Te Chaar Divas - 2 in Marathi Fiction Stories by बाळकृष्ण सखाराम राणे books and stories PDF | ते चार दिवस - भाग 2

Featured Books
Categories
Share

ते चार दिवस - भाग 2

ते चार दिवस --भाग 2
26 डिसेंबर 2020
स्थळ - चौकुळ
सकाळचे नऊ वाजले होते. शरद गावडेच्या बंगल्यासमोरच्या परिसरात सुमारे शंभराच्यावर गावकरी हजर होते. गावात अपहरणकर्त्याच्या निषेधाचे फलक लागले होते. सर्व स्थानिक वर्तमानपत्रात अपहरणाची बातमी आली होती.सर्वजण पोलीसांची वाट बघत होते. एवड्यात पोलीसांची गाडी आली. इन्स्पेक्टर इलियास खान गाडीतून उतरले.उंच व तगडा असा हा तरूण इन्स्पेक्टर गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळखला जायचा.घारीसारखी तीक्ष्ण नजर..चौकस बुध्दी.. समोरच्याला कोड्यात टाकणारे प्रश्न यामुळे प्रत्येक केसमध्ये तो यशस्वी व्हायचा.बंगल्याच्या बाहेर ऐवडे लोक बघून तो वैतागला.पण गावकर्यांच्या भावना लक्षात घेवून तो गप्पपणे बंगल्याच्या आत गेला.आत हॉलमध्ये
रिमा, उषा,समीर,संजना,प्रशांत व घनश्याम ऊभे होते.
" आणखी कोन आहे घरात?"
" यांची बायको..सावित्री..ती दोघं इथले केअर टेकर आहेत." समीर घनश्यामकडे बोट दाखवत म्हणाला.
खानने समीरकडे त्रासिक नजरेने बघत विचारले-
"तुम्ही तिघं कोण? तुमचा शरद गावडेंशी काय संबध?"
समीरने आपण कोण...चौकुळमध्ये का आलो व इथे सर्वात पहिल्यांदा कसे आलो ते सांगितले. उषाचा फोन त्यातील रेकॉर्डींग...प्रशांतने काढलेले गुन्हेगाराचे स्केच व त्यावरंन तयार केलेला थ्रीडी फोटो दाखवला.सुरवातीला चिडलेला इलियास खान शांत झाला.हे तरूण हुषार आहेत...केसमध्ये त्यांनी बर्यापैकी प्रगती केलीय हे त्याच्या लक्षात आले.त्याने बरोबरच्या हवालदाराच्या ताब्यात स्केच ,फोटो व रेकॉर्डींग दिले. स्वताःच्या मोबाईलमध्ये ते पुरावे घेतले.
" मुलीचे आईवडिल कुठे असतात. त्यानां कळवले?"
त्याने घनश्याम विचारले.
" साहेब , शरद मुंबईला असतो.त्याला फोन केलाय. येतील एवड्यात."
"बर,अन मुलीची आई?"
घनश्याम क्षणभर गप्प राहिला.मग म्हणाला-
"दोघं वेगेळे राहतात."
"हं अस आहे तर..दोघांच्या भांडणातून हे घडल असावं.. दोघांचीही चौकशी करावी लागेल. काल या मुलींना इथे सोडून गेलेल्या ड्रायव्हरचीही चौकशी करावी लागेल.कारण या मुली मुंबईहून इथे आल्यात हे फक्त त्यालाच माहित होत." खान म्हणाला.
" सर मला वाटत हे काम एकट्यानेच केलय."समीर म्हणाला.
" सांगता येत नाही; त्याचा एखादा सोबती गाडीत असावा. जिथे त्याने गाडी पार्क केली होती तिथे मला सिगारेटचं थोटूक मिळालय जी उच्चभ्रू लोक वापरतात.नक्कीच हे इथल्या लोकांचं काम नाही. " खान म्हणाला.
खानने स्केच सावंतवाडी पोलीसस्टेशनाला सेंड केल .ते स्केच सर्व पोलीस स्टेशनला पाठवायला सांगितलं.आंबोली व सावंतवाडी येथील सी.सी टिव्ही फुटेज तयार ठेवायला सांगीतलं.
"हवालदार सावंत...आंबोली व चौकुळचा लॉजवर व रिसाॅर्टवर काल आलेल्या पर्यटकांची माहिती घ्या.त्याना हे स्केच व फोटो दाखवा. आपल्याला एखादा माग सापडेल. चला..आताच हे काम करून या."
ऐवडायातच शरदची कार आवारात दाखल झाली. शरद व रेवतीला एकत्र बघून खान चमकला. प्रवासामुळे व मानसिक तणावामुळे त्यांचे चेहरे कोमेजलेले दिसत होते.
" फ्रेश होवून या...मला तुम्हा दोघांना काही प्रश्न विचारायचे आहेत. या वेळी इतर कोणी नको. " खान म्हणाला.
हवालदार सावंत यांच्या सोबत गावातले काही तरूण लाॅजवर चौकशीसाठी गेले. तर संजना,समीर व प्रशांत बाजूच्या खोलीत लॅपटॉपवर चंद्रिकेच्या मोबाईलमधले फोटो व व्हिडिओ तपासून बघण्यासाठी गेले.त्यातून एखादा सुगावा लागेल अस तिघांना वाटत होत.
शरद व रेवती फ्रेश होवून हॉलमध्ये आले.खान तोपर्यंत विचार करत होता.एका तेरा वर्षेच्या मुलीला किडनॅप करण्याचा हेतू काय असेल? खंडणीसाठी....?..एखादा बदला घेण्यासाठी? की या नवरा-बायकोपैकी कुणी दुसर्याला त्रास व्हावा म्हणून कुणाला तरी पैसे देवून अपहरणाचा नाटक केलय? कुठलीच शक्यता नाकारता येत नाहिय. दोघांच्या चौकशीतून एखादी दिशा मिळेल.
खानने शरद व रेवतीला हे सार गृहित धरूनच प्रश्न विचारले. त्यांच लग्न,त्यांची भांडण..घटस्फ़ोट..त्यांचा कुणावर संशय आहे काय असे अनेक प्रश्न विचारले. पण दोघांनी काही दडवून न ठेवता उत्तरे दिली. चौकशीनंतर खानचा विश्वास बसला की दोघांचा यात हात नाही.पण चंद्रिकेचे अपहरण का केल गेल हेच कळत नव्हते. अजूनही कुणाचा खंडणीसाठी फोन आला नव्हता.
मुलींना सोडावयास आलेल्या ड्रायवरचीही फोनवरून चौकशी खान यांनी केली.पण नवीन कूठचिही माहिती मिळाली नाही.
-----*------*------*--------*--------*---------*--------
समीर लॅपटॉपवर चंद्रिकेच्या मोबाईलमधील फोटो तपासत होता.अनेक फोटो त्यांनी पाहिले.पण संशयित इसम कुठच्याही फोटोत दिसेना.अखेर लिटल चॅम्पस् 2019 चा फोल्डर त्यानां दिसला.चंद्रिका या स्पर्धेत विजयी झाली होती.या स्पर्धेतले अगदी आॅडिशन स्टेजपासूनचे फोटो त्यात होते.यात काही मिळेल अशी अपेक्षा नव्हती. तरीही तिघेही प्रत्येक फोटो व व्हिडिओ काळजीपूर्वक बघत होते.सेमीफायनलच्या फेरीतल्या तिच्या गाण्याचा व्हिडिओ पाहत असताना अचानक प्रशांत ओरडला.."थांब..! ही प्रेम झूम कर."
"काय दिसल तूला?" समीर उत्तेजित होत म्हणाला.
" तो ...थो बघ प्रेक्षकांमधल्या पहिल्याच रांगेत बसलेला इसम..त्याचा चेहरा बघ."
समीरने ती फ्रेम झूम केली...थोड घूसर दिसत होत ते व्यवस्थित केल.त्या व्यक्तीचा चेहरा बघताच तिघेही एकाच वेळी उदगारले..' ओ गॉड..हाच तो."
प्रशांतला काढलेल्या स्केचशी नव्वद टक्के जुळणारा तो चेहरा होता.
समीर लॅपटॉप घेऊन इन्स्पेक्टर खानकडे गेला.
" सर हा माणूस बघा"
खानने बारकाईने ती फ्रेम बघितली.त्याने कौतुकाने प्रशांतच्या खांद्यावर थाप दिली.नुसत्या वर्णानावरून व आवाजावरून प्रशांतने काढलेल स्केच तंतोतंत जुळत होत.
"या चॅनेलच्या व्यवस्थापकाकडून याची माहिती निश्चित मिळेल. हा पहिल्या रांगेत बसलाय म्हणजे हा निमंत्रित किंवा नोंद असलेला प्रेक्षक असावा. खान म्हणाला.
" सर हा मनोविकृत असावा...त्याच्या हालचाली व चेहर्यावरचे भाव तेच सांगतायत ...कालच्या ऑडिओत तेच जाणवत होत.. आपल्याला घाई करायला हवी." संजना म्हणाली.
" खरच ,घाई करायला हवी .पण अपहरणाचा हेतू अजून लक्षात येत नाहीय." खान म्हणाला.
तेवढ्यात चौकुळच्या रिसॉर्टवर चौकशीला गेलेले तरूण परत आले त्यांच्या हावभावावरून त्यांना काहीतरी महत्वाचे सापडलय अस वाटत होत.
" साहेब,ह्या वर्णनाचा एक इसम ' बाबा रिसाॅर्ट' मध्ये आज पहाटे पासून रूम घेवून राहिला होता..व तो रात्री साडेदहा वाजता बाहेर पडला." एक तरूण म्हणाला.
"गुड..त्याने काही आय.डी.प्रुफ दिलाय...त्याच नाव..फोन नंबर?" खानने विचारले.
" साहेब, मॅनेजर माहिती द्यायला तयार नव्हता..पण थोडा मालवणी हिसका दाखवल्यावर माहिती दिली मी रजिस्टरच्या पानाचा फोटो काढून आणलाय.हा बघा."
खानने रजिस्टर पाहिले.मिस्टर रणजित राजमाने नावाने रूम बुक केला होता.पत्ता मुंबई मालाड मधला होता.खाली एक फोन नंबर दिला होता.
"समीर हा फोन नंबर कुणाचा ते शोधून काढशील?" मला संशय आहे हे सीमकार्ड चालू नसणार."
" निश्चित सर." समीर लॅपटॉपवर दिलेला नंबर तपासून लागला.
" सर हे सिमकार्ड मिश्रा नावाच्या व्यक्तिच होत व सध्या बंद आहे."
"सर, त्याच्या गाडीचा नंबर मिळाला तर ओनर व पत्ता शोधता येईल.शिवाय ही गाडी कुठच्या रूठने गेली ते कळेल." प्रशांत म्हणाला.
इन्स्पेक्टर खानने त्वरीत बाबा रिसॉर्टवर फोन लावला.खानच नाव ऐकताच मॅनेजर घाबरला.
" साहेब, रिसेप्शनला विचारतो ....नाहितर कालच फुटेज बघून ताबडतोब फोन करतो."
"ठिक आहे."
सर्व जण हॉलमध्ये बसले होते. सगळ्यांच्या चेहर्यावर चिंता होती.सावित्रीने सर्वांसाठी कॉफी आणली.दरम्यान रेवतीने तिच्या पप्पांचा मित्र असलेल्या मुंबईच्या पोलीस ऑफिससरला फोन लावून मालाडच्या पत्त्यावर चौकशी करायला सांगितली.प्रकरणाच गांभीर्य ओळखून त्यांनी लवकरच माहिती देतो अस सांगितले.
एवड्यात इन्स्पेक्टर खानचा फोन वाजला.फोन बाबा रिसॉर्ट मधून आला होता.
"सर,मी खात्री केली.कारचा नंबर MH 02 JM 3636 आहे."
" गुड.. समीर या गाडीची माहिती मिळव."
समीरने आर.टी.ओ.अॅप वरून त्वरीत गाडीची माहिती मिळवली.
"सर, ही गाडी मुंबई वेस्टची आहे.पत्ता रिसॉर्ट मधलाच आहे.पण गाडी शर्मिला राजमानेंच्या नावावर आहे." समीर म्हणाला.
"ठिक आहे, आपल्याला ही गाडी काल कुठवर गेली हे हायवेवरच्या चौकींवरून कळेल.कदाचित उद्या मुंबईला जावं लागेल. ह्या हरामखोराला धडा शिकवावा लागेल.पण हे मिशन अतिशय सावधगिरीने पार पाडाव लागेल. "इन्स्पेक्टर खान म्हणाला. खान त्यानंतर आंबोली येथे गेला. आपण पुन्हा दुपारी येणार अस सांगून गेला.
*----*-----*-----*-----*-----*-----*------*-----
वेळ -दुपारी 3.00
जेवणाची इच्छा नसतानाही शरद व रेवतीला सावित्री व घनश्यामने जेवायला भाग पाडलं.चंद्रिका या क्षणी कोणत्या अवस्थेत असेल याची त्यांना कल्पना करवत नव्हती. शरद तर पार कोलमडला होता.संजनाने आपल्या पध्दतीने दोघांचे समुपदेशन केल.चंद्रिका निश्चित सुखरूप परत येईल.सकारात्मक विचार आपण करूया.अस सुचवले.रिमा व उषा यांच्यावर संमोहनाचा वापर करून त्यांची भिती घालवली.
3.15ला इन्स्पेक्टर खान पुन्हा बंगल्यावर आला.
"ती गाडी पहाटे तिन वाजता चिपळूणच्या हायवेवरच्या एका चौकात पाच मिनिट थांबली होती. सी.सी.टिव्हीत तो इसम पाठमोरा दिसला." खान सर्वाना म्हणाला.
तेवढ्यात रेवतीला मुंबईलाच्या पोलीस ऑफिसला फोन आला.रेवतीने त्यांच्याशी थोड बोलून मोबाईल इन्स्पेक्टर खानच्या हाती दिला.
" बोला सर, मी इन्स्पेक्टर खान बोलतोय.."
" खान हे बघा, मालाडचा जो पत्ता दिलाय तो फ्लॅट राजमाने यांचा होता.त्यानी तो सहा महिन्यांपूर्वी विकला.आता तिथे शहा नावाचा गुजराती व्यापारी राहतो."
" ओ.गॉड ...मग राजमाने कुठे गेला."
" खान निराश होवू नका. मिसेस शर्मिला राजमाने याचां मी तुम्हाला फोन नंबर देतो.मालाड पोलिस ठाण्यात त्यांनी मिस्टर राजमाने यांच्याविरोधात छळवणूकीची तक्रार दिली होती.मी रणजित राजमानेची हिस्ट्री तपासली.हा माणूस सांयंस्टिट आहे....प्रचंड हुषार..पण तेवढाच न्यूनगंड असलेला. आपल्याला योग्य न्याय जगाने दिला नाही अस त्याला वाटत .त्याचा सर्वांवर राग आहे.थोडा विकृत व चंचल स्वभाव आहे.त्याला तेरा वर्षांची मुलगी आहे. तुम्ही त्याच्या मिसेसला फोन लावा.निश्चिततच त्याचा ठिकाण समजेल."
खान थोडा गंभीर झाला.त्याने मिसेसला राजमानेना फोन लावला. पहिल्यांदा फोन लागलाच नाही. नंतर दोन वेळा रिंग होवूनही फोन उचलला गेला नाही.पण खान प्रयत्न करत राहिला. पण अखेर फोन उचलला गेला.
" कोण आहात ? का फोन करताय मघापासून..?"
" मॅडम मी सावंतवाडीवरून इन्स्पेक्टर खान बोलतोय. मला मिस्टर राजमांने बद्दल माहिती हवी "
" अरे देवा, आता नवीन काय उद्योग केलय या माथेफिरु माणसाने! अहो या माणसाने माझ जगणं मुश्किल केल होत. रोज छळ करायचा..मारायचा.अखेर मी त्याला न सांगताच मुलीला घेवून बाहेर पडले. तोंड लपवून राहते.अहो हा माणूस कधी कधी म्हणायचा मी माझ ज्ञान वापरून सारी मुंबई काही मिनिटात बेचिराख करून टाकेन. खरच अस काही करतोय की काय तो!"
"हे बघा ते मालाडला राहत नाही. मग सध्या ते कुठे असतील ...त्याचं मिळणं अत्यंत महत्वाचे आहे."
" हे बघा, जर तो मुंबईत नसेल तर निश्चित अलिबागला फार्महाऊसवर असणार.मी एकवेळ तिथे गेले होते. बिचच्या डाव्या बाजूला तिसरा बंगला, पण नेमकं काय झालय?"
" मॅडम ते नंतर सांगतो.एक काम करा तुमचा व मुलीचा एकत्र असलेला फोटो या नंबरच्या व्हॉटस्अॅपर पाठवा."
खानने फोन कट केला.
" आपल्याला उद्या अलिबागला जायचंय.त्याचा पत्ता सापडलाय-- आता ऑपरेशन अलिबागच्या तयारीला लागा.समीर, संजना व प्रशांत तुम्ही तुमच सगळ साहित्य घ्या.शरदराव त्या दोन मुलीं व तुम्ही इथंच रहा.त्यांची मैत्रिण परवा इथ येईल."
पण शरद व रेवती अलिबागला येणारच यावर ठाम राहिली.
"पण सर मिसेस राजमाने व त्यांच्या मुलीचा फोटो का मागितलात?" संजनाने विचारले.
" मला फक्त मुलीचा फोटो हवाय.माझ्या डोक्यात एक शंका निर्माण झालीय .ती खरी ठरली तर चंद्रिकेच्या अपहरणाच कारण कळेल. मी आता एवडच खात्रीने सांगतो की चंद्रिकेच्या जीवाला कोणताही धोका नाही." इन्स्पेक्टर खान विचार करत म्हणाला.
---'*----'*------*--------*---------*-----------*---