लालसा
इतिहास संशौघनाची आवड आणि दुर्मिळ वस्तू गोळा करण्याचा माझा छंद माझ्या मित्रांना चांगलाच ठावूक होता. त्यमुळे या संर्दभात एखादी माहिती कळाली की ते मला लगेच कळवत.माझ स्वत:च वस्तू सहंग्रालय आहे.मी गोळा केलेल्या वस्तू तिथे कलात्मक पध्दतिने मांडलेव्या आहेत.प्रत्येक वस्तूची माहिती मी त्या वस्तूच्या बाजूला लिहून ठेवलीय.त्यात ती वस्तू कधी व कुठे मिळाली;तिचा काळ व इतिहासाच्या दृष्टिने तिचे महत्व मी नमूद केलय. अर्थात हया वस्तू मला सहजा-सहजी मिळालेल्या नाहित.काही वेळा मला अनाकलनीय प्रसंगाना तोंड द्याव लागलय.
संहग्रालयाच्या डाव्या बाजूला एका जाड काचेच्या पेटीत अर्धा फूट लांब खंजीर व सुर्वण अंगठी आहे. खंजीराच्या मुठीवर सुंदर कोरीव काम व काही चिन्ह आहेत तर अंगठी सुर्वण कारागीरीचा उत्कृष्ट नमुना आहे.पण त्या अंगठीचा वरचा भाग मी एका जाड काळ्या कागदाने काळजीपूर्वक झाकलेला आहे.ह्या वस्तूंचा काळ व कुठे मिळाल्या ते मी नमूद केलय पण कश्या मिळाल्या ते मी लिहिलेल नाही.खर म्हणजे मला ते आठवल तरी अंगावर काटा उभा राहतो.मी शक्यतो त्या वस्तूच्या बाजूला जाणे टाळतो.कारण त्या वेळी जे घडल त्याची तर्कसंगती आजही मला लावता येत नाहीय.जे घडल ते कल्पनेच्या पलिकडच होत. आजही सार बारिक-सारिक तपसीलासह आठवतय.
अॉक्टोबर २०१८च्या पहिल्या आठवड्यात मला माझा मित्र नार्वेकरचा फोन आला. तो म्हणाला की सावंतवाडी तालुका व कोल्हापूर जिल्ह्याच्या सिमेवर एका गावानजीक जंगलात एका वस्तीचे अवशेष आढळेयत.दंतकथेनुसार ह्या वस्तीचे रहिवासी एका रात्रीत नाहिसे झाले होते.ते कुठे गेले ,का गेले हे कधीच कुणाला कळले नाही .सावंतवाडी-आंबोली-ईसापूर वरून त्या ठिकाणी जाता येत.पलिकडे शिवकालीन पारगड किल्ला आहे.हे एेकल्यावर मी त्या ठिकाणी जाण्याचे निश्चित केल.सावंतवाडीवरून सुमारे साठ किलोमीटर अंतरावर ते ठिकाण होत.मी माझ्या सोबत एका हौशी इतिहास प्रेमी तरूणाला घेतल.सतिशला इतिहासाची आवड होती.एक दिवस तयारी करण्यात गेला.दुसरा दिवस रविवार होता.
आम्ही सकाळी सहा वाजता मोटर सायकलन प्रवास सुरू केला.आंबोलीचा घाटत डाव्या बाजूला डोंगर शिखरांवरून खाली झेपावणारे धबधबे तर उजव्या बाजूला खोल दरीत धुक्यात लपलेली डोंगर शिखर नजर खिळवून ठेवत होतीे.मधे मधे धबधब्यांचे तुषार अंगावर उडत होते.आंबोली पार करून आम्ही चौकुळच्या रस्त्याला लागलो.निर्सगरम्य चौकुळचा वळणा- वळणाचा रस्ता पार करून आम्ही ईसापूर गाठले.चौकुळ ते ईसापूर रस्ता निर्मनुष्य होता.भज्यांचा वास आला म्हनून एका झापाच्या हॉटेल मध्ये घुसलो.हडकुळ्या हाॉटेल मालकाने हसून आमच स्वागत केले.भजी खाता खाता मी सहज चौकशी केली.
"कोंड्ये गाव किती दूर आहे?"
आलच की राव जरा पुढ जावून डाव्या अंगाला जा .तिथून दोन किलोमीटरवर कोंडये गाव आहे."
"बर ,तिथून तातूंची वाडी किती अंतरावर आहे?"
हॉटेल मालक अेवडा दचकला की हातातल्या कपबश्या खळखळ वाजल्या.चेहरा थोडा भयग्रस्त झाला.
"मी इतिहास संशौधक आहे." मी झटकन म्हणालो.
"सायंकाळ नंतर त्या बाजूला कुणी जात नाहीत.भर दुपारी सुध्दा माणस झपाटलीत तिथ!"
"नाही,त्या ठिकाणी नेमक काय घडलय याबध्दल माहिती मिळतेय काय ते बघणार."
चहा घेवून आम्ही पुढ निघालो.अवघड वळणांचा रस्ता पार करीत आंम्ही कोंड्ये गावात पोहचलो.गर्द हिरव्या वनराईत नारळ फोफळीच्या बागा मधून वाहणारे पाटाचे पाणी छान गारवा निर्माण करत होत.संर्पूण गावात फक्त पाचच घर होती.ती सुध्दा एकाच 'मानकामे' कुटुंबाची .आम्ही गावात न थाबंता सरळ पुढे गेलो.साधारण दिड किलोमीटरवर आम्हाला 'तातूची वाडी' असा एक जुनाट गिचमिड शब्दात लिहीलेला बो्र्ड दिसला.मोटरसायकल थांबवून आम्ही खाली उतरलो.घनदाट वनराईत तातूच्या वाडीचे अवशेष लपलेले होते.दाटीवाटीने वाढलेली असंख्य रानटी झाड वर्तुळाकार परीसरात पसरली होती.झाडी व खाली पडलेला पालापाचोळा यातून जायला वाट सापडते काय ते पाहू लागलो.थोड पुढे गेल्यावर एक थोडीफार मळलेली पाऊलवाट दिसली.अधून मधून कुणीतरी तिथून जात असावा.आम्ही झाडांच्या फांद्या दूर करत आत शिरलो.अचानक समोरचा पाचोळा वर उडाला आणि कुणीतरी सरसर आवाज करीत उडी मारली. आम्ही दचकून स्तब्ध उभे राहिलो.एक भलीमोठी घोरपड धपकन आवाज करीत पाचोळयात गडप झाली.सतिश घामाने भिजला होता.मी हलकेच त्याच्या पाठीवर थोपटले.मी अनेक वेळा अश्या प्रसंगातून गेलो होतो.सतिशसाठी हे नव होत.मी पाठीवरच्या बँगमधून खोरपी काढली वाटेतल्या फांदया तोडत पुढे जावू लागलो.आमची चाहूल लागल्याने तिन-चार सुतार पक्शी चित्कारत पळाले.झाडांचा पर्णसंभार अेवडा घनदाट होता की सूर्यकिरण कवडश्यांच्या रूपात खाली येत होते.त्यामुळे वातावरण अधिकच भयाण वाटत होत.
"सर,खुपच भयाण वातावरण आहे हे!" सतिश म्हणाला.
"सोप काहीच नसत, सतिश!"
मी सभोवार नजर फिरवली सुमारे फूटभर उंचीचा पाचोळ्याचा थर सर्वत्र पसरला होता.पक्क्या विटांच्या काही पडक्या भिंती ,लटकते दरवाजे, मध्ये-मध्ये मातीचे ढिगारे अस भयावह दृश्य होत.पूर्वेला एक आडवी भिंत होती तिथे दोन तिन छोट्या मृर्त्या होत्या बहुतेक ते वस्तीतले मंदिर असाव.तिथला परीसर थोडा स्वचछ होता .तिथे एक जुना खराटा पडलेला होता.तो घेवून आम्ही थोडी जागा स्वचछ केली.आम्हाला काही तांब्याची भांडी,काही मातीची भांडी व एक अष्टधातूची भवानीची मूर्ती सापडली.तो पर्यंत दुपारचे बारा वाजले होते.सोबत आणलेला जेवणाचा डबा खावा म्हणून आम्ही हात धुतले व मंदिराच्या बाजूला एका सपाट दगडावर बसलो.डबा उघडणार अेवड्यात अचानक सुसाट वारा सुरू झाला.असा अचानक वारा कसा काय सुरू झाला या विचारात मी पडलो.इथ काहीतरी विचित्र घडतय याची मला जाणिव झाली.बघता-बघता वारा वावटळीत रूपांतरीत झाला.प्रंचड वावटळ उठली सारा पाचोळा गिरक्या घेत वर उडून भिरकटावल्या सारखा दूर फेकला जाऊ लागला.आमच्या समोर वावटळीचे तांडव नृत्य सुरू होते.गेल्या कित्येक वर्षातला साचलेला पाचोळा आपोआप फेकला जात होता .कुणीतरी हुंकार दिल्यासारखा आवाज निर्माण होत होता.हे सार बघून सतिश घामान चिंब भिजला होता व थरथरत होता.त्या परीसरातला पाचोळा दूर झाला होता. कुणीतरी आम्हाला काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत होता.समोरच्या परीसरात एकूण पंधरा घरांचे अवषेश दिसत होते.त्यातील दोन घर साध्या बांधणीची व उरलेली सर्व एक सारख्या व पक्क्या बांधणीची होती.कदाचीत ती दोन घर कामगांराची असावीत.जिथून वावटळ उठली होती तिथे जमीनीवर काही खुणा मला दिसल्या.अचानक वावटळ थांबली सार शांत झाल.
"सर, हे काय होत?" सतिश म्हणाला.
"घाबरू नकोस ,कुणीतरी आपल्या सोबत आहे ,आपल्याला मदत करतय हे रहस्य उघड करण्यासाठी"
सतिशने दचकून इकडे-तिकडे पाहिले.त्याच्या डोळ्यात भय स्पष्ट दिसत होत.न बोलता आम्ही थोड खाऊन घेतल.इथ रात्री यायचच असा मी निश्चय केला.सतिशला गावात ठेउन अेकट्याने यायच अस मी ठरवल.
"चल पारगडावर जाऊन येवूया."
आम्ही तेथून बाहेर पडलो.जिथून वावटळ उठली होती तिथे मी खुणेसाठी दगड ठेवला.तिथून आम्ही पारगडावर आलो. इथून सभोवतालचा परीसर विहंगम दिसत होता.गडावर एक सुदंर असे मारूती मंदिर आहे.गडावर गडकरी राहतात. तर गडाखाली प्रवेशद्वारावर डोंगरउतारावर काही घरे आहेत.मारूतीरायाला नमस्कार करून शिवरा़यांचा जयघोष करत पुन्हा खाली आलो.प्रवेशद्वाराजवळ चहाचा गाडा होता.तिथे एक वृध्द इसम बसला होता.चहा घेता-घेता मी सहज प्रश्न केला-"आजोबा,तुम्हाला तातुच्या वाडी बध्दल काय माहित आहे?" त्यांनी मला निरखून बघितल.
"लई, शापित जागा हाय पोरा.शंभर वर्षापूर्वी तिथे तातू संरजामेंच कुटंब ऱाहायच.मोठा दिलदार व शूर गडी बर का!अस्वलाशी नुसत्या हातान लढायचा म्हणे.सोबत त्यांचे कुळकार मानकामे राहायचे."
"म्हणजे ते कोंड्ये गावातले का?" मी विचारले.
"होय तेच .एका रात्री सारा कबीलाच नाहिसा झाला.फक्त मानकामेचा एक पोरग कोंडये गावात गेलेल ते राहिल.त्यांतेच वंशज एकादशीला तिथ दिवा लावतात.पण तिथ कुणी थांबत नाही."
"आजोबा माझ्या या साथिदाराची रात्री राहण्याची सोय होईल का? मी जरा आंबोलीत जाऊन सकाळी येतो." मी म्हणालो.
सतिशने माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिल.मी हसून त्याच्याकडे पाहिल.आम्ही त्या आजोबांच्या घराच्या माळीवर थोडा आराम केला.मी काय करनार ते सतिशला सांगितले.तो मला अडवण्याचा प्रयत्न करू लागला.पण माझा निश्चय झाला होता.सांयकाळी सहा वाजता काळोख झाल्यावर मी बँग पाठीला लावली. बँटरी,मोबाईल,पाण्यची बाटली,वितभर लांबीचा चाकू ,लायटर व पॉवरबँक या वस्तू बँगेत ठेवल्या होत्या.सतिशच्या खांद्यावर थोपटून त्याला सूचना दिल्या वआजोबांचा निरोप घेवून मी बाहेर पडलो. मी तातूंच्या वाडीवर पोहचेपर्यंत पूर्ण अंधार झाला होता.बँटरीच्या प्रकाशात मी मंदीरापर्यंत पोहचलो.आधिच स्वच्छ केलेल्या जागेवर मी बस्तान मांडल.मला फक्त एकच भिती वाटत होती की बँटरीचा प्रकाश बघून एखादा वाटसरू धाबरून जाईल.त्यामुळे मी बँटरी बंद केली.काहीतरी घडणार अस मला राहून राहून वाटत होत.बराच वेळ निघून गेला.असंख्य रातकिडे एकाच वेळी किरकिर करत होते.मध्येच सरपटणारे प्राणी सरसरत इकडून तिकडे जात होते.पूर्वेला आता चंद्र उगवला होता.मी माझ्या रेडीयमच्या घडळ्यात पाहिल,साडे नऊ वाजले होते.वनराईत अंधार होता पण पलिकडच्या शेतात मंद चंद्र प्रकाश पसरला होता.अचानक मी दचकलो कर्कश आवाज एकाचवेळी कुणीतरी ओरडत होत.मग समजल ती कोल्हेकुई होती.जरा उसंत घतो न घेतो तेवडयात एक उल्का लख्ख प्रकाश करत कोसळली.अेव्हाना वारा सुरू झाला . वारा कुजबुजल्या सारखा आवाज करत कानाजवळून जात होता.दिवसभराच्या श्रमामुळे माझे डोळे जड झाले होते.मी पडक्या भिंतीला टेकून डुलक्या काडू लागलो.मध्येच एखादा आवाज आला की दचकून इकडे तिकडे डोळे फाडून बघायचो.मी कधी गाढ झोपलो ते मला कळलेच नाही.मध्ये किती वेळ गेला कुणास ठावुक.कसल्यातरी आवाजाने मला जाग आली.डोळे रूंदावत मी समोर बघितल.जे दिसल ते बघून मी भ्रमित झालो.मी स्वप्नात आहे की जागा ते मला समजेना.मी घड्याळ्या कडे बघितल अन मला दुसरा धक्का बसला.घडाळयाचे काटे एकाच जागी स्थिर झाले होते.घड्याळ्याची टिकटिक चालू होती पण काटे फिरत नव्हते.(काळ थबकला होता का?)मी डोळे फाडून समोर पाहू लागलो.समोर सकाळची दाट वनराई नव्हती.पंधरा डौलदार घर दिसत होती.मी ज्या मंदीरात बसलो होतो ते मंदीर अगदी व्यवसथित होते. तिथेच सकाळी मिळालेली देवी भवानिची मूर्ती विराजमान होती.समोर एका आम्रतरू खाली वस्तीतली सारी मंडळी गोळा झाली होती.बायका मुले व पुरूष मिळून सुमारे साठजण असावेत.दोन मशालींच्या उजेडात त्यांचा म्होरक्या त्याना सुचना देत होता.
"हे बघा घोड्यांवर सामान बांधलेल आहे,जास्तीचा मोह नको .त्वरीत निघा.कुठ राहायच,कोणत नाव लावायच त्या सूचना मी सर्जेरावांना दिल्यात.आता सरंजामे नाव संपल"
"पण तातू आपण हे सार सोडून का जायचय"
ते नाव एेकून मी दचकलो.यांचच नाव या ठिकाणाला पडल होत.
"अरे,तो येतोयत्याचे पाय जिथे लागतात ती जागा शापित होते..त्याच्या तलवारीला फक्त रक्त लागत तो घरांवरून वरवंटा फिरवतो.बायांना भ्रष्ट करतो.आसुरी लालसेपोटी तो हैवान झालाय"
"आपण लढू त्याच्याशी---" सारे एकसाथ म्हणाले.
"नाही,त्याच्या त्या अंगठीमुळे तो बेभान होतो---"
"अंगठी? काय आहे त्या अंगठीत?" कुणीतरी विचारले.
"एेका, पंधराव्या शतकात राजा विचित्रविर्याला एका काश्मिऱी कारागीराने एक अंगठी भेट दिली.कुणाच्याही बेटात बसू शकेल अशी तिची रचना होती.त्या अंगठीवर एक लाल रत्न बसवलेल होत.ज्या वेळी राजाची नजर त्या रत्नावर पडली त्याच वेळी त्याच्या मनात आसुरी लालसा निर्माण झाली.अंगठी बोठात गेली त्या वेळी त्याचे डोळे रक्ताळले.तिथेच त्याने त्या कारागिराची मान उडवली"
"अरे देवा,----" कुणीतरी चित्कारल.
तातु पुढे म्हणाले " नंतर सुरू झाली बरबादी ---रक्तपाततो वावटळी सारखा शेजारच्या राज्यांमधे घुसायचा घरदार जाळून टाकायचा-कापाकापी करायचा बायकांवर बलात्कार करायचा त्याचे सैनिक लुटमार करायचेक्रूरकर्मा अशी त्याची नोंद इतिहासात झाली.त्यानंतर ज्याच्या हाती ती अंगठी गेली तो फक्त लूटमार व रक्तपात करायचा.मधल्या दोन शतकात त्या अंगठीचा इतिहास माहित नाही. पण कशी कोण जाणे आता ती अंगठी ह्या विक्रांताकडे आली पुन्हा सुरू झालाय तोच लालसी खेळ -मागे एका स्रीला पळवताना मी त्याच्या पाच मांणसांना ठार मारल म्हणून त्याने संरजामेना संपवण्याच ठरवलय,चला---- त्वरीत चला."
तातु सर्जेरावांना घेवून मंदिरात आले.अगदी माझ्या अंगावरून पुढे गेले.मी दचकून सरकलो पण त्यांच्यासाठी माझ्या अस्तिवाला अर्थ नव्हता.वर्तमान व भूतकाळ या मध्ये कुठतरी माझ अस्तिव होत.तातूंनी देवी समोरचा अंगारा स्वत:ला व सर्जेरावांना लावला.एकटक देवीकडे बघत काहीवेळ राहिले.बाहेर आले.
"तातू" सर्जेराव रडत म्हणाले.
"मर्दा सारखा वाग, मी इथ सारी तयारी केलीय जगलोच तर पुन्हा भेटू,चला सगळे.ह्या खंजीरावरच्या मंत्रभारीत यंत्रामुळे त्या अंगठीतचा प्रभाव नाहिसा होईल."
सारे उदासपणे निघून गेले.घोड्यांच्या टापांचे आवाज दूरदूर होत गेले.तातू त्वरीत आंब्याच्या उंच झाडावर चडले.काही काळ शांततेत गेला.मग पुन्हा टापांचा आवाज जवळ येवू लागला.क्रूरकर्मा विक्रम येत होता.माझ अंग भयान गारठल.तिस एक तलवारबाज तिथे मशाली घेवून आले.
"दिसेल त्याला कापा,कुणालाही सोडू नका.सरंजाम्या तुझा वंशच संपवतोतुझ्या पोरीबाळींना भ्रष्ट करतो."
खदाखदा हसत विक्रांत गरजला.त्याने हात वर करून सोबत्यांमा इशारा केला.त्याचवेळी मला ती अंगठी व ते लाल रत्न दिसल.तो भास आहे हे जाणूनही माझे डोळे रक्ताळले.अनामिक लालसा मनात निर्माण झाली मी झटकन डोळे फिरवले.कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने विक्रांत खवळला .
" भ्याडा सारखा पळालास होय! जाशील कुठ?शोधीन तुला पार नायनाट करीन.जाळून टाका सारी वस्ती."
बघता-बघता सारी घर धडाधडा पेटू लागली.विक्रांत आंब्याच्या झाडाखाली एकटा बसून खदाखदा हसत होता.अगदी मी बसलेलो मंदीरही पेटताना मला दिसत होत.मी थरथरत होतो.तेव्हड्यात अंचबिंत करणारी घटना घडली.आंब्याच्या घनदाट पर्णसंभारातून एक दोरी उलगडत खाली आली.तातू त्या दोरीला लटकत खाली आले.त्यांच्या उजव्या हातात लखलखित तलवार तर डाव्या हातात खंजीर होता.
त्वेषाने त्यांनी तलवारीचा वार विक्रांतच्या उजव्या मनगटावर केला त्याचवेळी खंजीर त्याच्या छातीत खुपसला.रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या.विक्रांतचा पंजा मातीत पडून थरथरत होता.तो खाली कोळसला.
"घात झाला ----सरंजाम्या फसवलस" विक्रांत किंचाळला.
ज्या वेगाने तातू खाली आले त्याच वेगाने वर गेलेही.माझा चेहरा भयाने पांढरा फटक पडला.
विक्रांतची किंचाळी एेकून सारे तलवारबाज तिथे जमा झाले. सारे घाबरले होते. दोघांनी विक्रांतला उचलले व पळत सुटले.घोड्यांच्या टापांचे आवाज दूरदूर होत गेले.जळणारी घरे - मातीत पडलेला पंजा सुन्न वातावरण पाहून माझ भान हरपू लागले. तातू झाडावरून खाली उतरले.रक्ताळलेला पंजा उचलून न बघता ती रत्न जडीत अंगठी खेचून काढली.तिथून देवळात येत त्यांनी तिथली पितळी पेटी उचलली.अंगठीच्या रत्नावर कसला तरी लेप दिला .खंजीर व अंगठी पेटीत ठेवून पेटी आंब्याखाली लपवली व त्या जागी काही खुणा केल्या.
हातात तिथली धूळ घेऊन त्यानी ती वर उधळली व म्हणाले"त्याचे शापीत पाय इथे लागले इथ काही टिकणार नाही."
नंतर हळूहळू धुक पसरत गेल .सार विरून गेल.मी भान हरपून बेशुध्द पडलो.
सकाळी कसल्यातरी आवाजान मला जाग आली.तांबड फुटल होत.रात्रीची घटना आठवून मला पुन्हा घाम फुटला.तोंडावर पाणी मारून मी उठलो. वावटळ उठलेल्या त्या जागी मी माझ्या हत्यारांनी
जमीन उरकली.अपेशेनुसार तिथे ती पितळी पेटी सापडली.पेटी उघडून खंजीर व अघोरी अंगठी बँगेत ठेवली.जराही न थांबता मी गाडी घेवून पारगडाच्या दिशेने निघालो.माझ अंग सतत थरथरत होते.वाटेत मी एका धबधब्यावर तोंड धुतले.पारगडाच्या पायथ्याजवळ पोहचलो .तिथे सतिश व आजोबा ऊन खात उभे होते.
"सकाळीच बाहेर पडलात!"
मी फक्त हसलो.अेवड्यात आजी चहा घेवून आल्या,मला चहाची नितांत गरज होती.मी आजोबांना काही रक्कम दिली.त्यांचे आभार मानून आम्ही मार्गस्थ झालो.वाटेत मी सतिशला अेवडेच सांगितल की त्या वस्तीवरील सारे लोक डाकूंच्या भितीने तिथून पळाले.
आजही त्या अंगठीकडे बघताना माझ ह्रदय धडधडते.ते रत्न बघण्याचा मोह होतो पण मी ते टाळतो. मला सतत भिती वाटते की कुणीतरी ती अंगठी पळवेल त्याची लालसा जागृत होईल...सुरू होईल पुन्हा रक्तरंजित वावटळ---