Proverbs in Marathi Short Stories by मच्छिंद्र माळी books and stories PDF | नितीकथा

Featured Books
Categories
Share

नितीकथा

मराठी नितीकथा
-----------------------
१ “ गु रु “
मच्छिंद्र माळी, पडेगांव,
औरंगाबाद .
एका शाळेतील हा प्रसंग आहे.संस्कृतचे शिक्षक एका विद्यार्थ्याला मोठमोठ्याने खडसावून विचारत होते.’ तुला व्याकरणाचे नियम पाठ सांगितले होते, का पाठ केले नाहीस?’ मुलगा परोपरीने सांगत होता’ त्याने रात्रभर पाठांतर करण्याचा प्रयत्न केला, तरीही त्याच्या लक्षात काहीच राहिले नव्हते’
का? का नाही राहिले लक्षात ? मला ठाऊक आहे त्यावर गुरुजीं व्याकरण फार कठीण आहे. पण अरे तु म्हणतोस रात्रभर प्रयत्न करुनही तुझ्या लक्षात काहीच नाही असे का? शिक्षकाचा पारा चढत होता. त्या मुलाचे डोळे भरुन आले. दाटल्या कंठाने तो म्हणाला ‘क्षमा करा गुरुजी पण खरच काही लक्षात नाही.त्यावर गुरुजींनी शांतपणे विचारले ‘ठिक आहे पण एक सांग वाचत असतांना तुझे लक्ष(ध्यान) दुसरीकडे कुठे गेले होते का?’ शिक्षकाच्या प्रश्नाने मुलाला एकदम आठवले. अभ्यास करीत असताना तो मुंग्याची रांग पाहण्यात गेला होता. मुंग्याची रांग शिस्तीत एकाग्रपणे कशाचे तरी कण घेउन जात होत्या. मुलाने असे सांगताच शिक्षक म्हणाले ‘ बस तर तु त्या मुंग्याकडून एकाग्रता शिक, त्याच एकाग्रतेने अभ्यास कर, हे मुंग्यांना जमले ते तुला जमणार नाही क? ध्यास आणि अभ्यास(प्रयत्न) असेल तर अशक्य गोष्ट देखिल शक्य होते. बस...!’ तो क्षण त्या विद्यार्थ्याचे जीवनातील साक्षात्कारी क्षण ठरला.त्याचा कायापालट करणारा तो क्षण होता.
पुढे हाच विद्यार्थी जगतमान्य संस्कृत पंडीत व तत्त्वज्ञानी म्हणुन ओळखला जाऊ लागला.तो विद्यार्थी दुसरा तिसरा कोणी नसुन डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन् होत.

तात्पर्यः- साक्षात्कार कोठूनही होवो फक्त त्याची जाणीव करून देणारा सद्गुरू मात्र हवा!

********************************************** मराठी नितीकथा
---------------------
२ " एकाग्रता " मच्छिंद्र माळी पडेगांव , औरंगाबाद
" चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ " या माऊलींचे उक्तीला अनुसरुन असे म्हटले जाते की, 'असामान्य स्मरणशक्ती हे एकाग्रतेच्या वेलीला आलेले गोड , रसाळ फळ आहे'. एकाग्रतेने आणखीही ब-याच गोष्टी साध्य होत असतात.
एकदा स्वामी विवेकानंद अमेरिका दौऱ्यावर असतांनाची ही गोष्ट आहे. ते तेथिल रम्य परिसर पहात फिरत होते.थोडे पुढे गेल्यावर नदीच्या तीरावर त्यांना कांही तरुण मुलें दिसली. ती काहीतरी करण्यात रममान झाली होती. स्वामीजी थोडे जवळ तेव्हा त्यांना दिसले की , ' ती मुले पाण्याच्या लाटावर वरखाली होणारी अंड्याची टरफले बंदूकीने नेम धरून उडविण्याचे खेळात तल्लीन झाली होती. पण प्रयत्न करुनही एकालाही एकही टरफल उडविता येत नव्हते. त्यांचा तो खेळ पाहून स्वामीजीना हसू अनावर झाले. त्यांना असे हसतांना पाहून त्यांच्यातील एकाला मात्र भयंकर राग आला. तो क्रोधाने स्वामीजीना म्हणाला, ' आपण समजता तेव्हढी ही गोष्ट सोपी नाही. प्रयत्न करुन पहा. बघु या तुम्हांला तरी कांही जमतय का?' असे म्हणुन त्याने बंदूक त्यांचे हाती सोपविली. स्वामींनी बंदूक हातात घेतली. अन नेम धरुन एका मागून एक बारा टरफले उडविली. आश्चर्याने चकीत व्हायची वेळ आता त्या मुलांवर आली होती. त्यांची धारणा झाली की स्वामीजी अटृल नेमबाज आहेत. असे त्या तरुणांनी म्हटल्यावर स्वामीजी म्हणाले, ' अहो ही नळी तर मि आयुष्यात पहिल्यांदाच हातात घेतली' . तरुण म्हणाला ,' मग आपण इतकी अचूक नेमबाजी कशी कृलीत?' तेव्हा स्वामीजी हसतच म्हणाले , ' अरे संपूर्ण एकाग्रता असली म्हणजे कोणतीही असाध्य गोष्टही साध्य होते.'
तात्पर्यः- संपूर्ण एकाग्रता हे मानवी यशाची गुरुकिल्ली आहे !
*********************************************

मातृभारती नियामक मंडळ (मराठी नितीकथा स्पर्धा) आणि मातृभारती नेटकर्क टीम!
स.न.वि.वि. वरील दोन्ही कथा स्वतः लिखीत आहेत. संपादक महाशयांनी या कथा प्रकाशित करण्याची अनुमती द्यावी व आयोजित स्पर्धेत समाविष्ट करुन घ्याव्यात ही विनंती.
आपला
मच्छिंद्र माळी पडेगांव औरंगाबाद .