वाजवला दरवाजा,
तिनं उघडली कडी।
मंग काय राजेहो,
तिची बात लय बडी।
दह्याचा धंदा,
दही विकाले गेलो।
नाकात गेली माशी,
मग शिकाले गेलो।
शेणाचं कालवण ,
ती टाकत होती सडी।
अन काय सांगू राजेहो,
तिची बात लय बडी।
अशी ना भौ,
ती दिसाले होती।
चमक जशी मोराच्या
पिसाले होती।
थबकलो तिथी,
विचारलं दही।
आज राहू द्या दाजी,
मंग बघू म्हणली कही।
अन फिगर तिची बघून,
गेली मडक्याले तडी।
अन काय सांगू राजेहो,
तिची बात लय बडी।
मले लयच भावला,
तिचा अनोखा नखरा।
घडी घडी गल्लीत,
मारत होतो चकरा।
आवाज माया जाताच,
ती हारखून आली।
जणू आज माया मूढ,
ती पारखून आली।
उभे का आहात,
म्हणली या दाजी आत।
ओझं पाहून म्हटली,
थोडा लावू का हात।
मंग मले थोडं,
गहिवरून आलं।
सोडून गेल्या बुढीचं,
मनी प्रेम भरून आलं।
रोज रोज असाच,
मी येत होतो थकून।
ती हात द्यायची मले,
हातचं काम झोकून।
म्हणायची धनी,
आज उशिरा आलात।
पाणी घ्या थोडं,
थकून फार गेलात।
आता हंबरून जाते मन।
सुनी दरवाजाची कडी।
अन तिची पन होती दादा,
बात लय बडी।