doubt resolution in Marathi Short Stories by मच्छिंद्र माळी books and stories PDF | शंका समाधान

Featured Books
  • ભીતરમન - 58

    અમારો આખો પરિવાર પોતપોતાના રૂમમાં ઊંઘવા માટે જતો રહ્યો હતો....

  • ખજાનો - 86

    " હા, તેને જોઈ શકાય છે. સામાન્ય રીતે રેડ કોલંબસ મંકી માનવ જા...

  • ફરે તે ફરફરે - 41

      "આજ ફિર જીનેકી તમન્ના હૈ ,આજ ફિર મરનેકા ઇરાદા હૈ "ખબર...

  • ભાગવત રહસ્ય - 119

    ભાગવત રહસ્ય-૧૧૯   વીરભદ્ર દક્ષના યજ્ઞ સ્થાને આવ્યો છે. મોટો...

  • પ્રેમ થાય કે કરાય? ભાગ - 21

    સગાઈ"મમ્મી હું મારા મિત્રો સાથે મોલમાં જાવ છું. તારે કંઈ લાવ...

Categories
Share

शंका समाधान

*देवाविषयीचे प्रश्न* : -----

१) देव कुठे आहे?
२) देव काय पाहतो?
३) देव काय करतो?
४) देव केव्हा हसतो?
५) देव केव्हा रडतो?
६) देव काय देतो?
७) देव काय खातो?

*१) देव कुठे आहे?* – जसे दुधात तूप कुठे आहे? तर दुधात तूप सर्वत्र आहे. तसेच देव सर्वत्र आहे. सर्व देशात, सर्व काळात व सर्व वस्तूत आहे.

तो नसे ऐसा ठाव असे कवण | सर्वत्र संपूर्ण गगन जैसे || - नामदेव…

विठ्ठल जळी स्थळी भरला | रिता ठाव नाही उरला || - ज्ञानदेव…

*२) देव काय पाहतो?* – जसे दिवा कुठे पाहतो? तर सर्व ठिकाणी पाहतो. तसा देव सर्वांना पाहतो. त्याचे डोळे विशाल आहेत.

‘मनोजगर्वमोचनं विशाललोल लोचनं’ | - श्रीशंकराचार्य…

त्याच्या दृष्टीतून काहीसुद्धा सुटू शकत नाही. ना खारुताईची सेवा ना मांडव्य ऋषींनी काजव्यास केलेली दुखापत. कोणी असं समजू नये मला कोणी पाहत नाही. तो सर्वांना पाहतो.

*३) देव काय करतो?* – भक्तांचा सांभाळ व दुष्टांचे निर्दालन.

घेऊनिया चक्र गदा | हाची धंदा करितो ||१||

भक्ताराखे पायापाशी | दुर्जनासी संहारी || - तुकाराम…

तुका म्हणे आले समर्थाच्या मना | तरी होय राणा रंक त्याचा || तुकाराम…
देवाने परम भक्त तुकाराम महाराजांना सायुज्य मुक्ती देऊन सदेह वैकुंठात नेले. चोरीचा आळ आलेल्या संत जनाबाईस बळी देणेसाठी शुळाजवळ नेले असतां शुळाचे पाणी करुन पांडुरंगाने तिचे प्राण वाचविले.भक्त प्रल्हादाला उकळते तेलाच्या कढईत टाकले असता भयानक संकटातही देवाने रक्षण केले. धृवबाळाच्या कठोर तपस्येने प्रसन्न होऊन नारायणाने त्यास अढळपद दिले.
*४) देव केव्हा हसतो?* – जीव जेव्हा जननीच्या उदरात असतो तेव्हा देवास सांगतो, "या संकटातून मला सोडव. मी तुझा अंश आहे." जीव म्हणतो, "सोहं, तू आणि मी समान." पण जीव जेव्हा संकटातून सुटतो, बाहेर येतो तेव्हा म्हणतो, कोहं (क्यां)! मी असं कुठे म्हणालो?" “देव तेव्हा हसतो”. आणि देवास फसविणाऱ्या जीवाच्या मागे अहं लावून देतो. अहंमुळे जीव दु:ख भोगतो. देव उंच पिकातुन डोलतो. देव त्याचा भक्त देहतादात्म्य विसरुन अंतरंगी नामस्मरण भक्तीत प्रेमाने व आनंदाने रंगुन जातो तेव्हा देव हसतो.

*५) देव केव्हा रडतो?* – भक्ताची दीन दशा पाहून. जेव्हा सुदामदेव श्रीकृष्णास भेटण्यास आले. त्यांनी सुदामाची दशा पाहिली. फाटके कपडे, पायात चप्पल नाही, शरीर कृश झालेले. हे पाहून देवास अश्रू आवरता आले नाहीत. राण्या पाणी आणण्याकरिता गेल्या.

देव दयाळ दयाळ | करी तुकयाचा सांभाळ || - तुकाराम…

*६) देव काय देतो?* – देव सर्वांना सर्व देतो. देह देतो, इंद्रिय देतो, प्रेम, शक्ति देतो.

देवे दिला देह भजना गोमटा | तया झाला फाटा बाधीकेचा || - तुकाराम…

दिली इंद्रिये हात पाय कान | डोळे मुख बोलाया वचन |
जेणे तू जोडसी नारायण | नाशे जीवपण भवरोग || - तुकाराम…

प्रेम देवाचे हे देणे | देहभाव जाय जेणे || - तुकाराम…

देव सर्वांना सर्व देतो. कारण हे सर्व देवाचेच आहे.

*७) देव काय खातो?* – देव प्रथम भक्ताचे दोष खातो.

माझ्या मीपणाचा करोनि फराळ | उरले खावयासी बैसला सकळ |
ऐसा भुकाळ हा नंदाचा गोवळ | यासी न पुरेची ग्रासीता माझा खेळ || - निळोबा…

यानंतर भक्ताचे चित्त हरण करतो व जन्म-मरणपण खाऊन टाकतो. हे सर्व केल्यानंतर भक्ताची बोरे अथवा कण्या खातो.

“सप्त द्विप नवखंड पृथ्वी भोजन किया अपार |
एक बार शबरीके घर, एक बार विदुरके घर स्वाद लिया दो बार ||”

भक्ताने दिलेले पत्र, पुष्प, फळ अथवा पाणीसुद्धा आनंदाने ग्रहण करतो...!

!! श्री जय जय रामकृरि !! ?