life in Marathi Short Stories by Pratiksha Patil books and stories PDF | आयुष्य

Featured Books
Categories
Share

आयुष्य

कार्यक्रम दिवसभर चालू होता टाळ्यांचा कडकडाट चालू होता मला स्टेज वर बोलावलं गेलं आणि माझा सत्कार केला गेला मला दोन शब्द बोलायला सांगितलं गेलं. माझा लेखन जीवन वाट याबद्दल मी खुप काही share केलं माझे मित्रांमैत्रिणी शिक्षकांवर्ग सर्वजण होते
पण एका अशी माझी मैत्रीण मात्र अजूनही आली नव्हती आता येईल नंतर येईल असं करत अगदी कार्यक्रम संपून गेला. तरीही ती आली नाही ती का आली नसेल या गोष्टीने माझं व्याकुळ होत. आजारी तर नसेल ना कि मी तिला दहा वर्षांनी भेटत आहे म्हणून ती नाराज तर नाही ना कि तीला मला भेटायचंच नाही म्हणून आली नाही का बर ती आली नसेल वरची कोणतीही शक्यता मला मंजूर नव्हती सगळ काही आनंदात झालं पण मला तिची हुरहूर लागली होती मला राहवत नव्हतं मी कॉलेज मधून तिचा ऍड्रेस घेतला
पण आता दिवस मावळला होता. मन मानत नव्हतं तरीही स्वतःच्या घरी गेले जेवण कसेबसे पूर्ण केले आणि बेडवर आडवी झाले. उद्या लेखणी मध्ये कोणता कथा लिहू असा विचार करता करता तिचाच विचार डोक्यात यायला लागला झोप लागेना पण तिच्या विचारामध्ये मन अगदी बुडून गेलं आणि कॉलेज मधल्या आठवणी मध्ये परत मन गुंतल.तोच तो दिवस ज्या दिवशी मी फर्स्ट टाइम तिला भेटले . भेटले म्हणजे काय आग आणि पाण्याचा गोळा एकाच ठिकाणी तीच नाव रुही बघताच क्षणी डोळ्यात भरावी अशी त्या दिवशी कॉलेज चा फर्स्ट डे होता सगळेजण स्वतःच्या मम्मी सोबत वडिलांसोबत कॉलेजला हजर झाले होते. मात्र या रुही मॅडम ज्या सिनियर होत्या आमच्या या चक्क बुलेट वरून एन्ट्री. ती आली कि सगळा कॉलेज तिला बघायला गर्दी करायचा ती नेहमी अशीच एन्ट्री मारायची. बुलेट वरून येण काय, काय तिची एन्ट्री आणि style ने हेल्मेट काढणं आणि style ने गॉगल चढवण.वाह तोडनातून एकच वाक्य निघत तुझ्यासारखी कोणच नाही. आणि ते तितकंच खरं होत तिच्यासारखी कुठेच कोणीही नव्हतं. त्या दिवशी माझंही कॉलेजचा फर्स्ट डे होता.मी कॉलेज मध्ये पहिल पाऊल ठेवलं आणि समोर ही दबंग गर्ल जी एका चेअर वर बसली आहे अगदी आरामात. आणि दोन्ही हात मागे डोक्याला बांधलेले तिची नजर माझ्यावर गेली आणि ती मला ईशाऱ्याने इकडे ये असं खूणवत आहे हे मी बघितलं मग मी तिच्याकडे गेले तर तीने मला नाव विचारलं मी सांगितलं रुचिता ती म्हणाली नाईस name डिअर त्यावर मी तिला थँक्स म्हटलं. बघता बघता तीने मला विचारलं नवीन आहेस का इथे मी म्हटलं हो. तीने नंतर मला उठाबषा काढायला सांगितल मी नाही म्हटल तिने म्हटलं हे बघ इथं येणाऱ्या नवीन मुलींना मी जे सांगते ते करावं लागत. मी म्हटलं मी नाही करणार. मी मनातल्या मनात विचार केला भलेही काहीही होऊ दे मी हा अन्याय सहन करणार नाही आणि मी शेवटचं नाही उत्तर देऊन तेथून निघून गेले. But रुही दुसऱ्या दिवशी
माझ्या समोर आली आणि तिने खिशातून कलर ची डबी काढली आणि सगळा कलर माझ्या व्हाईट शर्ट वर फेकला मी काहीच म्हटलं नाही. रुही चा राग वाढला असं कित्येक दिवस चालू होते एक दिवस मला स्टेज वर एक भाषण द्यायचं होत त्या दिवशी रुही ने माझ्या शर्ट वर इंक फेकलं. मला खुप राग आला कारण मला स्टेज वर जायचं होत आणि भाषण द्यायचं होत. तेवढ्यात मला स्टेज वर बोलावण्यात आलं. रुहीने मला सॉरी म्हटलं but वेळ निघून गेली होती रुही ला रागाने बघून मी स्टेज वर गेले सगळेजण मला बघून हसत होते तरीही मी कसेबसे भाषण दिले आणि स्टेज वरून खाली आले.
टाळ्या वाजत होत्या
रुही ने परत सॉरी म्हटलं but मी तीच नाही ऐकलं आणि मी तिथून निघून गेले.