Khel Jivan-Marnacha - last part in Marathi Fiction Stories by बाळकृष्ण सखाराम राणे books and stories PDF | खेळ जीवन-मरणाचा - 5 - अंतिम भाग

Featured Books
Categories
Share

खेळ जीवन-मरणाचा - 5 - अंतिम भाग

खेळ- जीवन -मरणाचा
आघात शेवटचा
सुलेमानच्या चमन पॅलेस वरून दोन चिलखती जीप्स बाहेर पडल्या. दोन्ही जीपमध्ये मिळून एकून बारा माणसं होती. सारे तडीपार गुंड होते.मशिनगन ...तलवारी अस साहित्य घेवून पहाटेच बाहेर पडले होते.अजून उजाडले नव्हते. हा सारा लवाजमा दोन नंबरच्या टेकडीकडे चालला होता. पाचजणांना बेसावध ठेवून घेरायच अशी त्यांची रणनीती होती.पण पीटरने अर्धवट झोपेतही वाहनांचा आवाज टिपला.
" ऊठा..ऊठा .. ,गाड्यांच्या आवाज येतोय..खडकाळ.. वाटेवरुन येताना थोडा वेळ लागेल....तोपर्यंत आपण तयारी करूया.."
सारे धडपडून उठले.डोळे चोळतच शायनाने तीर- कामठा हाती घेतला व उडी मारतच ती उभी राहीली.
" ईलियास तू टेकडीची उत्तर दिशा पकड ..शिवा तू दक्षिणेकडे जा मी पूर्व दिशा बघतो..अमित व शायना तुम्ही टेकडीची पश्चिम दिशा सांभाळा." पीटरने सर्वाना निर्देश दिले.
"अरे देवा...याच्यासोबत मी? " शायना मुद्दाम म्हणाली.
" हे बघ तू इथेच बसून रहा मी एकटा लढवतो खिंड." अमितने वैतागत उत्तर दिल व तो चालू लागला . शायना मंद हसत त्याच्या पाठिमागे चालू लागली.
" थांबा ! एक लक्षात ठेवा, त्यांच्याजवळ आधुनिक हत्यार आहेत.आपल्याजवळ फक्त सुरे व हा तीरकामठा एवढंच!
पण जिद्द व युक्तीच्या जोरावर त्यांच्याशी लढा देवू शकतो. जे मिळेल ते हत्यार वापरा ते आपल्याला मारायला येताहेत .आपण सहजा सहजी हरूया नको. आपण उंचावर आहोत त्याचा आपल्याला फायदा होईल.चला जगलो तर पुन्हा भेटू."
"माझ्याजवळ ही गलोल आहे अन माझा नेमही अचूक आहे." शिवा हसत म्हणाला.
" पण ही तू केव्हा तयार केलीस?"शायनाने विचारले
" काल दुपारी...यासाठी मी माझ्या कमरेच्या बेल्टच्या वाद्या तयार करून वापरल्या."
'गुड...!पण सावध रहा." पीटर म्हणाला.
पाचहीजण वेगवेगळ्या दिशांना पांगले.
पीटरचा अंदाज बरोबर होता. टेकडीच्या दोन्ही बाजूला एक एक जीप येवून थांबली. मशिनगनधारी गुंड खाली उतरले.उतरता उतरताच त्यांनी गोळ्यांच्या फैरी झाडल्या. घाबरून पाचहीजण पळापळ करतील व आयतेच हाती सापडतील असा त्यांचा होरा होता. पण काहीच हालचाल दिसेना हे पाहून ते थोडे गोंधळले.
" लपून बसले असतील...चला वर चला ..दिसेल त्याला गोळ्या घाला. एकही जीवंत सुटता नये.थोड अंतर ठेवून चला" त्यांचा म्होरक्या ओरडला.
दोन्ही बाजून सहा- सहा जण टेकडी चढू लागले.अगदी त्याचवेळी ईलियास उत्तरेकडून तर शिवा दक्षिणेकडून
. झुडपांचां आधार घेत गुडघ्यावर रांगत खाली उतरू लागले. त्यांच्या डोक्यात एवढाच विचार होता की एखाद्या गुंडाला एकटाच गाठून त्याच्याकडची गन काढून घ्यायची व मग पाठीमागून उरलेल्यांवर हल्ला करायचा.
शायना एका भल्यामोठ्या खडकांच्या आडोशाला तीर कामठा सज्ज ठेवून दबा धरून बसली होती.बाजूला अमित सुरा समोर ठेवून शांत बसला होता.
" तप करतंय काय?" शायनाने अमितला चिडवल.
" तू बाजूला असताना आणखी काय करणार? हाणामारीची हौस फिटवून घे." अमितही काही कमी नव्हता.
" मरणाला घाबरलास काय?"
" छट्...मरणाला हरवून जगण्यात मजा असते . ते बघ तिघेजण आपल्या बाजूने वर येतायत."
" माझ्या बाणाच्या टप्प्यात येऊंदे..मग बघ."
काही वेळातच तिघे गुंड त्याच्यांपासून तीस एक मिटरवर पोहचले. उभा चढ चढल्यामुळे ते थोडे दमले होते.अचानक शायनानने दोरी ओढून तीर सोडला.सू..सू करत टोकदार तीर एकाच्या छातीत घुसला. तो ओरडत खाली कोसळला.त्याच वेळी अमितने चेंडूएवड्या दगडांचा मारा सुरू केला.अस काही घडेल अशी कोणालाच कल्पना नव्हती. दचकून त्यांनी अंदाधुंद अश्या गोळ्यांच्या फैरी झाडल्या.याचा फायदा उठवत इलियासने हातातला धारदार सुरा अचूक फेकत एकाच्या गळ्याचा वेध घेतला.
आवाजी न करता तो खाली कोसळला. ईलियासने याचा फायदा उठवत त्याची गन हस्तगत केली.
दुसर्या बाजूला पीटरने काही मोठे दगड ठराविक अंतरावर जमा करून ठेवले .गनधारी गुंड वर चढू लागले तस पीटरने दगड खाली सोडायला सुरूवात केली.उतारावरून वेगाने येणार्या दगडांमुळे टेकडी चढणार्या गुंडाची धावपळ सुरू झाली.मोठ्या दगडांसोबत छोटे दगडी खाली घसरू लागले.एवड्यात शिवा अर्धीटेकडी खाली उतरला होता.दगडाआड लपलेला एक गुंड त्याला दिसला. शिवाने गलोलीत एक गुळगुळीत खडा ठेवला व गलोल ताणत खडा सोडला पण तेवढ्यात तो गुंड थोडा सरकला व वेगवान खडा त्याच्या डोक्याऐवजी डाव्या खंद्यावर आदळला. वेदनेचे किंचाळत तो घसरत खाली गेला.
इकडे शायनाने वर येणार्या एका माणसावर तीर सोडला.तीर कचकन त्याच्या मांडीत घुसला.पण खाली बसताबसता त्याने शायनावर गोळी झाडली. लक्ष ठेवून असलेल्या अमितने झेप घेत शायनाला मागे खेचले. पण गडबडीत गोळी अमितच्या खांद्याला घासून गेली.नशिबाने अमित जखमी होण्यापासून वाचला होता.या गडबडीत शायना अमितवर कोसळली. तिच्या उबदार स्पर्शाने अमित बावरला.
"साॅरी .. नाईलाज होता." अमित खांदे उडवत म्हणाला.
" स्टेशनवर धक्का दिलेलास तसच ना?" शायनाने मिस्किलपणे विचारले.
"असले चाळे करायला मी रस्त्यावरचा मजनू नाहिय." अमित सपाट आवाजात बोलला.
. दोघंही एकमेकांपासून दूर झाली.
हाती मशिनगन आल्याने हत्तीचे बळ लाभलेल्या इलियासने
ओरडत गुंडांवर गोळ्या झाडत पुन्हा वर चढायला सुरूवात केली. या घामधुमीमुळे दोन्हीकडचे गुंड गोंधळले व त्यांनी माघार घ्यायला सुरूवात केली.गोळ्या झाडता झाडता आपल्या जखमी साथीदारांना सावरत ते कसेबसे जीप्सजवळ पोहचले. पीटर , शायना ,अमित वरून मारा करत राहिले.तर शिवा व इलियास आपल्या हत्यारांनी हल्ला चढवत पुन्हा वर आले.जीप्स
सुरू झाल्याचा आवाज आल्यावर पाचहीजण एकत्र आले. किरकोळ खरचटण्यापलिकडे फारसं नुकसान झाल नव्हत.
" आपल्याला त्वरीत इथून गेल पाहिजे. ते निश्चितच जादा माणसासहीत हल्ला करतील.' अमित म्हणाला.
" होय , आपल्याला प्रथम त्या इमारती पर्यंत पोहचणारी गुहा शोधावी लागेल . चला...आताच बाहेर पडूया" पीटर म्हणाला.
" अब मेरे हाथमे ये हथीयार है...मी तुम्हाला कव्हर करतो." इलियास म्हणाला.
सारे झपाझपा टेकडी उतरू लागले.
---------*----------*--------------*--------------*--------
सुलेमान टेकडीवरचा संघर्ष स्क्रीनवर पाहत होता. आपल्या माणसांनी माघार घेतली हे बघून तो संतापाने वेडापिसा झाला.
" माघारी आलेल्या कुणालाही जीवंत ठेवू नका." तो ओरडला.
पण स्क्रीनवरवरच्या दुसर्या दृश्यांने तो थोडा सुखावला.
टेकडीजवळ ही धुमश्चक्रि सुरू असताना टेकडीपासून थोड दूर दोन स्पर्धक एकमेकांच्या जीवावर उठले होते.एकच स्पर्धक शेवटपर्यंत राहणार हे डोक्यात भिनल्यामुळे ते लढत होते .दोघांच्या अंगावर असंख्य जखमा झाल्या होत्या.तरीही ते एकमेकांवर वार करत होते .त्यातला एक नायजेरीयन बाॅक्सर होता.तर दुसरा जापनीज ज्युडोपटू होता.अखेर त्यांच्या हातातले सुरे गळून पडले.लटपटत दोघेही खाली कोसळले. दोघांचेही प्राण कंठाशी आले होते.तडफडत... आचके देत..ते निपचित पडले.
खुष झालेल्या सुलेमानने बेटाच्या दक्षिणेकडचे कॅमेरे सुरू केले.एक स्पर्धक दलदलीत बुडत चालला होता.तो जीवाच्या आकांताने त्यातून बाहेर पडण्याची धडपड करत होता.त्याच्या चेहर्यावरचे मरणाचे भय बघून सुलेमानला आसुरी आनंद झाला.असच भय त्याने आपल्या बापाच्या चेहर्यावर बघितल होत....जेव्हा सुलेमान रिवाॅल्हर रोखून त्याच्यासमोर उभा होता.
तो माणूस जेवढ्या जोराने बाहेर पडण्याची घडपड करत होता....तेवढ्याच वेगाने तो दलदलीत रुतत चालला होता.आता तर त्याचे तोंड दलदलीच्या वर दिसत होते.
आपण आता मरणार हे लक्षात येताच तो अखेरचा ओरडला व दिसेनासा झाला.
सुलेमान खदाखदा हसू लागला.त्याने आणखी काही कॅमेरे ऑन केले.एक कॅमेरा एक किलोमीटरच्या परिसरातल्या हालचाली टिपत होता. एका कॅमेरात त्याला दोन स्पर्धक सावधगिरी पुढे सरकताना दिसले.दोघांच्याही हातात धारदार सुरे होते.काही वेळातच ते एकमेकांसमोर येतील हे सुलेमानच्या लक्षात आल....आणि झालेही तसच ते दोघं एकमेकांसमोर आले. काही क्षण दोघेही परस्परांकडे पाहत राहिले.समोरचा इसम जीवंत राहणं म्हणजे आपल मरण निश्चित हे त्यांच्या लक्षात आल.
अचानक दोघांनी झेप घेत एकमेक॔वर वार केले.एक जीवघेणी झुंज सुरू झाली.जिंकेल तोच जिवंतपणे पुढे जाणार होता. पण ही जीवन मरणाची लढाई सुरू असताना अचानक वाघांची आरोळी ऐकू आली. त्यापाठोपाठ वाघाची झेप त्या दोघांवर पडली. दोघेही धडकन खाली पडले.भुकेल्या वाघाने जोरदार पंजाने दोघांना तडाखे दिले.दोघेही विव्हळत पळण्याची घडपड करू लागले.पण वाघाच्या अणुकुचीदार नखांनी दोघांची शरीरे रक्तबंबाळ झाली होती.त्यातल्या एकाची हालचाल बंद झाली होती.तर दुसरा अजुनही तडफडत होता.वाघाने आपल्या जबड्यात तडफडणार्या व्यक्तीचा पाय पकडला व ओढत झुडपात घेऊन गेला.
सुलेमानला जे अपेक्षित होत ते घडत होत.त्याच्या सारखी असंख्य माणसं जगभर हा जीवन-मरणाचा खेळ मोठ्या आवडीने बघत होती.
--------*------------*-------------*-----------*----------*-----
आता अख्या चमन बेटावर फक्त पाच स्पर्धक शिल्लक होते.शिवाच्या हातात नकाशा होता व सर्वाना मार्ग दाखवत होता. दगडांच्या चळतीपासून ते बरेच दूर आले होते.आता मार्ग बराच अवघड होता.दलदलीतून मार्ग काढत ते चालले होते. खडकांवरून उड्या मारत दलदल पार करत होते. एवड्यात समोर ऐक छोट सरोवर व मधोमध गोल चिमणीच्या (धुरांड)आकाराच्या दहा एक फूट उंचीचा उंचवटा होता.
" आपल्याला त्या उंचवट्यावर जायचं आहे. तेथूनच गूहेत जाण्याचा मार्ग आहे." शिवा उत्साहाने ओरडला.
" म्हणजे इथून पुढे कॅमेरे बसवलेले नाहित." पीटर उत्साहाने म्हणाला.
"कदाचित. पण आपल्याला लवकर गुहेत जावं लागेल."अमित म्हणाला.
सारे त्या सरोवराजवळ पोहचले. त्यांच्या लक्षात आल की सरोवराच्या पृष्ठभागावर पाणी आहे पण खाली दलदल आहे.मधल्या गोल उंचवट्यापर्यत जाण्याचा मार्ग ते शोधू लागले. आता दुपार होऊन गेली होती.सारे दामले होते.
" आपल्याला इथून जावं लागेल.इथे पाणी प्रवाही आहे. कुठेतरी ते खाली ओढले जातंय.इथे दलदल असणार नाही. "शायना ओरडली.
" निश्चित? नाहितर सगळ्यांना इथेच समाधी मिळेल." अमित म्हणाला.
"तू नेहमी शंका घेत रहा. चला रे.?"
सारे पाण्यात उतरले.छातीएवड् उंच पाणी होत.सर्वात मागे ईलियास होता.काही वेळातच ते त्या उंचवट्यावर पोहचले.
" शिवा, तू वर चढून खात्री कर." पीटरने सूचना केली.
शिवा दगडांना पकडत झपाझप वर चढला.
" एका वेळी एकमाणूस उतरू शकेल एवडीखाली पोकळी आहे." शिवाने माहिती दिली.
" अमित तू वर जा. आधी खात्री करा आत काही नाही याची. "
अमित वर गेल्यावर शिवा त्या पोकळीत उतरला.अंग चोरत- आक्रसत तो खाली गेला.
" अमित इथे दहा बारा माणसं बसू शकतील एवढी मोकळी जागा आहे. सगळे इथे या.अमितने सगळ्यांना वर येण्याची सूचना केली.सगळे गुहेत उतरले.खडकातून कोरल्यासारखी एक नैसर्गिक खोली होती. सगळे दमले होते. जागा मिळेल तिथे बस्तान ठोकून ते शांत पडून राहिले.
एवड्यात वर घरघर ऐकू आली .
"उपर ड्रोन है. उडवू काय ?" ईलियास गन उचलत म्हणाला.
" नको, त्याने ते सावध होतील. आता फांद्या छाटत बसण्याऐवजी सरळ मुळावरच एकच अंतिम आधात करूया." पीटरने त्याला आवरल.
काही वेळ ड्रोनचा आवाज ऐकू आला व नंतर बंद झाला.
सार्यांनी शिल्लक राहिलेली पॅकेटस वाटून खाल्ली.पाणी पिऊन ताजेतवाने झाले.
" थोड्या वेळाने पुढे सरकुया." शिवा म्हणाला.
----------*---------*-----------*--------------*-----------
मूर्तीने यावेळी चार जीप्स मागून तीस माणसं पाठवली होती.यातल्या प्रत्येकाजवळ बंदुक होती. कमरेला सुरा अडकवलेला होता.हे भाडोत्री गुंड दगडी चळतीपर्यंत पोहचले. आता पुढे दलदलीतून गाड्या नेणे शक्य नव्हते. समोरच्या सरोवरात कुणी गेल असेल अशी शंकाही त्यांना आली नाही. टोळक्या- टोळक्यांनी ते सारा परीसर पिंजून काढू लागले.त्यातल्या एका टोळक्यावर दबा धरून बसलेल्या भुकेल्या रानटी कुत्र्यांनी हल्ला चढवला.हे कुत्रे सुलेमानने बेटावर सोडले होते.आज त्याच्याच माणसांवर त्यांनी हल्ला चढवला होता.सहा कुत्र्यांनी एकाचवेळी झेप घेतली होती.त्यांच्या चाव्यांनी व तीष्ण नखानी जखमी झाल्याने हातातल्या बंदुका फेकत ओरडत त्यांनी पळ काढला. बंदुका झाडण्याचे भानही त्यांना राहिले नाही. ह्या भीषण हल्ल्यात एक माणूस तिथंच तडफडत पडला.क्षणातच क्रूर रानकुत्र्यांनी त्याच्या शरीराचे लचके तोडले.
बाहेर हा गोंधळ सुरू असताना. गुहेतल्या पाचहीजणांनी पुढे सरकारला सुरूवात केली होती. आत गुहा अरूंद व ओलसर होती. कधी सरपटत तर कधी बसत ते सरकत होते.वळणा वळणाने जाणार्या त्या अंधार्या गुहेतून जाणे खूपच जिकिरीचे होते. किती वेळ गेला कुणास ठाऊक आता थोडा चढ सुरू झाला होता. लाटांचा आवाज येत होता.
"आपण गुहेच्या दुसर्या टोकाजवळ आलोय " शिवाने सर्वाना जाणीव दिली.
अखेर शिवा गुहेच्या बाहेर पडला.बाहेर अंधुक दिसत होते.उसळत्या लाटा किनार्यावरच्या खडकांवर आदळून पांढरा फेस वर उडत होता. सारे किनार्यांवर आले.त्यांच्या पाठिमागे सुलेमानचा आलिशान महल होता. संधिप्रकाशात पीटरने इमारतीचे निरिक्षण केले.
"उजवीकडे शस्त्रागार आहे.....तर डावीकडे पाहरेकर्रांची खोली आहे. दोन्ही बाजूला टेहळणी बुरुज आहेत.मशिनगनधारी एक- एक व्यक्ती तिथे आहे.
इथ या नकाशात दाखविल्याप्रमाणे ...समोरच्या बाजूला फक्त दोन हत्यारबंद पाहरेकरी आहेत." शिवा सर्वांना समजावत म्हणाला. आता पूर्ण काळोख झाला होता.बुरूजावरची सर्च लाईट सुरू झाली होती.
" शिवा तू भिंतीचा आधार घेत डावीकडून पाहेकर्यापर्यंत जा व त्याचा निकाल लाव. ईलियास तू टेहळणी बुरूजावरच्या पाहरेकर्याना उडवायच...सर्चलाईट दर तीस सेकंदात पुन्हां त्याच जागी येते.या कालावधीत काम उरकायच .मी ,अमित..व शायना उजवीकडून जातो व तिथल्या पाहरेकर्याचा निकाल लावतो. इथे फार माणसं दिसत नाहीत. कदाचित आपल्या पाठलागावर गेलेले अजून परत आले नसतील.आम्ही शस्त्रागाराचा ताबा घेतो.तुम्ही पाहरेकर्यांची खोली बाहेरून बंद करा. हे सगळ बिनचूक घडल पाहिजे. थोडीशी चूक झाली तर आपल्या सर्वांचा निकाल लागलाच समजा. चला." सगळ्यांनी हात ऐकमेकांशी मिळवत निरोप घेतला.अमित व शायना कही क्षण एकमेकांचा हात धरून गप्प राहिले.एक नव नात त्या दोघांमध्ये निर्माण झाल होत.अंधारात चेहर्यावरचे भाव दिसत नव्हते पण स्पर्श बोलका झाला होता.अखेरची लढाई होती. पुन्हा भेट होईल की नाही ते माहित नव्हते.
सारे दबक्या पावलांनी इंच-इंच सरकू लागले.बेटावर गेलेली माणसं परतण्याचा अगोदर काम उरकाव लागणार होत.
शिवा व शायना एकाच वेळी इमारतीच्या कोपर्यात पोहचले. गस्त घालणारा पाहरेकरी जसा जवळ आला तशी शिवाने झेप घेतली व पाहरेकर्याच्या तोंडावर डावा हात ठेवून उजव्या हाताने त्याची मान डाव्या बाजाराला फिरवली. डोळे फिरवत तो गार झाला. त्याला जमिनीवर झोपवत शिवाने त्याची गन ताब्यात घेतली. इकडे शायनाने दुसर्या पाहरेकर्याच्या सगळ्याचा वेध घेत किक हाणली. आवाज न करता तो खाली कोसळला. अमितने झपकन पुढे होत त्याला पकडलं व त्याला अलगद खाली झोपवल. टेहळणी बुरूजावरच्या पाहरेकर्यांना संशय आला.ते सावध होत आहेत तोवर ईलियासने त्यांचा अचूक वेध घेतला.
पीटरने पाहरेकर्याकडची बंदूक खेचून घेत.शस्रगाराकडे धाव घेतली. दरवाज्याचे कुलूप बंदुकीने उडवत तो आत घुसला त्यापाठोपाठ अमितही आत गेला.आत जाताच दोघांचे डोळे विस्फारले. आत अनेक प्रकारच्या बंदुका.... काडतुसे ... पिस्तुले...हॅडग्रेनेड...अशी अत्याधुनिक हत्यारे होती.दोघांनी दोन गन उचलल्या तर अमितने काही हॅडग्रेनेडही घेतले.गडबड ऐकून मूर्ती आपल्या रूमच्या बाहेर आला. पण तो पिस्तुल खिशातून बाहेर काढणार तोपर्यंत ईलियास व शिवा त्याच्यासमोर उभे ठाकले.
" क्यों बे फट गयी क्या?" ईलियासने त्याच्यावर गन रोखत विचारले.
शिवाने दोन ठोसे त्याच्या तोंडावर हाणले.
"तू यांचा बाॅस काय?
मूर्ती तत..पप.. करू लागला.
वैतागलेल्या ईलियासने बंदुकीचा दस्ता मूर्तीच्या पाठीवर हाणला. धडकन मूर्ती जमिनीवर आदळला. त्याच तोंड रक्तबंबाळ झाल. तेवढ्यात आतून दोन खानसामे बाहेर आले.ते प्रचंड भयभित झाले होते.संतापलेल्या शिवाने आपल्या घनाघाती ठोश्यांनी त्याना अक्षरशः बुकलून काढले. दोघेही बेशुध्द होऊन पडले.
इकडे अमित नजिकच्या आलिशान केबीन मध्ये घुसला .
तिथे सुलेमान शानदार खुर्चीवर बसून निवांतपणे ड्रिंक घेत होता.त्याचे डोळे लालसर झाले होते. अमितला बघताच त्याने टेबलावरचा पिस्तुल उचलण्याचा प्रयत्न केला.पण अमितने अचूक वेध घेत त्याचा उजवा पंजा फोडला.रक्तबंबाळ हात झटकत तो वेदनेचे कळवळू लागला.
" माय... माय ह्यो सुलेमान बेग.. बरोबर न्हु?" आत शिरलेली शायना ओरडली.
"सुलेमान बेग..! कोण सुलेमान?" अमितने विचारले.
"जगप्रसिद्ध डॉन..स्मगलिंग...अपहरण...खून...गॅगवाॅर...अमलीपदार्थांची...तस्करी..हे सारे धंदे करणारा..जगभरच्या पोलिसांना हवा असलेला ईनामी गुन्हेगार. याने आपल्या बापाला त्याच्या वाढदिवसाला उडवल होत.मी याच्यावरच आर्टिकल वाचल होत.त्यात याचे अनेक फोटो होते."
हे ऐकताच अमितने दणादण सुलेमानला हाणायला सुरूवात केली. संतापलेल्या अमितने सुलेमानच्या उजव्या गुडघ्यावर गोळी झाडली.वेदनेने किंचाळत तो खाली आपटला.
"सर्वांना एका खोलीत बंदिस्त करूया व या रावणाची लंका जाळून टाकूया.यांचं काय होईल ते यांच्या नशिबावर सोडूया. या इमारतीत अंमली पदार्थांचा प्रचंड साठा आहे." पीटरने सूचना केली.त्यानी सर्व जखमींना एका खोलीत बंदिस्त केले.ईलियासने तिथे उभ्या असलेल्या तिन कारचे टायर गनने निकामी केले.फक्त एक जीप शिल्लक ठेवली.अमित व पीटरने हॅडग्रेनेड फेकून शस्त्रागार व दोन्ही टेहळणी बुरुज उध्वस्त केले.कानठळ्या बसवणारा आवाज व धडधडत्या ज्वाळांनी ते बेट उजळून निघाले. जीवन- मरणाचा खेळ रचणार्या सुलेमानचा खेळ संपला होता.त्याच साम्राज्य उध्वस्त झाल होत. सारे जीपमध्ये बसले.ईलियासने जीप सुसाट पळवत किनारा गाठला .तिथे तीन स्पिडबोटी होत्या. सावधगिरी म्हणून शिवाने दोन बोटींची ईंजिन नादुरुस्त केली.
-------------*-----------*---------------*----------*-------
बोटीच्या रेलिंगला टेकून शायना व अमित उभे होते.दोघांच्याही ह्रदयात घालमेल सुरू होती.पहिलं कुणी बोलाव हाच खरा प्रश्न होता.
"अमित अठ्ठाविस फेब्रुवारीला माझा वाढदिवस आहे .एक दिवस गोव्यात थांबशील?" शायनाने अमितला विचारलेले.
" काय अठ्ठाविसला? माझाही वाढदिवस त्याचं दिवशी आहे. मला वाटत...हा योगायोग नाहिय. कदाचित आपल्या सर्वांची जन्मतारीख अठ्ठाविस फेब्रुवारी असणार.यासाठीच त्या हरामखोरान आपल्याला एकत्र आणलं असणार."
" होय .नक्कीच तसच असणार. कारण मला आठवतंय त्याने अठ्ठाविस फेब्रुवारीला आपल्या बापाला मारलं होत."

अमित हसला .शायनाचा हात पकडत तो एवढंच म्हणाला...
"आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी मला ...एवड्या जवळच वाटल."
अन शायना उभ्या आयुष्यात पहिल्यांदाच लाजली.

वाटेत त्यांना भारतीय नौसेनेची गस्त घालणारी बोट मिळाली. चमन बेट व त्यावर चालणारे उद्योग याची माहिती त्यांनी अधिकार्यांना दिली.
दुसर्याच दिवशी भारतीय नौसेनेने ते बेट ... जखमी सुलेमान व त्याच्या माणसांना ताब्यात घेतले होते.
---------*---------*------------*--------------*--------
समाप्त