ALIBI - 15 - last part in Marathi Detective stories by Abhay Bapat books and stories PDF | ॲ लि बी. - (प्रकरण १५) - शेवटचा भाग

Featured Books
  • You Are My Choice - 41

    श्रेया अपने दोनो हाथों से आकाश का हाथ कसके पकड़कर सो रही थी।...

  • Podcast mein Comedy

    1.       Carryminati podcastकैरी     तो कैसे है आप लोग चलो श...

  • जिंदगी के रंग हजार - 16

    कोई न कोई ऐसा ही कारनामा करता रहता था।और अटक लड़ाई मोल लेना उ...

  • I Hate Love - 7

     जानवी की भी अब उठ कर वहां से जाने की हिम्मत नहीं हो रही थी,...

  • मोमल : डायरी की गहराई - 48

    पिछले भाग में हम ने देखा कि लूना के कातिल पिता का किसी ने बह...

Categories
Share

ॲ लि बी. - (प्रकरण १५) - शेवटचा भाग

अॅलिबी
 
प्रकरण १५ ( शेवटचे प्रकरण.)
 
पाणिनी पटवर्धन त्याच्या ऑफिस मधे, केबिन मधे फिरत्या खुर्चीत आरामात बसला होता.समोर इन्स्पे.होळकर होता. “ या वेळेला माझ्या हातात तुझ्या अटकेचे वॉरंट आहे. “
 
“ मला वाटत नाही की खांडेकर ना ते द्यायची इच्छा असेल,.” – पाणिनी.
 
“ परत एकदा विचार कर पाणिनी, पूर्ण तयारीत आहोत आम्ही .”
 
“ मोकाशी ने स्वतःच्या सही चा कबुली जबाब वर्तमान पत्राच्या संपादकांकडे स्वतः जाऊन सादर केलाय “ – पाणिनी.
 
“ ही काय नाटकं आहेत पाणिनी ? तयारी कर, जायचयं आपल्याला , माझ्या हातात तुझ्या अटकेचे वॉरंट आहे. “
 
“ ते शब्द उच्चारून झालेत तुझे मगाशी., मला नेलंस तर तूच अडचणीत येशील.” – पाणिनी
 
पाणिनी ने आपल्या टेबला वरून काल्पनिक वर्तमान पत्र उचलल्याचा आणि वाचल्याचा अभिनय करत म्हंटले. “ इन्स्पे.होळकर, काय छापून आलंय पेपरात बघ, ‘ ज्या गोष्टीचा शोध पोलिसांना लावता आला नाही ते रहस्य आमच्या जनसत्ता वृत्तपत्राने शोधून काढलंय. मोकाशी ने आपल्या गुन्ह्याची लेखी कबुली दिली असून पोलिसांना त्याची काहीच माहिती नाही असे दिसून आले आहे.डोळ्यावर झापड लाऊन इन्स्पे.होळकर ने मात्र पळशीकर खुनी असल्याचे गृहित धरून पाणिनी पटवर्धन ने त्याला मदत केल्याच्या आरोप खाली त्याच्या वर वॉरंट बजावून स्वतःचे हसे करून घेतले.”
 
“ पाणिनी, खरंच अशी बातमी येणार आहे ?”
 
“जनसत्ता वृत्तपत्र या बातमी साठी जादा अंक काढणार आहेत म्हणे.”
 
“ उगाच गंडवू नकोस मला “
 
“ गंडवत नाहीये ,तुला ब्रेक द्यायचा प्रयत्न करतोय. खऱ्या खुन्याला इन्स्पे.होळकर ने पकडून दिले अशी बातमी आणू शकतो.”
 
“ म्हणजे नेमके काय करणार आहेस तू पाणिनी ? मला काही वेगळे काही सुचवायचा प्रयत्न करतो आहेस का? “ इन्स्पे.होळकर ने उत्सुकतेने विचारले. आपले नाव पेपरात प्रसिद्ध होणार या जाणीवेने तो सुखावला होता.
 
“ उदाहरण द्यायचे झाले तर टोपे च्या तोंडाला लागलेले लिपस्टिक.” पाणिनी म्हणाला.” या प्रकरणात अनेक स्त्रिया गुंतल्या आहेत पण त्यापैकी एकीनेच टोपे चे चुंबन घेतले असण्याची शक्यता आहे. त्या एकांतातील रस्त्यावर , टोपे ला, त्याची बंदूक जवळ नसताना एकच स्त्री भेटली असण्याची शक्यता आहे. ”
 
“ एकांतातील रस्ता ? म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? “ – इन्स्पे.होळकर
 
“ मला काय म्हणायचं आहे ते माहिती आहे तुला. टोपे ला त्याच्या बायकोवर काहीतरी वचक निर्माण करायचा होता.तो तिच्या बंगल्याच्या बाहेर वाट बघत होता.एक गाडी आली.त्यात कोण होते याची टोपे ला कल्पना होती.त्यातले लोक खाली उतरले. त्यातल्या स्त्रीचे टोपे ने चुंबन घेतले.”
 
“ कोण होती ती स्त्री ? “ इन्स्पे.होळकर ने अधीरतेने विचारले.
 
“ गेयता बाब्रस ! “ पाणिनी ने नाव जाहीर केले.
 
“गेयता बाब्रस ! “ इन्स्पे.होळकर उद्गारला. “ कशावरून अंदाज केलास तू ? ‘’
 
“गेयता बाब्रस ला पैसा हवा होता. मिसेस टेंबे ला पण पैशाची हाव होती. टोपे ला गेयता बाब्रस आवडायची पण मिसेस टेंबे चा तो धिक्कार करायचा. ती जवळ असताना तो गेयताला भेटायचा नाही म्हणूनच ऑफिसातून बाहेर पडल्यावर टोपे आदिती हुबळीकर ला भेटायला तिच्या घरी गेला तेव्हा मिसेस टेंबे त्याच्या मागोमाग आदिती हुबळीकर च्या घरा पर्यंत पोचली पण त्याच्याशी बोलायची संधी मिळाली नाही.मग ते त्याच्या मागोमाग त्याच्या बायकोच्या त्या बंगल्यात आले जिथे बाहेर टोपे त्याच्या बायकोची वाट पाहत होता.तिथे त्यांना त्याच्याशी बोलायची संधी मिळाली. गेयता गाडीतून उतरली आणि टोपे चे चुंबन घेतले.पण नंतर टेंबे गाडीतून उतरली आणि तिने टोपे कडे आपल्या मागण्या केल्या.त्याला कोर्टात खेचण्याची धमकी दिली.टोपे तिला हसला आणि म्हणाला ज्या क्षणी ती कोर्टात जायचा प्रयत्न करेल त्या क्षणी तो सर्वांसमोर उघड करेल की गेयता ही तिच्या मुलीची अनौरस मुलगी आहे, फुटलेल्या जहाजाची आणि रशिया तून तिला आणल्याची बातमी बकवास आहे. त्याच वेळेला दोघांच्यात खूप टोकाचे वाद झाले. मिसेस टेंबे एकदम चवताळली आणि तिने टोपे ला गोळी घातली.”
 
“ लहान मुलाला झोपवताना सांगतात तशी गोष्ट आहे ही.” इन्स्पे.होळकर म्हणाला.
 
“ अजिबात नाही , माझं हे बोलणे पूर्ण पणे तर्कशुद्ध आहे.मला मोकाशी च्या गादीत लपवलेली नोटांची लगड मिळाली.आणि ते पैसे त्याला मिसेस टेंबे कडून मिळालेले नव्हते कारण ती तेवढी चतुर होती, तिने त्याला काम होण्यापूर्वी आगाऊ रक्कम दिलीच नसती.त्याला पैसे देणारा एकच माणूस होता तो म्हणजे टोपे” पाणिनी म्हणाला.
 
“त्याने का दिले पैसे मोकाशी ला ?” इन्स्पे.होळकर ने विचारले.
 
“ अर्थातच मिसेस टेंबे बद्दल माहिती मिळवायला.विशेषतः गेयताच्या अनौरस पणा बद्दल, टेंबे च्या त्या रशिया च्या तथाकथित गोष्टीला खोटे पाडण्यासाठी. “ – पाणिनी
 
“ अजून एक लक्षात घे, टेंबे बाई माझ्या कडे आली ती माझी वकील म्हणून नेमणूक करायला नाही तर माझे आणि टोपे चे फोन वर बोलणे करून द्यायला.मी टोपे समजून त्याच्या सेक्रेटरी शी बोललो अकरा वाजता. तेव्हा माझ्या दृष्टीने टोपे जीवंत होता म्हणजेच दुपार नंतर मेला आणि तेव्हा टेंबे बाई कडे तिचा ठाव ठिकाण सिध्द करायला भरपूर पुरावा होता. म्हणजे थोडक्यात तिच्याकडे अॅलिबी होती.”
 
“ तुम्ही पोलिसांनी टोपे च्या चेहेऱ्यावरील लिपस्टिक आणि ते वापरणाऱ्या तरुणीच्या ओठावरचे लिपस्टिक याची तपासणी केली असती तर बरे झाले असते, आधीच रहस्य उलगडले असते.” पाणिनी ने पुस्ती जोडली.
 
“ ते काहीही असले तरी मी वॉरंट बजावणारच तुझ्यावर.”
 
“ मग त्यात तुझंच हसू होईल. त्यापेक्षा जनसत्ता च्या ऑफिस मधे जा, त्यांना सांग मोकाशी खुनी नाहीये, खरा खुनी वेगळा आहे, त्या मोकाशी ला तुमचा मुख्य साक्षीदार कर. तुला त्यात खूप प्रसिद्धी मिळेल, फोटो येईल तुझा.” पाणिनी म्हणाला.
 
“मी वॉरंट बजावणारच तुझ्यावर “
 
“ बजाव, बजाव. ! काहीही झाले तरी तुझा आता पेपर ला फोटो येणारच आहे. एक तर खुनी कोण याची माहिती पेपर वाल्यांना आहे पण पोलिसांना नाही,चोर सोडून संन्याशाला फाशी द्यायला निघाल्या बद्दल तुझा फोटो येईल किंवा माझे ऐकलेस आणि पेपरवाल्यांकडील बातमी चुकीची आहे हे दाखवून टेंबे बाईला खुनाच्या आरोपाखाली पकडलस तर कौतुकाने फोटो छापला जाईल. ” पाणिनीने जाणीव करून दिली.
 
“ मला गंडवण्याचा तुझा विचार नाही कशावरून? “ इन्स्पे.होळकर ने संशय व्यक्त केला
 
“ तूच बघ, कोणीतरी टोपे चे चुंबन घेतले, कोणीतरी त्याला गोळी घातली.नंतर मिसेस टोपे आणि पळशीकर आले. त्याला कसेबसे बंगल्यात नेले, अंथरुणावर झोपवले,तेव्हा तो मेला, त्यामुळे.......’’ पाणिनी चे बोलणे अर्धवट राहिले, सौम्या घाईत केबिन मधे घुसली.
 
“ ठीक झाले सगळे ? “ पाणिनी ने तिला विचारले.
 
“ एकदम व्यवस्थित झाले सगळे; तुम्ही अंदाज केलात तसेच घडले आहे, टेंबे बाई बद्दल माहिती मिळण्यासाठी मोकाशी ला टोपे कडून पैसे मिळत होते. तर पळशीकरवर आळ येण्यासाठी टेंबे ने मोकाशी ला लाच दिली होती.” डेला ने माहिती पुरवली.
 
“ इन्स्पे.होळकर, मला वाटले त्यापेक्षा जास्त चांगलं झालंय, तुला अजूनच संधी आहे चमकायची.” पाणिनी सांगू लागला, “ वर्तमान पत्र वाले मोकाशी च्या लेखी कबुली वरून मिसेस टेंबे वर खुनाचा आरोप नाही करणार,फारतर लाच दिल्याचा करतील.तुझ्या जागी मी असतो ना, तर गेयता बाब्रस च्या मागे लागून माहिती घेतली असती.मिसेस टेंबे, टोपे ला मारेल असा गेयता बाब्रस ला अंदाजच नसावा पण आता ते झालं म्हटल्यावर ती तिच्या आजीच्या बाजूने म्हणजेच मिसेस टेंबे च्या बाजूने उभी राहिली. तुझ्या जागी मी असतो ना, तर..... “
 
पाणिनी चे बोलणे ऐकायला इन्स्पे.होळकर थांबला नाही, दाराकडे पळत सुटला.
 
“ पाणिनी , तुझ्या कामाच्या पद्धती मला कधीच आवडल्या नाहीत पण आज तू माझ्यासाठी जे केलेस, त्यासाठी आभार.”
 
“ आभार मानल्या बद्दल आभार इन्स्पे.होळकर “
 
दार लावता ,लावता, इन्स्पे.होळकर पुन्हा म्हणाला, ” तरी मला तू आवडत नाहीस पटवर्धन. आणि मला वाटत, तुला ही मी आवडत नाही.” तो बाहेर पडला तेव्हा दार दाणकन आदळले.
 
फोन वाजला. सौम्या ने उचलला .” आदिती हुबळीकर चा फोन आहे.ती विचारत्ये की तिला करण्या सारखे काही आहे का? “
 
“ तिला सांग, तिला काही करण्या सारखे नव्हते आणि तिने केले ही नाही. उगाचच ती स्वत:चे महत्व वाढवून घेत होती. आम्ही ज्या हॉटेलात बसलो होतो तिथे ये म्हणावे पंधरा मिनिटात. मला तिचा पडलेला चेहेरा बघायचाय, तिने पेपरात बातमी वाचल्या नंतरचा !!! “ - पाणिनी म्हणाला.
 
( प्रकरण १५ आणि संपूर्ण कादंबरी समाप्त !!! )