Desire in Marathi Short Stories by Author Sangieta Devkar.Print Media Writer books and stories PDF | डिझायर

Featured Books
Categories
Share

डिझायर

विराज आज अगदी खुशीत च घरी आला.पुढच्या आठवड्यात तो भारतात आपल्या मायदेशी परत जाणार होता. कपंनीने त्याला चार वर्षा साठी इथे कॅनडाला पाठवले होते. कारण तो खुप टैलेंटेड सॉफ्ट वेयर इंजीनियर होता. त्याच्या स्पार्क पाहता कंपनीने त्याला निवडले होते,चार वर्षाच्या करारावर तो भारत सोडून कॅनडाला आला होता . आपण परत येत आहोत ही न्यूज कधी एकदा त्याच्या मित्रांना सांगतो,असे त्याला झाले होते. घरी आल्या आल्याच् त्याने लॅपटॉप उघडून फेसबुक लॉगिन केले,आणि अभ्या,निखिल ला मेसेज केला. तो, अभय आणि निखिल कॉलेजचे अगदी जिवलग मित्र,,हो आणि मिताली सुद्धा,,!!! या चौकड़ी चा दंगा मस्ती धमाल साऱ्या कॉलेजला माहित होती.जगावेगळी अशी यांची मैत्री होती,पण आता या चौकोना चा एक कोन यांच्या पासून वेगळा झाला होता. मिताली,,दोन वर्षा पासून यांच्या संपर्कात् नव्हती.
मिताली च्या आठवणीने विराज चे डोळे भरून आले,कॉलेज च्या पहिल्या वर्षी च ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते,आणि आयुष्यभर एकत्र राहन्याचे स्वप्न पाहिले होते. पण ते स्वप्न स्वप्नच बनून राहिले. 2 वर्षा पूर्वी मिताली चे लग्न झाले,कारण विराज भारतात नव्हता. आणि कपंनी च्या करारा नुसार त्याला 4 वर्ष भारतात येन्याची परवानगी नव्हती,रादर तो बॉन्ड संपे पर्यन्त लग्न ही करु शकत नव्हता . तसेच जर जेनुयन रिजन असेल तर तो भारतात येऊ शकत होता. मितालीच्या घरचे इतकी वर्ष वाट पाहायला तयार नव्हते. मिताली तर विराज साठी आयुष्यभर थांबायला तयार होती. पण तिच्या आई वडिलांनी तिला लग्ना साठी इमोशनली तयार केल. मग तिचा ही नाइलाज झाला. आईवडिलांच्या प्रेमासाठी,काळजी पोटी ती विराजला सोडून राहुलशी लग्नाला तयार झाली. 2 वर्ष झाले त्यांच्या संसार चांगला चालला होता. सुरुवातीला मितालीला विराज ला विसरने अवघड झाल होतं,क्षणोक्षणी त्याच्या आठवणी तिच्या पीछा करत,त्याच्या आठवणींत् अश्रु ढाळन्या शिवाय ति काहीच करु शकत नव्हती. पण लग्नाआधी तिने राहुलला तिच्या आणि विराज च्या नात्याची कल्पना दिली होती. राहुल खूपच शांत आणि समजस होता,त्याला माहित होते अशा परिस्थितित् कसे वागावे,तिला कसे समजवावे हे तो चांगले जाणुन् होता.त्यामुळे त्याने मितालीला थोडा ही दोष न् देता हळूहळू तिला यातून बाहेर काढले होते. तिला प्रेमाने समजून घेतले होते म्हणून च राहुलचा हा चांगुलपणा मितालीला भावला होता. तिने स्व्:ता हुन विराजशी पूर्णपणे संपर्क तोडला होता. आज राहुल तिचा सर्वस्व होता. पण कधी कधी भूतकाळातील गोड आठवणी अचानक डोक वर काढायाच्या मग मिताली पुन्हा उदास व्हायची.किती ही झाले तरी विराज वर तिचे जिवापाड प्रेम होत,दोघे एकमेकांचे "जान" बनले होते. पाहिले प्रेम होत तिच!!पण कुठेतरी या सगळ्याच्या पुढे राहुलने तिच्या मनात आदराचे,प्रेमाचे स्थान मिळवले होते.
विराज कड़े मिताली चा कोणताच कॉन्टेक्ट नव्हता. पूर्णपणे तिने त्याला तोडून टाकले होते.म्हणूनच तो जरा खट्टू झाला. आपण भारतात परत जातोय ही आनंदाची बातमी त्याला मितालीला सांगता येत नव्हती. असेही सांगून ति थोडीच त्याच्या आनंदात सहभागी होणार होती.तिचा विचार बाजूला करत विराज आपली तयारी करु लागला. दुसऱ्याच वीक मध्ये तो भारतात परत आला. विराज,अभय निखिल आज त्यांच्या फेवरेट हॉटेल ला भेटणार होते. पुण्यातील फेमस वाड़ेश्वर ,,जिथे ही चौकट कायम पडिक असायची. त्यांना दूसरी कड़े जायला जास्त आवडत नसायच. आज तर विराजला भेटायच तर मग त्यांनी त्यांच् लाडक हॉटेलच निवडल होतं. विराज पोहचला होता,फोन वर टाइमपास करत त्या दोघांची वाट पहात होता. पाच मिनिटात् अभय ,निखिल आले.
त्याला पाहताच निखिल म्हणाला,अरे विराज कसला चेरी सारखा पिंक पिंक झालास यार तू कॅनडात राहून,तबयेत पण मस्त,छान मानवल की तुला परदेस,,!! विराज मुळातच गोरा,देखणा,त्यात बाहेर राहून अजुनच स्मार्ट दिसू लागला होता. तो हसत म्हणाला,मग काय मस्त गुलाबी थंडी,छानस जेवण,वर हवी तेवढी बियर ते ही सगळ कपंनी कडून फुकट ,मग काय यार,तबयेत तबयेतीत च होणार ना!
खरे आहे विरया तुझ ,फुकटच खाउन पिऊन तंदुरुस्त झालास ना,! अभ्या म्हणाला.
विराज तिकडच्या गंमती जमती सांगत होता,खुप गप्पा रंगल्या होत्या त्यांच्या. मध्येच अभय म्हणाला,काय रे विरया मिताली चा काही फोन मेसेज ? हताश पणे तो बोलला,नाही रे मागेच तिने माझ्याशी कॉनटेक्ट बंद केला. 2 वर्ष झाली ना रे तिचे लग्न होऊन? मि तिला दिलेला शब्द नाही पाळू शकलो ना,मग का ती माझ्याशी बोलेल? निखिल म्हणाला डोन्ट वरी विराज,तुझ्या कडून काही नाही चूकले,फक्त परिस्थितीच अशी होती की तू तरी काय करणार होतास?
ओके जे झाल ते झाल,माझ्या नाशिबात नव्हती मिताली,तिच्या आठवणी फक्त राहिल्या. विराज.
नन्तर खुप वेळ गप्पा मारून्,खाणे पिणे उरकून पुन्हा भेटायचे ठरवून जो तो निघाला.
विराज पार्किंग मधून त्याची बाईक काढ़त् होता,तसाच मागे मागे येत कोणाला तरी जोरात धड़कला. तसा ही तो मेन रोड ,त्यामुळे तिथ सतत गर्दी असायची,हॉटेल च्या बाहेरच सगळ्या गाड्या पार्क असायच्या. त्याने सॉरी म्हणत मागे पाहिले,हि डोन्ट बिलिव्ह,,!त्याच्या डोळयांवर त्याचा विश्वासच बसत नव्हता,तो जिला धड़कला होता ती मिताली च होती. क्षणभर दोघांना काही सूचले नाही. एकमेकांना पहात राहिले काही सेकन्द,मग भाना वर येत विराज म्हणाला,मिताली तू? कशी आहेस,व्हाट अ प्लेझेन्ट सरप्राइज,!
मि ठीक आहे,तू कधी परत आलास विराज?
कालच,मी कायमचाच इकडे परत आलो,तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता,त्याला पाहून ती भांबावून गेली होती. तिचा विराज,वीरू तिच्या समोर उभा होता. ति त्याला प्रेमाने वीरू म्हणायची,तर हा म्हणायचा ये ते नको वीरू म्हणू मला ,ते शोले मधल्या जयविरू सारख वाटत,तू आपल मला विराज किवा राज म्हण ते चालेल. यावर ती म्हणायची,हो का, डिडिलजे मधला राज चालेल पण वीरू नको.
येस बेबी,राज कस रोमैंटिक वाटत,विरू गांवढळ.
तिच्या मनान तिच्या ही नकळत् ही उजळणी केली,तिचे डोळे भरून आले.विराज तिला म्हणाला,मिताली कॉफी घेऊयात का? आणि हो आता जस्ट अभ्या,निक्या मला भेटून गेले,यू मिस देम!
आता नको ,विराज मि जरा घाईत् आहे,
ओके मग प्लीज मिताली पुन्हा भेटशील मला?
हो ,मि सांगते तुला. मेसेज करते.
नम्बर आहे का माझा तुझ्या कड़े? त्याने हसत हसत विचारले,
नाही ना,,ती ही हसली.मग त्याने त्याचा नम्बर दिला.
दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. ती घरी आली,आज विराज भेटला,याच आनंदात ,गतकाळ च्या आठवणीत ती मग्न झाली.विराज ला आज प्रत्यक्षात समोर पाहून ती सैरभैर झाली होती. तिच प्रेम,तिचा विराज आज तिच्या हाकेच्या अंतरा वर होता. त्याला भेटायची,बोलायची तिला खुप ओढ़ लागूंन राहिली. या धुंदीत ती नकळत पणे राहुल ला पूर्णपणे विसरून गेली.
अभय निखिल एका फ़्लैट मध्ये राहत होते,आज ती दोघ घरी नव्हती. सो विराज ने मितालीला त्यांच्या रूम वरच भेटायला बोलावले होते. राहुल ला तिने मैत्रिणी कड़े चालले असे सांगितले होते. प्रेमाची नशा,कैफ अशीच असते ,की भल्याभल्या लोकांना भुलवते,मोहात पाडते. एक धुन्द नशा तनामना वर पसरते,यचा धुंदीत मिताली चे पाय आपसुक विराज कड़े धाव घेऊ लागले. ती पोहचली,विराज अगोदरच आलेला होता. तो खुप स्मार्ट दिसत होता,त्याच्या आवडीचा त्याने येलो कलर चा टिशर्ट आणि ब्लू जीन्स घातली होती,त्याला हा कलर उठून दिसायचा. विराज ही तिच्या कडेच पाहत होता,तिने फूल व्हाइट कलर चा चूड़ीदार घातला होता. तिच्या कड़े पाहत विराज म्हणाला,छान दिसतेस मिताली,
थैंक्यू विराज,,मला सांग या 2 वर्षात किती मिस केलस तू मला?
मीतू,तुज़्या शिवाय जगाव लागणार ही कल्पनाच मला सहन होण्यासारखी नव्हती,खुप डिप्रेस झालो होतो ग,पण खूपच नाइलाज होता,माझ प्रेम,माझ्या हातून निसटुन चालल होतं,आणि मी काही ही करु शकत नव्हतो.
विराज,तुझ्या आठवणी,तुझ प्रेम,यांनी माझ मन भरून यायच,पण ते मी कसे आणि कोणा सोबत रिते करु हेच समजत नव्हतं. आभाळाच ठीक असत रे,ते भरल तर पावसाच्या रूपान कोसळते तरी,,पण माझ्या मनाच काय? तुझी वाट पाहण,नुसत्या तुझ्या आठवणी वर जगण,तू समजतोस तितक सोप नव्हतं विराज.
आय कम्प्लीटली अंडरस्टैंड मीतू,पण काही मार्ग नव्हता,तुज्या घरचे पण थाम्बायला तयार नव्हते ना ग,,
विराज मनातल सगळ बोलायला,समजून घ्यायला आपल माणुस जवळ असाव लागत,नुसते आपले म्हणून कोणी आपल होतं नसते.
मिताली,मला तुझा रोष समजू शकतो,तू वाटेल ती शिक्षा दे,मी तुझा गुन्हेगार आहे.
आता कसली शिक्षा आणि काय विराज,काय उपयोग त्या शिक्षेचा? मी तर आता तुझी कोणी नाहीये.
विराज म्हणाला,मीतू,तू आज ही माझे प्रेम ,माझ सर्वस्व आहेस,असे म्हणत त्याने तिचा चेहरा आपल्या ओजळीत धरला.तिचे डोळे भरले होते,ते अश्रु गालावर पडले,तसे त्याने आपल्या ओठाने अश्रु टिपले,मिताली त्याच्या स्पर्शाने पुलकित झाली.ती म्हणाली,विराज खुप बोलायचे होते तुज्याशी,माझ दुःख,तुज्या पासून दुर होण्याचा त्रास,सगळ सगळ,,पण मला समजून घ्यायला तू कुठे होतास,?खुप दूर,माझ्या पासून कोसो मैल दूर.....
मीतू आता तरी कुठे आहेस तू माझ्या जवळ ? तू माझी नाही होऊ शकलीस हे दुःख आयुष्यभर सोबत राहणार ग..
तिने त्याला घट्ट मीठी मारली,त्याच्या मिठित स्व्:ताला झोकुन देवून अश्रुना मोकळी वाट करुन् दिली.
विराज ने तिचा चेहरा हातात घेऊन तिच्यावर चुंबनाचा वर्षाव करु लागला,अखेर त्याने तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले,त्याक्षणी मिताली भानावर आली,ती म्हणाली,नाही विराज प्लीज असे काही करु नकोस म्हणत त्याच्या पासून दूर झाली.
विराज म्हणाला,का नको मीतू,माझ प्रेम आज ही पहिल्या इतकेच आहे तुझ्यावर.
नाही विराज,मि आता तुझी कोणी नाही.
मग मला भेटायला का आलीस?
विराज ,तुला इतक्या वर्षानी पाहिल्यावर जुन्या आठवणी,पुन्हा मनात थैमान घालु लागल्या,कदाचित त्या आठवणीच्या धुंदीत,नशेत मि तुला भेटायला आले.विराज,राहुल खुप चांगला आहे रे त्याला मी सगळ सांगितले आपल्या बद्दल ,त्याने खुप समजस पणे मला माझ्या दुखातुन बाहेर काढले,हळूवार त्याच्या प्रेमाची फुंकर माझ्या जखमें वर घातली,खुप जपलय त्याने मला,,त्याच्या विश्वासघात मी नाही करु शकत. तिने विराज चा हात् हातात घेतला,म्हणाली विराज,मिताली तुज्या आयुष्यातल एक सुंदर स्वप्न होतं,अस समज. आणि सारीच स्वप्न पूर्ण होत नसतात रे वेड्या,,मागे वळून पाहू नकोस ,पुढे जा,तरच तू सुखी होशील.गुडबाय विराज,,काळजी घे.
पण मिताली,आपण मित्र म्हणून भेटत् राहु ना.?
नाही विराज,ते शक्य नाही आता,ज्या पत्त्यावर जायचेच नाही तिथला रस्ता कशाला माहित करुन् घ्यायचा? ज्या वाटेवर फक्त काटेच आहेत ती वाट मुद्दामहुन का निवडायची ? काहीच हाती लागणार नाही,असे म्हणत मिताली तिथुन बाहेर पडली.
विराज हताश पणे जाणाऱ्या मीतू कड़े पहात राहिला,त्याच्या चिमटीतले फुलपाखरू कधीच उड़ून् गेल होतं,त्याच्या हातावर आपल्या पंखाचे रंग उधळून्...

समाप्त