Ram I saw in Marathi Short Stories by Author Sangieta Devkar.Print Media Writer books and stories PDF | मी पाहिलेला राम

Featured Books
Categories
Share

मी पाहिलेला राम

स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘अजून मानवजातीला जी आदर्श संस्कृती प्राप्त करून घ्यावयाची आहे, तिचे चित्रण करणारा व प्राचीन आर्य जीवनाचे दर्शन घडवणारा ज्ञानकोश म्हणजे रामायण!’ ‘वाल्मीकी रामायणा’त वर्णिलेल्या सद्गुणांमुळे श्रीराम सर्वसामान्यांचा व असामान्यांचाही आदर्श ठरला आहे. लहानपणापासून आपण राम आणि सीतेच्या गोष्टी ऐकत मोठे झालो. एकवचनी राम,एकपत्नी राम आज्ञा धारी राम अशी आदर्श रामाची रूप वाचत ,पहात आलो.
मानव रूप घेऊन सुद्धा आपले वेगळेपण जपणारा "राम".
रामा सारखा आपला ही पुत्र असावा अस कित्येकांना आज ही वाटत. रामाला लोकांनी आप आपल्या दृष्टिकोनातून पाहिले आहे. ज्याची जशी भक्ती ,तसा त्याचा राम! एक राजा असून ही त्याला वनवास भोगावा लागला. राम जितका धीरोदात्त ,संयमी,वीर,तशीच त्याला साजेशी सीता ही होती. श्रीराम केवळ वडिलांच्या वचनपुर्तीसाठी बारा वर्षे वनवासात गेले व आपली राजगादी आपला धाकटा बंधू भरताला दिली. त्यागाचे हे प्रतिक केवळ एकट्या भरतखंडातच पाहावयास मिळते. रामाने आपल्या वडिलांची आज्ञा पालन करण्यासाठी सुखी संसाराचा त्याग केला. सीते वर मना पासून प्रेम केले पण लोक आग्रहासत्व तिला अग्नी परीक्षा द्यायला भाग पाडले.
स्थितप्रज्ञतेने राज्यकारभार सुरू केला आणि जलसमाधी घेईपर्यंत रामाने जसे दुसरे लग्न केले नाही, तसेच इतर स्त्रियांशीही शरीरसंबंध ठेवले नाहीत. म्हणूनच राम मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखला जातो. राजा असून ही विधुराचे आयुष्य जगला.
राजनीती चे एक सूत्र असते की जी गोष्ट प्रजेला अमान्य आहे त्या गोष्टीचा राजाने त्याग करणे ,हे राजाचे कर्तव्य होय.सीतेचा त्याग करून रामाने त्या काळात आदर्श राजा राणी कसे असावेत हे दाखवून दिले. राम राजा नसता तर रामाने सीतेवर अन्याय केल्यासारखे झाले असते. परंतु रामाने राजकर्तव्याला श्रेष्ठतर मानले आणि तसेच ते कोणत्याही राजाने मानायला हवे. राजाला दोषी ठरवणे त्याची चूक दाखवून देणे हा प्रजेचा नैतिक हक्कच ! रामाला नैतिकतेचा धाक दाखवून त्याच्या सदसद्विवेकबुद्धीला आवाहन केले. रामाची अमुक एक कृती पती म्हणून किंवा राजा म्हणून वेगळी दाखवणे अत्यंत कठीण आहे. कारण, रामाची प्रत्येक कृती मर्यादशीलतेचे उदाहरण आहे. रामाने लोक नेता म्हणूनच नेहमी आचरण केले म्हणूनच श्रीज्ञानेश्वर महाराज त्यांच्या ओवी तुन म्हणतात "
मार्गाधारें वर्तावे । विश्व हे मोहरें लावावे ।
अलौकिका नोहावे । लोकांप्रति ॥’
स्वत: सन्मार्गाने आचरण करून लोकांनाही सन्मार्गास लावावे व आपण कोणी एक अलौकिक पुरुष आहोत, असे त्यांना भासू देऊ नये. (ज्ञानेश्वरी,) आपल्यानंतर येणाऱ्या राजांना, साधुसंतांना व सामान्यांना मार्गदर्शन करण्याची भूमिका रामाने वठवली आहे. प्रजेचा एक घटक (दशरथपुत्र) समजून व मर्यादा घालून घेऊन त्याने पत्नीत्याग केला आहे. चिरंतन व तत्कालीन जीवनमूल्यांना धरूनच त्याचे वर्तन झाले आहे.
एकवचनी, एकपत्नी हे व्रत ज्यांनी धारण करून रघुकुलाच्या मर्यादा कधीही ओलांडल्या नाहीत ते श्रीराम केवळ वडिलांच्या वचनपुर्तीसाठी बारा वर्षे वनवासात गेले व आपली राजगादी आपला धाकटा बंधू भरताला दिली. त्यागाचे हे प्रतिक केवळ एकट्या भरतखंडातच पाहावयास मिळते. रामाने आपल्या वडिलांची आज्ञा पालन करण्यासाठी सुखी संसाराचा त्याग केला.
आज मात्र कुठेच "राम" जन्माला येत नसल्याचे दिसून येते. काळ बदलला तसे जगण्याचे ,वागण्याचे,नात्याचे संदर्भ बदलत गेले. आई वडिलांची आज्ञा पालन करावे ही शिकवण रामा कडून आपल्याला मिळाली आहे त्याच चित्र आजच्या काळात कुठेच दिसत नाही. लहान वया पासूनच मुल आई वडिलांना उलट उत्तर करताना दिसतात. आई वडिलांना मान देणे,त्यांची काळजी घेणे,त्यांचा शब्द प्रमाण मानणे हे आताच्या काळात लोप पावले आहे. थोडे फार याला अपवाद असतील ही !
आपला मुलगा रामा सारखा एकपत्नी,मर्यादा पुरूषोत्तम असावा असं प्रत्येक आई ला वाटते पण हल्लीचे चित्र पाहता ते शक्य नाही. लग्नाची बायको घरात असून ही बाहेर संबंध ठेवणारे पुरुष याच जगात बघायला मिळतात. पती पत्नी चे वाद,अरेरावी, इर्षा,भांडण यामुळे तडजोड, त्याग,संयम,समजूतदार पणा या गोष्टी कधीच हद्दपार झाल्या आहेत. आपल्या संसारात अनेक मुलांना म्हाताऱ्या आई वडिलांची अडचण होऊ लागते तेव्हा आई वडिलांना घरा बाहेर ही काढन्या पर्यंत ही मजल आजच्या पिढी ची आहे. घरा घरातून स्त्रीला अत्याचार सहन करावा लागत आहे. आजचा पुरुष "राम" म्हणून आदर्श पुरुष नाहीच आहे कारण इथे क्षणा क्षणाला सीते ला अग्नी परीक्षा द्यावी लागत आहे. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण केली जाते. घरा बाहेर काढले जाते तिला.
स्वतः वनवास भोगला पण रामाने आपल्या भावाला भरत ला राज्य कारभार सांभाळायला दिले. आज मात्र भाऊ भाऊ संपत्ती साठी,मालमत्ते साठी एकमेकांच्या जिवावर उठतात.
संकट आले असता आपण संघटन केले पाहिजे असा संदेश श्री राम देतात म्हणूनच त्यांनी वनवासात असतांना संपूर्ण वानरसेनेला संघटीत करून हनुमंतरायाला त्याचे प्रमुख केले व रावणासारख्या बलाढ्य शत्रुचा त्यांनी रामबाण इलाज केला. शत्रूंच्या ह्या गर्दीतही त्यांनी बिभीषणासारख्या मित्राला ओळखून त्याला रावणवधानंतर लंकेचे राज्य दिले. श्रीरामांचे हेसर्व सद्गुण प्रत्येक मनुष्याला दिशादर्शक आहेत म्हणून श्रीरामांचा आदर्श प्रत्येकाने आपल्या जीवनात उतरवावा असाच आहे.
श्रीरामांच्या आदर्शाची आजही ह्या देशाला गरज आहे. वडिलांच्या आज्ञेचे पालन करणा-या त्या श्रीरामाची विज्ञानाच्या ह्या युगातही घराघरात आवश्यकता आहे. तो सुसंस्कारीत श्रीराम आज घराघरात मातांपित्यांनी जन्माला घालण्याची वेळ आज आली आहे.
समाप्त. #रामनवमी विशेष