Saptpadi - 10 in Marathi Love Stories by Author Sangieta Devkar.Print Media Writer books and stories PDF | सप्तपदी (साथ जन्मोजन्मीची) - 10

Featured Books
Categories
Share

सप्तपदी (साथ जन्मोजन्मीची) - 10

ती आणि मल्हार ज्या हॉटेलमध्ये आले होते तिथेच विक्रांत ही आला होता. संदीप विक्रांत कडे बघून हसत होता . सँडी का हसतो आहेस त्याने विचारले. विकी नक्की तू त्या संयोगीता च्या प्रेमात पडला आहेस चेहरा बघ तुझा कसा फुलला आहे तिला बघून. अस काही ही नाही सँडी. ओहह रियली आता तू मला नको सांगू विकी, मी तुला आज ओळखत नाही. तसा विक्रांत ही गालातल्या गालात हसला. खर आहे तर मान्य कर त्यात काय प्रेम करणं हा गुन्हा थोडीच आहे? जी व्यक्ती आपल्याला मना पासून आवडते तिच्यावर प्रेम करणं काही ही गैर नाही विकी. पण सँडी तिच्या कडे बघ ती त्या मुला सोबत किती जवळीक तेने वागत आहे. त्याने तिचा हात हातात घेतला आहे. अँड आय थिंक दे अल्सो ड्रिंक. पण विकी तो तिचा मित्र ही असू शकतो ना? नो सँडी मित्र असा हातात हात घेऊन बसत नाही आणि ती ही गोड हसून बोलत आहे त्याच्या शी. मला वाटते तो तिचा बॉयफ्रेंड असेल. विकी आपल्याला काही तिच्या बद्दल अजून माहिती नाही सो नो गेस ओके. हम्मम विकी इतकंच बोलला. तेवढ्यात संयु चे लक्ष विक्रांत कडे गेले. तिने त्याला बघून स्माइल केले मग विक्रांत ही तिच्या कडे बघून हसला. मल्हार ते बघ तुझ्या मागे ते विक्रांत बसले आहेत. संयु मग काय झाले हॉटेल मध्ये कोणीही येऊ शकते ना? तसे नाही त्यांनी मला बघितले मग मी जाऊन त्यांच्याशी बोलायला हवे ना? संयु काय संबंध? आपली त्याची ओळख ही नाही जस्ट गेस्ट म्हणून तो फंक्शन ला आला तुला प्राईज दिले दयाटस ऑल. मल्हार पण हे बरोबर नाही ना दिसत . संयु माझ्या पेक्षा तुला तो जास्त महत्वाचा वाटतो का ? तसे असेल तर जा रागात बोलत मल्हार तिथून उठून जाऊ लागला. मल्हार तू का निघाला असे ? आपली ऑर्डर येईल आता . संयु तू बस त्या विक्रांत ला भेट मी चाललो . मल्हार ओके आय एम सॉरी प्लिज चिडू नकोस. संयु त्याला रिक्वेस्ट करत होती पण तो थांबला नाही. मग संयु ने काही पैसे तिथे टेबलावर ठेवले आणि मल्हार च्या मागोमाग गेली. इकडे विक्रांत चे लक्ष होते तिच्या कडे त्याने ते सगळं बघितले. सँडी अरे तो मुलगा रागात बाहेर गेला आणि ती संयोगीता ही त्याच्या मागे गेली नक्की काहीतरी झाले असेल चल बघू आपण. विकी हा त्यांचा पर्सनल मॅटर आहे आपण का जायचे? सँडी ती जर अडचणीत असेल तर आपण तिला मदत नको का करायला. विकी तू जा आणि बघ मी बसतो इथेच सँडी म्हणाला. विक्रांत ला खरच राहवले नाही तो हॉटेल बाहेर आला. त्याने पाहिले संयु त्या मुलाला खूप सॉरी म्हणत होती आणि रडत ही होती पण मल्हार ऐकत नवहता तो असाच होता एकदम रुड. तो कार उघडून आत बसला आणि संयु चा विचार न करता तिथून निघून गेला. संयु अजूनच रडत तिथे बाजूला एक बसायला कट्टा होता तिथे बसली. विक्रांत ला राहवले नाही तो तिच्या जवळ गेला, एनी प्रॉब्लेम मिस संयोगीता? त्याच्या आवाजाने तिने दचकुन मागे पाहिले विक्रांत तिच्या जवळ उभा होता. डोळे पुसत ती बोलली काही नाही सर पण तुम्ही इथे ? हो माझा एक फ्रेंड येणार होता तो अजून आला नाही आत फोन ला रेंज नाही येत सो मी कॉल करायला बाहेर आलो आणि तुम्ही इथे बसलेल्या दिसलात . काही प्रॉब्लेम असेल तर सांगा मी मदत करेन. नाही सर काही नाही मी घरी जाईन आता. कशा जाणार आहात? सर कॅब ने जाईन संयु बोलली. संयोगीता आता रात्रीचे एकट्या मुलीने कॅब ने जाणे सेफ आहे का? इफ यु डोन्ट माईंड मी तुम्हाला सोडायला येऊ शकतो जर तुमचा माझ्या वर विश्वास असेल तर. संयु ला त्याच बोलणं पटले होते आणि आता रात्र ही झाली होती एकटी जाणे सेफ नवहते आणि विक्रांत वर विश्वास ती ठेवू शकत होती कारण त्याच्या डोळ्यात तिला तिच्या बद्दलची काळजी दिसत होती. चालेल सर तुम्हाला त्रास नसेल होणार तर चला आपण जाऊ संयु म्हणाली. तेवढ्यात विराज तिथे आला, हे विकी बाहेर काय करतोस आणि सँडी कुठे आहे? विराज सँडी आहे आत मध्ये ,हे बघ मी यांना याच्या घरा पर्यंत सोडून येतो तोपर्यंत तुम्ही सुरू करा डिनर मी आलो लगेच . विकी काय आणि कशा बद्दल बोलत आहे हे विराज ला काहीच समजले नाही पण संयु कडे बघून तिला हेल्प हवी असेल असा अंदाज विराज ने बांधला आणि आपला हिरो विक्रांत सगळ्याना मदत करायला नेहमी पुढे असायचा हे विराज जाणून होता सो जास्त काही त्याला न विचारता विराज ओके म्हणाला आणि हॉटेल मध्ये गेला. संयोगीता प्लिज एक मिनिटं थांबा मी पार्किंग मधून माझी कार घेऊन येतो विक्रांत म्हणाला. तसे संयु ने फक्त मान हलवली. विक्रांत कार घेऊन तिच्या बाजूला उभा होता तिने डोअर ओपन केले आणि ती आत बसली. विक्रांत ने तिला तिचा पत्ता विचारला. मग रेडिओ ऑन केला. तुम्हाला चालेल ना रेडिओ मिस संयोगीता? त्याने विचारले. हो नो प्रॉब्लेम ती म्हणाली. कार त्याची तो सोडायला येतोय आणि आपला किती ही मूड खराब असला तरी त्याला गाणी लावू नका अस ती नाही बोलू शकत ना म्हणून गप्प बसली. ती फक्त मल्हार चा विचार करत होती. आता पर्यंत तिने त्याला 100 तरी सॉरी चे मेसेज केले होते पण तो खडूस होता एकदम शॉर्ट टेम्पर्ड त्यामुळे इतक्या लवकर तो तिला माफ करणारा नवहता. त्याच हे नेहमीचे होते संयु ने जरा काही मना विरुद्ध केले की याच्या रागाचा पारा लगेच शम्बरी गाठायचा

क्रमश..