विषमता ही फरक किंवा भेद निर्माण करणारी एक विचारप्रणाली आहे. जी कोणत्याही राष्ट्राची एकता व एकात्मता भंग करू शकते. कोणताही देश विविध विषमता घेऊन राष्ट्र होऊ शकत नाही. कारण राष्ट्र म्हणजे एकता, राष्ट्र म्हणजे एक समाज, राष्ट्र म्हणजे समानता, राष्ट्र म्हणजे राष्ट्रबांधव ही भावना यावरून आपल्याला समजेल की, राष्ट्र ही एक मानसिक भावना आहेः जी सर्वांना एकसूत्रात बांधण्याचे कार्य करीत असते. परंतू विषमतेचे जेथे अस्तित्व असते; तेथे राष्टी्य भावना अस्तित्वात येऊच शकत नाही.
माझ्या मतानूसार विषमतेची व्याख्याः ‘‘विषमता ही विचारप्रणाली राष्ट्रातील लोकसमूहांना विघटित करून राष्ट्र खंडित करण्याची दुष्प्रेरणा देणारी प्रणाली होय.’’
जी विचारप्रणाली सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतीक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये भेदभावाची भावना रूजू करते तिला आपण विषमता म्हणू शकतो. विषमता ही केव्हाही राष्ट्रहितासाठी उपयोगी येत नसते. परंतू पुरोगामी राष्ट्रवादातून मानवताद या प्रणालीतून राष्ट्रवाद ही भावना राष्ट्राला मानसिक भावनेतून एक करण्यासाठी सर्व विषमतेला दूर करू शकते. पुरोगामी राष्ट्रवादातून मानवताद या प्रणालीची राष्ट्रवादी व्यक्ती केव्हाही कोणताही भेदभाव करू शकत नाही. कारण त्यांच्या मनामध्ये राष्ट्रहित व मानवहित ही संकल्पना असते, त्यामुळे ते विषमतेला स्थान देऊ शकत नाहीत.
जगामधील अस्तित्वात असणारी कोणतीही विषमता ही मानवनिर्मित असते; कारण नैसर्गिक विविधता ही विषमता नसून ती मूळातच विविध असणारी निसर्गाची महानता असते; जी या संपूर्ण जगाला सौदर्यं प्रदान करण्याचे कार्य करते. परंतू मानवनिर्मित विषमता ही विविधता नसून ती मुळातच अमानवीय विचारधारा आहे; जी या संपूर्ण जगाला कुरूप बनवत असते. तसेच विषमता आणि पुरोगामी राष्ट्रवादातून मानवताद हे परस्परविरोधी आहेत; जेथे विषमता असेल तेथे पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद असूच शकत नाही तसेच जेथे पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद असेल तेथे विषमता असूच शकत नाही. त्यामुळे कोणतेही राष्ट्र, राष्ट्र तेव्हाच असू शकेल जेव्हा तेथे पुरोगामी राष्ट्रवादातून मानवताद असेल आणि विषमता नसेल.
समुद्रातील जीवासारखे राष्ट्रातील लोकशाही समाजात अनेक धर्माचे लोक एकत्र राहत असतील तेव्हा त्यांचे संबंध राष्ट्राशी जोडत राष्ट्रबांधव या भावनेतून एकोप्याचे आणि समानतेचे असायला हवेत; अन्यथा सुमुद्री जीवासारखे केव्हा ऐकमेकावर हल्ले करायला लागतील काय सांगता येणार नाही आणि त्याच धार्मिक विविधतेमधून विषमता आणि त्यातून संघर्श निर्माण होतील. त्यामुळे हे काही लोकशाहीसाठी आणि राष्ट्रीय एकता व एकात्मतेसाठी चांगले संकेत नाहीत.
त्यामुळे सहिष्णू होऊन पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद या प्रणालीतून राष्ट्रवाद आणि राष्ट्रबांधव ही भावना रूजवून; प्रत्येक व्यक्तीला आपआपल्या श्रध्देप्रमाणे कोणताही धर्म स्वीकारून त्याप्रमाणे प्रार्थना किंवा पुजा करण्याची मुभा देईल. कारण धर्म कोणताही असो पंरतू राष्ट्रीयता ही एकच असते. तसेच पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद या प्रणालीतून राष्ट्रवाद हा राष्ट्रबांधव ही भावना सरकार मध्ये रूजवेल आणि सर्वच राष्ट्रबांधव आहेत या नात्याने कोणत्याही धर्माच्या लोकांशी निःपक्षपातीपणे व्यवहार करेल तसेच प्रत्येक धर्मांचा ते एक सारखाच आदर-सन्मान करतील. त्यामुळे राष्ट्राची एकता व एकात्मता तडीला जाणार नाही.
जसे वाळीव एखाद्या लाकडाला हळू हळू टोकरून खाते तसेच जातीव्यवस्था राष्ट्रीय एकता व एकात्मतेला हळू हळू टोकरून खात असते. पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद या प्रणालीतून राष्ट्रवाद नसल्याने विषमता आपल्या भारतामध्ये जाती व्यवस्थेच्या स्वरूपात मुंडके वर काढत विशाल रूप धारण केलेले दिसते. भारतीय समाज हा अनेक जातींनी मिळून बनलेला आहे. त्यामुळे या वैशिटयाला विविधतेपेक्षा विषमतेचे स्वरूप अधिक आहे. समाजात विविध वंश, धर्म, जात, उपजात, पेहनाव, भाषा, प्रांत आणि कोणताही भूप्रदेष इत्यादीं लोक एकत्र राहत असतील तेव्हा एक प्रश्न मात्र निर्माण होतो.
तो म्हणजे एखादा समूह आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ कसे आहोत असे हे ना ना प्रकारचे कपट करून सांगतो. त्यातून विविध समूहांमध्ये स्पर्धा तर निर्माण होतेच परंतू आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत अषा दाव्यांमुळे विषमता निर्माण होते. व विषमतेतून एका समूहाला आपल्यावर अन्याय झाल्याची भावना होते; व त्यातूनच संघर्षजन्य परिस्थितीचा जन्म होतो. तसेच विषमतेवरून झालेले संघर्ष राष्ट्र खंडित करण्याची दुष्प्रेरणा देत असते. त्यामुळे भारतामध्ये विविधता असूनही सर्व समूहांचे संबंध समानतेचे आणि सलोख्याचे राहतील याची दक्षता आपल्याला घ्यावयाची आहे. पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद या प्रणालीतून राष्ट्रवादाचा अभाव नागरिकामध्ये असल्याने राष्ट्राची एकता व एकात्मता तसेच देशाच्या लोकशाहीपुढे ही आव्हानात्मक ठरू शकते.
‘राष्ट्रवादी लोकशाही प्रणालीतून राष्ट्रावर निष्ठा ठेवत राश्ट्रबांधव ही भावना विविध वंश, धर्म, जात, उपजात, पेहनावा, भाषा, प्रांत आणि प्रदेष यातील लोकांच्या मनात रूजवून एकाच राष्ट्रात राहून सामाजिक हित जोपासत वादविरहित अपापसामध्ये एक समूहाची जीवनप्रणाली इतर समूहाच्या जीवनप्रणालीपेक्षा वेगळी असू शकते हे मान्य करण्यासाठी राष्ट्रवादी प्रेरणा देऊन, राष्ट्रवादी लोकशाहीतून वेग-वेगळे मत मांडण्यास भिन्न-भिन्न समूहांना मोकळीक देणे म्हणजेच राष्ट्रवादी लोकशाही सहिष्णूता होय.’ मला वाटते ही व्याख्या सहिश्णूता समजण्यासाठी पुरेषी आहे
एका समूहाने आपल्या विविध जीवनप्रणालीपेक्षा इतर समूहांना त्यांच्या विविध जीवनप्रणालीचे जीवन जगण्याचे पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद प्रणालीतून राष्ट्रवाद करीत राष्ट्रहित आणि लोकहित साधण्याचा उद्देष नजरेसमोर ठेऊन तसे करण्याची त्यांना मोकळीक देणे हे मान्य करणे हे पूरोगामी राष्ट्रवादातून मानवातावाद प्रणालीतून राष्ट्रवाद्यांचे सहिष्णूतेचे लक्षण असते. अषी सहिष्णूता पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद ही प्रणाली समाजाची एक आवशक्य घटक बनते. समाजात सहिष्णूता जेवढी अधिक तेवढी लोकशाही यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. त्याऊलट जर पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद प्रणालीतून राष्ट्रवाद करीत राष्ट्र आणि लोकहित जोपासत राष्ट्रबांधवाची भावना ही समाजामध्ये रूजवलेली नसेल तर लोक असहिष्णू होतील आणि ते राष्ट्रहितासाठी, लोकहितासाठी आणि लोकशाहीसाठी एक मोठे आव्हान ठरू षकते.
जगाच्या पाठीवर सर्वात जास्त सामाजिक विषमता ही भारतामध्ये आहे; ही एक खरी वास्तविकता आहे. पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद या प्रणालीतून राष्ट्रवाद हा सांगतोः आपण भारत मातेची संताने भारतामध्ये विविधता स्वीकार करू शकतो; परंतू राष्ट्रीय एकता आणि एकात्मतेला मारक असणारी विषमता ही एक आपण राष्ट्रवादी म्हणून केव्हाही स्वीकार करू शकत नाही. सामाजिक विषमता ही महामारी प्रमाणे राष्ट्र आणि लोकशाहीच्या आरोग्यावर प्रतिकुल परिणाम करते. आपल्या भारत मातेची सार्वभौमता, एकता आणि एकात्मतेच्या आरोग्याला लागलेला विषमता हा महाभयकंर रोग आपल्या पूरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद या प्रणालीच्या राष्ट्रवादातून रामबाण उपायाने कायमचा नष्ट करावयाचा आहे; असा आपण दृढ संकल्प केलाच पाहिजे.
विषम समाज रचना असलेल्या आपल्या राष्ट्रात लोकशाही राबवायची असेल तर सामाजिक विषमतेचा सामना पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद या प्रणालीच्या रामबाण उपायाने दृढतेने करण्याचे आव्हान स्वीकारावे लागेल. तसे केले नाही तर लोकशाही यशस्वी होऊ शकणार नाही. लोकशाही ही राजकीय समानता आणण्याची हमी देते. पण सामाजिक समानता आणण्यासाठी पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद या प्रणालीतून राष्ट्रवाद करीत काही खास प्रयत्न करावे लागतात आणि सामाजिक समानता आणली नसेल तर राजकीय समानता निरर्थक ठरू शकते. त्याअर्थी राष्ट्र आणि लोकशाही हे एक आव्हान उभे राहू शकते.
वर्चस्ववाद्यांनी राष्ट्राची सार्वभौमता, एकता आणि एकात्मता धोक्यात घालून त्यांच्या प्रतिस्पर्धीपासून कायमचे संरक्षण मिळविण्यासाठी धर्माच्या नावाने स्वतःच्या दारिद्रयाच्या विचाराचा प्रचार करीत त्यांच्या प्रतिस्पर्धीकडून मिळकतीचे साधन काढून घेऊन आपल्या राष्ट्रामध्ये आर्थिक विषमतेचे बीज रोवले आहे. धर्माच्या नावाखाली आपला वर्चस्ववादीपणा कायम राखण्यासाठी खतरूपी धर्माचे बनवाटी दाखले देत आर्थिक विषमतेच्या बीजाला मोठे घनदाट करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत.
पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद या प्रणालीतून राष्ट्रवादाच्या अभावामुळे भारतामध्ये आर्थिक विषमता ही वर्चस्वादी विचारांच्या सावलीखाली अत्यंत आनंदाने नांदत आहे. वर्चस्ववादीच्या क्षेत्रात गरिबी किंवा बेरोजगारी यांचे प्रमाण जास्त असेल त्या सामाजात लोकशाही व्यवस्था असली तरी तिला अनेक मर्यादा पडतात. सर्व नागरिकासोबतच राष्ट्रहित साधणे तसेच विश्वशांतीचा संदेष देणे हे पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद या प्रणालीतून राष्ट्रवादाचे एक उद्दिश्टच असते. म्हणून पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद या प्रणालीतून लोकशाहीमध्ये शासनाला गरिबी कमी करण्याची आणि गरीबांना सर्व मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घ्यावी लागते.
राष्ट्रामध्ये टोकाची आर्थिक विषमता असेल तर लोकशाही नुसती नावापुरती उरते किंवा वर्चस्ववादी विचारातून लोकशाही व्यवस्था धोक्यात येते. राष्ट्रातील आर्थिक विषमता दूर करण्यासाठी वर्चस्ववाद्यांना पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद या प्रणालीतून राष्ट्रवादाचे बाळकडू पाजावे लागेल; आणि राष्ट्रवादी लोकशाही प्रणालीतून आर्थिक विषमता दूर करण्यासाठी समानतारूपी मुलभूत संरचना निर्माण करावी लागेल.
माझ्या मतानुसार प्रांत विषमतेची व्याख्या ‘‘राष्ट्रातील विविध प्रांतामध्ये एक विकसीतता आणि दुसरी अविकसितता म्हणजेच प्रांतिक विषमता होय.’’ अविकसित प्रांतामधील लोकाकडे मिळकतीचे साधन उपलब्ध नसल्यामुळे ते मिळकतेचे साधन मिळण्याची आशा घेऊन विकसित प्रांताकडे जात असतात. कोणत्याही राष्ट्रामध्ये लोकशाही असेल परंतू त्यातील नागरिकामध्ये पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद प्रणालीतून राष्ट्रवादाची भावना जर विकसित झाली नसेल; तर त्या राष्ट्रातील विकसित आणि अविकसित प्रातांतील लोक नेहमीच संघर्श करतील.
प्रादेषिक विषमतेमुळे अविकसित भागांमधून लोक मोठया प्रमाणावर स्थलांतर करून पोटापाण्यासाठी आणि चांगली नोकरी मिळविण्यासाठी विकसित भागाकडे जात असतात. परिणामी, विकसित भागांवर दडपण येते. मोठया शहरांच्या सुविधांवर ताण पडतो. तिथे मुळचे स्थानिक आणि अस्थानिक असा वाद सुरू होऊन सामाजिक तणाव निर्माण होतो; त्यामुळे राष्ट्राच्या एकता व एकात्मतेला वाघनखे लागू शकतात. दुसरीकडे, मागास प्रदेषात, आपल्यावर अन्याय होत आहे आणि आपल्याकडे शासनाचे दुर्लक्ष होते आहे अशी भावना निर्माण होऊन विद्रोहाची ज्वाला भडकू शकते.
पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद या प्रणालीतून राष्ट्रवादाच्या विचाराशिवाय लोकशाहीमधील राष्ट्रपातळीवरील राज्यकर्ता (लोकसेवक) हा आपल्या प्रातांला मातृभूमी मानून त्याच्या विकासाकडे इतर प्रातांच्या तुलनेत अधिकच लक्ष देत असतो. त्यामुळे काही प्रांत विकसित तर काही अविकसित राहतात; या परिणामी राष्ट्रविद्रोहाला सुरूवात होते; जे राष्ट्राची सार्वभौमता, एकता व एकात्मता याला धोका निर्माण करू शकते. त्यामुळे याला तोड फक्त पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद या प्रणालीतून राष्ट्रवादच देऊ शकतो; जी राष्ट्रातील लोकांना राष्ट्रबांधवाची समज देत लोककल्याणाच्या उद्देशपुर्तीसाठी एकत्रित राहण्याची प्रेरणा देत राष्ट्रभूमीच ही आपली मातृभूमी असा संदेश देते.
त्यामुळे राष्ट्रपातळीवरील राज्यकर्ता (लोकसेवक) हा राष्ट्रातील कोणत्याही एका प्रांताला आपली मातृभूमी न मानता विषमतेचे विचार आपल्या मनातून काढून राष्ट्रालाच आपली मातृभूमी मानून राश्ट्रच विकसित करेल; त्यामुळे कोणतीच व्यक्ती मिळकतीच्या साधनासाठी स्थलांतर करणार नाही तसेच पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद या प्रणालीतून राष्ट्रवादाने राष्ट्रहिताची मुल्ये जपत लोककल्याण साधतील. परंतू आपण पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद या प्रणालीतून राष्ट्रवादाषिवाय प्रांतिक विषमता दूर न केल्यास; ते राष्ट्रापुढे आणि लोकशाहीपुढील एक आव्हानच ठरेल.
लोकशाहीची पध्दत आणि पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद या प्रणालीतून राष्ट्रवादाची गरज ही या जगातील प्रत्येक राष्ट्रातील मानवी मुल्ये जपण्यासाठी आवशक्य असते. आज जगभर लोकशाहीचा आवाज बुलंद होत असला तरी, फक्त लोकशाही असणे ही काही सर्व विषमतेच्या समस्यावरील मात करणारी ती यशाची गुरूकिल्ली नाही किंवा विविध विषमतेचे प्रश्न सोडवण्याची त्यात कोणतीही हमी नाही. त्यामुळे राष्ट्रातील नागरिकामध्ये पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद या प्रणालीतून राष्ट्रीय भावना निर्माण करणे राश्ट्रहितासाठी आणि लोकहितासाठी आवशक्य असते.
पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद या प्रणालीतून राष्ट्रवादाने विषम दूर करीत मानवी मुल्ये जोपासित राष्ट्र आणि त्यातील नागरिकांचा विकास करण्यासाठी सरकार आणि जनता यांनी सतत केलेले प्रयत्न तसेच जनता पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद या प्रणालीतून राष्ट्रवादाने जागृत राहिली तरच हे सर्व प्रश्न सोडविता येतीत.
जगाच्या पाठीवरील वास्तविकात अस्तित्वात असणारी विषमता ही कोणत्याही शासन पध्दतीमध्ये दोष निर्माण करण्यास कारणीभूत ठरत असते तसे ते दोश लोकशाहीमध्ये सुध्दा असतात. परंतू ही विषमता दूर करण्याची अंतर्गत व बहिगृत शक्ती फक्त पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद या प्रणालीतून राष्ट्रवादामध्येच असते. कारण पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद या प्रणालीतून राष्ट्रवादाने, लोक हे राष्ट्रीयत्वाच्या भावनेतून राष्ट्र बांधिलकी जोपासित राष्ट्रकल्याण आणि लोककल्याण करतील.
सरकारला विरोध करण्याचा अधिकार नागरिकांना असतो. तसेच राज्यकर्त्ये हे जनतेकडून अंतिम निर्णय घेण्याचा उसना अधिकार घेत असतात. त्यामुळे जनतेच्या हाती अंतिम सत्ता असल्याने जनता आपली चुक दुरूस्त करू शकते. लोकशाहीपुढे अनेक आव्हाने असली तरी ती पेलण्याची ताकदही पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद या प्रणालीतून जनतेला मिळविता येत असते.
देशातील विविध विषमतेमुळे भारतीय समाज हा एक संघ होऊ शकला नाही.; आपल्या मध्ये पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद या प्रणालीतून राष्ट्रवादाच्या अभावामुळे आपण देश तर बनवू शकलो परंतू राष्ट्रीय भावना नसल्यसामुळे राष्ट्र बनवू शकलो नाही. हे एक कटू सत्य आहे. समाजातील विषमतेमुळे मानवी मुल्यांचा अभाव आपल्या देशात आहे. देशातील विविध विषमता ही सामाजिक, आर्थिक, राजकीय व शैक्षणिक विकासाला बाधक आहे. तसेच ती राष्ट्रीय एकता व एकात्मतेसही बाधक आहे.
देशातील विषमतेमुळे उच्च जातीची हकूमषाही, जाती-जीतीत संघर्ष, अन्यायाच्या भावनेतून विद्रोह, नागरिकांमध्ये मनभेद व मतभेद, समाज विघटित करणे इत्यादी गंभीर समस्या उद्भवत असतात. तसेच या सर्व समस्यांची जननी ही विषमता असल्याने ती फक्त पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद याच प्रणालीतून राष्ट्रवादाने दूर करता येते. जोपर्यन्त आपण देशातील विषमता दूर करीत नाही; तोपर्यन्त आपणाला आपल्या देशाला मानसिक भावनेतून राष्ट्र म्हणता येणार नाही.
तुम्हाला विचार येत असेल की मी तर सतत देषा ऐवजी राष्ट्र या शब्दाचा उल्लेख करीत आहे पंरतू तुम्ही हे जाणले पाहिजे की, मी तुमच्यामध्ये पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद या प्रणालीतून राष्ट्रवादाची भावना जागृत करण्यासाठी मुद्दाम राष्ट्र हा शब्द उपयोग करीत आहे. परंतू आपल्या देशाला राष्ट्र ही पदवी बहाल करावयाची असेल तर हे सामर्थ्य फक्त पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद या प्रणालीतून देशातील नागरिकच करू शकतात.
देशातील विविध विषमता नष्ट करण्यासाठी प्रथमता अस्तित्वात असणारी मानवनिर्मित विषमता नष्ट करणे, शिक्षणाचा प्रसार करणे, वैज्ञानिक विचारसरणी रूजविणे, औद्योगिकीकरणास प्रोत्साहन देणे, नागरीकरण करणे, लोकशाही मुल्ये रूजविणे, कायद्याची अंमलबजावणी करणे, वैचारिक परिवर्तन करणे, राष्ट्रीय भावना निर्माण करणे, राष्ट्र हेच घर ही संकल्पना रूजविणे आणि विषेश म्हणजे पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद या प्रणालीतून राष्ट्रवाद ही भावना जन भावनातून जन धारणामध्ये रूजविणे.