Struggle - 4 in Marathi Fiction Stories by dhanashri kaje books and stories PDF | स्ट्रगल - भाग-4

Featured Books
Categories
Share

स्ट्रगल - भाग-4

विराज खुर्चीवर बसत बोलतो.

“सॉरी जरा उशीर झाला. अरे, हे काय तु काही मागवल नाहीस. (ऑर्डर देत.) वेटर.. (वेटर येतो.) दोन चहा. (वेटर ऑर्डर घेउन निघुन जातो). (परत विक्रमला) हं विक्रम या इडस्ट्रीत काम करायच असेल तर खुप स्ट्रगल करावा लागतो आहे तुझी तयारी.”

विक्रम लगेच म्हणतो.

“हो सर माझी तयारी आहे. मी घेईन मेहनत तुम्ही फक्त सांगा मी काय करु ते मी माझ्या कथेसाठी वाट्टेल ते करायला तयार आहे.”

विराजला समजुन जात. आपण योग्य दिशेने चाललो आहोत. तो लगेच म्हणतो.

“ठीक आहे मग उद्या सकाळी १० वाजता याच ठीकाणी मला भेट आपल्याला एका ठीकाणी जायच आहे. तुझ्या कथे बद्दल एका सरांशी बोललोय जस्ट त्यासाठीच बाहेर गेलो होतो. आणि आणखी एक गोष्ट ईथे हेखेखोर पणाने वागुन काहीच मिळत नसत हे लक्षात ठेवायच. काय”

विराजला नेमक काय सांगायच होत हे विक्रमला समजत. तो विराजला म्हणतो.

“सॉरी ते तुम्ही एकदम माझ्या कथेला नकार दिलात तर मला जरा राग आला माफ करा ह चुक झाली माझी पण तुम्ही जे सांगितल ते खर आहे का म्हणजे माझी कथा.”

लगेच विराज विचारतो.

“तुला नक्की माझ्यावर विश्वास आहे न? नाही म्हणल असे प्रश्न विचारतो आहेस म्हणून विचारल.”

विक्रम त्याला म्हणतो.

“तस नाही सर त्याच काय आहे न माझी ही पहीलीच वेळ आहे म्हणून. आणि मी अस ऐकलय की इथे लगेच कुणाच ही काम होत नसत म्हणून बस”

दोघांच्या गप्पा सुरू असतात. तेवढयात वेटर चहा घेउन येतो.

विराज चहा घेत घेत बोलु लागतो.

“अगदी बरोबर बोललास तु. इथे कुणालाच लगेच काम मिळत नाही अगदी एखाद्याला कुणी गॉडफादर असेल तरी सुध्दा थोडक्यात सांगायच तर मेहनती शिवाय पर्याय नाही तु लकी आहेस तुला बोलावल तरी नाही तर या इंडस्ट्रीत साध उभ सुध्दा कुणी करत नाही. बर ते जाउ देत मला सांग पुढे काय करायच ठरवल आहेस.”

विक्रम जरा विचारात पडतो. ते बघुन विषय बदलायच म्हणून विराजच म्हणतो.

“असा भांबावल्या सारखा नको बघुस बघ मला तुझी कथा आवडली आहे. आणि म्हणून उदया आपण निर्मात्यांकडे जाणार आहोत तेव्हा ते साधारण काय विचारु शकतील याची एक ओझरती तयारी करुन ठेव हे पहा. समोरची व्यक्ती निर्माता जरी असली आणि त्यांना प्रत्येक गोष्टीच ज्ञान जरी असल तरी एक रायटर या दृष्टीने तुला सुध्दा ज्ञान असण गरजेच आहे. म्हणजे कथानकाची पार्श्वभुमी लोकेशन्स अस तर त्या सगळया ची तयारी करुन ठेव हं. तुला जे जे वाटतय त्या प्रत्येक गोष्टीची तयारी करुन ठेव.”

विक्रम अगदी लक्ष पुर्वक ऐकत असतो. आणि मनाशी ठरवत ही असतो आपल्याला काय काय तयारी करायची आहे. तो विराजला म्हणतो.

“हो, नक्कीच सर थँक्यु सो मच की तुम्ही इतका वेळ देउन मला मर्गदर्शन केल मी नक्कीच चांगली तयारी करेन.”

दोघ गप्पा मारत चहा घेतात.

काही वेळा नंतर...

विराज घडयाळा कडे बघतो. आणि म्हणतो.

“अरे, बाप रे बराच वेळ झाला चल मी निघतो माझी एक महत्वाची मिटींग आहे भेटू आपण उदया.”

दोघ हँडशेक करतात. आणि आपापल्या वाटेने निघुन जातात.

विक्रम आपल्या घरी परत येतो. इकडे गणपत ही घरी आलेला असतो. गणपत साठी विक्रम लहान भावा सारखाच असतो. म्हणून तो मिटींगमध्ये काय झाल हे जाणुन घ्यायला आणि त्याच्या नोकरीच काम झाल आहे हे सांगायला खुप उत्सुक असतो आणि त्याची आतुरतेने वाट पहात असतो. तेवढयात विक्रम येतो. त्याला आलेल बघुन गणपत त्याला विचारतो.

“अरे, ये.. ये.. हॉटेल सापडायला काही त्रास तर झाला नाही न. व्यवस्थीत झाल न सगळ?”

आपले शुज काढत विक्रम म्हणतो.

“नाही नाही काहीच त्रास झाला नाही उलट सोप्प होत सापडायला. आणि मिटींग तर मस्तच झाली उदया १० वाजता बोलावल आहे एका निर्मात्यांनी ज्यांच्या बरोबर मिटींग होती आज तेच निर्मात्यांशी बोलले.”

हे ऐकताच गणपत जरा विचारातच पडतो. कारण धीरजने देखील गणपतला तीच वेळ दिलेली असते. आणि विक्रमच बोलण ऐकल्यावर त्याला प्रश्न पडतो की “आपण विक्रमला नोकरीच कस सांगायच” म्हणून तो शांत रहायच ठरवतो. व त्याच्या आनंदात शामील होतो. विक्रम आपले शुज काढतो आणि दोघ घरात येतात.

विक्रम फ्रेश व्हायला आपल्या खोलीत निघुन जातो. आणि गणपत हॉलमध्ये खुर्चीवर येउन बसतो.

काही वेळा नंतर...

गणपत आपल्याच विचारात असतो. तेवढयात विक्रम फ्रेश होउन येतो आणि गणपत शेजारी बसतो. व गणपतला विचारतो.

“दादा, एवढे शांत का? काही प्रॉब्लेम आहे का? तुम्ही मला सांगु शकता तुम्ही आज धीरज सरांकडे गेला होतात न काय झाल? त्याच.”

विक्रमच विचारण ऐकुन गणपत अजुनच विचारात पडतो. पण तरी हिम्मत करून सांगतो.

“हे बघ विक्रम तुला आता वेळेच नियोजन कराव लागेल. तु म्हणत आहेस नोकरी आणि तुझ हे स्वप्न तुला दोन्ही करायच आहे. मग कस मॅनेज करणार आहेस तु? तु काही प्लॅनिंग केल आहेस का? आता हेच बघ तुझी उदयाची मिटींग आणि तुझा इंटरव्हु दोन्ही एकाच वेळी आले आहेत जागा ही वेगवेगळया दिशेच्या आहेत मग कस करशील. मला वाटत तु जॉबचा विचार थोडा बाजुला ठेवावास पैसे कुठे पळुन जात नाहीत आधी पुर्ण लक्ष तुझ्या क्षेत्रावर केंद्रीत कर मग पुढचा विचार कर आणि पैश्याच इतकच महत्वाच वाटत असेल तर तुमच ते काय असत न फ्रीलांसींग वगैरे ते बघ घरातच असतोस न. हातात मोबाईल असतो सारखा बघ की त्याच्या वर काय झाल त्यात. मी आपला तुला सजेस्ट केल विचार करुन बघ यावर.”

विक्रमला त्याच बोलण पटत. तो गणपतला म्हणतो.

“खर आहे दादा तुमच दोन नावांवर पाय ठेवण्यापेक्षा मी एकच क्षेत्र निवडायला हव. पण मग धीरज सर.?”

गणपत म्हणतो.

“तु त्याची काळजी करु नकोस. मी घेइन सांभाळुन आता फक्त तु तुझ क्षेत्र बघ (थोडस थांबुन). तु वडीलांनी सांगितल्या प्रमाणे लहान मुलांना शिकवाला का सुरवात करत नाहीस. मी अस ऐकल होत कुठे तरी ऑनलाईन देखील मुलांना शिकवता येत असत. तुझ्या वडीलांची इछा पण पुर्ण होईल.”

हे ऐकताच विक्रमला खुप आनंद होतो. आणि त्या आनंदाच्या भरात तो गणपतला विचारतो.

“दादा, तुमच्याकडे जादुची कांडी आहे का एखादी? प्रत्येक प्रश्नाच कस हो उत्तर असत तुमच्या कडे. मी याचा विचारच केला नव्हता खुप खुप धन्यवाद तुम्हाला. मुलांना शिकवता शिकवता आता मी लीखाणा कडे पण नीट लक्ष देउ शकेन आणि बाबांची सुध्दा इछा पुर्ण होईल या निमीत्ताने.”

दोघ हसतात. तेवढयात दुर्गाबाई हॉल मध्ये येउन सांगतात.

“तुमच्या गप्पा झाल्या असतील तर बसुयात का जेवायला जेवणाची तयारी झाली आहे.”

लगेच दोघ उठतात आणि किचनकडे निघतात. इकडे दुर्गाबाईंनी सगळी जेवणाची तयारी केलेलीच असते. दोघ हात पाय धुउन जेवायला बसतात.

जेवण झाल्या नंतर...

गणपत आणि दुर्गाबाई आपापल्या खोलीत दुपारच आराम करायला निघुन जातात आणि विक्रम आपल्या खोलीत येतो. त्याच्या डोक्यात आता एक विचारचक्रच सुरू झालेल असत. कारण आपला आणि मुंबईत राहण्याचा खर्च भागवण्याचा एक खुप सुंदर मार्ग त्याला मिळालेला असतो. पण त्या मार्गाचा उपयोग कसा करायचा या विचारात तो असतो. आणि ऑनलाइन शिकवण्या कश्या सुरू करायच्या याची माहीती शोधु लागतो.

क्रमश:

नोट : आपल्या आयुश्यात काही चांगल्या गोष्टी तर काही वाईट गोष्टी या घडतच असतात. आता पहायच आहे विक्रमच्या आयुष्यात पुढे काय घडत ते. “वाचत रहा आणि नवीन गोष्टी शिकत रहा.” भेटुच लवकर