Chandra aani Nilya betaverchi safar - 2 in Marathi Fiction Stories by बाळकृष्ण सखाराम राणे books and stories PDF | चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 2

Featured Books
Categories
Share

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 2

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर
२) सफरीवर
त्या रात्री चंद्राला झोप येईना. झोपडीच्या बाहेर ओट्यावरच तो झोपायचा.समुद्री वार्यावर छान झोप यायची.पण आज समोर चांदण्यात चमकणारा समिंदर त्याला झोपू देईना. वेडा वारा, उसळत्या लाटा त्याला खुणावत लागल्या.अखेर न राहवून तो उठला आणि वाळूत जाऊन बसला.त्याच्या पाठोपाठ वाघ्याही त्याच्या पायापाशी येऊन बसला.पाण्यावर चमकणार्या लाटा बेभानपणे नृत्य करत होत्या.सळसळतं येणारा वारा त्याच्या अंगा-खांद्याला स्पर्श करत होता.
चंद्राच्या मनात निळ्या बेटाने ठाण
मांडले होते. त्याला साहस दाखविण्याची संधी आपोआपच चालून आली
होती. त्या निळ्या बेटाच्या शोधात जाण्याचा त्याचा पक्का निर्णय झाला होता.

पण जाण्याअगोदर सागरी प्रवासाची तयारी करायची होती आणि ती


सुद्धा कुणाला कळू न देता. प्रश्न होता गौरीचा! ती नेहमी दादा... दादा..
करत त्याच्या मागं मागं फिरायची. त्यामुळे गौरीच्या नकळत सारी तयारी
करावी लागणार होती. दुसऱ्या दिवसापासून चंद्रा तयारीला लागला. शिडासाठी
आणि इतर कामासाठी त्याला मजबूत दोरी लागणार होती. चंद्राने नारळीच्या
काथ्यापासून दोऱ्या वळायला सुरुवात केली. त्याच्या बाबान त्याला काथ्याच्या
टणक व टिकाऊ दोऱ्या कशा वळायच्या ते शिकवलं होतं. चंद्राचं दोरी
वळणं पाहून आईने त्याला हटकलं. पण उगाच भटकत वेळ घालविण्यापेक्षा
आपण दोरी वळण्यात वेळ घालवतो, असं त्याने आईला सांगितले. आईला
थोडे आश्चर्य वाटलंच. गौरीसुद्धा दोरी वळण्यात आपल्या दादाला मदत
करू लागली.
सरजूने याच वर्षी नवी होडी बांधून घेतली होती. त्यामुळे त्यांची
जुनी होडी तशीच पडून होती. जुनी होडी चांगली दणकट व मजबूत होती.
थोडी आकाराने लहान व अरुंद होती. चंद्राने आपल्या परीने होडीची थोडी
डागडुजी केली. तिला काजूच्या तेलाचा लेप दिला. थोडा रंग दिला. सरजू
कौतुकाने आपल्या मुलाचे उपद्व्याप बघत होता. पण चंद्राच्या मनात काय
आहे, हे त्याला कळले असते तर त्याने निश्चितपणे त्याला अडवलं असतं.
प्रवासासाठी लागणारी सारी तयारी झाल्यावर चंद्राने पौर्णिमेला निघायचं
निश्चित केलं. रात्री सारेजण झोपल्यावर चंद्रा हळूच उठला. दबक्या पावलांनी
माडांमधून चालत तो होडीजवळ आला. संध्याकाळच्या वेळी त्याने होडीत
पाण्याने भरलेले दोन बुधले, शिडासाठी लागणाऱ्या काट्या, वळलेल्या
दोऱ्या, तीर-कमठा, काही शहाळी आणि काही कंदमुळे लपवून ठेवली होती.
त्यावर झावळ ठेवली होती. कमरेला वीतभर लांबीचा खंजीर होता.
खंजीराचं पातं चांगलं तीन बोटे रुंद होतं. त्याच्या दोन्ही बाजूला धार होती.
तो त्याचा आवडता खंजीर होता.
चंद्राने माडांचे ओंडके वाळूत एका पाठोपाठ ठेवले. त्यावरून
त्याला होडी पाण्यापर्यंत ओढत आणायची होती. त्याची छाती धडधडत
होती. या वेळी कुणाला जाग येऊ नये म्हणून तो आई एकवीरेची प्रार्थना
करत होता. चंद्रानं होडी ओंडक्यावरून सरकवत-सरकवत पाण्यात आणली.
खरं म्हणजे एकट्यासाठी हे कष्टाचं काम होतं. सारं जग शांत झोपलं होतं.
समुद्रावर चांदरात पसरली होती. एकवेळ मागे वळून त्याने झोपडीकडे
बघितलं. क्षण दोन क्षण बेचैन झाला. सरजू, आई, गौरी आणि वाघ्या या
साऱ्यांचे चेहरे त्याच्या डोळ्यांसमोर आले. क्षणभर त्याला वाटलं, माघारी
जाऊन गुमान झोपून द्यावं; पण समुद्र सफरीवर जाण्याची त्याची इच्छा
प्रबळ ठरली. होडीला पायानं रेटा देत तो होडीत शिरला अन् तो दचकला.
आश्चर्याने थक्क झाला. होडीत वाघ्या अगदी आरामात झोपला होता. जणू
त्याला चंद्राच्या बेताची पुरी जाणीव होती. तो आपल्या जिवलग दोस्ताला
एकटा कसं जाऊ देईल? आता काय करावं, अशा विचारानं चंद्रा काही
वेळ उभा राहिला. पण वेळ दवडण्यात अर्थ नव्हता. कोळीवाड्यात
कुणाला
जाग आली असती तर साराच बेत फसला असता.
“वाघ्या! वाघ्या, चल ऊठ.... चल जा की झोपडीकडे!"
पण वाघ्या होडीच्या बाहेर पडायला तयार होईना. त्या इमानी
प्राण्याला आपल्या धन्याला-दोस्ताला त्या अफाट समुद्रावर एकट्याने
जाऊ द्यायचंच नव्हतं. अखेर चंद्राने नाइलाजाने वाघ्याला सोबत न्यायचे
ठरवले.
समुद्र शांत होता. वारा फारसा नव्हता. त्यामुळे शिडाचा उपयोग
नव्हता. होडीत बसून त्याने वल्ही मारायला सुरुवात केली. बघता बघता
त्याचे हात एका लयीत वरखाली होऊ लागले. चंद्राची होडी लाटांवर

डोलत पाणी कापत चालू लागली. चंद्राच्या मनात थोडी भीती होती. पण
त्यापेक्षा जास्त उत्सुकता होती. या अगोदर सरजूबरोबर तो अनेकवेळा खोल समुद्रात गेला होता. पण या वेळची परिस्थिती वेगळी होती. या वेळी
तो एकटाच होता. चंद्रा कोळ्याचा मुलगा होता. समिंदराची त्याला भीती वाटत नव्हती. त्याच्या लाटांवर तो लहानपणापासूनच खेळला होता. सागराचं खारं वारं पिऊन त्याचं शरीर दणकट बनलं होतं. पंधरा वर्षांचा चंद्रा मना
आणि शरीरानं कणखर होता... संकटांना तोंड देण्याएवढा तो धाडसी बनला
होता. नव्या साहसानं त्याच्यात चैतन्य संचारलं होतं. मन उत्साहानं भरून
गेल होत.
आता किनाऱ्यापासून बराच खोलवर तो घुसला होता. आता याच
रेषेत सरळ पुढे जायचे त्याने ठरवले. एव्हाना छानपैकी वारा सुरू झाला
होता. आता शिडांचा उपयोग होणार होता. चंद्रानं भराभर काठ्या बांधल्या
व शीड ओढून घेतलं. आता त्याच्या हातांना थोडा वेळ विश्रांती मिळणार
होती. अचानक त्याचं लक्ष समोर गेलं. असंख्य चमकते हिरवे पुंजके
त्याला पाण्यावर तरंगताना दिसले. ते दृश्य विलक्षण होतं. पाण्यावर असंख्य
हिरवे दिवे लावल्यासारखे वाटत होते. मग त्याच्या लक्षात आलं की ते
माशांचे डोळे होते. काही जातीच्या माशांचे डोळे किंवा त्यांच्या अंगातून
हिरवट किंवा गुलाबी रंग फेकला जातो. या रंगीत प्रकाशामुळे छोटे कीटक
आकर्षित होतात व माशांना आयतं खाद्य मिळत असे. काही वेळ तो डोळे
मिटून गप्प राहिला. होडी वाऱ्यावर भराभरा पाणी कापत चालली होती. खर
म्हणजे 'निळं बेट' नेमकं कुठं आहे हे त्याला माहीत नव्हतं. निळ्या
बेटाविषयी तो ऐकून होता. त्या बेटाचं नाव काढताच सारेजण बिचकत.बघता
कुठेतरी चंदेलच्या उत्तरेला असावं असं त्यानं पूर्वी ऐकले होते. त्याने
सरजूला त्याबद्दल विचारलेही होते. पण त्या वेळी सरजूने चलाखीने विषय
बदलला होता. त्यामुळे त्याचे कुतूहल जास्तच चाळवले गेले होते. काहीतरी
अद्भुत किंवा भयावह असे त्या निळ्या बेटावर होते, एवढे मात्र निश्चित!
फक्त प्रश्न एवढाच होता की त्या अज्ञात माणसाने बाटलीतून पाठविलेला
तो संदेश किती दिवसांपूर्वीचा होता ते समजत नव्हतं. त्या अज्ञात माणसाची
सुटका करण्यासाठी... त्याला मदत करण्यासाठीच तो तिकडे चालला
होता.
हळूहळू त्याचे डोळे मिटू लागले. वातावरणात थोडा गारवा होता.
होडीत पाय पसरून तो गप्प पडून राहिला. असा किती वेळ गेला कुणास
ठाऊक! पहाटेच्या समुद्री पक्ष्यांच्या आवाजाने त्याला जाग आली. त्याने
सभोवार बघितले. चारही दिशांना फक्त पाणीच पाणी होतं. किनाऱ्यावर
गर्जना करणारा समुद्र इथं मात्र शांत व गंभीर होता. पहाटेच्या तांबूस
सूर्यकिरणांनी पाणीही लालसर दिसत होते. सूर्याकडे पाहून आपण नेमके
उत्तर दिशेला चाललोय हे त्याच्या लक्षात आले. जवळपास एखादं बेट
दिसतं का हे त्याने पाहिले. पण तसं कुठेही काही दिसत नव्हतं. बुधल्यातल्या
पाण्याने त्याने तोंड स्वच्छ धुतले. खंजीराने शहाळ्याला भोक पाडून त्यातले
गोड पाणी प्याल्यावर तो उत्साहित झाला. इथे वारा थोडासा कमी होता.
त्यामुळे मध्येमध्ये वल्ही मारून होडीला गती द्यावी लागत होती. वाघ्या
अजूनही अंगाचं मुटकुळं करून पडला होता. कदाचित चंद्राचा डोळा
लागला तेव्हा तो जागा राहिला असणार. तेवढी जाण त्या मुक्या प्राण्याला
निश्चित होती.
काही काळ गेल्यावर सूर्य बराच वर आला होता. पाणी तापल्यामुळे
वारा थोडा गरम जाणवत होता. वाघ्या मघाशीच उठला होता. मध्येच भुंकतहोता. या अथांग समुद्रावर एका कुत्र्याचं भुकणं निश्चितच एक वेगळेपण होतं. वाघ्यामुळे चंद्राला आता एकटं वाटत नव्हतं. दुपारपर्यंत असाच ते दोघे प्रवास करत राहिले. एवढ्यात चंद्राला राखाडी रंगाच्या पक्ष्यांचा भला मोठा थवा डाव्या बाजूला उडत जाताना दिसला. तो थवा एवढा मोठा होता की काही काळ डाव्या बाजूला आकाश राखाडी रंगानं भरून गेलं. चंद्राच्या लक्षात आलं की जवळपास एखादं बेट असणार. कारण हे पक्षी खोल समुद्रात कधीच जात नाहीत, तर किनाऱ्यालगतच्या समुद्रात शिकार करतात. चंद्रानं होडी पक्षी ज्या दिशेला गेले त्या दिशेला वळवली. बऱ्याच वेळानंतर समोर एक छोटसं बेट असल्याचं त्याला दिसलं. अजून ते थोडं दूर होतं. पण तिथली हिरवीगार झाडी दुरूनही दिसत होती. चंद्राला आनंद झाला. आपला अंदाज बरोबर आला हे पाहून तो खूष झाला. त्याच्या बाबानं त्याला दिलेली माहिती किती महत्त्वाची व अचूक आहे. हे त्याच्या लक्षात आले. घरातल्यांच्या आठवणीने तो थोडा व्याकूळ झाला. आपण घरात नाही, हे पाहून घरी गोंधळ उडाला असेल. आपण भलतंच धाडस तर नाही ना केलं? या विचाराने तो थोडासा विचलित झाला. पण आता पुढे टाकलेले पाऊल मागे खेचायचे नाही, अन्यथा आपण पळपुटे व भित्रे ठरू व पुन्हा कधीच असे साहस करण्याची कल्पनाही आपण करू शकणार नाही. त्यापेक्षा आता पुढेच जाणे योग्य, असा निर्णय त्याच्या मनाने घेतला.

अखेर त्याची होडी त्या बेटावर पोहोचली. होडीचा दोर त्याने किना-यावर झुकून खाली आलेल्या माडाच्या बुंध्याला बांधला. तो आणि वाध्या बेटावर उतरले. बेटावर पाणी व खाण्यासाठी फळे मिळतात काय हे त्याला पाहायचे होते. शिवाय सुरक्षित जागा बघून तास दोन तास विश्रांती घ्यायची होती. झाडांच्या गर्द राईतून वाट काढत तो पुढे जात होता. त्या वेळी चंद्र अतिशय सावध होता. त्याचा एक हात खंजीरावर होता. वाघ्याही

सावधपणे त्याच्या पाठोपाठ चालत होता, पण त्याला फारसा शोध घ्यावा लागला नाही. एक छोटा धबधबा त्याला दिसला. पुरुषभर उंचीच्या एका खडकावरून पाणी झेपावल्यासारखे खाली कोसळत होते. ज्या ठिकाणी पाणी कोसळत होते तिथे छोटा डोह तयार झाला होता. तिथून हे पाणी वाहात समुद्राच्या दिशेने जात होते. तिथे हिरवीगार हिरवळ उगवली होती. पाणी अगदी स्वच्छ व निर्मळ दिसत होते. ओंजळीत पाणी घेऊन त्याने

चाखून बघितले. ते अत्यंत गोड व चवदार पाणी होते. चंद्राने भरपूर पाणी पिऊन घेतले. वाघ्यानेही आपली तहान भागवली. धबधब्याच्या कडेलाच एका झाडावर नारिंगी रंगाची फळे दिसली. ती फळे खाण्यासाठी उपयुक्त आहेत, हे चंद्राला माहीत होतं. थोडी फळे त्याने काढून घेतली.

ते पुन्हा

किनाऱ्यावर आले. तिथे एका माडाच्या सावलीत तो पहुडला. सकाळपासून समुद्रावर असल्याने तो थकला होता. त्यामुळे त्याला चटकन झोप आली. जाग आली तेव्हा सभोवर काळोख पडायला सुरुवात झाली होती. झटपट उठून तो पुन्हा झऱ्यापाशी गेला. हात-पाय धुवून गार पाणी त्याने पिऊन घेतले. थोडी फळे खाली. वाघ्यासुद्धा छानपैकी पाण्यात डुंबत होता. चंद्रा पुन्हा होडीपर्यंत आला. आता पुरा काळोख दाटला होता. पुढच्या प्रवासाला निघणे आवश्यक होते. होडी योग्य दिशेने मार्गाला लागेपर्यंत त्याने वल्ही मारली.

आता चंद्र उगवला होता. चमकत्या चांदण्यात तो दर्याची शोभा निरखू लागला. मध्येच काही मासे चांगली दोन माणसांच्या उंचीएवढी उडी मारून पाण्यात पडत होते. हे उडणारे मासे होते. त्यांचे पंख वेगळे व सुंदर होते. रुंद पडद्यासारखे दिसणारे पंख होते. चांदण्यात ते लखलखत, चांदीसारखे चमचमत होते. एक मोठाला मासा तर उडी चुकून होडीत पडला. वाघ्याने पटकन त्याच्यावर झडप घातली व त्याला मटकावल. खरच समुद्र म्हणजे विविध गोष्टींचा खजिनाच आहे. किती विचित्र प्राणी असतात ह्याच्या पोटात. चंद्राच्या प्रवासात अशा असंख्य मौजेच्या गोष्टी अजूनही दिसणार होत्या. एवढ्यात पाण्याच्या पृष्ठभागावर उडणाऱ्या एका छोट्या पक्ष्यावर एका लांब तोंडाच्या माशाने बाणाप्रमाणे तोंडात भरलेले पाणी मारून त्याला पाण्यात पाडलं व खाऊन टाकलं. हा धनुर्धारी मासा होता.

त्याच्या बाबाने सांगितलेल्या निळ्या कांतीचा छोटा 'वैद्य मासा' म्हणजेच खरारा करणारा, अगदी मोठ्या माशाच्या पोटात शिरून त्याचे पोट साफ करून परत येणारा हा मासाही त्याने पाहिला. ज्यांच्यामुळे माशांचा थवा कोठे आहे हे समजून येते असे विविध जातींचे समुद्रपक्षी त्याला वाटेत दिसत. त्याचा बाबा सांगायचा, या पक्ष्यांच्या पंखात अमाप ताकद असते. तासनतास ते आकाशात घिरट्या घालत राहतात. दूरपर्यंतचा प्रवास करतात. चंद्राची प्रवासाची दुसरी रात्रही होडीतच गेली.

तिसऱ्या दिवशी सकाळी असाच एका छोट्या बेटासारख्या टापूवर थोडा वेळ थांबून त्याने पुन्हा प्रवास सुरू केला. संध्याकाळपर्यंत त्याचा प्रवास अतिशय संथपणे सुरू होता. सायंकाळी तो एका मोठ्या संकटातून वाचला. त्याच्या होडीच्या बाजूला काही अंतरावर पाण्यात प्रचंड खळबळ माजली. लाटा याव्यात तसं पाणी हलू लागलं. एका प्रचंड माशाचे डोके पाण्याच्या पृष्ठभागावर दिसले. त्याच्या शेपटीमुळे पाणी कापून जात होते. एक रेघ पाण्यातून पुढे सरकल्याचा भास होत होता. तो भैरव मासा होता. मागे एकदा त्याच्या वाडीतील कोळ्यांनी तसला मासा पकडला होता. अतिप्रचंड आकार होता त्याचा. चांगला तीस हात लांब व पाच ते सहा हात रुंद होता. त्याला मोठे झिंगे खायला फार आवडतात, असे सरजूने त्या वेळी सांगितले होते. चंद्राला थोडी भीती वाटली. ह्या माशाने होडीला धडक दिली असती तर क्षणात होडीचे तुकडे तुकडे झाले असते. खरोखरीच त्याचे नशीब चांगले होते. कारण भैरव मासा त्याच्या बाजूला न येता वळून दुसरीकडे निघून गेला.

. चंद्रा घरातून बाहेर पडल्यावर तीन दिवस होत आले होते. पण अजून निळ्या बेटाचा पत्ता नव्हता. त्याच्याजवळचे पाणीही आज संपत आले होते. शिवाय तो थकलाही होता. डोळे खाऱ्या वाऱ्यामुळे चुरचुरत होते. वाघ्याही कंटाळल्यागत दिसत होता. चंद्राला वाटलं, आपण जास्तीत जास्त एखादीच रात्र आणखी तग धरू. कमीत कमी संध्याकाळपर्यंत निळे बेट किंवा दुसरा एखादा किनारा सापडावा यासाठी तो देवाची प्रार्थना करू लागला. पण देवाच्या मनात काही दुसरे होते. त्या दिवशी दुपार टळल्यानंतर अचानक हवेत बदल झाल्याचे जाणवू लागला. वारा उधाणल्यासारखा वाहू लागला. लाटा हळूहळू मोठा आकार धारण करू लागल्या. ही सारी लक्षणं वादळाची होती. चंद्रा वादळाला घाबरत नव्हता. दर्यावर उठणारी कितीतरी वादळे त्याने पाहिली होती. पण आज मात्र तो थकला होता.

त्याने भराभरा शीड खाली उतरवलं. बघता बघता वाऱ्याचा वेग वाढू लागला. मोठमोठाल्या लाटा उसळू लागल्या. होडीत गेले दोन दिवस शांतपणे बसलेला वाघ्यासुद्धा कावराबावरा झाला. वारा पिसाटासारखा धिंगाणा घालू लागला. कधी डाव्या बाजूला तर कधी उजव्या बाजूने होडीला फटकारू लागला. तापलेल्या तव्यावर जोंधळे जसे टणाटणा उडतात तशी होडी लाटांवर उडू लागली. वल्ही मारूनही उपयोग नव्हता. भयंकर लाटांच्या थपडा खाऊन होडी फुटण्याचा धोका होता. तेवढ्यात एक नवे संकट समोर दत्त म्हणून उभे ठाकले. समुद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचा एक भला मोठा भोवरा गरगरत वर चढू लागला. बघता बघता पाण्याचा एक मोठा खांब सरसरत वर सरकू लागला. लांबून तो आभाळातील ढगांना टेकल्यासारखा दिसू लागला. चंद्रा अचंबित होऊन ते दृश्य पाहू लागला. .
जणू काही आकाशाला

हात-पाय थकले होते. मनही थकले होते. कसेबसे ते दोघे किनाऱ्याजवळ आले आणि चंद्राची शुद्ध हरपू लागली. क्षीण आवाजात त्याने वाघ्याला

.

हाक दिली,

"

कुणालाही सांगूनही न पटण्यासारखे

दृश्य

होते ते.जणू काही आकाशाला भेटण्यासाठी दर्याने आपला हात उंचावला आहे, असे वाटत होते ते. ते दृश्य जेवढे दुर्मीळ तेवढेच भयावह होते. तो जलस्तंभ असाच पुढे सरकत सरकत आला असता तर त्याचे, वाघ्याचे व होडीचे काय झाले असते हे सांगायला ज्योतिषाची गरज नव्हती. पाण्याचा सरकता खांब आपटून जहाजे फुटल्याचे त्याने ऐकले होते.

लाटांच्या पाठशिवणीच्या खेळात त्याची होडी जोराने पुढे ढकलली जात होती. त्यामुळे त्या जलस्तंभापासून तो दूर जात होता. चंद्रा त्या जलस्तंभाकडे एकटक पाहात होता. वाघ्याच्या भुंकण्याने तो भानावर आला. वाघ्या त्याची पैरण ओढत जोरजोराने भुंकत होता. त्याने वळून पाहिले आणि आनंदाने वेड लागायची पाळी त्याच्यावर आली. दूरवर जिथे नजर पोहोचत होती तिथे झाडे आणि डोंगर दिसत होते. धुक्याच्या आवरणात दडल्यासारखे झाडांचे शेंडे निळसर दिसत होते. चंद्राला वाटले, आपल्याला भास होतोय. ते समुद्रावरचे एखादे मृगजळ असावे. पण आपल्यासारखे वाघ्याला भास होणे शक्यच नाही. ते निश्चितच एखादे बेट असणार! कदाचित ते निळे बेटही असेल. बस्स! "देवा, आणखी थोडा वेळ साथ दे...” तो मनातल्या मनात देवाची प्रार्थना करू लागला.

पण दैव त्याची परीक्षा घेत होते. एका प्रचंड लाटेने त्याच्या होडीला धडक दिली. अजूनपर्यंत तग धरून असलेल्या होडीची डावी बाजू उद्ध्वस्त झाली. चंद्रा आणि वाघ्या पाण्यात फेकले गेले. चंद्रानं जीवाच्या आकांतानं हात-पाय मारायला सुरुवात केली. उसळत्या लाटांशी झगडतझगडत तो किनारा गाठू लागला. त्याच्यापासून थोड्या अंतरावर वाघ्यासुद्धा पोहत किनारा गाठण्याचा प्रयत्न करत होता. बस्स.. अजून थोडं....! अजून थोडा वेळ... असं म्हणत तो स्वत:ला धीर देत होता. पण त्याचे

"वाघ्या... वाघ्या...'

क्षणात त्या इमानी जनावराने चंद्राला ओढत ओढत किनाऱ्यावरच्या वाळूत नेलं. अतिश्रमाने चंद्राची शुद्ध हरपली. त्याच्या बाजूला वाघ्या धापा टाकत बसला. मघापासून थैमान घालणारे वादळ शांत झाले होते. त्याचा मागमूसही नव्हता. शुद्ध हरपलेला चंद्रा वाळूत पडला होता. त्याला हेही माहीत नव्हते की तो ज्या निळ्या बेटाच्या शोधात आला होता तेच ते बेट होते. त्या बेटावर सर्वत्र निळसर पानांची झाडे होती. त्यामुळे लांबून ते बेट निळे वाटायचे. वाघ्याने एकदा चंद्राकडे पाहिले. आपल्या धन्यासाठी काही खायला मिळते का हे बघितले पाहिजे, हे त्याला जाणवले. तसाच उठून वाघ्या किनाऱ्यावरच्या गर्द राईत शिरला.

------------------------------ भाग २ समाप्त---------
.