Self respect in Marathi Motivational Stories by Vaishnavi Meena Kiran Bhalerao books and stories PDF | स्वाभिमान

Featured Books
Categories
Share

स्वाभिमान

'स्वाभिमान' म्हणजे घमंड नव्हे तर स्वतःच्या अस्तित्वाची एक धमक प्रत्येकामध्ये स्वाभिमान हा असलाच पाहिजे. नाहीतर आपली किंमत शून्य होऊन जाते आणि तीच ओळख किंवा अस्तित्व टिकवण्यासाठीची ही एक चळवळ, धडपड. स्वाभिमान असल्याशिवाय कोणी सुखी होऊ शकत नाही. आपण जर आपला स्वाभिमान जपला तर कोणतीच व्यक्ती ही आपला अपमान करणार नाही कारण आपण स्वतःच्या अस्तित्वासाठी उभे असतो. स्वतःवर कधीही प्रथम प्रेम करावे. कारण जो स्वतःवर प्रेम करतो तो कधीच आपला स्वाभिमान गमवत नाही. जी व्यक्ती स्वतःचा स्वाभिमान जपते तिला समाजातही मानसन्मान मिळतो. प्रत्येकाला आपला स्वाभिमान जपता आला पाहिजे. स्वाभिमानाने वागणे म्हणजे खूप घमंडी आहे ही व्यक्ती असे समाजतात. कोणाकोणाला नाही जमत कोणाच्या पुढे पुढे करणे किंवा त्यांच्या होला हो मिळवली जर तो व्यक्ती एखाद्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागला, तर तो चांगला जर तो त्याच्या मनाविरुद्ध वागला तर तो वाईट ठरत . पण हे लोकांच्या लक्षात येत नाही की त्याला त्याचा स्वाभिमान महत्त्वाचा असतो . काही लोक आपला स्वाभिमान जपत असतात तेव्हा ती लोक समाजात एकटे देखील पडतात . स्वाभिमान असणारे कधी कोणापुढे झुकतनाही . जे आपली स्वतःची एक ओळख निर्माण करतात. स्वतःचा मार्ग स्वतः निवडतात . आयुष्याच्या वळणावर जाता जाता त्याला खूप अडथळे आले तरी तो घाबरून न जाता पुढे चालत राहतो. तो आयुष्यात कधीही एकटा पडत नाही आणि तो पुढे जाऊन खूप यशस्वी होतो. तसेच अहंकारापेक्षा नात्याला जपणं नक्कीच महत्त्वाच आहे पण तुमचा स्वाभिमान सोडून नातं जपणं नक्कीच महत्त्वाचं नाही तुमच्या मनाची शांतता स्वाभिमान मूल्य यांचा भंग करणाऱ्या माणसांपासून दूर राहणं हाच शहाणपणा आहे. कारण कोणत्याही नात्यात स्वाभिमानाला तडा जाणं हे परवडण्यासारखे नाही . त्यामुळे स्वाभिमान जपण्यासाठी तुम्हीच कणखरपणे उभे राहायला हवं तुम्हाला मदत करायला कोणीही येणार नाही त्यामुळे कधीच कोणाला उधार आणि आधार मागून जगणं लाचार करू नका. कारण आपल्या मनगटाच्या जोरावर आपण स्वाभिमानाचे साम्राज्य उभ करून ताट मानेने जगू शकतो. स्वाभिमानाच्या जोरावर आपण कोणतीही गोष्ट मिळू शकतो . आपण हे जग जिंकू शकतो. स्वाभिमानापेक्षा महान जगामध्ये कोणतीच गोष्ट असू शकत नाही. कारण तो जपण्यासाठी सर्वात जास्तमेहनत करावी लागते . कारण स्वतःशी प्रामाणिक राहणं हे स्वाभिमानाचे सर्वात महत्त्वाचे स्वरूप आहे . हे नेहमी लक्षात ठेवा . कारण कोणत्याही नात्याचा पाया हा विश्वास आणि आदर हा स्वाभिमानावर टिकून असतो . स्वतःला सुधारण्यासाठी जास्त काम करा स्वतःला सिद्ध करण्यासाठी नाही. सुधारण्यासाठी काम केल्यास स्वाभिमान जपला जातो. आणि सिद्ध करताना अहंकार बळावतो. नातं टिकवताना आयुष्यामध्ये खूप अडचणी येतात. जर एखादी व्यक्ती तुमचा पदोपदी अपमान करत असेल किंवा तुम्ही जर कोणती गोष्ट करत असाल तर त्या गोष्टींच्या चुका काढत असेल किंवा तुम्ही एखादा निर्णय घेतला तर तो किती चुकीचा आहे हे वारंवार दाखवत असेल आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही किती चुकीचे आहात हे सांगत असेल तर ते सहन न करता आपल्या स्वाभिमानासाठी बोललेच पाहिजे. मग ते बोलणे उलट असू किंवा चुकीचे असू आपल्या स्वाभिमानासाठी उभे राहणे हे महत्वाचे. भले तो व्यक्ती तितकासा त्या गोष्टी समजून घेण्यासाठी योग्य नसेल किंवा त्या गोष्टींच त्याला ज्ञान नसेल तरी मीच कसा खरा आहे. हे सांगत सुटत असेल तर त्याला वेळीच थांबवणे कधीही योग्य आपल्या मनाचे खच्चीकरण न करता न डगमगता त्या गोष्टींचा विरोध करणे कधीही योग्य .अशा व्यक्तींशी जवळीक न करता तशा व्यक्तीपासून लांब राहणे कधीही योग्य . स्वाभिमान जपला तर आपल अस्तित्व टिकून राहील. स्वाभिमान हेच आपलं अस्तित्व.