GIFT FROM STARS 43 in Marathi Love Stories by siddhi chavan books and stories PDF | नक्षत्रांचे देणे - ४३

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

नक्षत्रांचे देणे - ४३

गाडीमध्ये क्षितिज भूमीचाच विचार करत होता. ती जशी आधी होती तशीच होती. जराही बदल झाला नव्हता. ती आपल्याशी खोट का बोलली? आणि लंडनला गेल्यावर एकही फोन करू शकली नाही. मेसेज नाही. त्याने केलेल्या फोनला रिप्लाय करू शकली नाही. का? असे बरेचसे प्रश्न त्याला सतावत होते. खरतर ती भेटली तेव्हा तिला कडकडून मिठी मारावी असे त्याला वाटले होते.  तिच्याशी भांडाव, तिला जाब विचारावा असेही वाटले, पण त्याने तसे केले नाही. आता तो आपल्या आयुष्यात खूप पुढे गेला होता. त्याच्याही पुढे जाण्यासाठी तो प्रयत्न करत होता. आणि आता त्याच्या आणि त्याच्या कंपनीच्या मध्ये त्याला कोना दुसऱ्या तिसऱ्याची गरज नव्हती. फक्त आपल्या SK ग्रुप चे नाव मोठे करायचे आणि त्याचा विस्तार अजून वाढवायचा एवढेच ध्येय त्याच्या मनात होते. आधी मैथिली आणि आता भूमी या दोघैकडून मिळालेल्या फसवणुकीमुळे प्रेम वेगैरे भावना त्याने मनातून केव्हाची हद्दपार केली होती.

 

 

 

 

*****

 

 

 

 

भूमी आपल्या घरी आली. मिस्टर किर्लोस्कर म्हणजेच तिचे पप्पा तिची वाट बघत होते.

 

''वेलकम बॅक. प्रवास कसा झाला?'' महंत त्यांनी तिचे स्वागत केले.

 

 

 

 

''मस्त.'' म्हणत ती आपल्या रूमकडे वळली.

 

 

 

 

''भूमी थांब तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे.'' म्हणत त्यांनी तिला थांबवले.

 

 

 

 

''उद्या बोलता येणार नाही का?'' भूमी

 

 

 

 

''नाही, महत्वाचं आहे.'' भूमीचे पप्पा

 

 

 

 

''बोला.'' ती मागे वळून येऊन सोफ्यावर त्यांच्या समोर बसली.

 

 

 

 

''मी तुला सांगितलेल्या गोष्टीचा तू विचार केलास का? SK ग्रुप बद्दल.'' मिस्टर किर्लोस्कर

 

 

 

 

''नाही. अजूनही माझे उत्तर नाही असेच आहे.'' भूमी उठून आता निघाली.

 

 

 

 

''नीट विचार करून सांग मला. हवा तर थोडा वेळ घे. घाई नाही. मी सांगतोय त्यातच सगळ्याची भले आहे. '' मिस्टर किर्लोस्कर

 

 

 

 

''बघते.'' म्हणत ती मागे न पाहताच पुढे निघून गेली.

 

 

 

 

तिला क्षितीजमध्ये झालेला बदल याशिवाय काहीही काहीही सुचत नव्हते. ती त्याच्या विचार करत होती. उद्या कंपनीत जाऊन त्याच्याशी बोलले असे तिने ठरवले.

 

 

 

 

*****

 

'ब्यू रंगाच्या ऑडी कारमधून त्याने ऑफिसमध्ये एंट्री केली. पांढऱ्या शुभ्र शर्टवर डार्क ब्राऊन ब्लेझर आणि ट्राउसर असा त्याचा पेहेराव त्याला शोभत होता. त्याच्या ऑडीच्या मागे पुढे दोन सिक्युरिटीच्या गाड्या उभ्या होत्या. ऑफिसच्या आवारात पोहोचताच ड्राइव्हरने दरवाजा उघडला आणि तो गाडीतून खाली उतरला. ''सर आले, सर आले... म्हणत वोचमॅनने येऊन त्याची बॅग घेतली. मागे आणि पुढे असणाऱ्या सिक्युरिटीच्या गाड्या तळमजल्यावर असणाऱ्या पार्किंगमद्ध्ये उभ्या राहिल्या.

 

रिसिप्शनिस्टने 'गुड मॉर्निंग सर.'' म्हणत त्याचे स्वागत केले. आणि तिला एक स्माईल देत तो त्याच्या कॅबिनकडे निघाला. ऑफिसमध्ये प्रवेश करताच सगळ्यांची एकच धावपळ उडाली. सगळे आपापल्या डेस्कवर जाऊ लागले आणि आपापल्या लॅपटॉप मध्ये डोकं खुपसून काम करू लागले. क्षितिजचा धाक असा होता कि सगळे त्याला बघून मुकाट्याने  काम करू लागले होते.

 

 

 

 

त्याच्या PA घाईघाईने येऊन त्याच्या समोर उभा राहिला. ''एस सर?''

 

''माझ्या परवानगी शिवाय स्टाफ आणि इन्व्हेस्टर व्यतिरिक्त बाहेरील कोणालाही आतमध्ये कंपनीमध्ये येऊ द्यायचे नाही.'' म्हणत तो खुर्चीवर बसला.

 

 

 

 

''एस सर.'' म्हणत PA बाहेर निघून गेला.

 

 

 

 

''भूमी बाहेर येऊन मेन गेट वर उभी होती. पण तिला आतमध्ये सोडायला सिक्युरिटीने नकार दिला.  एकतर ती आता इथे काम करत नव्हती. ना स्टाफ ना इन्व्हेस्टर, त्यामुळे तिला आता कंपनीमध्ये जाणे शक्य नव्हते. तिने मिस्टर किर्लोस्करांना फोन लावला.

 

''हॅलो. मला कंपनीमध्ये आतमध्ये जाता येत नाहीये. काही मदत करू शकता.''

 

 

 

 

''क्षितिज सावंतने तशा ऑर्डर्स देऊन ठेवल्या आहेत. त्याच्या परवानगी शिवाय कंपनीमध्ये कोणालाही जाण्याची परमिशन नाही. मला सुद्धा यामध्ये हस्तक्षेप करता येणार नाही.'' पलीकडून मिस्टर किर्लोस्कर म्हणजे तिचे बाबा बोलत होते.

 

 

 

 

''क्षितीज ने? पण का? मिस्टर सावंत ऑफिस मध्ये नाही येत का?'' भूमी

 

 

 

 

''संजय सावंत माझ्यासारखाच आजारी आहे. आता क्षितीज सावंत कंपनीचा CEO आहे. तोच सगळे डिसिजन घेतो. आपला कोणताही प्रतिनिधी किंवा हेड तिथे उपस्थित नसल्याने आपसूकच एकहाती सगळा कारभार त्याच्याकडे सोपवला गेला आहे.'' मिस्टर कोर्लोस्कर

 

 

 

 

''ओह, तर क्षितीज सध्या बॉस आहे. आय सी.'' भूमी

 

 

 

 

''म्हणूनच तुला सांगत होतो, सध्या ऑफिसमध्ये जाऊन तिथे काय चाललं आहे मला बघायला नाही जमत. माझी ताब्यात बिघडत चालली आहे. मी सांगितलेल्या गोष्टीचा लवकरात लवकर विचार कर. नाहीतर आपल्याला कंपनीतील आपले शेअर्स आणि आपली अर्धी मालकी सगळं काही आपल्याला सोडून द्यावं लागेल.''    मिस्टर कोर्लोस्कर

 

 

 

 

''मला थोडा वेळ द्या. मी लवकरात लवकर तुम्हाला कळवते. बाय.'' म्हणत भूमीने फोन ठेवला

 

******

 

मनात काहीतरी विचार करून ती  सावंत मेनशन कडे निघाली. तिथे पोहोचल्यावर तिला धक्का बसला.  मिस्टर सावंत बेडरेस्ट वरती होती. आज्जो त्यांची देखभाल करत होत्या. मिसेस सावंत बाहेर गेल्या होत्या.

 

मिस्टर सावंतांशी बोलल्यावर तिला खूप वाईट वाटले.  त्यांना आता बेडवरुन उठता येणे शक्य नव्हते. एका छोट्याश्या अपघातात त्यांच्या बॉडी चे काही भाग बऱ्यापैकी फ्रॅक्चर झाले असल्याने ते तीन-चार महिने बेडवर होते. भूमीला बसायला सांगून त्यांनी आशा ताईंना तिच्यासाठी चहा पाण्याची व्यवस्था करायला सांगितली. आज्जो शेजारी बसल्या होत्या. त्यांच्या तब्ब्येतीची चौकशी करून भूमी आज्जोनशी गप्पा मारू लागली. तेव्हा बोलता बोलता त्यांनी सध्या घराची असणारी कंडिशन सांगितली. भूमी लंडन गेल्या पासून सगळ्या गोष्टी बिघडल्या होत्या.

 

अचानक मिस्टर सावंतांचा कार अपघात झाला आणि ते जागेवर बसले. त्यामुळे त्यांनी क्षितिजकडे कंपनी चा सर्व कारभार सोपवला.  क्षितीज SK ग्रुपच्या मुख्य अधिकारी पदी विराजमान झाला. भूमी एका महिन्यात परत इकडे येणार होती, ती आली नाही तिच्याशी असणारे सगळे कॉन्टॅक्ट संपले होते, त्यासाठी क्षितिजने त्याच्या आईला म्हणजेच मेघाताईना जबाबदार ठरवले. आणि त्याने सावंत मेनशन हे त्याचे स्वतःचे घर सोडून दिले. तो आत्ता कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्यांसाठी असणाऱ्या बँग्लोमध्ये एकटाच राहत होता. फक्त वडिलांना आज्जोला भेटण्यासाठी आठवड्यातून एकदा तो इकडे येत असे. असे सर्व मिस्टर सावंतांनी भूमीला सांगितले

 

 

 

 

आज्जो तर म्हणाल्या मेघा घरी यायच्या आत तू इथून निघून जा. क्षितीज मेघाशी अजिबात बोलत नाही. आणि त्याने हे घर सोडले आहे, त्यासाठी मेघाताई म्हणजेच क्षितिजची आई भूमीला जबाबदार ठरवत होती.

 

 

 

 

गोष्टी एवढ्या थराला जातील याची भूमीला पुसटशी कल्पनाही नव्हती. आपल्या मागे खूप काही बदलले होते, हे तिला जाणवले. तो सध्या मनाला वाट्टेल तसे वागत होता. फक्त कंपनीच्या हिताच्या गोष्टी करत होता, त्यामध्ये काम करणारे कामगार आणि इतर स्टाफ यांच्याशी त्याची असणारी वागणूक फारशी चांगली नव्हती. कामगार हिताच्या दृष्टीने तसेच त्यांच्या ग्रोथ च्या दृष्टीने तो कोणताही विचार करत नव्हता. त्यामुळे कंपनीमध्ये स्टाफ मध्ये नाखुषी दिसून येत होती. हे त्यांनी भूमीला सांगितले.

 

 

क्षितीजच्या वागण्यात आणि राहणीमानात झालेल्या बदला विषयी मिस्टर सावंतांनी भूमीला सांगितली. आपल्यामुळे इथे खूपच प्रॉब्लेम्स निर्माण झाले आहेत, आता एकएक करून सगळ्या गोष्टी व्यवस्थित करण्याचे वाचन देत भूमी मिस्टर सावंत आणि आज्जोचा निरोप घेऊन निघाली. निघताना तिने आपल्याला कंपनीत पुन्हा काम करण्याची संधी मिळेल का? असे  मिस्टर सावंतांना विचारले. त्यावर ते म्हणाले.'' आता क्षितीज जर तयार असले तरच तुला तिथे नोकरी करत येईल. पण तो तुला परवानगी देईल असे मला वाटत नाही.'' त्यांच्या या वाक्यावर भूमी काय समजायच ते समजली होती. त्यांची इच्छा असतानाही त्यांना आता भूमीसाठी काहीही करता येण्यासारखे नव्हते. ती ''बाय.काळजी घ्या.'' एवढे बोलून तिथून निघाली.

 

 

 

'भूमी घरी जाऊन तडक मिस्टर किर्लोस्कर म्हणजेच तिच्या बाबांना भेटली. त्यांनी दिलेले प्रपोजल एका कंडिशनवर एक्सपेक्ट करायचे तिने ठरवले. एक दिवस कंपनी व्हिजिट करून ती तिचा निर्णय देणार होती. आणि मिस्टर किर्लोस्कर तिची अट मान्य करून कंपनीमध्ये तिला घेऊन जायला तयार झाले.'