Chandra aani Nilya betaverchi safar - 9 in Marathi Fiction Stories by बाळकृष्ण सखाराम राणे books and stories PDF | चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 9

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 9

. ९ शिंगाड्यांशी पुन्हा सामना

दुसऱ्या दिवशी पक्ष्यांच्या किलबिलाटानं चंद्राला जाग आली. त्याने बाजूला पाहिले, दंतवर्मा कुठेही दिसले नाहीत. डुंगा मात्र अजूनही झोपेत होता. काल रात्री दंतवर्मांची

ची गोष्ट ऐकता ऐकता झोपायला खूप उशीर झाला होता. त्यामुळे डुंगाला अजून जाग आली नव्हती. चंद्रा शरीराला झटका देत उठला. तो दंतवर्मांच्या कहाणीचा विचार करत होता. भद्रसेनांच्या बंधूने केलेल्या अविचारामुळे सारा मद्र देश भयावह संकटात सापडला होता. त्यातून सुटका होण्यासाठी तो मुकूट देवीच्या डोक्यावर विधिवत स्थापन करणे गरजेचे होते. तसा मुकूटही दंतवर्मांनी .तयार करून आणला होता. पण जोपर्यंत त्या मुकुटावरचा गुलाबी हिरा सापडत नाही तोपर्यंत सारे व्यर्थ होते. रुद्रसेन तो गुलाबी हिरा घेऊन कुठे गेला जे कुणालाच माहीत नव्हतं. चंद्राला मनापासून वाटत होतं की तो दैवी गुलाबी हिरा लवकर सापडो व मद्र देशावरचे संकट लवकर टळो.

अर्थात, एक गोष्ट चंद्राच्या लक्षात आली होती की दंतवर्मांनी त्याला ती खजिन्याची पेटी कुठे ठेवली ते सांगितले नव्हते. कदाचित सुरक्षिततेसाठी किंवा अन्य कारणासाठी त्यांनी ती गोष्ट सांगितली नव्हती. चंद्रा उठला व समोरच्या मातीच्या भांड्यातले पाणी घेऊन त्याने तोंड स्वच्छ धुतले. मंद गार वारा सुटला होता. पक्षी सुस्वर आवाजात गात होते. आसमंतात गुलाबी रंगाची पखरण झाली होती. अंधार हळू दूर जात होता व प्रकाशाचं साम्राज्य सुरू होत होतं. अतिशय प्रसन्न व उत्साही सकाळ होती ती! झाडांच्या फांद्यातून, पानांच्या झालरीतून प्रकाश झिरपत झिरपत जमिनीपर्यंत पोहोचत होता. हलकं धुकंही सभोवताली पसरलं होतं. चंद्रा थोडा पुढे सरकला. तेवढ्यातच त्याला दंतवर्मा दिसले. एका प्रचंड पिंपळवृक्षाखाली पद्मासन घालून ते ध्यानस्थ बसले होते. भरदार शरीरयष्टी लाभलेल्या दंतवर्मांची ध्यानमग्न मूर्ती धीरगंभीर भासत होती. त्यांचा चेहरा आत्मिक तेजाने तळपत होता.

चंद्राची चाहूल लागताच त्यांनी डोळे उघडले. चंद्राकडे बघून ते प्रसन्नपणे हसले. चंद्राला आपल्या बाजूला बसण्याची खूण करत म्हणाले" आज खूप प्रसन्न व आनंदी वाटतंय. "

"होय! खरंच... जंगलातील प्रत्येक पहाट मला नेहमीच सुंदर वाटते. "

"खरं म्हणजे मी पहिल्यांदा या निळ्या बेटावर पाऊल ठेवलं तेव्हा मी प्रचंड धास्तावलो होतो. या बेटावरून मी जिवंत परत जाऊ शकेन यावरमाझा विश्वासच नव्हता. पण आता मला हे जंगल खूप आवडलंय चंद्रा!"

" "पण प्रधानजी, आपल्याला लवकरच मद्र देशात जायचं आहे. वेळ खूपच कमी आहे."

"होय! पण त्यासाठी एखाद्या होडीची सोय झाली पाहिजे."

" "इथं होडी मिळणे कठीण! पण आपण तराफ्यावरून जाऊ शकतो."

'तराफ्यावरून? एवढ्या मोठ्या लाटांसमोर तराफा टिकेल?" दंतवर्मांनी चंद्राकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले.

"मला वाटतं आपल्याला ते जमेल! समुद्रावर वाटेत एखादं जहाजही भेटेल."

"होय! खरंच... चंद्रा मला तुझ्या जिद्दीचं कौतुक वाटतं बरं का!" दंतवर्मांनी कौतुकाने चंद्राची पाठ थोपटली.

"त्या गुलाबी हिऱ्याचं काय? त्याचा शोध कसा लागणार?" चंद्रने विचारले. "

"होय, तो तर मोठाच प्रश्न आहे. देवी रेवतीच्या मनात असेल तेच घडेल.

दंतवर्मांनी गंभीरपणे मान हलवली व ते जागेवरून उठले. दोघेही विचार करत पुन्हा मयुरांच्या वस्तीकडे परत फिरले.

“चंद्रा काल रात्री मी तुला त्या सुवर्ण मुकूट व देवीच्या दागिन्यांच्या पेटीविषयी काहीही सांगितलं नव्हतं... गोष्टीच्या ओघात मी ते विसरलो. मी ती अनमोल पेटी या बेटावरच्या धूर ओकणाऱ्या झाडाजवळ ठेवलीय." "धूर ओकणारं झाड?" चंदाने आश्चर्याने विचारले. “होय. धूर ओकणारे झाड... त्या झाडाच्या फांद्यांतून धूर बाहेर

पडत होता. या बेटाच्या पूर्वेला ते असावं.... खुणेसाठी मी तिथं कासवाच्या आकाराचा दगड ठेवलाय. आज दुपारी आपल्याला ती पेटी आणावी लागेल. मग उद्याच आपण इथून निघू शकू."

- . “ठीक आहे. आपण उद्याच निघू या. मी डुंगा व त्याच्या बाबांना तसं सांगतो." चंद्रा उत्साहाने म्हणाला. त्यालाही परतीचे वेध लागले होते. ' घराची आठवण सतावत होती. त्याला आई-बाबा व गौरीची आठवण येत होती. कुणालाही न सांगता तो एका साहसावर बाहेर पडला होता. त्याच्या नाहीसे होण्याने घराकडच्यांची अवस्था काय झाली असणार याची कल्पनाच त्याला करवत नव्हती.

दंतवर्मा व चंद्रा बोलत बोलत मयुरांच्या वस्तीकडे परतले. वाटेतच त्यांना वाघ्या भेटला. वाघ्या चंद्राच्या पायावर अंग घासू लागला.

" “चंद्रा, तुझ्या व वाघ्याच्या दोस्तीचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे.” दंतवर्मा वाघ्याकडे बघत हसत म्हणाले.

"खरंच! वाघ्यानं मला अनेक संकटात मदत केलीय." चंद्रा वाघ्याला थोपटत बोलला.

मयुरांच्या वस्तीवर वस्तीवर परतल्यावर चंद्राने डुंगाला दुपारच्या मोहिमेबद्दल थोडक्यात सांगितलं. डुंगा पण त्यांच्यासोबत यायला तत्काळ तयार झाला. पूर्वेला धूर ओकणारी झाडे आहे. नेमकं झाड कसं ओळखणार हाच प्रश्न आहे असं डुंगा म्हणाला. शिवाय सभोवताली घनदाट जंगल आहे, असंही त्याने सांगितले.

दुपारी जेवण आटोपल्यावर चंद्रा, दंतवर्मा, डुंगा व वाघ्या पूर्वेच्या दिशेने निघाले. मंगा पण त्यांच्यासोबत यायला उत्सुक होता. पण आज मयुरांच्या सामूहिक शिकारीचा दिवस होता व तिथे जमातीच्या प्रमुखाची उपस्थिती आवश्यक होती. त्यामुळे मंगाला त्यांच्यासोबत येणे शक्य नव्हतं. त्याने दंतवर्मांना सावधगिरीचा सल्ला दिला. रानटी प्राणी, राक्षसी सरडे,झाडांच्या फांद्यांवर लोंबकळणारे अजगर तिथल्या घनदाट अरण्यात आहेत याची त्याने दंतवर्मांना कल्पना दिली. अर्थात, चंद्रा, डुंगा व दंतवर्मा पूर्ण तयारीनिशीच बाहेर पडले होते.

घनदाट जंगलातून त्यांनी प्रवास सुरू केला. उंच वाढलेली झाडे, त्यांचा प्रचंड पर्णविस्तार, त्यातून येणारे प्रकाशाचे कवडसे, असंख्य प्रकारची झुडपे, रानवेली यांनी तो सारा प्रदेश व्यापलेला होता. बऱ्याच वेळा वाट तयार करावी लागत होती. कधी सरळ उभ्या चढणीवर एका-एकाने कसरत करत चालावं लागत होतं तर कधी पाय टिकणार नाही अशा उतारावरून अलगद उतरावं लागत होतं. पण प्रवास करणारे चारही बहाद्दर जिद्दीने चालत होते. डुंगाला या जंगलाची सवय होती. कधी लोंबळणाऱ्या वेलींना झोके घेत तो हवेत झेपावत रस्ता पार करत होता. चंद्रा व दंतवर्मा त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांना फारसं जमत नव्हतं. एक-दोन वेळा ते पडता पडता वाचलेसुद्धा! वाघ्या मात्र झुडपांमधून वाट काढत त्यांच्या पाठीमागून धावत होता. दोन वेळा त्यांना झाडावर लटकणाऱ्या अजगरांना टाळून पुढे जावे लागले. रानटी जनावरांच्या डरकाळ्या ऐकून त्यांना मार्ग बदलावा लागला. -

अखेर ते एका सपाट दिसणाऱ्या भूभागावर पोहोचले. तिथे झाडे दाटीवाटीने नव्हती. पण अतिशय उंच अशी झाडे तिथे दिसत होती. ही झाडे खूप उंच होती व त्यांचे शेंडे आकाशाला भिडल्यासारखे दिसत होते. बाजूला हात पसरल्यासारख्या फांद्या शेंड्याजवळ दिसत होत्या.

"हेच ते ठिकाण... बघा... या झाडांच्या फांद्यांतून धूर येतोय. दंतवर्मा उत्साहाने म्हणाले. चंद्राही डोळे विस्फारून पाहू लागला. खरंच काही झाडांच्या शेंड्याजवळ धूर बाहेर पडत होता. काही ठिकाणी धुराचे प्रमाण खूप होते, तर काही ठिकाणी ते किरकोळ होते. "

'आता आपल्याला ते नेमके झाड शोधावे लागणार! चंद्रा म्हणाला.

"होय. त्यासाठी आपल्याला कासवाच्या आकाराच्या दगडाचा शोध घ्यावा लागेल. पण मला वाटतं मी तो डावीकडच्या कुठच्यातरी झाडाच्या मुळाजवळ ठेवलाय. चला लवकर..” दंतवर्मा झपाझपा चालत म्हणाले.

. तिघेही अधीरपणे मार्गक्रमण करू लागले. मध्येच एक पाण्याचा छोटासा प्रवाह दिसला. त्यांनी ते स्वच्छ पाणी पिऊन घेतले. गुडघाभर पाण्यातून चालत त्यांनी तो ओढा ओलांडला. थोड्याशा दलदलीतून ते चालत होते. एवढ्यात समोरून प्रचंड चीत्कार ऐकू आला. पाठोपाठ पाच हत्तींचा कळप वेगाने पाण्यासाठी येताना दिसला. प्रचंड असे हत्ती बघताच तिघेही जागेवर थबकले. वाघ्याही मूकपणे स्तब्ध झाला. सर्वांत पुढे विशालकाय मादी आपली सोंड उंचावत-चित्कारत धावत येत होती. तिच्या पाठी एक छोटे पिल्लू व त्यापाठोपाठ आणखी तीन हत्ती... जे तरुण वाटत होते.. येत होते.

"असेच स्तब्ध उभे राहा." डुंगा कुजबुजला.

सारे पुतळ्यासारखे स्तब्ध राहिले. हत्ती अगदी त्यांच्या जवळून पाण्यावर गेले. सोंडेने पाणी पीत व पाणी उडवीत त्यांनी जलक्रीडा केली व पुन्हा मागे न परतता ते पाणी ओलांडून पुढे गेले.

तिघांनीही सुटकेचा श्वास सोडला व ते पुढे गेले.

दुपारपर्यंत सारेजण धूर ओकणाऱ्या झाडापर्यंत पोहोचले. त्यांनी खजिन्याच्या पेटीचा शोध घ्यायला सुरुवात केली. कासवाच्या आकाराचा दगड कुठच्या झाडाजवळ आहे हे ते शोधू लागले. हे शोधत असताना चंद्राच्या लक्षात आलं की इथली जमीन वेगळी आहे. लालसर-काळी . - - असलेली व थोडा उग्र वास असलेली माती होती. चंद्राला वाटलं, आपण ही माती कुठेतरी बघितली आहे. अचानक त्याच्या लक्षात आलं, जेव्हा तो शिंगाड्यांचा कैदी होता तेव्हा शिंगाड्यांचा पुजारी असलीच माती आगीत फेकत होता व त्यामुळे हिरवट-जांभळ्या रंगाच्या ज्वाला वर उठत होत्या. त्याने ती माती दंतवर्मांना दाखवली. त्यांनी ती चिमटीत धरली, नाकाजवळ नेऊन बघितली.

"दारूकामासाठी...सुरुंगासाठी वापरतात.” ते हसून म्हणाले. एवढ्यात डुंगाने त्यांना हाक मारली.

“इथे या...हा बघा कासवासारखा दगड." तो आनंदाने किंचाळत होता.

दंतवर्मा, चंद्रा व त्या पाठोपाठ वाध्याही धावला. एका उंच झाडाच्या मुळाशी कासव आकाराचा दगड पुरून ठेवला होता.

"होय, हेच ते झाड...” दंतवर्मा उद्गारले. "

चंद्रा व दंतवर्मांनी झपाझपा तिथली माती तासलेल्या बांबूच्या साहाय्याने दूर केली. हातभर माती उपसल्यानंतर एक हातभर लांबी-रुंदीची चंदनी पेटी दिसली. दंतवर्मांनी त्या पेटीचं कुलूप आपल्या कमरेला अडकविलेल्या किल्लीने उघडले. पेटीचे झाकण दूर करत त्यांनी आतील खजिना सुरक्षित आहे का ते पाहिले. त्या वेळी तो विलक्षण सुंदर-चमकणारा रंगीबेरंगी हिऱ्या-मोत्यांनी सुशोभित देवीचा मुकूट व दागिने बघून चंद्रा व डुंगाचे डोळे विस्फारले. त्यांनी असला अनमोल ठेवा यापूर्वी कधीच बघितला नव्हता.

“सारं सुरक्षित आहे... चला आपण परतूया...काळोख पडण्यापूर्वी आपल्याला वस्तीवर जायचे आहे.” दंतवर्मा म्हणाले.

पण चंद्रा थोडा थबकला. त्याने तिथली माती वेलींच्या भल्यामोठ्या
पानांमध्ये बांधून घेतली. तो हे कशासाठी करतोय हे कुणाच्याच लक्षात आलं नाही. बांधून घेतलेली माती त्याने व्यवस्थित कमरेभोवती बांधली. आता उन्हें कलू लागली होती. झपाझपा पावलं टाकत परतू लागले. पण आता निसरड्या उतरणीवरून त्यांना अधिक काळजी घ्यावी लगात होती. वाटेतील जंगली प्राण्यांना चुकवत चुकवत येताना काळोख पडायला सुरुवात झाली.

मयुरांच्या वस्तीपासून कोसभर अंतरावर असतानाच त्यांच्या कानावर मयुरांच्या हाका ऐकू येऊ लागल्या.

“वस्तीवर कुठचंतरी संकट आलंय.” डुंगा गडबडून म्हणाला व वेगाने धावू लागला. धावताना तो विशिष्ट आवाजात हाका देत होता. सूर्य क्षितिजाआड गेला होता. सावल्या रुंदावल्या होत्या व काळोखाचा भाग बनत चालल्या होत्या. अशा अंधारलेल्या वाटेवरूनही तो धावत होता. त्या पाठोपाठ चंद्रा व दंतवर्मा धावत होते. एवढ्यात एक मयूर धावतच त्यांच्याकडे आला.

“मंगाला.. त्यांनी... शिंगाड्यांनी पळवलंय.” त्याने डुंगाला सांगितले. आपल्या बापाला शिंगाड्यांनी बंदी करून नेलंय हे ऐकल्यावर डुंगा तिथेच डोके पकडून खाली बसला. '

चंद्राने त्याला सावरले. आता डुंगा संतापाने थरथरत होता. तो त्वरित शिंगाड्यांच्या वस्तीजवळ जाण्यासाठी तयार झाला. पण चंद्रा व दंतवर्मांनी त्याला थांबवलं. एवढ्यात तिथे तयारीविना जाणे धोक्याचे होते. शिवाय शिंगाडे मध्यरात्री व आपल्या देवाचा कौल घेऊनच मग नरबळी देतात, हे चंद्राने स्वत:च्या अनुभवावरून जाणले होते. त्यामुळे पूर्ण तयारीनिशी शिंगाड्यांवर हल्ला चढविणे गरजेचे होते. .

सारेजण मयुरांच्या वस्तीवर आले. तिथे एकच हलकल्लोळ माजलाहोता. सारेच घाबरले होते. बायका रडत होत्या. डुंगाच्या आईने तर एकच आकांत मांडला होता. दंतवर्मांनी साऱ्या पुरुषांना एकत्र केले. त्यांनी तगड्या व उत्कृष्ट नेमबाज अशा आठ मयुरांना निवडले. चंद्राने दंतवर्मांना शिंगाड्यांच्या 'नरबळी' देण्याच्या जागेची माहिती दिली. पानावर नकाशा काढून तिथला परिसर व सभोवतालची उंच झाडे व त्यावर लपून बसणाऱ्या शिंगाड्यांची माहिती दिली. त्यानुसार दंतवर्मांनी प्रत्येकाने कुठे राहायचे व काय करायचे ते सांगितले. दंतवर्मा कसलेले सेनानी होते. यापूर्वी त्यांनी अनेक धोकादायक मोहिमा फत्ते केल्या होत्या. चंद्राने धूर ओकणाऱ्या झाडांजवळून आणलेली माती सुकलेल्या पानांमध्ये गुंडाळून बारीक व लवचीक वेलींनी व्यवस्थित बांधली. त्याने असे बरेच दारूगोळे तयार केले. दंतवर्मांनी काही पुरुषांना वस्तीच्या रक्षणासाठी तैनात केले व सतर्क राहण्यास सांगितले. पूर्ण काळोख झाल्यावर दंतवर्मांनी साऱ्यांना जेवण करण्यास सांगितले. खाण्यावर कुणाचीच इच्छा नव्हती. पण लढताना ताकद अंगी असणे गरजेचे होते हे दंतवर्मा जाणून होते. अखेर डुंगा, चंद्रा, दंतवर्मा व इतर आठ मयूर शिंगाड्यांशी सामना देण्यास बाहेर पडले. सोबत वाघ्याही होता. मंगाला सोडवून आणण्याची जिद्द साऱ्यांनी बाळगली होती.
--------भाग९------------------------
पुढील भाग

भाग१०वा-- मंगाची सुटका व शिंगाड्यांची वाताहात