होते. त्यामुळे त्याचे सर्वजण खूप कौतुक करत होते. कॉलेजच्या प्रत्येक मुलीच्या तोंडावर रुपेशचे नाव ऐकू येत होते. रुपेशचे हे यश थोडे फार रुपाला खटकत होते. त्याचे होत असलेले कौतुक बघून रुपाला मनातून एक प्रकारचा मत्सर वाटू लागला होता. रुपेशच्या भोवती मुलींचा गराडा बघून रूपाच्या मनात जलसी वृत्ती निर्माण होत होती. प्रत्येक मुलगी रुपेशशी मैत्री करायला उत्सुक होत होती. रुपेशला सुद्धा हेच हवे होते. रुपाला जळवण्याची हीच संधी आहे म्हणून त्या संधीचा तो पुरे पूर फायदा घेत होता. स्पोर्ट्सची धांदल कमी झाल्यावर सिंगिंग, नाटक, नृत्य, आणि कॉलेज ब्युटीक्वीन स्पर्धा यांच्या रिहर्सल चालू झाल्या होत्या. त्यासाठी रूपा आपल्या फिगरसाठी खूप मोठी मेहनत घेत होती. डायटिंग,व्यायाम, लेप लावणं, मसाज या गोष्टींकडे ती नेहमी पेक्षा जास्त मेहनत घेऊ लागली होती.ब्युटीक्वीन स्पर्धा आपल्यालाच जिंकायची आहे आणि ती मीच जिंकणार या निश्चयावर ती स्वतःची पूर्व तयारी करत होती. रुपेशने स्पोर्ट्स चॅम्पियन म्हणून जो 'किताब जिंकला होता तो बघून रूपाचा जोश अधिकच वाढला होता. त्याच्यापुढे आपली हार म्हणजे आपल्या जीवनाची हार असा रूपाने मनोग्रह करून घेतला होता.