Sant Eknath Maharaj Ganga read the scripture - 18 in Marathi Spiritual Stories by Sudhakar Katekar books and stories PDF | संत एकनाथ महाराज गंगेने ग्रंथ झेलला - १८

Featured Books
Categories
Share

संत एकनाथ महाराज गंगेने ग्रंथ झेलला - १८

श्री संत एकनाथ महाराज १८

एकनाथी भागवत - श्लोक ८ वा

प्रवृत्तिलक्षणे निष्ठा पुमान्यर्हि गृहश्रमे । स्वधर्मे चानुतिष्ठेत गुणानां समितिर्हि सा ॥८॥

पुरुषासी जो गृहाश्रम । तो जाणावा केवळ काम । तेथ नित्यनैंमित्तिक कर्म । हा स्वधर्म चित्तशुद्धी ॥५१॥ गृहाश्रमीं हिंसा पंचसून । यालागीं तमोगुण प्रधान । गृहीं स्त्रीभोग पावे जाण । रजोगुण या हेतू ॥५२॥ नित्यनैमित्तिक स्वधर्म । हें गृहस्थाचें निजकर्म । हें चित्तशुद्धीचें निजवर्म । सत्व सुगम या हेतू ॥५३॥ गृहाश्रमप्रवृत्ति जाण । सदा मिश्रित तिनी गुण । गुणीं गुणवंत करुन । कर्माचरण करविती ॥५४॥ न रंगतां तेणें रंगें । स्फटिक तद्रूप भासों लागे । तेवीं गुणात्मा गुणसंगें । वर्तों लागे गुणकर्मी ॥५५॥ जेवीं कां कसवटी आपण । कसूनि दावी सुवर्णवर्ण । तेवीं पुरुषाची क्रिया जाण । दावी गुणलक्षणविभाग ॥५६॥

एकनाथी भागवत - श्लोक ९ वा

पुरुषं सत्त्वसंयुक्तमनुमीयाच्छमादिभिः । कामादिभी रजोयुक्तं क्रोधाद्यैस्तमसा युतम् ॥९॥

इंद्रियनिग्रहो यथोचित । जो शमदमीं सदा क्रीडत । शांति वसे जयाआंत । तो जाण निश्चित सात्विक ॥५७॥ जो सदा फळकामें कामुक । वांछी संसारभोगसुख । द्रव्यार्थी अतिदांभिक । रजोगुणी लोक तो जाण ॥५८॥ ज्यासी स्वधर्मी नाहीं रती । आवडे अधर्मप्रवृत्ती । क्रोधलोभें गिळिली स्फूर्ती । तो जाण निश्चितीं तामसू ॥५९॥ एवं देखोनि कर्माचरण । लक्षिजे पुरुषलक्षण । या नांव गा अनुमान । विवेकसंपन्न जाणती ॥१६०॥ सामान्यतः तिन्ही गुण । सांगीतलें निरुपण । हें न कळे म्हणेल मन । गुणवृत्ति भिन्न अवधारीं ॥६१॥

एकनाथी भागवत - श्लोक १० वा

यदा भजति मां भक्त्या निरपेक्षः स्वकर्मभिः । तं सत्त्वप्रकृतिं विद्यात्पुरुषं स्त्रियमेव वा ॥१०॥

स्वकर्मी वांछित फळ । तेंचि मायेचें दृढ पडळ । ते फळाशा सांडोनि केवळ । जे भजनशीळ मद्रूपीं ॥६१॥ करुनि फळाशेचें शून्य । स्वधर्में करिती माझें भजन । पुरुष अथवा स्त्रिया जाण । ते सत्वसंपन्न निश्चित ॥६३॥ देहावयवलिंगदर्शन । तेणें स्त्रीपुरुषनामाभिधान । परी आत्मा आत्मीं नाहीं जाण । जीवत्म समान स्त्रीपुरुषीं ॥६४॥ चित्तवृत्तिक्रियाचरण । त्या नांव गा कर्म जाण । तेथ निरपेक्ष तें माझें भजन । स्वधर्म संपूर्ण या नांव ॥६५॥ ऐशिया स्वधर्मवृत्ती । जेथ प्रगटे माझी भक्ती । ते ते सात्विक प्रकृती । जाण निश्चितीं उद्धवा ॥६६॥ आशंका ॥ कर्म करितां फळाश वाढे ॥ तो फळभोग भोगणें पडे । स्वकर्में भक्ति केवीं घडे । कर्म तें कुडें अत्यंत ॥६७॥ कर्म करितां फळ बाधक । न करितां प्रत्यवाय नरक । कर्में कर्मबद्ध लोक । केले देख संसारीं ॥६८॥ जीव होता जो स्वतंत्र । तो कर्में केला परतंत्र । एवढें कर्माचें चरित्र । अतिविचित्र बाधक ॥६९॥ स्वकर्में भगवद्भक्ती । म्हणशी घडे कैशा रीतीं । तेचि अर्थीची उपपत्ती । स्वयें श्रीपती सांगत ॥१७०॥ सर्प धांवोनि धरिल्या तोंडीं । तो सर्वांगीं घाली आढी । तेणें धाकें जो सोडी । तरी तो विभांडी महाविखें ॥७१॥ ते सर्पबाधेची सांकडी । निवारी मंत्रवादी गारुडी । तेवीं कर्मी कर्मबाधा गाढी । निवारी रोकडी गुरुरावो ॥७२॥ रिघतां सद्गुरुसी शरण । कर्म करवी ब्रह्मार्पण । हेंचि निरपेक्षलक्षण । उद्धवा जाण निश्चित ॥७३॥ ब्रह्म कर्माचें प्रकाशक । कर्म तितुकें ब्रह्मात्मक । हेंचि मर्दपण चोख । माझें भजन देख या रीतीं ॥७४॥ सर्वेंद्रियीं ज्ञानस्फूर्ती । ते ब्रह्मींची ब्रह्मशक्ती । ऐसेनि निश्चयें कर्मस्थिती । स्वकर्मभक्ति या नांव ॥७५॥ ऐसेनि स्वकर्में स्वाभाविक । जे मज भजती भाविक । ते ते शुद्ध सात्विक लोक । जाण निष्टंक उद्धवा ॥७६॥ स्वधर्म सर्वथा निष्फळ । म्हणती ते मूर्ख केवळ । स्वधर्म निरसी चित्तमळ । कर्म समूळ निर्दळी ॥७७॥ एवढी स्वधर्माची जोडी । सांडूनि वांछिती विषयगोडी । तें तें राजसें बापुडीं । केवळ वेडीं विषयार्थी ॥७८॥ विषयफळ वांछितां देख । देह धरणें आवश्यक । देहसंभव दुःखदायक । स्वर्गनरकफळ भोगी ॥७९॥ यापरी जनीं दुःखदाती । राजसतामसप्रकृती । ऐक त्या दोनी गुणवृत्ती । विशद तुजप्रती सांगेन ॥१।।

श्लोक ११ वा

यदा आशिष आशास्य मां भजेत स्वकर्मभिः । तं रजःप्रकृतिं विद्याद्धिंसामाशास्य तामसम् ॥११॥

जो कां आचरोनि स्वधर्म । वांछी नाना फळकाम । तें तें जाण काम्य कर्म । राजस धर्म या नांव ॥८१॥ जो अभ्यंतरीं अतिसकाम । तो जे जे आचरे कर्मधर्म । ते ते अवघेचि सकाम । फळसंभ्रम निजहेतू ॥८२॥ स्वरुपीं काम्य कर्म नाहीं । कामना काम्य करी पाहीं । सोनें स्वभावें असे ठायीं । लेणें उपायीं स्वयें कीजे ॥८३॥ स्वकर्म स्वभावें पवित्र जाण । स्वधर्में माझें शुद्ध भजन । तेथ कामनाफळ कामून । काम्य आपण स्वयें कीजे ॥८४॥ फळकामें जें माझें यजन । तें केवळ फळाचेंचि भजन । सकामें जें स्वधर्माचरण । ते प्रकृति जाण राजस ॥८५॥ ऐसऐशिये प्रकृतीचा विलास । स्त्री अथवा हो कां पुरुष । तें तें जाण पां राजस । ऐक तामस गुणवृत्ति ॥८६॥ क्रोधयुक्त अंतःकरण । तेणेंसीं ज्याचें स्वधर्माचरण । फळ वांछी शत्रुमरण । ते प्रकृति जाण तामसी ॥८७॥ जेथें द्वेषें बांधलें घर । जे ठायीं क्रोध अनिवार । जो भूतमात्रीं निष्ठुर । ज्याची प्रकृति क्रूर सर्वदा ॥८८॥ ऐशिया स्वभावावरी । नर अथवा हो कां नारी । ते ते तामस संसारीं । निजनिर्धारीं उद्धवा ॥८९॥ जीव स्वरुपें चैतन्य पहा हो । त्यासी ’मां भज’ कां म्हणे देवो । जीवासी कां सेवकभावो । सेव्य देवो कैसेनी ॥१९०॥ येच अर्थीचें निरुपण । कृष्ण सांगताहे आपण । सेव्यसेवकलक्षण । मायागुणसंबंधें ॥९१॥

0

।।