Sakshidaar - 3 in Marathi Thriller by Abhay Bapat books and stories PDF | साक्षीदार - 3

Featured Books
  • ऋषि की शक्ति

    ऋषि की शक्ति एक बार एक ऋषि जंगल में रहते थे। वह बहुत शक्तिशा...

  • बुजुर्गो का आशिष - 9

    पटारा खुलते ही नसीब खुल गया... जब पटारे मैं रखी गई हर कहानी...

  • इश्क दा मारा - 24

    राजीव के भागने की खबर सुन कर यूवी परेशान हो जाता है और सोचने...

  • द्वारावती - 70

    70लौटकर दोनों समुद्र तट पर आ गए। समुद्र का बर्ताव कुछ भिन्न...

  • Venom Mafiya - 7

    अब आगे दीवाली के बाद की सुबह अंश के लिए नई मुश्किलें लेकर आई...

Categories
Share

साक्षीदार - 3




प्रकरण -३
पाणिनी पटवर्धन त्याच्या गाडीत बसला, बोटात थोटूक धरून त्याने सिगारेट पेटवली.खरं तर थोड्या वेळेपूर्वीच त्यानं धूम्रपान केलं होतं. त्याचा चेहेरा पूर्ण एकाग्र झाला होता., त्याचे डोळे चमकले.
त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थतेचे भाव नव्हते. फक्त त्याचा अस्वस्थपणा दर्शवणारी एकच गोष्ट म्हणजे तो सतत सिगारेट पेटवत होता, एक झाली की दुसरी, दुसऱ्या नंतर तिसरी,, एका तासापेक्षा जास्त काळ.
थेट रस्त्याच्या पलीकडे ती इमारत होती ज्यामध्ये मिर्च मसाला चं ऑफिस होतं. तेवढ्यात फिरोज लोकवाला इमारतीतून बाहेर आला.
लोकवाला त्याच्या कडे यंत्रवत दृष्टीक्षेप करून, चालता झाला.पाणिनी पटवर्धनने सिगारेट ओढली आणि स्टार्टरवर पाय दाबला.आणि गाडी वाहतुकीच्या प्रवाहात घातली.
लोकवाला कोपऱ्यात उजवीकडे वळला आणि टॅक्सी केली. पाणिनी त्याच्या मागे जाऊ लागला.
वाहतूक थोडीशी कमी होईपर्यंत, टॅक्सी चालत राहिली. तेव्हा तो आणखी मागे पडला.
फिरोज लोकवाला एका कोपऱ्यावर टॅक्सी थांबवून बाहेर पडला, ड्रायव्हरला पैसे दिले आणि एका इमारतीत शिरून त्याने दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडला गेला . लोकवाला आत गेला आणि दारातल्या माणसाने दरवाजा बंद केला.पाणिनी पटवर्धनने आपली कार त्या इमारती पासून थोड्या अंतरावर पार्क केली, आणि पुन्हा धूम्रपान सुरू केलं.
फिरोज लोकवाला जवळ जवळ पाऊण तास त्या इमारतीत होता.मग तो बाहेर आला, पाणिनी पटवर्धन त्याच्या कडे बघत असताना लोकवाला ने पुन्हा टॅक्सी केली आणि एका होटेल समोर ती थांबवली..पाणिनी टॅक्सीच्या मागे गेला.
मग त्याने आपली कार उभी केली, हॉटेलच्या लॉबीमध्ये गेला आणि सावधपणे आजूबाजूला पाहिलं त्याला लोकवालाचे कोणतेच चिन्ह आत दिसत नव्हते. पाणिनी ने लॉबीत पाहिले. ते एक व्यावसायिक प्रकारचे हॉटेल होते. बरेच लोक लॉबीमध्ये होते.
पाणिनी पटवर्धन हळू हळू लोकांकडे बघत सावधपणे पुढे गेला .मग तो रिसेप्शन कडे गेला.
“ इथे फिरोज लोकवाला म्हणून कोणी बुकिंग केलंय का? “
तिथल्या मुलीने आपले रजिस्टर चाळले. “ सराज लोकवाला ” आहे.ती म्हणाली.
“ मी फिरोज लोकवाला म्हणालो.” पाणिनी म्हणाला
“ या नावाने नाही कोणी.”
“ ठीक आहे काही हरकत नाही.” असं म्हणून पाणिनी तिथून निघून डायनिंग हॉल च्या दिशेने जायला लागला तिथे काही लोक टेबलवर खात बसले होते पण फिरोज लोकवाला त्यांच्यामध्ये नव्हता तळघरात एक सलून होतं पाणिनी पटवर्धन पायऱ्या उतरून तिथेही जाऊन शोधून आला तिथे फिरोज लोकवाला तिसऱ्या खुर्चीत बसला होता त्याचा चेहरा फोम ने झाकला होता पण त्याच्या अंगावरच्या कपड्यावरून आणि बुटा वरून पाणिनी ने त्याला ओळखला. पाणिनी ने खुश होऊन मान डोलावली. जिने चढून पुन्हा वरच्या बाजूला आला तिथे टेलीफोन डेस्कवर एक मुलगी होती.
. “सगळे फोन तुझ्या मार्फतच जोडले जातात?” त्यानं तिला विचारलं ती हो म्हणाली.
“ठीक आहे. मी तुला दोनशे रुपये कसे मिळतील याची युक्ती सांगतो.” तो तिला म्हणाला.
तिने चमकून त्याच्याकडे बघितलं
“काय गंडवता आहात का मला?” तिने विचारलं.
पाणिनी पटवर्धन ने मान हलवली. “ऐकून घे, मला एक नंबर हवाय बस एवढंच !”
“म्हणजे काय म्हणायचे आहे तुम्हाला?” तिने विचारलं
“ एवढंच, की मी बाहेर जाऊन एका माणसासाठी मी एक फोन लावणारे. तो बहुतेक लगेच फोन घेणार नाही पण थोड्या वेळाने तो इथे येईल. आत्ता तो खालच्या सलून मध्ये बसलाय आणि माझ्याशी फोनवर बोलल्यानंतर तो ज्या कोणाला फोन करेल ,तो फोन नंबर कुठला आहे तेवढंच मला तुझ्याकडून हवं आहे.” तो तिला म्हणाला.
“ पण समजा त्याने कोणाला फोन केलाच नाही तर?” तिनं विचारलं
“ तसं असेल तरी तुला पैसे मिळतील. कारण तू तुझं काम केलं आहेस म्हणून.” तो तिला म्हणाला
“ मी अशा गोष्टींची माहिती दुसऱ्याला देणे अपेक्षित नाहीये” ती मुलगी म्हणाली
“ ते माहीत आहे मला मी म्हणून तर मी तुला दोनशे रुपये देतोय” पाणिनी म्हणाला
“ ठीक आहे, मी कोणाचे बोलणे ऐकू शकत नाही आणि कोण काय बोललं हे तुम्हाला सांगू शकत नाही, पण नंबर देऊ शकते.” ती मुलगी म्हणाली
तू करायचं काहीच नाहीयेस.तो कोणाला फोन करेल त्याचा फोन नंबर काय आहे हे तू मला सांगायचं आहेस. मी तुला कोणाच्याच गोपनीय संवादातलं काही विचारत नाहीये” पाणिनी म्हणाला
. ती थोडी अडखळली थोडी घाबरली तिला वाटलं असावं की आपलं बोलणं कोणी ऐकते की काय तिने इकडेतिकडे बघितलं . पाणिनी ने आपल्या खिशातून पैसे काढले आणि तिच्या हातात कोंबले.
“ ठीक आहे ” ती मुलगी म्हणाली.
“त्या माणसाचं नाव म्हणजे मी ज्याला फोन करणार आहे त्याचं नाव आहे फिरोज लोकवाला. मी साधारण दोन मिनिटांनी त्याला फोन करणारे. तू त्याला तसा निरोप दे. लक्षात ठेव तो आता खाली सलून मध्ये बसलाय माझा फोन झाल्यावर तो कोणालातरी फोन करेल आणि त्याला विचारेल की, त्या माहितीसाठी चाळीस हजार रुपये देणे योग्य आहे का ? आणि पलीकडली बोलणारी व्यक्ती त्याच्यासाठी होकार देईल” पाणिनी तिला समजून सांगत म्हणाला
“त्या मुलीने आपली मान होकारार्थी हलवली.
“ येणारे सगळे फोन तुझ्याकडे येतात ना पहिल्यांदा? ” पाणिनी म्हणाला.
“आपोआप नाही येत सगळे. माझ्याकडे फोन करणाऱ्यांने स्टेशन तेरा द्या असं सांगितलं तर येतात.” ती मुलगी म्हणाली
“ठीक आहे मी बाहेरून फोन करीन आणि स्टेशन 13 मागून घेईन .” पाणिनी म्हणाला
“ सर्, एक मिनिट, आमच्या होटेल मध्ये पोलिसांनी आज सकाळ पासून काही कारणास्तव मोबाईल जॅमर लावलाय.त्यामुळे तुम्ही लँड लाईन वर बोला.” ती म्हणाली.
“ थँक्स.” पाणिनी म्हणाला.आणि तिच्या कडे हसून बाहेर पडला. बाहेर गेल्यावर एका औषधाच्या दुकानातल्या टेलिफोन बूथ मधून त्या हॉटेल ला फोन केला आणि स्टेशन १३ मागून घेतलं. जेव्हा त्यांना त्या मुलीचा आवाज फोन मधून ऐकला तेव्हा तो म्हणाला “ मला फिरोज लोकवाला शी बोलायचं आहे. त्याला निरोप देऊन तुझ्या बोर्डा जवळ बोलावून घे.तो लगेच येणार नाही ,सलून मध्ये आहे तो.पण ज्या माणसाला तू त्याला बोलावण्यासाठी पाठवशील,त्याला हे सांगू नकोस की तो सलून मध्ये आहे हे मला माहिती आहे म्हणून.सहज त्याला सुचव की तिकडे जाऊन बघ आहे का तो तिकडे. मी माझा फोन चालू ठेवतोय.” पाणिनी म्हणाला
“ मला कळलं नीट. वाट बघा जरा सर.” ती म्हणाली.
दोन मिनिटांनी तिचा आवाज आला, “ तो म्हणतोय की तो तुला फोन करेल नंतर.तुमचा नंबर घेऊन ठेवायला सांगितलं आहे त्याने.” ती म्हणाली.
पाणिनी ने नंबर दिला “ या नंबर वर फोन केल्यावर स्वानंद नावाच्या माणसाला मागून घ्यायला सांग त्याला. ”
“ ठीक आहे.”
पाणिनी ने फोन ठेवला.नंतर दहा मिनिटे वाट पहिली. फोन वाजला.पाणिनी ने फोन उचलून मुद्दामच उच्च स्वरात बोलायला सरूवात केली.पलीकडून फिरोजचा आवाज एकदम सावध होता.
“ ऐकून घे,कोणताही गोंधळ नको म्हणून विचारतोय, तुम्ही मिर्च मसाला मासिकाचे फिरोज लोकवाला आहात?” पाणिनी म्हणाला.

“होय” फिरोज म्हणाला. “पण तुला कसं कळलं की मी इथे सापडेल म्हणून ?” त्यांनं विचारलं.
“ तू ऑफिसमधून गेल्यानंतर दोन मिनिटातच मी तुझ्या ऑफिस मध्ये फोन केला. त्यांनी मला सांगितलं की आत्ताच फिरोज लोकवाला बाहेर पडलाय म्हणून. मी विचारलं की तो कुठे भेटेल, तर त्यांनी मला हा पत्ता दिला” पाणिनी म्हणाला
“पण त्यांना कसं कळलं की मी इथे भेटेन म्हणून?”
“ते मला काही माहीत नाही. त्यांनी मला सांगितले एवढं खरं.” पाणिनी म्हणाला
बरं ठीक आहे .काय हवय तुला?”
“मला माहिती आहे की तुला धंद्याच्या गोष्टी फोनवर बोललेल्या आवडत नाहीत पण मी जे सांगणार आहे ते तुला खूप पटापट हाताळायला लागणारे.” पाणिनी म्हणाला. “या धंद्यात तुम्ही फक्त तब्बेत सुधारण्यासाठी आलेला नाहीत. मी पण नाही.”
“थांब थांब असे फोनवर बोलू नकोस. मला एक सांग आत्ता तू माझ्या पासून किती दूर आहेस? म्हणजे किती वेळात आपण भेटू शकतो? ” फिरोज लोकवाला ने विचारलं.
“मी अजिबात जवळ नाहीये तुझ्या. आणि मी तुला फोन केला तो तुला महत्वाची बातमी द्यायची म्हणून. तुला त्याची गरज असेल तर सांग नाहीतर ती बातमी विकण्यासाठी माझ्याकडे दुसरा ग्राहक आहे . गोळीबार झाला त्या दिवशी त्या हॉटेलात हृषीकेश बक्षी बरोबर कोण बाई होती या माहितीत तुला रस आहे का?” पाणिनी पटवर्धन ने विचारलं .
“हे बघा आम्ही पब्लिकेशनच्या व्यवसायात आहोत आणि जी गोष्ट बातमी म्हणून ठरू शकेल अशा कुठल्याही महत्त्वाच्या व्यक्तीची माहिती आम्हाला हवी असते.” फिरोज लोकवाला म्हणाला.
“ असं तळ्यात-मळ्यात आणि मोघम बोलू नको” पाणिनी ने त्याला सुनावले. “ तिथे काय झालं हे तुलाही माहिती आहे आणि मलाही माहित्ये. गोळीबारानंतर एक यादी बनवली गेली आणि हे नाव त्या यादीत नाहीये. त्याचबरोबर त्याच्याबरोबर जी कोणी बाई होती त्या बाईच सुद्धा नाव त्या यादीत नाहीये. आता ती बाई कोण होती याबद्दलची माहिती म्हणजे काही हजारात मला रक्कम मिळवून देणारी माहिती आहे.” पाणिनी म्हणाला
“नाही हजारात रक्कम मिळवून देण्या एवढी महत्वाची माहिती नाही ही.” लोकवाला म्हणाला.
“ तुझ्या दृष्टीने काही शेकड्यात रक्कम मिळवून देणारी माहिती आहे ?” पाणिनी ने त्याला विचारलं.
“ नाही” फिरोज लोकवाला म्हणाला.
“ मी काय करणार ते तुला सांगतो. चारशे रुपयात मी तुला माहिती द्यायला तयार आहे आणि या पेक्षा एक रुपया सुद्धा कमी ,मी घेणार नाही .चारशे रुपये देणार नसाल, तर तेवढी रक्कम मला देणारे दुसरे ग्राहक माझ्याकडे आहे .मी त्याला साडे तीनशे रुपयाला सुद्धा देईन. एक लक्षात घे तुला शोधून काढायला मी बराच वेळ पण घालवला आणि बरेच कष्ट घेतले.” पाणिनी त्याला म्हणाला.
“चारशे रुपये पण खूप होतात.” लोकवाला म्हणाला.
“ माझ्याकडे जी माहिती आहे ती खूप महत्वाची माहिती आहे ” पाणिनी म्हणाला
“मला काही गोष्टी माहित असायला पाहिजेत ” लोकवाला त्याला म्हणाला.
“ म्हणजे कुठल्या गोष्टी ? “ माहीत नसल्याचा आव आणून पाणिनी ने त्याला विचारलं.
“ म्हणजे पुढेमागे आमच्यावर खटला भरला गेला तर माझ्याकडे काहीतरी पुरावा म्हणून पाहिजे.”
“ नक्कीच. तू मला चारशे रुपये दे. त्याच वेळेला मी त्याचा पुरावा पण देईन.”
“ मला विचार करायला काही अवधी दे .” लोकवाला त्याला म्हणाला. “ माझा निर्णय झाला की मी तुला पुन्हा फोन करीन.”
“ ठीक आहे “ पाणिनी म्हणाला, “ मी इथे या नंबर वर तुझी वाट बघतो.” आणि त्याने फोन ठेवून दिला. त्यानंतर तिथल्याच एका टेबलवर बसून पाणिनी ने मस्त आईस्क्रीम खाल्लं, सँडविच खाल्लं. तो एकदम निवांत पणे त्याच्या फोनची वाट बघत बसला. सहाव्या सातव्या मिनिटाला फोन पुन्हा वाजला, पाणिनी ने तो उचलला. “ मी मिस्टर स्वानंद बोलतोय” पाणिनी म्हणाला
“ठीक आहे. मिस्टर स्वानंद, मला जर तू पुरावा देणार असशील तर पुराव्यासकट मिळणाऱ्या माहितीसाठी मी चारशे रुपये द्यायला तयार आहे.” फिरोज लोकवाला फोनवरून म्हणाला.
“ ठीक आहे”. पाणिनी म्हणाला “ तू उद्या तुझ्या ऑफिसमध्ये असशील सकाळी तेव्हा मी तुझ्याशी संपर्क करीन पण आयत्या वेळी मला पालथा पाडू नकोस कारण तुझ्या साठी मी दुसरी साडे तीनशे रुपयाची असलेली ऑफर नाकारून तुला मी ही माहिती देणार आहे “ पाणिनी म्हणाला
“ ऐक.ऐक.” फिरोज लोकवाला गडबडीत म्हणाला. “मी तुला आज रात्रीच भेटतो आणि आज रात्री सगळ्या गोष्टी आपण निपटून टाकू उद्या ऑफिस उघडेपर्यंत वाट बघायला नको”
“नाही नाही तसं नाही करता येणार. पाणिनी म्हणाला, “मी तुला आज रात्री माहिती देऊ शकतो पण तुला पुरावे हवेत ना ! ते पुरावे आज रात्री नाही देता येणार ते उद्या सकाळी देऊ शकतो”
“एक काम करुया आज रात्री माहिती दे आणि उद्या सकाळी पुरावे दे. ते पुरावे दिलेस की मी तुला ठरलेली रक्कम देईन.”
पाणिनी पटवर्धन जोरात हसला “आता मी सांगितलं तसंच करायचं”
“बर ठीक आहे ;होऊन जाऊदे तुझ्या मनाप्रमाणे” लोकवाला म्हणाला पाणिनी ने फोन ठेवून दिला तो त्याच्या गाडीकडे जायला निघाला गाडीत जवळ जवळ वीस मिनिटे तो बसून होता त्या अवधीत फिरोज लोकवाला त्या हॉटेलात न बाहेर आला. त्याच्याबरोबर एक तरुणी होती ती साधारण २१-२२ वयाची होती दिसायला चांगली होती तिचा चेहरा पूर्णपणे निर्विकार होता महागडे कपडे तिने अंगावर घातले होते ती आणि लोकवाला हातात हात घालून रस्त्याच्या कोपऱ्यापर्यंत चालले नंतर त्याने टॅक्सीला हात केला आणि ते टॅक्सीत बसून निघून गेले.पाणिनी ने आपल्या गाडीत बसून टॅक्सीतून दृष्टीआड होईपर्यंत वाट बघितली त्यानंतर तो बाहेर आला आणि हॉटेलात शिरला आणि टेलिफोन ऑपरेटर कडे गेला. तो समोर दिसताच त्या मुलीने चेहऱ्यावर कोणतेही भाव आणून देता एक कागदाचा तुकडा बाहेर काढला आणि त्याच्यावर एक नाव आणि नंबर लिहिला 629 80333
पाणिनी ने हसून तिने दिलेला कागद आपल्या खिशात टाकला. “त्या माहितीसाठी किती पैसे द्यायचे या संदर्भातच त्यांने फोन केला होता का ?” पाणिनीन तिला विचारलं.
“ पलीकडं काय बोलण्यात आलं हे मी नाही सांगू शकत” ती मुलगी म्हणाली.
“ ते मला माहित आहे .” पाणिनी पटवर्धन म्हणाला. “पण तशा प्रकारचा संवाद नसेल तर तू मला सांगितलं असतंस ना?”
“ हो कदाचित.” ती मुलगी म्हणाली.
“ ठीक आहे आणि तू मला काही सांगणार आहेस का ?” पाणिनी न विचारलं
“काहीही सांगणार नाही” ती मुलगी म्हणाली
पाणिनी काय समजायचे ते समजला आणि खुश होऊन तिथून बाहेर पडला
(प्रकरण ३ समाप्त)