‘इकडे संध्याकाळी मेघाताईंनी क्षितीज आणि घरी सगळ्यांचा कानावर भूमी बद्दल समजलेले सत्य सांगितले. त्यांना अपेक्षित होते कि क्षितीज चिडेल, पण तसे झाले नाही. तो ''आई आपण रात्री बोलू, मी आलोच.'' बोलून तिथून तडक बाहेर निघाला. ‘एवढी मोठी गोष्ट समजूनही याची सौम्य प्रतिक्रिया कशी? हा भूमीला जाब विचारायला गेलाय का?' हे मेघाताईंना समजेना. त्या आणि आज्जो झालेल्या प्रकाराने अगदी डिस्टर्ब झाल्या होत्या. यामधून क्षितीज कसा बाहेर पडेल? कि मैथिली प्रकरण सारखंच तो स्वतःला त्रास करून घेईल? असे एक ना हजार प्रश्न त्यांना पडले होते.
*****
'मनाशी पक्का विचार करून भूमीने एक मेल ड्राफ्ट केला. तो कंपनीच्या HR ला पाठवून दिला. आपली बॅग भरत असताना तिने क्षितिजला कॉल करण्याचा प्रयत्न केला. त्याने तो उचलला नाही. मग शेवटी तिने ''सॉरी.'' असा एकच मेसेज पाठवून तिचा मोबाइल स्विचऑफ केला. तिच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं. हरलेल्या मनाने तिने रूमच्या मुख्य दाराला कुलूप लावले. आणि ती आपले सगळे सामान घेऊन निघाली.
*****
तिचा सॉरी मेसेज बघून क्षितिजला काही कळेना. गाडी चालवताना फोन उचलून कानाला लावणे शक्य नव्हते. त्याने नंतर तिचा फोन डाइल केला, पण तो बंद लागत होता. झाल्या प्रकाराने भूमी डिस्टर्ब असणार, आणि स्वतःला काहीतरी त्रास करून घेईल. याची त्याला काळजी होती. तिच्या पर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी शेवटी त्याने गाडीचा वाढवला. थोड्यावेळातच तो तिच्या रूमवर पोहोचला पण तोपर्यंत उशीर झाला होता. ती रूम सोडून तिथून निघून गेल्याचे त्याला समजलं. तो डोक्याला हात लावून तिथेच बसला. 'कुठे गेली असेल? आणि का?' हे त्याला कळेना. मोबाइलवर निधीचा नंबर डाइल करून त्याने तिला विचारले. निधीला सुद्धा काहीच माहित नव्हते. ती खूप दिवस बाहेरगावी होती. 'एकतर आश्रमात, नाहीतर माई आणि नानांना भेटायला भूमी गेली असेल.' असे त्याला निधीने सांगितले.आश्रमाचा पत्ता त्याच्याकडे होताच. नानांच्या घराचा पत्ता निधीकडून घेऊन तो निघाला. आधी त्याने गाडी आश्रमाकडे वळवली. तिथे भूमी नसेल तर तो नानांच्या गावच्या घरी जाणार होता. कोणत्याही किमतीत त्याला भूमीला भेटायचं होतं. त्यासाठी वाट्टेल तिथे जाण्याची त्याची तयारी होती.
*****
'नाना-माईंच्या पायापडून भूमी आत घरात आली. थोडं फ्रेश होऊन तिने आराम केला. सारखं विचार करून तिचं डोकं पुन्हा दुखू लागलं होतं. सुदैवाने विभास घरी नव्हता. काही दिवसांपूर्वीच तो शहरात गेला होता. त्यामुळे ती नाना-माईंशी मोकळेपणाने बोलू शकत होती. थोडं आराम करून झाल्यावर नानांनी विषय काढला आणि तिने सगळ्या गोष्टी सविस्तरपणे त्यांच्या कानावर घातल्या. क्षितीज आणि तिची अचानक झालेली एंगेजमेंट वेगैरे सगळं त्यांना सांगितलं.'
''खरंतर हे आधीच सांगायला पाहिजे होतं. पण कसं सांगावं कळेना. तुम्हाला प्रत्यक्ष भेटून सांगेन असं ठरवलं होत. त्यामुळे राहून गेलं. त्यासाठी मला माफ करा.'' तिने त्या दोघांनाही माफी मागीतली. दोघांनाही कसलीच तक्रार नव्हती. कोणीतरी मनापासून प्रेम करणारा मुलगा तिच्या आयुष्यात आलाय. तिला सुद्धा लग्नाचे सुख मिळाले पाहिजे. तिने तिचे आयुष्य तिच्या मनाप्रमाणे जगावे, यात वावगे काय? नाना या विचाराचे होते.
'संपत्ती आपल्या नावावर का केली नाही म्हणून विभास नानांना त्रास देत होता. त्याला इथले सगळे विकून पुन्हा परदेशी जाऊन स्थाईक व्हायचं होत. त्यामुळे नाना त्याला काहीही द्यायला तयार नव्हते.' हे समजल्यावर भूमीचा संताप अनावर झाला. आपल्या आयुष्याशी खेळून त्याच पोट भरलं नाही तर तो माई-नानांना इथे बेघर करून वाऱ्यावर सोडून परदेशी पाहण्याची स्वप्न बघतोय. अजून किती खालच्या पातळीवर उतरणार आहे हा? त्याच्या आपमतलबी पानाचा तिला राग आला. खरतर ती प्रॉपर्टीच्या पेपर्सवरून आपले नाव काढून टाकणार होती. पण तसे केले तर माई-नानांसाठी मोठं संकट उभं राहील असतं. त्यामुळे नानांनी तिला तसे न करण्याचे बजावले. तिने तो विचार मनातून झटकून टाकला. आधी क्षितिजच्या आईचा झालेला गैरसमज दूर कर. असा सल्ला माईंनी तिला दिला. त्यासाठी लागणारी मदत ते दोघे करणार होते. काय करावं? या विचारात तो होती. आणि तेवढ्यात बाहेरची दाराची बेल वाजली.'
दार उघडताच नाना आश्चर्यचकित झाले. विभास समोर उभा होता. बाहेरगावी जातो सांगून तो निघून गेला होता. जवळपास आठवड्याने त्याने घरी पुन्हा हजेरी लावली. भूमीला बघून त्याने कुटूर हास्य केले.
''शेवटी भेटलीसच ना?'' विभास
''म्हणजे?'' नाना
''मी असा नाही डाव खेळलो कि हिला स्वतःच्या पायाने इथे यावे लागले. हेच तर अपेक्षित होते मला.'' विभास
''माझा तुझ्याशी काहीही संबंध नसताना तू का केलास हे सगळं? माझ्याबद्दल गैरसमज पसरवून काय मिळालं तुला?'' भूमी फार चिडली होती. तिने त्याला सरळसरळ जाब विचारला.
''हे नाना मला तुझा नंबर देत नव्हते. तुझा पत्ता तर दूरच. असे केलर नसते तर तू इथे आलीच नसतीस.'' विभास
''मला लाज वाटते तुला माझा मुलगा म्हणण्याची.'' माई डोक्याला हात लावत मटकन जागच्याजागी खाली बसल्या.
''मग मला माझी वाटणी द्या. मी इथून कायमचा निघून जातो. परदेशातील माझं करिअर आणि सगळं उध्वस्त झालाय, त्यामुळे मला पैश्यांची गरज आहे.'' विभास रागारागाने बोलतं होता.
''माझ्या काष्ठाने मी हे सगळं कमावलं आहे, एक फुटकी कवडीही तुला मिळणार नाही.'' नानांनी त्याला खडे बोल सुनावले. त्याचा राग अनावर झाला आणि तो नानांवर धावून आला. भूमीने त्याला मागच्या मागे ढकलून सरळ पोलीस स्टेशनमध्ये फोन लावला होता. तेव्हा पोलिसांच्या भीतीने तो थोडा शांत झाला. शेवटी माईनी त्याला तिथून निघून जायला सांगितले. ''आजपासून तू आमचा कोणीही लागत नाहीस. त्यामुळे इथे तुझं काहीही नाही. चालत हो.'' असे सांगून नानांनी त्याला घराबाहेर काढले.
''आत्ता मी इथून जातो, तुला मी सुखासमाधानाने जगू देणार नाही.'' असे भूमीला बजावून तो निघून गेला.
तो गेल्यानंतर घरात एक भयाण शांतता पसरली. आपला मुलगा या थराला जाऊ शकतो. आपल्या वडिलांवर धावून येऊ शकतो. हि गोष्ट माई-नानांच्या मनाला फार लागली. त्याला डावलून भूमीच्या नावे सगळे केल्याचे ऐकल्यावर तो फार चवताळला होता. तेव्हापासून त्याचे वागणे बदलले होते. विभासचे वागणे त्यांच्या कल्पनेपलीकडचे होते. उद्या तो कोणाचेही बरेवाईट करायला मागेपुढे पाहणार नाही. त्याआधीच सावध झाले पाहिजे आणि काहीतरी निर्णय घेतला पाहिजे हे नानांनी ओळखले. पण काय ? हे त्यांना कळेना.
'आश्रमात भूमी नाही हे समजल्यावर क्षितिजने नानांच्या घरी जाण्याची तयारी केली. अर्ध्या रस्त्यामध्ये त्याच्या गाडीचा टायर पंक्चर झाला आणि तो तिथेच अडकला. जवळपासचे गॅरेज बघून त्याने गाडी रिपेअरिंगला दिली. आणि ती पूर्ववत झाल्यावर तो पुन्हा भूमीला भेटायला निघाला. सारखे मेघाताईंचे फोन सुरु होते. तो कुठे आहे? आणि काय झालं? याची विचारपूस त्या करत होत्या. आत्ताच काहीही सांगणे योग्य नाही. भूमीला भेटून मग काय ते बघू, म्हणत तो आईला सांगणे टाळत होता.'
'भूमीचे असे अचानक रिझाइन मिळाल्याने मिस्टर सावंतही चिंतेत होते. तिचा फोन बंद असल्याने काही संभाषण होऊ शकत नव्हते. झालेला प्रकार त्यांच्या कानावर आला होता. पण यात काय खरे आणि काय खोटे हे त्यांना समजेना. या सगळ्याचा परिणाम आपल्या कंपनीवर होऊ नये म्हणून ते शक्य ती काळजी घेत होते.'
****
'चिडलेल्या विभासने घर सोडले होते. त्याची सगळी प्रॉपर्टी आयतीच भूमीला मिळाली होते. त्यामुळे तिच्याबद्दल त्याच्या मनात प्रचंड राग निर्माण झाला होता. ला धडा शिकवण्याची योजना त्याने आखली आणि तो संधीची वाट पाहू लागला.'
-------------------
क्रमश